सांवरीच्या कापसागत मन हल्लक झाले
तुझ्यासवे वाऱ्यावर, उडाया उत्सुक झाले
हलक्या हलक्या जलधारा बरसती
माझिया डोळ्यात, तुझी आठवण झरती
सभोवताली वेढली धुक्याची चादर
सले विरहाची वेदना, उरी अपार
तुझ्या स्पर्शासाठी अवघा देह आसुसला
गात्रागात्रातूनी श्वास, तुझा हुळहुळला
गौर कांतीवर तुझ्या अधरांची मोहर
प्रणयास उत्सुक, कामिनी चतुर
तुझ्या माझ्या मिलनाचे फुलले मळे
अंकुर रुजला, गर्भात उमलले कळे
जिवापाड जपेन आपल्या बाळाला
तुझे डोळे, तुझे हात असावे सानुल्याला
भरेल तो माझा सुनासुना एकांत
तरळता अश्रू, पुसतील तुझेच हात
भाग्यश्री,
ReplyDeleteऔर एक धमाल!
काय छान कविता केली आहेस तू. पाचव्या कडव्यापर्यंत कवितेची मनांत झालेली प्रतिमा सहाव्या कडाव्यांत कांहीशी गडद होते, मनांत जे एक वेगळेच चित्र उभे राहते मात्र सातव्या कडव्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि केवळ एकच दाद निघून जाते वाह...क्या बात है!!!
जियो !!!
अरुणदादा, अनेक आभार.
ReplyDelete