जिन्नस
- तीन -चार केळी - मध्यम पिकलेली असावीत
- चार चमचे ओले खोबरे
- एक चमचा तूप
- चार चमचे साखर
- दोन मिरी, दोन लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा, चिमुटभर वेलची पूड
- काजू, बदाम, बेदाणा, पिस्ता--- एकुण दोन चमचे सुका मेवा
मार्गदर्शन
बरेचदा केळी घरात आणली जातात पण खाल्ली जात नाहीत. तशीच लोळत पडतात, जास्ती पिकली की फेकून दिली जातात. कधीकधी अचानक गोड खावेसे वाटते. पण फार सोपस्कार करायची इच्छा नसते-कंटाळा येतो. आणि पदार्थ फार जडपणा आणणारा नको असतो. अशावेळी अगदी दहा मिनिटात होणारी व छान लागणारी भरली केळी करून पाहा.
मध्यम पिकलेली चार केळी साल काढून प्रत्येकी दोन तुकडे करून घ्यावी. एका पसरट पातेल्यात (नॉन स्टिक पॅन) चमचा भर तूप घालावे. तूप तापले की लवंगा, मिरे व दालचिनी तुकडा टाकून मिनिटभर परतावे. त्यावर सुका मेवा टाकून दोन-तीन मिनिटे परतून हलक्या हाताने केळी टाकावीत. लागलीच खोबरे व साखर घालून केळी मध्यम आचेवर चार मिनिटे परतावे. त्यावर वेलची पूड टाकून आंच किंचितशी वाढवून केळी जराशी खरपूस झाली की लागलीच उतरवावे. गरम किंवा गार जसे आवडेल तसे खावे.

टीपा
केळी किंचित कचरट असताना केल्यास मध्ये चीर पाडून खोबरे भरावे व अगदी हलकेच ढवळावे. राजेरी केळ्यांची जास्त चांगली होतात.
मी घरी असेपर्यंत असे काही लिहित नाहीत तुम्ही ... पण मी कामाला गेलो की बरोबर खाद्यपदार्थ सुरू होतात तुमचे इकडे ... निषेध माझा ... हाहा ... :)
ReplyDeleteरोहन...:D
ReplyDeleteमी तुला विचारणारच होते कारण फोटो पाहिला ऑर्कूटवर but where is the रेशिपी?
ReplyDeleteसुदैवाने अति पिकलेली केळी आहेत घरात....लग्ग्येच ट्राय करते...
Teep dilyapramaane, ha padartha rajali/rajeri kelyancha jasta chhaan hoto. Bharitasathi vaanga bhaajto tase rajali kela nusta bhajoon, mag tyaawar toop takoon khayla suddha chhaan laagte.
ReplyDeleteAtee pikleli hirvya saalichi keli kuskaroon tyaat maavel itki kanik, chavipramaane saakhar, kinchit meeth, tupaache mohan ghaloon purya suddha chhaan hotat.
माझा पण निषेध...हे असे आम्ही का सोसावे.तुम्हाला माहिते की आम्ही पण खादाड आहोत,तरी तरी...हा दुष्टपणा...........चांगले नाही हे...
ReplyDeleteतन्वी काय मग, केळी सुस्थळी म्हणजे पोटात गं....हीही, पडली ना?:)
ReplyDeleteमाऊ तू पण....हेहे...
ReplyDeleteAnonymous...राजेरी तोंडात बसलयं....माटुंगा/चेंबुरला राजेळी कोणी म्हणत नाही ना/ विकायला येणारेही राजेरीच करत राहतात अन मग.......:(
ReplyDeleteकेळी घालून केलेल्या पु~या सुंदरच लागतात.आम्ही लहान असताना आई बरेचदा करत असे.:)
आभार.