जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, August 25, 2009

जेव्हा अचानक असे घडते....

तुम्ही रस्त्यावरून नेहमीसारखी गाडी पळवताय. डोक्यात काहीतरी विचार सुरू आहेतच.( विचार कधीतरी पाठ सोडतील का? ) गंभीर-कटकटी/ एखादा जोक आठवून ओठावर हसू आलेय/ आवडते गाणे वाजतेय अन त्याच्या सुरावटीत हरवून तुम्ही अगदी तल्लीन झाला आहात. तुमच्या आजूबाजूला बऱ्याच गाड्या आपापल्या तालात पळत आहेत. पुढची गाडी तुमची लय बिघडवतेय म्हणून तिला ओव्हरटेक करावे या विचारात तुम्ही असतानाच, अरे अरे......... ब्रेक ब्रेक......अजून छातीत धडधडतेय ना? आधीच ओव्हरटेक केले असतेत तर......


फार वैताग आलाय. या बायका सुखाने स्वतः जगणार नाहीत अन नवऱ्यांना जगू देणार नाहीत. कधी कधी वाटते गळाच दाबा...... बापरे! काय भयंकर विचार करायला लागलोय मी या महामायेमुळे. काय करू कशी मुक्ती मिळवू? आयडिया, आयडिया, देवा..........
प्लीज प्लीज....... हुश्श्श्शssss....


सारख्या पार्ट्या पार्ट्या..... अग हो हो आलो बाई. चल चल. निघतात. मोठ्या हॉल मध्ये सगळे जमलेत, मस्त धमाल सुरू आहे. बायको हाकारते, चल रे डान्स करूयात. अं बरं बाईसाहेब, आपली आज्ञा प्रमाण. डान्स करायचाय काय...... डान्स डान्स......


ए काहीही बोलू नकोस हं का. फेकाड्या, म्हणे भूत पाहायचे आहे का? काय खरचं, तू पाहिलेस? चल चल दाखव बरं भूत.

एका प्रसिध्द आयटी कंपनीच्या सिक्युरिटी कॆमेरावर हे भूत सापडले. खरे-खोटे कोण जाणे.

5 comments:

  1. Bhoot was ok,
    Che nakoch to wichar. pan overtake kel asat tar.......................

    ReplyDelete
  2. हो ना. धन्यवाद आशाताई.

    ReplyDelete
  3. ओव्हरटेकिंग खरंच भयानक आहे .. हा खरा व्हिडिओ की ट्रिक सिन आहे?? जे काही असेल ते असो.. पण आहे बाकी भयानक.
    अर्थक्वेक.. मस्त आहे प्रॅक्टिकल जोक..

    ReplyDelete
  4. हो... माझ्याबरोबर पण एकदा असचं झाल होत, मुबंई-गोवा हायवे वर, ओवरटेक करताना अचानक गाडीवरचा कंट्रोल गेला, आणि समोरुन टाटा सुमो येत होती, फ़ुल लेफ़्ट मारुन गाडी साईडला घेतली, नंतर १० मिनीटे नुसता बसुन राहिलो, स्टिअरींगला हात लावायला सुद्धा फ़ाटत होती....:P

    ReplyDelete
  5. महेंद्र, सिन खराच असावा असे वाटतेय.(?)हो ना आहे मात्र भयानक. हेहे, मलाही मजा आली पाहताना. आभार.
    प्रसन्ना, अरे बापरे!माझ्या अपघातानंतर लागलीच म्हणजे दोन मिनिटात मला गाडी चालवावी लागली तेव्हां असेच झाले होते माझे.पण इलाजच नव्हता.सांभाळ रे.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !