जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, March 7, 2010

गोठलेला नायगारा - चित्रफिती

शब्दातीत आहे सारेच. डोळ्यांचे पारणे फेडणारे वर्णनातीत निसर्गाचे एक आगळेच रूप. जिकडेतिकडे चकाकणारे हिमाचे शुभ्र ढीग व झिरपणारा थंडावा. नायगारा नदीच्या कोसळण्यासाठी झेपावणाऱ्या पाण्याला मधूनमधून अडथळा करू पाहणारे लहानमोठे बर्फाचे खडक. कड्यावरून आवेगाने स्वत:ला झोकून देऊन समर्पित झाल्यावर काहीसे शांत होऊ पाहणारे पाणी अन लागलीच त्याचा हिमाने घेतलेला कब्जा. थोडासा उशीरच झालाय या चित्रफिती टाकायला, त्याबद्दल दिलगीर आहे.

गोठलेला नायगारा11 comments:

 1. फ़ंडु आहेत एकदम आणि ध्वनियोजनाही एकदम झकास....नायगारा म्हणजे फ़ार आठवणीतला आहे गं..एकदा स्वतः आणि भारतातून येणार्‍या घरच्यांबरोबर असा कितींदा पाहिलेला..आज असा गारठलेला तुझ्यामुळे दिसतोय नाहीतर आता गेलो आम्ही नायगारापासूनही लांब लांब...

  ReplyDelete
 2. वाह...क्या बात है..श्री..इथे घर बसल्या बसल्या नायग~याचे दर्शन तु आम्हाला करवुन दिलेस...धन्यवाद ..[:)]

  ReplyDelete
 3. गोठलेला नायगारा फॉल्स फारच अप्रतिम दिसतोय. तुझ्यामुळे पाहायला मिळाला. थॅक्स.
  मनाली

  ReplyDelete
 4. सही.. एकदम मस्त आहेत..

  ReplyDelete
 5. अप्रतिम!
  निसर्गा इतका आनंद जगात दुसरी कुठलीही गोष्ट देत नाही.
  सोनाली

  ReplyDelete
 6. मनाली, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 7. महेंद्र,सोनाली.... :)

  ReplyDelete
 8. अप्रतिम. कसला जबरदस्त अनुभव असेल हा !!

  ReplyDelete
 9. आणि श्री सर्वात जास्त कौतुकास्पद म्हणजे..गाण्यांची धुन पण सही पकडली आहेस.पंडीत.जोगकाकांची आहे ना..वायोलीन...गाता रहे मेरा वायोलिन...

  ReplyDelete
 10. हेरंब, पुढच्या वर्षी योग साधाच. तोवर आदित्यही थोडासा मोठा होईल.:)

  ReplyDelete
 11. माऊ, ओळखलेस बरोबर फक्त ते त्यांचे नाहीये. आर.डीच्या ऑर्केस्ट्रातले आहे.बेमिसालच्या ये री पवनची....आणि दुसरी जुर्मानाची... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !