पाहता पाहता बसने किंग्जसर्कल गाठले अन त्या चिरपरीचीत फालुदाची तीव्रतेने आठवण आली. न चुकता प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपली की बाबा सगळ्यांना नको नको होईल इतका फालुदा खाऊ घालत. आता कुठे बरे गेला असेल तो फालुदावाला....... एकदा तरी लेकाला त्याच्याकडचा फालुदा खिलवायची इच्छा होती. रसभरित वर्णने ऐकून लेकही फार उत्सुक होताच. दोन चार वेळा लेकाला बरोबर घेऊन तिने किंग्जसर्कलला चकराही मारल्या होत्या. पण लकने साथ दिलीच नाही. अशी कितीतरी माणसे मनावर छाप सोडून जातात........ कितीही काळ मध्ये गेला तरी ठळक आठवतात......मनात रेंगाळतच राहतात........
बस पुढे सरकत होतीच. सायन हॉस्पिटल आले आणि बस, स्टॉपवर थांबली. शमेचे हृदयही थांबले. अगदी डोळेभरून तिने त्या बसस्टॉपकडे पाहिले. लोक चढत होते-उतरत होते...... बस गच्च भरली होती. कंडक्टरचा आवाज, लोकांचे आपसातले बोलणे, कोलाहल काहीही ऐकू येईनासे झाले....... जणू सगळे कुठेसे अदृश्यच झाले होते..... दिसत होता फक्त तो बसस्टॉप अन अतिशय आतुरतेने, काळजात उडणारी फुलपाखरे घेऊन, खुशीच्या लाटेवर आरूढ झालेली ’ त्याची ’ वाट पाहणारी एक गोडशी मुलगी..........
" भिडेबाई..... अहो भिडेबाई...... शमा, तुझ्या अहोंचा फोन आहे....... येतेस घ्यायला, की ठेवून देऊ? " अहिरेसाहेबांनी हाकांचा सपाटा लावला होता. अय्या! अभीचा फोन..... आत्ता... यावेळी...... साहेब पण ना....... किती जोरात ओरडताहेत...... सगळ्या सेक्शनला कळले....... शमेचा चेहरा अगदी लाल लाल होऊन गेला. अहोंचा फोन..... अभिषेक आणि अहो...... मोहरून गेली शमा. तोच पुन्हा साहेबांनी जोरात हाकारले, " शमा, अगं येऊ नकोस आता..... मी त्याला सांगितले...... आमच्या भिडेबाईंना अजिबात वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला. त्या त्यांच्या मनोराज्यात रममाण आहेत. तेव्हां उगाच पुन्हा फोन करून त्यांच्या तंद्रीचा.... आय मीन दिवास्वप्नांचा भंग करू नये. "

तोवर शमा साहेबांच्या केबिनच्या दरवाज्यात पोचली होतीच. तिने पाहिले तर काय, साहेबांनी खरंच फोन ठेवून दिलेला होता. ते पाहून शमा अगदी रडकुंडी आली......, " साहेब, असं काय हो....... तुम्ही पण नं...... येतच होते नं मी...... आता अभिषेक कित्ती रागावेल मला. म्हणेल यापुढे तुला कधीच फोन करणार नाही......... " तिचा रडवेला चेहरा पाहून मोठ्याने हसत साहेब म्हणाले, " शमाबाई, अहो इतका काही खडूस नाहीये मी........ आता तो रडका मूड हसरा करा आणि घ्या तिकडून फोन...... अगं होल्डवर ठेवलाय ना त्याला ...... बाहेरून घे, म्हणजे तुला मोकळेपणे बोलता येईल. बघत काय उभी राहिलीस. घे पटकन, अभिषेक वाट पाहतोय ना..........., चालू दे तुमचे..... " तशी लाजून शमा पटकन स्टेनोच्या रूममध्ये पळाली.
साहेबही, हल्ली फारच खेचत असतात आपली...... असा विचार करत धडधडत्या मनाने तिने रिसीव्हर उचलला आणि....... हॅलो म्हणताच पलीकडून अगदी गंभीर आवाजात अभीने, " हॅल्लो..... मी अभिषेक बोलतोय...... " अशी सुरवात केली. ते ऐकून त्याला मध्येच तोडत ती चिवचिवली, " हो का! अभिषेक बोलतोय का? अभिषेक म्हणजे.....? मी नाही बाई ओळखत कोणा अभिषेकला. ( मग त्याला वेडावून दाखवल्यासारखे करत....... ) काय रे, एकदम फॉर्मल...... म्हणे मी अभिषेक बोलतोय...... अभ्या, सरळ बोल की नेहमीसारखा..... "

तसा अभी वैतागला. " च्याय...... सॉरी....... जाऊ दे..... ए पण त्याशिवाय जोर येत नाही ना......... तू सवय करून घे गं बाई...... तर काय म्हणत होतो.......हां..... च्यायला...... मागच्या वेळी, मी फोन केला होता..... तेव्हां, तू फोन घेतल्यावर....... हम्म्म्म्म, बोला.......... असे केले तर काय म्हणाली होतीस? आठवं आठवं. हे, हम्म्म्म्म...... म्हणजे काय? हॅल्लो करावे, मी अभी बोलतोय.... काही म्हणशील का नाही? नुसतेच म्हणे हम्म्म्म्म्म, बोला........... , म्हणून आज स्वत:ची ओळख करून दिली आधी...... न जाणो बाईसाहेब गरीबाला विसरल्या असतील तर.........त्याचे जरा कवतिक करायचे सोडून पुन्हा काहीतरी खुसपट काढलेसच का तू........... बये, अजून आपले लग्न झालेले नाही..... आत्तापासूनच तू मिऱ्या वाटायला लागली आहेस. ये ना चालबे.......नो नो...... ये ना चालबे........ "
" नो नो, ये ना चालबे काय......, बरं. मग काय करायचा विचार आहे......... नको करूयात का लग्न? सांगून टाक पटकन....... अजूनही तो तळेगावचा सर्जन..... तोच रे...... चांगले चार मजल्याचे, चाळीस खाटांचे हॉस्पिटल आहे बरं का त्याचे....... पंचक्रोशीत बक्कळ नाव कमावलेय इतक्या तरुण वयातच...... आणि त्याची आई....... ती तर अगदी फिदाच झाली होती माझ्यावर....... वाट पाहतोय माझ्या उत्तराची. देऊन टाकू का होकार त्याला? मग बस तू खुंट वाढवून देवदास बनून गाणी म्हणत......... काय? " त्या हरामखोर सर्जनला, त्याच्याच हास्पिटलात जायबंदी करून भरती करतोच बघ आता....... अगं तो माणसांचा नाही काही, गुरांचा डागदर असेल....... बसशील जन्मभर त्याच्या मागे मागे शेणाची पाटी घेऊन फिरत..... निघाली लागली तळेगावला. " अभी आता जाम भडकला होता. तो तो शमा हसून हसून त्याला अजूनच भडकवत होती.
कोणीतरी मागून खाकरले तशी पटकन भानावर येत तिने म्हटले, " ये अभी, सोड त्या डॉक्टरला....... सध्या त्याला साईडींगला ठेवलाय. उचक्या लागून लागून बेजार झाला असेल बघ तो. आधी तू सांग, कशाला फोन केला होतास? सहजच ना? " " बरे झाले विचारलेस, नाहीतर त्या तुझ्या गुरांच्या- आणि नऊवार नेसून, हात बरबटून त्यांचे शेण गोळा करत कशी अगदी शिफ्तर दिसशील तू हे पाहण्याच्या नादात मी मेन गोष्ट विसरूनच गेलो असतो....... तर ऐक शेणमाये.........अर्रर्रर्र..... महामाये....... आता मला बरेच पिडून झालेय आधीच तेव्हां बिलकूल खळखळ न करता आज संध्याकाळी साडेसहाला सायन हॉस्पिटलच्या बस स्टॉपवर भेट. मी वाट पाहीन तुझी."
हे ऐकताच शमा खूश झाली, वरकरणी मात्र, " अरे पण...... आधी तरी सांगायचेस. आता आईला कळवायला हवे...... नाहीतर ती काळजी करत बसेल. आज नको रे..... प्लीज.... उद्या भेटूयात नं. प्रॉमिस. " " शमे..... उद्या नाही आजच. उगाच लाडात येऊ नकोस. आणि आईला एक फोन करून सांग की अभिषेकचा फोन आला होता आणि त्याने भेटायला बोलावले आहे. काय? अगं आपले लग्न ठरलेय आता........ विसरलीस? चल मग, ये गं वेळेवर. बाय. " " अरे अरे अभी..... ऐक तर......... "

कमालच केलीन याने. चक्क फोन ठेवूनही दिलानं पाहा......... आता आईला सांगायला हवे. शिवाय साहेबांनाही सांगून पंधरा मिनिटे लवकर निघायला हवे....... कुठे भायखळा आणि कुठे सायन....... चेहरा मात्र वेगळेच बोलत होता........ आनंदाने तिने स्वत:भोवतीच एक गिरकी मारली तसे नुकत्याच रूममध्ये शिरलेल्या स्टेनोने अगदी खास त्याचा दक्षिणी-मराठी हेल काढून सगळ्यांना हाकारून तिची फिरकी ताणायला सुरवात केली. त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........
क्रमश:
पुन्हा क्रमश:???नको ग राणी...जीव घेउ..टाक ग लवकर..शमा आणि अभी त गुंतत चालले आहे मे..वाट पाहींग..
ReplyDeleteवा.. मस्त ओघवती आहे... क्रमशः नको अजिबात.. :-)
ReplyDeleteमाऊ ममं...
ReplyDeleteआणि ताई नो कमेंट्स फ़ॉर धिस क्रमश: प्रकरण...नुसते टांगून ठेवता तुम्ही लोक....
टॅगा- टॅगी नंतर आता टांगा टांगी चालू झालय का???? क्रमशः नको. . . कथा अगदी मस्त झाली आहे. . .क्रमशः साठी. . . नि.....षे.....ध!!!!!!
ReplyDeleteसर्वांना क्रमश:चे वारे लागले आहेत. :( पटापट लिहा आता... :D
ReplyDeletestory wachali, ekdam chhan ahe, yach uttarardha lawkar pathvane
ReplyDeleteखरच क्रमश: नको, please.
ReplyDeleteगोष्ट संपेपर्यंत डोक्याचा भुगा होतो.
सुंदर कथा आहे.मराठी साहित्य हे असे असावे...भावनांचा गोफ छान विनला आहे.वाचकाला कथा खिळवून ठेवते....संपू नये वाटते.
ReplyDeleteचिमुकल्या जीवनात असे प्रेमाचे क्षण फार कमी येतात ते जपून ठेवावे वाटतात....शब्दातून असे क्षण शब्दबद्द करून वाचकाना सुखावणारे लेखन करत आहात.आपण महान आहात.आपली भाषाशैली उत्ककृष्ट आहे.पुढची कथा वाचायला नि ब्लॉग पाहायला पुन्हा पुन्हा येणार....Bharati
क्रमश:???नको... ५-६ वेळा ब्लॉग चेक करावा लागतो, लवकर येउ द्या
ReplyDeleteमी क्रमश: वाली कथा जेव्हा पूर्ण होते तेव्हाच वाचतो. काय करणार Digital World आहे म्हणे हे. Either zero or one !! :)
ReplyDeleteपण खरच क्रमश: वाचायला नको वाटत. म्हणून एकदमच वाचतो कथा.
ह्या आठवणीनं तिच्या डोळ्यात पाणी आलं ही हिंट आहे नीट लक्षात!
ReplyDelete:)
छान
माऊ, टाकते गं आज पुढचा भाग.....
ReplyDeleteहेरंब, तन्वी, रोहन.....अरे एकदम इतकी मोठी पोस्ट टाकली तर... इतका वेळ कुठेय कोणाकडे वाचायला..... म्हणून ही तुकड्या तुकड्यात.... :P
ReplyDeleteमनमौजी, धन्स रे. आज वाच हं का.... :)
ReplyDeleteसोनाली, इतर वेळी मीही असेच म्हणते गं.... पण आज मीच लिहीतेय म्हटल्यावर..... हा हा.... टाकतेय आज पुढचा भाग.... :)
ReplyDeleteभारती, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. इतक्या छानश्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार. कथा भावतेय हे वाचून बरे वाटले...
ReplyDeleteआनंद... हा हा....येतोय पुढचा भाग....
ReplyDeleteविक्रम, अहो.... आज एकदम दोन्ही भाग वाचा..... :)
ReplyDeleteAnonymous, मी काही बोलणार नाहीये यावर टिपणीत... पाहुया काय होतेय पुढे.... :)
ReplyDeleteबघा मी एव्हढ्या रात्री पण येवून गेले ब्लॉगवर पण पुढच्या भागाचा पत्ता नाही :)
ReplyDeleteसोनाली
दुसर्या वेळेस चेक केले
ReplyDeleteसोनाली..... अग, सकाळपासून थोडी धावपळ झाली गं.... त्यामुळे उशीर झाला....सॉरी... आता टाकलाय बघ.
ReplyDeleteआनंद, टाकलीये रे पोस्ट.....:)
ReplyDelete