जाता जाता एक नजर इथेही........

Friday, March 26, 2010

मराठी माणसाला काय येतं ???

मंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात आहेतच. अशी महान व्यक्तिमत्वे व त्यांचे असामान्य कार्य काळाच्या ओघात हरवत चालले आहे. केवळ मराठी मराठी म्हणून हा गवगवा नसून जे ठळक सत्य आहे तेच दर्शविलेयं.


मराठी माणसाला काय येतं ....











29 comments:

  1. छान प्रेरणा देणारी लिस्ट आहे. सुंदर !!!

    ReplyDelete
  2. जबर्‍या विरोप आहे हा!!! गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!

    ReplyDelete
  3. वा. मस्तच.. खुपच छान यादी आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं यात अजूनही अनेक नावं घालता येतील.

    ReplyDelete
  4. एकदम मस्त झाली. आणि खरही आहे.

    ReplyDelete
  5. मला हा इमेल मिळाला नव्हता, पण महती माहिती होती आणि विश्वास आहे.....खुप धन्यवाद!

    ReplyDelete
  6. sahiiiiiiiiiiiiiiiiiii..........

    ReplyDelete
  7. सगळं चांगलं आहे पण घोडं अडतं कुठे याचा विचार करायचा का तरीही??? हा विचार करतेय....पण हे सगळं वाचलं की तात्पुरतं का होईना बरं वाटतं....

    ReplyDelete
  8. S R Walke, ब्लॉगवर स्वागत आहे.

    ReplyDelete
  9. मनमौजी,गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!

    ReplyDelete
  10. हेरंब, हो ना. नक्कीच घालता येतील.

    आनंद, या व अश्या अनेक महान व्यक्तिंची महती महान आहे.

    ReplyDelete
  11. hemantathalye, आभार.

    माऊ.... :)

    ReplyDelete
  12. अपर्णा, सहमत आहे. घोडं अडतयं कुठे तेही कळतयं पण त्यांना अडवण्याचे सामर्थ्य नाही गं सामान्य माणसात. मात्र या सामान्यातूनच असे असामान्य लोक महाराष्ट्रात झाले व यापुढेही होतीलच अशी खात्री आहे.

    ReplyDelete
  13. mastach...pan aaplach aaplywar vishwas nahi tayla kay karnar!

    ReplyDelete
  14. prajkta, आणि त्याचाच काही पुरेपूर फायदा उठवत आहेत ना.... :(

    ReplyDelete
  15. 'मरकर भी नाही हटा वो मरहट्टा' ... असे मुघल म्हणायचे ते उगाच नाही.

    'करेंगे या मरेंगे' या पेक्षा 'बचेंगे तो और भी लढेंगे' यावर आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. मराठीला मरण नाही... !!!

    ReplyDelete
  16. मस्त..मराठी माणसाला काय येत नाही. सगळ्या क्षेत्रात आहे पुढे आणि राहील

    ReplyDelete
  17. रोहन, मुघलांचे हे वाक्य आजही सार्थ करणारे ते मराठी. आपली वाटचाल यशस्वीच असणार-असायला हवीच.:)

    ReplyDelete
  18. suhas, नक्कीच. आभार.

    ReplyDelete
  19. मला पण कालच आली मेल ने ही यादी..
    असं काही वाचलं की बरं वाटतं!!
    धन्यवाद.

    ReplyDelete
  20. मस्तच गं!!!
    खूपच मस्त .....

    किती खरयं..लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...

    हे मेल मला आलेले नव्हते बरं झालं तू इथे टाकलेस!!!

    ReplyDelete
  21. मी पहिल्यांदा वाचलं. दिल खुश होगया!
    सोनाली

    ReplyDelete
  22. मराठी माणसाला काय येतं?
    मला राजानेच पाठवले आहे. हे खूपच छान आहे. मला आवडलं. त्यात फोटो आहेत ते मला आवडले. पण त्यात एक चूक आहे. पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी काढली, महर्षी कर्वे यांनी नाही.
    मला दुसर्‍या कुणीतरी पाठवले आहे त्यात बाकी हेच आहे फक्त फोटो नाहीत. आणि पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना: महात्मा फुले, हे बरोबर दिले आहे.
    अंजली सरदेसाई

    ReplyDelete
  23. महेंद्र, असे काही वाचले की अभिमान वाटतो.

    ReplyDelete
  24. तन्वी,सोनाली... यस्स्स्स.... दिल खुश हो गया!

    ReplyDelete
  25. आई, बरे झाले तुम्ही सांगितलेत. मलाही ही मेल राजानेच पाठवली. लगेच सुधारणा केली आहे. अनेक धन्यवाद.

    ReplyDelete
  26. आपण बरच काही विसरतो असं मला वाटतं. समर्थ रामदासानी महिलांना मठाच्या प्रमुख पदी नेमलं.महिलांना असं महत्वाच्या पदी नेमून त्यांच्यावर जबाबदारी सोपवणा्रे पहिले संत ”समर्थ" होत

    ReplyDelete
  27. सावधान, ब्लॉगवर स्वागत आहे. अगदी खरेयं तुमचे म्हणणे.... अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

    ReplyDelete
  28. अतिशय छान just added your link http://www.marathisuchi.com/upcoming.php

    ReplyDelete
  29. marathisuchi, स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !