जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, December 20, 2009

कळविण्यास अतिशय आनंद होत आहे.....

सनविवि,

कळविण्यास अतिशय आनंद होत आहे....

दीपावलीचे औचित्य साधत "
नेटभेटच्या " सलिल चौधरी व प्रणव जोशी यांच्या अथक मेहनतीने मराठीतले पहिलेवहिले ई-मासिक प्रसिद्ध झाले. ऑक्टोबर २००९ च्या पहिल्याच मासिकात माझे " बाबांची खिचडी " व " खारीचे योगदान " हे दोन लेख समाविष्ट आहेत. अंक येथे वाचता येईल. या पहिल्याच अंकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

पहिल्या अंकाच्या जोरदार स्वागताने व प्रतिसादाने नोव्हेंबरचा अंक अजूनच सुंदर व कसदार लिखाणाने समृद्ध झाला आहे. नोव्हेंबर २००९ च्या अंकात "
रुमाल " व " नको म्हटले होते ना, तरीही...." हे दोन लेख समाविष्ट केलेले आहेत. अंक येथे वाचता येईल.

" नेटभेट ई-मासिकाचा नोव्हेंबरचा " अंक जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न व अंक निर्मितीसाठी घेतलेल्या श्रमाचे चीज होते आहे. सलिलने म्हटलेच आहे की ६००० पेक्षा जास्त वाचकांनी मासिक वाचले असून १५०० लोकांनी डाउनलोडही केले आहे. हे वाचून खूप आनंद झाला.

नोव्हेंबरच्या या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता या वर्षाचा शेवटचा म्हणजे डिसेंबर २००९ चा अंक प्रसिद्ध झाला असून यात माझा "
खरी कमाई " हा लेख समाविष्ट केलेला आहे. तीनही अंकात माझ्याकडून थोडेसे योगदान देण्याची सलिल व प्रणव यांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे अनेक आभार. अंक " येथे " वाचता येईल.

ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हे तिनंही अंक आपण जरूर वाचावेत. ते डाउनलोड करूनही घेता येत असल्याने आपल्याला जशी सवड होईल तसतसे वाचता येतील. अंक कसे वाटले ते आवर्जून कळवा अशी विनंती आहे. नेटभेटच्या या ई-मासिकाला वाचकांचे उदंड प्रेम नेहमीच लाभावे ही मनोमन इच्छा आहे.

आपण वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे सतत लिहिते राहण्याची प्रेरणा मिळते व उत्साह वाढतो. आपला लोभ आहेच. माझ्या सगळ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार.

भाग्यश्री

27 comments:

 1. अरे वा! मस्तच!
  ई-बुक्सचा एक फायदा म्हणजे ते ऑफलाईन कधीही वाचता येतात!
  तुमच्या आनंदात सहभागी आहोत :)

  ReplyDelete
 2. दिपक स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:) हो ना ऒफलाईन वाचता येत असल्याने जास्त लोकांना लाभ घेता येतोय.

  ReplyDelete
 3. अभिनंदन...आता एक पार्टी पाहिजे...पुढचा लेख बहुतेक डेझर्ट...:)

  ReplyDelete
 4. अपर्णा....:) आता तू म्हणते आहेस तर.....

  ReplyDelete
 5. अभिनंदन...........आणि अपर्णाला दुजोरा.....:))

  ReplyDelete
 6. तन्वी तू पण.....हा हा... तुझेही अभिनंदन!:)

  ReplyDelete
 7. अभिनंदन, लवकरच माझं ही एक पोस्ट तु त्या मासिकात वाचशील :-) , पार्टी हवी तुझ्याकडुन

  ReplyDelete
 8. हे पोस्ट खरं तर मला लिहायच्ं होतं, ठरवलं पण होतं की शनीवारचं पोस्ट हे असेल म्हणुन.. पण माझ्या आधी तुझा नंबर लावलास.. असो
  प्रणव जोशी आणि सलिल चौधरी दोघांनी घेतलेली मेहेनत यात दिसुन येते. पहिलं मासिक आणि ह्या वेळचं मासिक या मधे जमिन अस्मान चा फरक लक्षात येतो. या वेळेसचा अंक अगदी प्रोफेशनल झालेला आहे.
  मांडणी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. फॉंट्स पण वाचतांना छान वाटतात.. इलेक्ट्रऑनिक मिडीया- म्हणजे न टाळता येणारा एव्हिल, त्याचा वापर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी कसा करायचा हे प्रणव आणि सलिलने दाखवुन दिले आहे.
  दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन..
  डेव्हलपमेंट इतकी की ती म्हणजे हानुमान उडी ठरावी.

  ReplyDelete
 9. अभिनंदन ... आणि अपर्णाला अनुमोदन :)

  ReplyDelete
 10. भानस . . नाही नाही भाग्यश्री ताई, तुमच हार्दिक अभिनंदन!!!
  आता मस्तपैकी पार्टी हवीच. . .भेंडी मसाला, सामोसे, डेझर्ट . . .(बाकी लिस्ट मेल केली तर चालेल ना??)

  ReplyDelete
 11. अभिनंदन! तुमचे लेख मस्त असतातच!
  आम्हालाही पार्टीला बोलावणं पाठवा! :)

  ReplyDelete
 12. अजय तुझेही अभिनंदन!:)एकदा सगळे भेटू यात आपण. धमाल येईल.

  ReplyDelete
 13. महेंद्र अगदी अगदी....पहिल्या व तिस~या अंकातला फरक दिसून येतोच आहे. यावेळचा अंक उत्कॄष्ट झालाय. काही ज्येष्ठ नागरिकांनी(ज्यांना डोळ्याचा त्रास आहे...वय बरेच जास्त आहे असे )अंक आवडल्याचे व डाउनलोड करता येत असल्याने आमच्या स्पीड्ने हवे तेव्हां वाचता येतो हे आवडल्याचे आवर्जून सांगितले. वाचक हा वयातीत असल्याने सगळ्यांना भावेल हा प्रयत्न सलिल व प्रणव यांनी केला आहे. हे फार महत्वाचे वाटते.त्याबद्दल पुन्हा एकवार त्यांचे व अंकातील योगदानाबद्दल तुझेही अभिनंदन!

  ReplyDelete
 14. गौरी तरीच मी म्हणतेय आहात कुठे? आभार आणि स्टॆंडिग आमंत्रण आहेच...कधीही या.स्वागत आहे.:)

  ReplyDelete
 15. मनमौजी अनेक आभार. होहो ....चालेल ना. असेही आत्ता लेक आलाच आहे.म्हणून तर अपर्णा डेझर्ट डेझर्ट करतेय....आले ना लक्षात...:)

  ReplyDelete
 16. आनंद अनेक आभार. जरूर या.:)

  ReplyDelete
 17. हार्दिक अभिनंदन !!
  पार्टी हवी..नुसते फ़ोटो चालणार नाही..सकाळी एवढ्या गप्पा मारल्यास पण सांगितले का नाहिस ग..आता पनिशमेंटची पण पार्टी !![:फ]

  ReplyDelete
 18. माऊ अग सॊरी सॊरी....चालेल असेही आपण भेटू हीच मोठी पार्टीच आहे ना...:)

  ReplyDelete
 19. Congrats !!!!!!!

  Pudhil ankat ajun lekh yeu det

  ReplyDelete
 20. माधुरी शुभेच्छांबद्दल मन:पूर्वक आभार.

  ReplyDelete
 21. धन्यवाद,

  तुम्ही आणि इतर ब्लॉग लेखकांनी आमच्यासारख्या नवख्या मुलांवर विश्वास दाखवीला आणि मदत देउ केलीत त्यामुळेच हे सर्व शक्य झाले. मराठी कंटेट ऑनलाईन असले तरी सर्वांनाच ईंटरनेटवर वाचणे शक्य होत नाही. अशा सर्व मराठी रसिकांना चांगल्या मराठी कंटेंटशी जोडणे हाच नेटभेट ई-मासिकाचा मुख्य उद्देश होता.

  आपल्या आशीर्वादाने नेटभेट उत्तरोत्तर प्रगती करत राहील यात शंका नाही.

  ReplyDelete
 22. सलिल यावेळचा अंक अप्रतिम झाला आहे. तुम्हा दोघांची मेहनत दिसून येते आहे. संपूर्ण नेटभेटच्या टीमचे व लेखकांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

  ReplyDelete
 23. अगदी मनापासून अभिनंदन :) नेट भेट वाचावेच लागेल.

  ReplyDelete
 24. रविंद्रजी नेटभेट जरूर नजरेखालून घाला.आपले आभार.

  ReplyDelete
 25. अभिनंदन ... ई-मासिक अजून वाचलेले नाही पण आता उतरवतो आणि वाचतो सवडीने ... :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !