जिन्नस
- तीनशे ग्रॅम भेंड्या
- एक मोठा टोमॅटो मध्यम चिरून
- एक मध्यम कांदा उभा चिरून
- खडा मसाला ( तीन मिरे, दोन लवंगा, छोटा दालचिनीचा तुकडा, दोन तमालपत्रे, अर्धा चमचा शहाजिरे )
- दोन चमचे तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद ( मिसळणाच्या डब्यातला चमचा )
- दोन लसूण पाकळ्या ठेचून
- मूठभर कोथिंबीर चिरून, अर्ध्या लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ, एक टेबल स्पून साखर
- सहा चमचे तेल व दोन चमचे तूप-बटर( जे आवडत असेल ते )
मार्गदर्शन
भेंड्या धुऊन कोरड्या करून घ्याव्यात. प्रत्येक भेंडीचे दोन किंवा तीन तुकडे करावेत. ( भेंडीच्या लांबीवर हे ठरवावे ) एका पसरट नॉनस्टिक पातेल्यात चार चमचे तेल घालून आच जास्त ठेवावी. तेल तापले की भेंड्या टाकून आच जराही कमी न करता परतावे. साधारण सात-आठ मिनिटे परतून ताटात भेंड्या काढून घेऊन पुन्हा त्याच पातेल्यात उरलेले दोन चमचे तेल टाकावे. आता आच मध्यम करावी. तेल तापले की खडा मसाला व ठेचलेली लसूण घालून दोन मिनिटे परतून त्यावर उभा चिरलेला कांदा, अर्धी कोथिंबीर व तिखट- हळद टाकून तीन-चार मिनिटे परतावे. त्यावर चिरलेला टोमॅटो टाकून सगळे मिश्रण दोन मिनिटे परतून घेऊन काढून ठेवलेल्या भेंड्या घालून हलक्या हाताने एकत्र कराव्यात. झाकण ठेवून एक वाफ आणावी. नंतर मीठ, साखर, गरम मसाला व दोन चमचे तूप घालून झाकण न ठेवता सारखे करावे. आच बंद करावी. उरलेली कोथिंबीर भुरभुरावी. गरम गरम फ्राय भेंडीवर लिंबू पिळून परोठा-पोळी बरोबर वाढावे.
टीपा
भेंडी तळून घेतली ( डीप फ्राय ) तर अजूनच सुंदर लागतात. परंतु नेहमी तसे करणे शक्य नाही. शहाजिरे नसल्यास साधे जिरे घालावेत. या भाजीत पाणी घालू नये. साखर-मीठ व कांदा-टोमॅटोमुळे जेवढा रस सुटेल तेवढाच पुरेसा असतो. तूप किंवा बटर मात्र अवश्य टाकावे. त्यामुळे भाजीला शाही स्वाद येतो. लसणामुळे भाजीचा जायका अजूनच वाढतो. भेंडी तळून घेतल्यामुळे तार येत नाही. तरीही बुळबुळीत होते आहे असे वाटलेच तर वाफ आणतानाच लिंबू पिळावे. ( नंतर पुन्हा लिंबू पिळू नये. नाहीतर आंबट होईल. )
(थंडीवाऱ्यात लोकं झोपत का नाहीत!!!.....मनात)
ReplyDeleteमला आवडते फार भेंडी....दिसतेय मस्त!!!....प्रकट
(रोहन तुला वाकोल्या...माझा नं. पहिला.....)
वाह!!पुन्हा एकदा.फोटो पाहून आत्मा तृप्त केला आहे!! माझी सगळ्यात आवडती डिश आहे ही!!! चला तुमच्याकडे आता पाहुणचाराला यावचं लागेल!!!
ReplyDeleteयम.................करून पाह्यला पाहिजे ।
ReplyDeleteतन्वी(थंडीवा~यात तेवढीच जरा उब... गॆसपाशी उभे राहून गं...हेहे) मला वाटलेच होते तुला आवडत असणार....म्हणून तर...:)
ReplyDeleteमनमौजी जरूर यावे.:)
ReplyDeleteआशाताई कळवा बरं का आवडली का ते...:)आभार.
ReplyDeleteभाग्यश्री, तुम्ही अक्षरशः पोटात आग लावली... भेंडी माझी सर्वात आवडती भाजी. पोळी, पराठा नसेल तर मी भातासोबत देखील खातो...
ReplyDeleteआईच्या हातची आठवली फोटो पाहून....
आनंद.....:)
ReplyDeleteTumcha blog khup aavadla.Kahi dishes karun pahilya,chhan jhalya.
ReplyDeletekatha,pravas varnane..sarv chhan!
काय चाललय काय ??? बर्फ पडत असताना लोकं खरच झोपत नाहीत का का ??? पुन्हा पुन्हा निषेध.. आणि ह्यावेळी तन्वीचा सुद्धा निषेध.. हेहे.
ReplyDeleteबाकी आज आमच्या घरी नक्की भेंडी फ्राय..
ही माझी आवडती डिश. माझी आई भेंडी कापुन त्यामध्ये मसाला भरुन एक प्रकार करते, ती ही मस्त लागते.
ReplyDelete-अजय
रोहन मग काय झाली का खाऊन? :)
ReplyDeleteअजय हो ना. माझ्या खाऊगल्लीत आहे तशी पण केलेली. कधी वेळ मिळाला तर पाहा.:)
ReplyDeleteमसाला भेंडी करून पाहीली, मस्त जमली. तृप्त पोटाने, प्रतिक्रिया द्यायला शेवटी आले. पण समाधानाचा ढेकर ही पोहचवायला पाहिजे न!!!
ReplyDeleteअरे वा! अनुक्षरे करून पाहिलीस...सहीच. चला तुम्हाला आवडली मला ढेकर आय मीन भावना पोचल्या.:)
ReplyDeletemast
ReplyDelete:)
Delete