जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, March 21, 2010

सकाळने घेतली दखल....

दोन तीन दिवस नेटवर जवळजवळ नव्हतेच. घरात गडबड-प्रवास, त्यामुळे ब्लॉगवरही खूपच कमी आले. काल मध्यरात्री फोनवर टुंग झाले. गाढ झोपेतच मी विरोप उघडला. दोघा-तिघांच्या टिपण्या दिसल्या त्यातच आल्हादची टिपणी होती. एक एक टिपणी वाचत त्याचीही उघडली, वाचली आणि एकदम दिल खूश झाला. त्याने म्हटले होते, " सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपल्या ब्लॉगचा उल्लेख आलाय... याच लेखाच्या संदर्भात! अभिनंदन....... " आल्हाद धन्यवाद. तुम्ही सांगितलेत म्हणून लगेच कळले.

बारा तासांच्या प्रवासाने अतिशय शिणले असूनही ' सकाळच्या लेखावर ' जाण्याचा मोह आवरला नाही. सम्राट फडणीसने दिलेले वृत्त वाचले. माझ्या पोस्टची-ब्लॉगची घेतलेली दखल मनाला आनंद देऊन गेली. ' सकाळ व सम्राटचे ' अनेक आभार. त्याचबरोबर संपूर्ण ब्लॉगविश्वातील मित्र-मैत्रिणी-ओळखीचे व अनोळखीही ब्लॉगधारकांचे अभिनंदन! सकाळने व अनेक वृत्तपत्रांनी, स्टार माझाने या आधीही ब्लॉगविश्वाची दखल अनेकदा घेतलेली आहेच. आज पुन्हा एकवार ब्लॉगिंगच्या अनेकविध मुद्द्यावर विस्तृत लिहून या सशक्त माध्यमाचे चांगले-उपयुक्त गुण आवर्जून मांडले आहेत. धन्यवाद.

त्याचबरोबर आवडीने व नेमाने ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार. वेळोवेळी व आवर्जून आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह टिकून आहे.

सकाळच्या वृत्तातील काही मजकूर खाली देत आहे.

प्रतिबिंब समाजमूल्यांचं

मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाचा दर्जा हा अत्यंत उच्च आहे, असा अजिबात दावा नाही. तसा तो कोणत्याही लिखाणाबाबत सरसकट करताही येत नसतो; मात्र प्रस्थापित मराठी साहित्याला समकक्ष किंवा समांतर अशी ही निर्मिती आहे, हे नक्की. हा दावा नाकारणं म्हणजे साहित्यनिर्मितीच्या मूलभूत प्रेरणेशी प्रतारणा ठरू शकेल; कारण साहित्यनिर्मितीची मूलभूत प्रेरणा ही आत्यंतिक व्यक्तिगत असते. रोजच्या जीवनातल्या अनुभवांपासून या मूलभूत प्रेरणेला प्रारंभ होतो. तो अनुभव घेऊन कल्पनाशक्तीच्या भरारीवर उच्चकोटीचे साहित्य निर्माण झाल्याचे दाखले मराठी साहित्यात ढीगभर आहेत. हीच मूलभूत प्रेरणा ब्लॉगर्समध्ये आणि त्यांच्या ब्लॉग्जवरील साहित्यात आहे. किंबहुना प्रस्थापित मराठी साहित्यात जेवढे नव्या पिढीचे, बदललेल्या समाजमूल्यांचे प्रतिबिंब येत नाही, त्याहून अधिक ते मराठी ब्लॉग्जमध्ये येते आहे. आणि हे मान्य केले पाहिजे.

त्यामुळेच नोकरीच्या रोजच्या धबगड्यासाठी होणाऱ्या प्रवासात भेटलेला एक भिकारी मुलगा लिखाणाचा (संदर्भ -
http://sardesaies.blogspot.com/) विषय होऊ शकतो. "टिपूर तारे साक्षीला अन्‌ चंद्रकोरही लोभसवाणी... रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी,' असं तरल काव्य (संदर्भ -http://www.misalpav.com/node/10662) ब्लॉगर्सच्या व्यासपीठावर जन्म घेतं. "नसतेस ऑनलाइन जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जीटॉकचे विरती धागे, ऑरकूट फाटका होतो...', असं विडंबन ब्लॉगवर (संदर्भ -http://vikrantdeshmukh.blogspot.com/) धमाल उडवतं. एड्‌सनं आई-बाबा हिरावले गेलेल्या दोघा चिमुरड्या भावांची दीर्घकथा (संदर्भ - http://ffive.in/journy/1259) ऑनलाइन नवसाहित्यविश्‍व विलक्षण अनुभवानं समृद्ध करते. "गाढव आयुष्यभर ओझं वाहतं, म्हणून काय ते ट्रान्स्पोर्टर बनतं का?', असा खोचक सवाल अनुभवांचं विश्‍व उलगडताना ब्लॉगवर (संदर्भ - http://kayvatelte.wordpress.com/) सहजपणे व्यक्त होतो.

सकाळचे संपूर्ण वृत्त
येथे वाचता येईल.

34 comments:

  1. Wow...Abhinanadan...navin warshachi chan bhet aahe bagh tula.....aata mast kahi tari goad kar ani khayala dhad....:)
    (Majha laptop chalu kela nahiye mhanun minglish madhe re detey....karan i just cant wait to congratulate you....)

    ReplyDelete
  2. वा वा वा भाग्याश्रीताई.. खूप खूप अभिनंदन !!!

    ReplyDelete
  3. अपर्णा, हेरंब, खूप छान वाटले.:) धाडते गं तुला आणि हेरंबलाही. ( नाहितर निषेध येईल... :P )

    ReplyDelete
  4. अभिनंदन ताई... सकाळ, साप्ताहिक सकाळ आणि इ-सकाळ हे ब्लोग्सची चांगली दखल घेत आहेत. माझ्या आणि पंकजच्या ब्लॉगचा देखील उल्लेख २० फेब.च्या साप्ताहिक सकाळ मध्ये आला होता... :)

    ReplyDelete
  5. रोहन, अभिनंदन! मला लिंक पाठवशील?

    ReplyDelete
  6. भाग्यश्रीताई आणि रोहन...
    अभिनंदन...अभिनंदन...अभिनंदन...

    ReplyDelete
  7. लिंक नाही आहे.. scanned फोटो पाठवतो लवकरच... :)

    ReplyDelete
  8. भाग्यश्रीजी अभिनंदन!!
    पाडव्याचे आणि आजचे मिळून 'श्रीखंड' जमवा आता :)

    ReplyDelete
  9. congrats Bhagyashree.
    Kalach Indiahun parat ale. alya alya esakal wachla teva blogbaddal bare lihillele pahun jara ascharya watle nahitar to ek cheshtecha wishay asto...aso...blogwar khup wegweglya prakarche likhan wachayla milte he nakki ani kahi wela watte masike wachnyapeksha he changle. aso...

    ReplyDelete
  10. दवबिंदू, आनंद अनेक आभार.
    आनंद, श्रीखंड पाडव्याला केलेच होते पण शोमूने फोटू काढायच्या अगोदरच सुरवात केली. :) आता पुन्हा केले की जालावर धाडतेच तुम्हाला.

    ReplyDelete
  11. माधुरी, आलीस का. कशी झाली मायदेशाची वारी? चांगलीच होणार म्हणा.... खरेयं गं. बरेचदा चेष्टा होतेच. मात्र आजच्या लेखात अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख आहे.:)

    ReplyDelete
  12. मनापासून अभिनंदन श्रीताई!

    ReplyDelete
  13. अरे वा क्या बात है!! अभिनंदन त्रिवार अभिनंदन..

    लिहीत रहा बयो!!!!

    ReplyDelete
  14. भाग्यश्री,
    अभिनंदन!!
    आणि तो लेख आहेच दखल घेण्यासारखा.
    उद्या जातोय आम्ही वरोऱयाला आनंद वनात. :) सुटी एंजॉय करतोय..

    (माहेरवासी) महेंद्र

    ReplyDelete
  15. प्लीज, अहो-जाहो नको, मी लहान आहे...

    ReplyDelete
  16. त्रिवार अ.भि.नं.द.न.........पार्टी कुठे...........................???

    ReplyDelete
  17. सोनाली, गौरी अनेक आभार.:)

    ReplyDelete
  18. माऊ, धन्यवाद गं. आता मी आले की धमाल करूच नं... :)

    ReplyDelete
  19. तन्वी, महेंद्र... :)

    महेंद्र, काय... माहेरपण जोरदार चाललेय ना. थालीपीठ तेही ताज्या ताज्या लोण्य़ाबरोबर.... जाम जळलेयं मी तुझ्यावर... लोणी आणि थालीपीठ... मला पण हवे. आईला सांग लेक येतेय माहेरपणाला.

    ReplyDelete
  20. अभिनंदन ताई!

    ब्लॉगची नविन टेम्प्लेट एकदम अफलातुन !

    ReplyDelete
  21. सलिल,प्रयत्न केला धीर करून... :) आणि तू सांगितल्याप्रमाणे फिरता फळाही लावला. अनेक धन्यवाद रे.

    ReplyDelete
  22. sakal nehmich changlychi dakhal ghete.

    ReplyDelete
  23. Arey kya baat hai !!!!Khup Khup khupppp Abhinandan.Keep going dear.

    ReplyDelete
  24. प्रसाद, क्रान्ति, अनेक आभार. :)

    ReplyDelete
  25. prajkta, टिपणी एकदम भावली रे. धन्स.

    ReplyDelete
  26. asana, धन्स गं. खूप खूप छान वाटले तुझी प्रतिक्रिया आली.

    ReplyDelete
  27. अभिनंदन
    नवीन टेम्प्लेट छान आहे

    ReplyDelete
  28. esudip, ब्लॉगवर स्वागत व आभार.

    ReplyDelete
  29. अभिनंदन भाग्यश्री. तू केलेल्या लिखाणाचं चीज झालं असं नाही म्हणत कारण कुठेतरी छापून येण्याच्या इच्छेने तू लिखाण करतेस असं निदान मलातरी वाटतं नाही. पण इतक्या ब्लॉग्जच्या मांदियाळीत तुझ्या ब्लॉगची दखल घेतली गेली, यातच काय ते आलं. तुझं संवेदनाक्षम मन असंच कायम राहू देत हीच ईच्छा.

    आणि हो, ब्लॉगला नवीन वर्षाला केलेले कपडे छान दिसतायत.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !