जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, December 23, 2009

साखळीतली माझी कडी.........टॅगले म्या....

एका शब्दात लिवा म्हणे..... कसे जमनार तुम्हीच सांगा बरे...... अवो इतकं सिंपल का आहे ते. बरं असू दे.... डायरेक्ट मुद्द्यावरच येते म्हणजे तेवढेच कमी शब्द होतील. ( पण मी म्हणते इतकी कंजूशी का करावी माणसाने? आता याला काय पैसे पडतात का? जरा गप्पा-खिदळणे झाले की दिवस कसा मस्त जातो... ) सुटली का तू पुन्हा..... कंसात लिहिले म्हणजे ते शब्द गणले जाणार नाहीत असे वाटतेय का? चला..... कामाला लागा. चौतीस प्रश्न आहेत आणि वेळ फक्त पंधरा मिनिटे. ( चोर लेकाचे. मुद्दामहून कमी वेळ ठेवलाय..... , हा... पण मी सोडणार नाही. विक्रमदित्याची भन हाय मी...... वेताळा .... अरे शब्दांना म्हण गं.... तुम्हाला सोडणार नाही...... ही ही हा हा ...... ) अग दोन मिनिटे संपलीही..... खरड पटपट.....


1.Where is your cell phone?
गपगार पडलाय ( शोमू घरी आलाय ना )

2.Your hair?
सरळ-सिल्की

3.Your mother?
जीवलग

4.Your father?
मिश्किल व आनंदी जीव

5.Your favorite food?
आईच्या हातचे काहीही

6.Your dream last night?
शोमूने नासा जॉईन केले

7.Your favorite drink?
आले व गवती पात घालून केलेला चहा व शहाळे

8.Your dream/goal?
बरीच आहेत.....

9.What room are you in?
फॅमिली रूम

10.Your hobby?
आवडत्या माणसांबरोबर बसून दंगा करणे

11.Your fear?
रोज रात्री स्वप्नात मी जिन्यावरून गडगडत जाते ( हे स्वप्न मला गेली कित्येक वर्षे नेमाने पडतेय.... आणि ते पडले की मी आधार शोधते पडू नये म्हणून.... आणि नवरा किंचाळतो. एकही दिवस ही बया सुखाने झोपू देणार नाही. थांब मीच ढकलून देतो तुला ( स्वप्नात बरं का ) ..... चांगली सडकून आपटून घे म्हणजे तू सुटशील आणि मी पण..... लोक्स ओळीने दहा दिवस मी तुम्हाला दिसले नाही तर समजून घ्या काय झालेय ते...... हाहा... अरे देवा एका शब्दात लिहायचे होते ना..... पण हे कंसात आहे तेव्हां........ )

12.Where do you want to be in 6 years?
मायदेशात

13.Where were you last night?
घरीच लेकाबरोबर पीएस३ खेळत होते

14.Something that you aren’t diplomatic?
माझ्या जीवलगांबरोबर

15.Muffins?
डार्क चॉकलेटवाले कुठलेही ( पण फक्त दोन घास.... नंतर त्याचा घास लागतो मला )

16.Wish list item?
कुठून सुरवात करू...... मारुतीच्या शेपटावाणी लंबेलाट यादी आहे बुवा......

17.Where did you grow up?
दादर- आमची मुंबई

18.Last thing you did?
शोमूला बुरजी करून दिली ( रात्री २.३० वाजता....)

19.What are you wearing?
नाइट ड्रेस

20.Your TV?
एलएमएन-मूव्हीज, नुसती रडारड....

21.Your pets?
नोप. मासे सोडून( टँकमधले बरं का..... हो नाहीतर द्याल शार्कच्या तोंडी ढकलून....)
कुठलाही प्राणी पाहिला की मी रस्ता बदलते. मुलखाची घाबरट.

22.Friends
अनेक, काही खासम खास..... नंबर वनवर माझी ममा.....

23.Your life?
सध्या तरंगतेय( लेक आलाय ना )

24.Your mood?
एकदम झकास. ( काल रात्री आयमॅक्सला जाऊन " अवतार " पाहिला...... निसर्गसौंदर्याने डोळे सुखावलेत..... मस्तच. जबरी फिक्शन, जरूर पाहा. आणि हो मी त्याला अवतारच म्हणते.......ऍवॅटार नाही.....)

25.Missing someone?
हो तर.... आई-बाबा-लेक( जवळ नसतो ना नेहमी ) आणि माझे ठाण्याचे घर.

26.Vehicle?
बी. एम. डब्ल्यू एक्स थ्री व होंडा सिव्हिक-इक्स.

27.Something you’re not wearing?
कुत्सितपणा व माज

28.Your favorite store?
डोळ्यांना व मनाला सुखावणारी ( फुले-भाजी मार्केट- गौरीला डिट्टो..... व मेसीज मधले होम सेक्शन )

Your favorite color?
मोतिया व लिंबू

29.When was the last time you laughed?
काल ( दोन वर्षापूर्वीचा मी, आई, बाबा, शोमू व वहिनी आणि दोघी भाच्या असा एक फोटो आहे..... त्यात मी बकासुरासारखी दिसतेय आणि बाकीचे सगळे सापळे...... या सगळ्यांच्या वाटचे जेवण मी हादडले होते बहुतेक.....हीही...)

30.Last time you cried?
२००८ नोव्हेंबराला मायदेशाहून आई-बाबांचा निरोप घेऊन निघाले तेव्हां.....

31.Your best friend?
माझी ममा ( नचिकेत आणि शोमू बदडणार मला )

32.One place that you go to over and over?
नवऱ्याच्या मागे ( काय करता राव..... आपल्याला हवे तेच करवून घ्यायचे असेल तर सारखी भुणभूण-कटकट करावी लागते. हीहीहाहा.....)

33.One person who emails me regularly?
कोन नाय बा...... ( जो तो आपापल्या व्यापात बिजी.......वेळेचा सवाल हाय.... आणि इतकं प्रेम कोण करतंय आजकाल )

34.Favorite place to eat?
आई जिथे स्वयंपाक करत असेल ते

30 comments:

 1. तुझं स्वप्न वाचून मी एकटीच केंव्हाची हसते आहे ... :D:D:D

  ReplyDelete
 2. अगं खरेच तो एक दिवस सूड काढणार बघ.... :)

  ReplyDelete
 3. Apratim uttar dili aahet.!!!

  ReplyDelete
 4. धन्यवाद रवींद्र.

  ReplyDelete
 5. मजा आली वाचायला....ए अवतार काय?? ऍवॅटार...:) मी हेरंबच्या ब्लॉगवर पण प्रतिक्रियेत लिवलंय बग....
  तुमचं स्वप्न खरं होवो...(माझं पण आहे माझ्या जवळच्या वळखीच कुणी नासात जावं म्हनुन वो बाय....)

  ReplyDelete
 6. अपर्णा मी ’अवतारच ’ म्हणते... ऍवॅटार नाही...हीही....

  ReplyDelete
 7. "थांब मीच ढकलून देतो तुला..... चांगली सडकून आपटून घे म्हणजे तू सुटशील
  आणि मी पण....."

  This is some thing great.. Khup mast lihilay..

  ReplyDelete
 8. @भाग्यशी: दादरवासी , लई झ्याक लिहिलं बघा. पण तो जिन्यावरुन गडगडण्याच प्रकरण काही टाळक्यात नाय घुसल.

  ReplyDelete
 9. अजय अरे रोज गाढ झोपेत तुला कोणी दचकवले तर काय होईल.....:)

  ReplyDelete
 10. maja aali wachtanna.
  Dhans taglya baddal...aaj dete uttara...:)

  ReplyDelete
 11. "थांब मीच ढकलून देतो तुला..... चांगली सडकून आपटून घे म्हणजे तू सुटशील
  आणि मी पण....."

  हीहीही................नचिकेतदादा पुन्हा एकदा हीहीही.............अग आपले नवरे समदु:खी गं!!!!
  माझी स्वप्न तर अमित ऐकतच नाही गं!!! म्हणतो मला झेपतच नाही ते प्रकरण...बरं CID पाहून स्वप्न पाहिलं तर पोलिस नाही होत ग मी त्याऐवजी कोणाचा तरी गेम डायरेक्ट.............
  मोतिया आणि लिंबु कलर माझेही आवडते!!!!

  ReplyDelete
 12. तन्वी आणि भाग्यश्री: अहो परवा वर्तमानपत्रात बातमी आली होती की की नवर्याने बायकोला नदीत ढकलुन दिल्यावरही बायकोने ५ तास पोहुन स्वताचा जीव वाचवला. काल बातमी होती की नवर्याने बायकोला दरीत ढकलुन दिलं तरी तिने स्वताचा जीव वाचवला. या बायकांना कुठेही ढकलुन दिलं तरी नवर्याला एवढ सहजा सहजी त्या सोडणार नाहीत :-)

  फक्त हसण्यासाठी लिहिलं आहे हे सगळं , सिरीयसली घेउ नये बर का !

  ReplyDelete
 13. तुमची उत्तर लय भारी हाय बगा!!!

  "थांब मीच ढकलून देतो तुला..... चांगली सडकून आपटून घे म्हणजे तू सुटशील
  आणि मी पण...." हे तर भन्नाट!!!

  ReplyDelete
 14. तन्वी अग घरोघरी मातीच्याच चुली....:)

  ReplyDelete
 15. अजय अरे तू सिरियसली घेतलसं की काय मला गंमतीने घे म्हणता म्हणता.....अरे बाबा मला स्वप्नात ढकलून दिले की मी त्या दुष्टचक्रातून सुटेन ना म्हणून रे..... बाकी बायका कधी नव~यांची पाठ सोडतील काय???( इथे मी अगदी चेटकीणीसारखी हसतेय बघ...)

  ReplyDelete
 16. मनमौजी या टॆगाटॆगीमुळे मस्त करमणूक झाली... हॊलीडे सिझन सुरू झाला ना...:)

  ReplyDelete
 17. प्रसाद चलता हैं रे... :)

  ReplyDelete
 18. मुग्धा जोडलीस का कडी? पाहते तुझी चंमतग.....

  ReplyDelete
 19. majha blog haravla mhanun navin banavlay. srujanswapn. tithe vach majhi uttar.

  ReplyDelete
 20. भानस....
  खूपच मस्त लिहिले आहे. वाचताना अनेक ठिकाणी खुदकन हसू आलं. ख्रिसमसची यापरता आणखी छान मला वाटतं दुसरी कुठली नसेल. खरंतर लगेचच वाचायला हवे होते, (कामाचा व्याप) BAD LUCK पण मजा आली. आणखी असंच येऊ दे. ख्रिसमसच्या खुप शुभेच्छा...आनंद लुटा...आयुष्याचा आणि वाटाही...आयुष्याला.

  ReplyDelete
 21. उत्तरं भन्नाट आहेत. मला पण अवतार नावच बरोबर वाटतं. अगं, तू दादरची माहेरवाशीण का? मी सासुरवाशीण (सासुरवास होत नाही, ती गोष्ट वेगळी ;-))

  ReplyDelete
 22. सुट्टीच्या दिवसायमधी प्रत्येकाच्या ब्लॉगवर अश्या झकास पोस्ट्स वाचून वाचून २-३ दिवसायपासून नुसतं हसतोय मी... तोंड(गाल!) दुखतयं आता असं हसल्यामुळं... बाकी कही बी म्हना, तुमची उत्तरं वाचून तं पोट बी दुखायला लागलं मव्हं.... ;)

  - विशल्या!

  ReplyDelete
 23. Prajakta anek aabhaar. tumhalahi Shubhechchaa! sadhya travel karatey tyamule thoda ushir zalay. Happy Holidays.

  ReplyDelete
 24. Kanchan ho na me Dadarchi Mahervashin.....:)

  ReplyDelete
 25. Visha pratikriyebaddal anek aabhaar v anek Shubhechchaa! Happy Holidays!:)

  ReplyDelete
 26. ही टॆगाटॆगी मी मिस केली ... पण आता जरा लिहून काढायचा विचार आहे ... बघुया .. लिहू कुठे हा प्रश्न आहे ... :D

  ReplyDelete
 27. रोहन काल आल्या आल्या तुझा शिवलेला धागा वाचला. मस्तच. अरे कधीपासून मी वाट पाहत होते. :)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !