जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, March 23, 2010

ज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!


भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
ज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज ८७वी पुण्यतिथी. २३ मार्च १९२३ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल ( इंग्रजांच्या मते ) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश, मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत. शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले ( तेही कोणाला आठवण राहिली तरच .....), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले......." अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा.... नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो.... ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही...... आणि गरजही नाही. " खरेच आहे ना...... जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे........... तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी - स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे - हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. ( दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे . ) फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे ..... नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा तरच कदाचित.......

11 comments:

  1. शहीदों की चितायों पे ... लगेंगे हर बरस मेले ... वतन पर मिटने वालों का ... बाकी यही निशां होगा ... !

    ReplyDelete
  2. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सर्वच ज्ञात अज्ञात वीरांच्या चरणी नतमस्तक !!

    ReplyDelete
  3. या संबंधित विषयावर चा माझा लेख अवश्य वाचावा
    हरवलेली पाने शोधतांना -http://maplechipaane.blogspot.com/2009/12/blog-post_26.html

    बाकी लिहिलं उत्तमच आहे.
    तुमच्या ब्लॉग चा मी नियमित वाचक आहे.

    ReplyDelete
  4. खरंय भगतसिंग शेजारच्या घरी असला तर बरं अशा विचारांचे सगळेही तितकेच दोषी..
    या आणि इतरही अशा अनामवीरांना नेहमीच प्रणाम आणि व्यर्थ न होवो हे बलिदान इतकंच म्हणायचं आणि पुन्हा एकदा दुसर्‍या हल्ल्याला तयार व्हायचं हीच सध्याची मानसिकता आहे...

    ReplyDelete
  5. पुर्णपणे विसरलो होतो ..!! आठवण करुन दिलीस त्याबद्दल आभार.
    खूप बरं वाटलं पोस्ट वाचून.मनःपुर्वक श्रध्दांजली..

    ReplyDelete
  6. रोहन, हेरंब... सर्वच ज्ञात अज्ञात वीरांच्या चरणी नतमस्तक !!

    ReplyDelete
  7. शंतनू, नक्की वाचते. आपण नेमाने ब्लॉग वाचता, अनेक आभार.

    ReplyDelete
  8. अपर्णा, खरेयं गं. आजची परिस्थिती अशीच झालीये. :(

    ReplyDelete
  9. महेंद्र, सगळ्यांना श्रध्दांजली!!!

    ReplyDelete
  10. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

    ReplyDelete
  11. कृष्णा घोडके, ब्लॉगवर आपले स्वागत व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !