जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, March 6, 2010

प्रिटी वूमन......प्रिटी वूमन........

आत्ताच पाहिला...... कितव्यांदा.... पंचवीस-तीस..... जाऊ दे ना, कशाला मोजायचे. कधीही आणि कितीही वेळा पाहावा इतका सहज सुंदर सिनेमा. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा. नाही नाही मी त्याचे रसग्रहण-समीक्षा काहीही करणार नाहीये. माझा अत्यंत आवडता सिनेमा. जूलिया रॉबर्टसचा नितांत सुंदर-पारदर्शी -बोलका चेहरा व जीवघेणे हसू आणि देखणा- काहीसा अबोल- स्वतःच्या कोशात मग्न रुबाबदार रिचर्ड गेर व या दोघांचा काळजात उतरत जाणारा अभिनय, तितकेच समर्थ संवाद व गॅरी मार्शलचे दिग्दर्शन. आजही व्हॅलेंटाइन डे साठीच्या सिनेमा पसंतीत प्रिटी वूमनचाच नंबर पहिला आहे. अतिशय हलकीफुलकी नर्मविनोदी लव्हस्टोरी. जूलिया आणि रिचर्ड यांच्या प्रेमात न पडणारी माणसे विरळाच. १९९० साली आलेला प्रिटी वूमनची या आठवड्यातील आवडीचे प्रमाण: ३६%, हे आकडेच किती बोलके आहेत. आनंदाची लागण करणारा ऑल टाइम फेवरेट असा प्रिटी वूमन चुकून कोणी पाहिला नसेल तर
येथे पाहता येईल.

15 comments:

 1. अहाहा... सदाबहार चित्रपट. १५-२०-२५ नंतर काउंट ठेवलाच नाही. अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही.

  ReplyDelete
 2. जुलिया रॉबर्ट्स माझीही जाम आवडती आहे गं!!!

  पण ह्यो शिणेमा अजुन बी पाह्यलेला नाय बग... आता लगोलग पहातेच कशी.....

  ReplyDelete
 3. अरे..सही सिनेमा..माझा पण अत्यंत आवडीचा..रिचर्ड गेर तर अफ़लातुन..

  ReplyDelete
 4. अगं बाई, हा तर माझा अतिशय लाडका चित्रपट! ऑल टाईम फेव्हरीट का काय म्हणतात ना, तो! किती वेळा पाहिलाय ह्याला गणतीच नाही. आणि रिचर्ड व ज्युलिया दोघेही आवडते!! इतक्या मस्त रोमांटिक पिक्चरची छान आठवण करून दिलीस! धन्यवाद!:-)

  -- अरुंधती
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 5. तन्वी टुकटुक...तू तर दर्दी नं..पण मी पाहिलाय हा सिनेमा आणि एकपेक्षा जास्त वेळा...ज्यु रॉ आणि रि.. दोघंही जाम आवडलेत...ज्यु तर सॉलिड ढासू उंच चिकनी दिसतेय...(मुली मुलिंची स्तुती करू शकतात आणि करतात...)

  ReplyDelete
 6. हेरंब, असा सिनेमा, अशी अभिनेत्री आणि असा अभिनेताही पुन्हा होणे नाही.

  ReplyDelete
 7. तन्वी, अग तू म्हणजे ना.... लगेच पाहा गं.एकदा पाहिलास की मग पुढचे अनेक वेळा पाहणे ओघाने होईलच.....:) लागण आहे लागण.

  ReplyDelete
 8. माऊ, यस्स्स्स.... जूलिया आणि रिचर्ड दोघेही अफलातून आणि त्यांच्यातली केमिस्ट्रीही तितकीच ग्रेट.

  ReplyDelete
 9. इरावती, हो गं....ऑल टाइम फेवरीटच.... आभार.

  ReplyDelete
 10. अपर्णा, जूलिया कसली चिकनी दिसते ना...:)सगळ्या वयातील मुले-मुली तिच्या प्रेमात.हा हा...

  ReplyDelete
 11. आता पुन्हा पहावा लागेल, आठवण करुन दिलीस म्हणून..
  एकदाच पाहिलाय. आता खरं तर विसऱल्यासारखं झालंय, रात्री पहातो.

  ReplyDelete
 12. मी अजुन पाहीला नाहीये हा सिनेमा, एवढा छान आहे तर नक्कीच पहायला हवा.
  सोनाली

  ReplyDelete
 13. ज्युलिया रॉबर्ट्स... बस्स अजुन काही बोलणे नको :-)

  ReplyDelete
 14. I have been following your blog since quiet a time .. but this one made me comment ...

  i am not a great follower of films.. but your blog made me watch the film on net..I did it and guess what -- since this week I have become follower of films ..shodun shodun films baghyala laglo ahe.. every day one atleast...ata boss ne kam hot naslya baddal..or change from workoholic to filmoholic asa kahi bolla agar shivya ghatya tar jababdar kon ??? :)

  aajch "as good as it gets" pahila mast ahe..chakat ful jala war!

  amchya office madhe ajun koni tumcha blog follow karat asel tar .. naste wande nakot mhanun email det nahie ithe..gair samaj nasava!

  Mark (iv)

  ReplyDelete
 15. Mark (iv), प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.ब्लॉग वाचता हे कळले बरे वाटले. 'As good as it Gets ' जॅक निकल्सन चा ना... मला वाटते हेलेन हन्ट होती त्यात.... चांगला आहे सिनेमा. चला या पोस्टमुळे काही छान छान सिनेमे पाहून होतील तुमचे.
  लोभ असू द्यात.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !