जमीन सोडली आभाळाला गवसणी घालावी म्हणून
नाती दुरावली कर्तृत्वाला उभारी मिळावी म्हणून
नशिबावर हवाला ठेवून निघालो चाचपडत
मायबापाच्या डोळ्यातला अंधार वाढवत
रोजच चाले खेळ बेरीज-वजाबाकीचा
नेमकं काय मिळवले काय गमावलेचा
हातातल्या रेषांतच भरून तुझी साठवण
सुरकुतल्या चेहऱ्यातच गोठून पडली आठवण
ह्यावेळी निघताना मी धरला तुझा हात घट्ट
आश्वासक थोपटत टाकलास शांत कटाक्ष
वदलीस, अग मी सदैव आहेच तुझ्यापाशी
दुरावलीस देहे तरी तू असतेसच आमच्यापाशी
हळवे होऊन दाटलेल्या कंठाने म्हणालीस
आयुष्याच्या संध्याकाळी आहोत एकमेकास
सुखाने जा आता मागे वळून पाहू नकोस
आम्ही इथे नातू तिथे तू त्रिशंकू होऊ नकोस
सुंदर... प्रतिक्रियेमध्ये काय लिहू...
ReplyDeleteही माझ्यासारख्या अनेक लेकरांची गोष्ट आहे ज्यांना ऐन पंचवीशीत आभाळाला गवसणी घालण्यासाठी जमीन सोडावी लागते...
पाठीवरचा अश्रूभरला थरथरणारा हात सांगत असतो, "आमची काळजी करू नको. मजेत राहा"...
पण ईलाज नसतो...
हळवी, हळुवार कविता.मला समजली. अशीच हळवी होत रहा.पण त्रिशंकू होऊ नकोस. दोन बिंदूना सांधणारी तसरी रेष हो. मग या बिंदूकडून त्या बिंदूकडे,कधी इकडे कधी तिकडे आंदोलत रहा.दोन बिंदूतली अवकाश होऊन रहा.
ReplyDeleteसतीश, भापो.आभार.
ReplyDeleteअरुणदादा,तोच प्रयत्न सुरू आहे.:)आभार.
मस्त लिहिलयं, मला एकदम माझे इंग्लंड्मधले दिवस आठवले... :( परदेशात असताना आपण कधितरी अधांतरी जगतोय असं वाटत, पण नाविलाज को क्या इलाज भिडू ???
ReplyDeleteधन्यवाद प्रसन्न.
ReplyDelete:)
ReplyDelete