समोर दिसेल त्या दुकानात घुसून थोडेसे विंडो शॉपिंग करू लागले पण पंधरा मिनिटातच पायांनी कुरकूर करायला सुरवात केली. बिचारे खूप दमले होते शिवाय असाही खूप वेळ आपल्याला विमानतळावर काढायचाच आहे तेव्हा प्रथम थोडा आराम करावा असे ठरवून आम्ही दोघांनी भोज्जाला टच केले. गेट नंबर ७८ हे शेवटचे गेट. सी शेपमध्ये - एका भिंतीला ७२-७४, ७६ दुसऱ्या भिंतीला ७३-७५-७८ व मध्यभागी ७७ अशी गेट्स असून या सगळ्यांच्या सेंटरला मोठ्ठा कॅफेटेरिआ आहे. हुश्श्श..... मी एक मोठा निःश्वास टाकला. हो ना... नाहीतर काही खावे म्हटले की पुन्हा किमान दहाबारा गेट्स तुडवावी लागतील या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आलेला. ७७ च्या समोरच भले मोठे टांगलेले टीवी पाहून एकदाचे स्थानापन्न झालो. जरा श्वास नियमित झाल्या झाल्या मन आजूबाजूला फिरू लागले.
आमच्या समोरच एक वयस्कर व्हाईट अमेरिकन जोडपे बसलेले. त्यांच्या थोडेसे पुढेच एक कपल " तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा " स्टाइलवर स्वतःत मशगुल होते. त्यांच्या शेजारीच.... अरे, ही तर तीच मेक्सिकन मुलगी ना? आपल्यामागेच होती की रांगेत उभी. माझे कुतूहल चाळवले. नेमके तिनेही त्याचवेळी माझ्याकडे पाहिले. मी हात हालवून तिला हाय करताच एखादे कोणी ओळखीचे माणूस दिसावे असे हसू तिच्या चेहऱ्यावर पसरले. तिनेही हात हालवून प्रत्युत्तर केले. आणि बाडबिस्तरा उचलून समोरच बसलेल्या वयस्कर जोडप्याच्या शेजारच्या खुर्चीवर स्थिरावली.
मग तू कुठे मी कुठे जातेय..... आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिची कथा अजूनच वैताग आणणारी होती. पहाटे पाचालाच ती आलेली तरीही ८.०५ मिनिटांची लॉस अँजेलिसची तिची फ्लाईट चुकली होती. त्यातून तिचा सख्खा भाऊ नॉर्थ वेस्टमध्येच काम करत होता. मिळेल ते कनेक्शन घेऊन ती ये असे त्याचे म्हणणे हिला काही केल्या पटत नव्हते. तिचे म्हणणे मी डायरेक्ट फ्लाईटनेच जाणार. ती मिळेतो बसेन इथेच. आता खरे तर नको त्या वेळी हे आडमुठे धोरण उपयोगाचे नव्हते पण तिला समजावणार कोण. ओघाओघात मी तिला म्हटले, अग गंमत म्हणजे माझी बॅग मात्र गेली बरं का त्याच विमानाने. काश त्या बॅगांसारखीच आपल्यालाही तिथूनच कलटी मारता आली असती. या गप्पा शेजारीण ऐकतच होती.
बॅग हा शब्द ऐकताच तिही मैदानात उतरली. ते दोघे मुलीकडे लॉस अँजेलिसलाच निघाले होते. त्यांचीही फ्लाईट चुकली होती. १.५० च्या फ्लाईटची तिकिटे आणि आधीच्या दोनवर ते स्टँड बाय होते. " अग आमच्या दोन्ही बॅग्ज गेल्यात पुढे. सगळी गिफ्ट्सही त्यातच आहेत. आता मला बाई भारी अस्वस्थ वाटतेय. नातवंडांना आजच्या दिवसात भेटणार की नाही काही समजत नाही. ते म्हणतील आजीने आम्हाला चीट केले. येते म्हणाली आणि आलीच नाही." ती अगदी रडवेली झालेली. तिचा नवरा हातावर थोपटून तिचे सांत्वन करत होता. तोच ७४ नंबरवर एकदम गडबड सुरू झाली. एलएचीच फ्लाईट निघणार होती. बोर्डिंग सुरू झालेले. काही लोकांच्या नावाची अनाँन्समेंट सुरू होती. जर ते लोक आलेच नाहीत तर कदाचित या जोडप्याचा व मेक्सिकन मुलीचा नंबर लागू शकला असता. कोणाचीही फ्लाईट, गाडी, बस काहीही चुकणे हे वाईटच त्यात तसे दुसऱ्या कोणाचे व्हावे म्हणजे आपण जाऊ शकू अशी वाट पाहणे म्हणजे...... मनाला एकीकडे अपराधी भावना सतावत असते तर दुसरीकडे आपल्याला जायला मिळेल याचा आनंद. फारच चमत्कारिक अवस्था....
हे तिघेही उठले आणि कॉउंटरपाशी जाऊन उभे राहिले. पण यांच्या आधीपासून नंबर लावून उभे असलेले दोन जण होते. त्यांना फ्लाईट मिळाली. म्हणजे आणखी दोन जणांची चुकली होती. अजून दोन लेडीज नावांची सारखी पुकारणी सुरू होती. अगदी गेट बंद करणार तोच एक जण धापा टाकत आली ... नशीब जोरावर होते तिचे. दुसरीचे नाव पुन्हा एकवार घेऊन तिच्या जागी एका माणसाला त्यांनी पाठवून गेट बंद केले.
अक्षरशः दोन मिनिटेच मध्ये गेली आणि एक अठरा-वीस वर्षांची मुलगी पळत पळत गेटवर येऊन थडकली. अतिशय बारीक शरीरयष्टी, केसांच कसातरी बांधलेला बुचडा. जीन्स, टीशर्ट, खांद्यावर भली मोठी बॅग, पाठीवर दप्तर आणि हातात जाडा कोट. धावताना चष्मा नाकावर घसरलेला. तो सावरायला हात मोकळे नव्हतेच. कॉउंटरवर टेकली तोच कर्मचाऱ्याने आत्ताच गेट बंद केले तेव्हा आता तुला जाता येणार नाही हे सांगताच ती स्तब्ध झाली आणि पाहता पाहता स्फुंदून स्फुंदून रडायलाच लागली. आम्ही सगळे पाहत होतो. कॉउंटरवरील दोघेही जरा बावचळलेच. ही आपली रडतेय रडतेय. एकाने तिचे दुसऱ्या कुठल्याश्या फ्लाईटचे तिकीट करून दिले, पाणीही दिले.

तरीही तिचे रडे थांबेचना. रडतच तिने सगळे सामान उचलले अन आमच्याच रांगेत येऊन सामान फेकून दोन्ही गुडघे पोटाशी घेऊन डोके गुडघ्यात खुपसून खूप वेळ मुसमुसत राहिली. एक विचित्र शांतता पसरली. फसफसून उतू चाललेल्या प्रेमी युगुलाची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. शेवटी त्या दोघांनी परस्परांच्या कुशीत झोपून टाकले. मी पुस्तकात डोके खुपसले. नवरा चक्कर मारून येतो म्हणून सटकला. मेक्सिकन सेलला लटकली. अमेरिकन आजी-आजोबा टीवी पाहू लागले. एकंदरीत पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात आपापल्या चुकलेल्या विमानाची याद प्रकर्षाने उफाळून आली.
असाच अर्धा तास गेला. ही मुलगी शांत झाली. सेल काढून कोणालातरी काय काय झाले त्याचे रंगून वर्णन करत हसू लागली. चला.... निदान हसतेय तरी. वातावरण सैलावले. तोवर ११.४५ झालेले. भुकेची जाणीव चांगलीच सतावू लागली. आम्ही दोघे कॅफेटेरियाकडे निघालो. ती मक्कू मुलगीही आमच्याबरोबर आली व सोबतच खायलाही बसली. " अग मी पहाटेपासून इथे आहे. भाऊ म्हणत होता तसे कनेक्शन घेऊन किंवा $५० देऊन गेले असते तर बरेच झाले असते गं. नाहीतरी बघ ना आता फ्लाईट मिळेतो माझा खाण्यावर तेवढाच खर्च होणार आहे. शिवाय इतका त्रासही. " अग बाई हे तुला कळतेय ना मग कशाला हा हेकटपणा करायचा....... मनातच मी बडबडत होते. तोच बाजूला ओळखीचा आवाज कानावर पडला.
अरे हा तर चिंकीचा आवाज. म्हणजे हे लोक अजूनही इथेच आहेत. आश्चर्याने मी वळून पाहिले.... चिंकू फॅमिली टाको बेलचे विविधप्रकार घेऊन पलीकडेच बसली होती. आजी-आजोबा खूप थकल्यासारखे दिसत होते. तान्हुले झोपले होते. जरा मोठा नातू आजीला मोठे मोठे डोळे करत रंगून काहीतरी सांगत होता आणि चिंकी अजूनही तडतडच होती. तोच अचानक चिंकू पळत सुटला तो कॉउंटरवर जाऊन थडकला. त्याच्या मागोमाग चिंकीही पळाली. तिथे काय झाले कोण जाणे पण परत आले तेव्हा चिंकीचा चेहरा आनंदाने फुलला होता. टेबलपाशी पोचताच एका फ्लाईटची तिकिटे देत नाहीत म्हणजे काय मी बरी गप्प बसेन. ही बघा आणलीच मी मिळवून या आवेशात ती लगालगा आजी-आजोबांना काहीतरी सांगू लागली. त्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रथम अचंबा मग अविश्वास आणि सरतेशेवटी आनंद व सून-लेक जी कोण असेल तिचे कौतुक ओसंडून व्हावू लागले. भरभर खाणे तोंडात कोंबत त्या सगळ्यांनी संपवून गेटकडे धूम ठोकली. चला एका कुटुंबाची तरी नैय्या पार झाली होती.

खाणे संपवून आम्ही तिघे पुन्हा येऊन बसतच होतो तोच अमेरिकन जोडप्याचा स्टँडबाय मध्ये नंबर लागला. ते हॅपी हॉलिडेज-मेरी ख्रिसमस म्हणत बाय करून पळाले. ती फ्लाईट निघताच आम्हाला स्टँडबाय वर टाकलेली फ्लाईट लागली. ते पाहताच नवरा विचारायला गेला. लेकही तोवर अटलांटाला पोचून पुढच्या फ्लाईटची वाट पाहत बसला होता. त्याच्याशी बोलताना एक डोळा नवऱ्याकडे होताच. बोलता बोलता नवऱ्याने खिशात हात घालून पाकीट काढलेले पाहिले आणि मी उमजले. आधीच गगनाला भिडलेले रेटस कमी पडले की काय म्हणून नॉर्थवेस्टने आमची काहीही चूक नसताना आम्हाला अजून $१०० ची फोडणी दिली होती. पण एकदाचे ३.५० च्या डायरेक्ट फ्लाईटचे कन्फर्म तिकीट मिळाले होते. चला आता तरी कुठेही नवीन माशी न शिंकता सकाळी ११.३० वाजता पोचणारे आम्ही दैवाने साथ दिली तर संध्याकाळी ६ वाजता ( म्हणजे डेट्रॉईटच्या वेळेनुसार रात्री ९ वाजता ) पोचणार होतो.
सुतारपक्षी अटलांटावरून वेळेवर उडाला. आम्ही तरीही गेट नंबर ७८ वरच धरणे धरून होतो. अखेरीस ३.१५ ला आमचे विमान आले. ३.३५ ला आम्ही विमानात शिरलो व ४ वाजता चक्क आम्हाला घेऊन विमान उडालेही. टेल विंड असल्याने विमान ५० मिनीटे आधीच पोचले. लेक कधीचाच पोचलेला होता. मित्रही येऊन आम्हा सगळ्यांची वाट पाहत होता. मग सकाळीच रवाना झालेली बॅग पावती दाखवून ताब्यात घेतली आणि मित्राच्या गाडीने घरच्या रस्त्याला लागलो तेव्हा घड्याळात साडेसहा वाजून गेले होते .
मेक्सिकन सेलला लटकली. हा हा खूपच सही शब्दप्रयोग ! शेवटी पोचलात म्हणायचे !
ReplyDeleteहुश्ह्ह.. पोचलात एकदाचे .. इकडे वाचताना इतके वाटत होते तर तुम्हाला तिकडे काय त्रास झाला असेल नाही ... आता पुढच्या वेळेपासून लक्ष्यात राहील ना चांगलेच ... :)
ReplyDeleteफारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.
ReplyDeleteबापरे, खुपंच खस्ता खाल्यात, बरे झाले पोचलात एकदाचे....
ReplyDeleteक्रिसमस टाळुनच अमेरिकेत प्रवास करावा या सल्ल्याबद्द्ल धन्यवाद !
साधक शेवटी म्हणतात ना.... शेवट गोड तर सारेच गोड.:) पुढची सगळी ट्रीप मस्तच झाली.
ReplyDeleteरोहन गेली तीन वर्षे डिसेंबरचा हा असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. इजा-बिजा आणि आता तिजा झालाय. पुढच्या वेळी सारे कसे सुरळीत पार पडेल.... हेहे
ReplyDeleteकल्पना... एक सुन्दर जग... आपले स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)
ReplyDeleteआनंद ... हेहे... पोचलो पोचलो. अहो इतका धसका नका घेऊ... असे काहीतरी घडावेच लागते नाहीतर मजा येत नाही. (मजा नंतर वाटते पण प्रत्यक्ष घडताना जीवाची नुसती घालमेल...:) ) आभार.
ReplyDeleteहुश्श पोचलीस बाबा एकदाची...आणि पोस्टा काय एकसो एक आहेत....सुतारपक्षी काय?? चिंक्यांची मजा काय आणि सेलला लटकलेली मक्कु काय....हे हे ...एकदम मजा आली वाचायला...
ReplyDeleteशेवटी काय ज्याचा शेवट गोड त्याचे सारेच गोड....दोन्ही मिळून एकदम प्रतिक्रिया देतेय...तिळासारखी गोड मानुन घे....
कोलंबस ला देखील असे अनुभव हि आले असतील न?
ReplyDeleteअपर्णा तिळगुळासारखी तुझी प्रतिक्रिया गोड आहे बरं का. ....हा हा.
ReplyDeleteAkhil स्वागत व आभार. हा हा...कोलंबसचे अनुभव.... भन्नाटच असतील.
ReplyDeleteचला म्हणजे इतक्या ट्वीस्ट्स नंतर एक्दाच्या सुखरुप पोहोचलात.. खरच काही घटना प्रत्यक्ष घडताना जीवाचे हाल होतात पण नंतर मजा वाटते ती घटना आठवल्यावर...
ReplyDeletedavbindu,पोचलो बाबा एकदाचे.:) बरेचदा मी म्हणते की मन शांत ठेवून परिस्थिती enjoy करायची, पण..... जमताच नही। हेहे...., आभार.
ReplyDeleteसगळे भाग वाचल्यावर प्रतिक्रिया द्यावी म्हणून थांबले होते ... म्हटलं शेवटी पोहोचता आहा्त का नाही :)
ReplyDeleteमोठ्या एअरपोर्टवरची एका गेटपासून दुसऱ्या गेटपर्यंतची वरात म्हणजे परीक्षा असते खरंच ... सामान घेऊन धावायचं,त्यात तिकिट, पासपोर्ट, बोर्डिंग पास असं सगळं वर, कॅमेरा गळ्यात, केबीन लगेजचं लोढणं मागे, आणि शिवाय वेळेवर पोहोचू का नाही ही धाकधूक !
सुतार पक्षी खासच आणि चिंकू आणि मक्कूचं वर्णन एकदम भारी.
गौरी, पोचलो पोचलो ग एकदाचे.:) आभार.
ReplyDelete