जाता जाता एक नजर इथेही........

Monday, August 10, 2009

रात भी है कुछ भीगी भीगी.......


काही गाणी मनात खोलवर रुतून बसतात. किंवा असेही म्हणता येईल त्या गाण्यांचे बोल, त्यांचा भावार्थ, संगीत आपल्या हृदयाला इतके भावते की आपले मनच त्यांच्यात अडकून पडते. जोडलेले गाणे अतिशय गाजलेले आहेच, परंतु या गाण्याच्या शब्दांकडे मी मुद्दामहून लक्ष वेधू पाहत आहे. शिवाय गाणे आपण कुठल्या मनस्थितीत प्रथम ऐकतो, याचाही ते आवडण्यामध्ये फार मोठा वाटा असतो. कधी कधी एखादे गाणे प्रथम ऐकून अजिबात आवडत नाही. परंतु वारंवार ऐकले तर आपसूक आपण गुणगुणतो म्हणजेच शब्द आवडू लागतात अन संगीतकाराच्या जादुई गेयतेमुळे ते गाणे मनात रेंगाळते. मग एखाद्या विवक्षित क्षणी ते तुमचा कब्जा घेते. अनेक आवडती गाणी आहेत त्यातले आज सकाळपासून सारखे हेच मनात ऐकू येतेय, कदाचित तुम्हालाही आवडेल.

सोबत या गाण्याचे बोल दिलेत व चित्रफीतही दिली आहे. हे सुंदर विरहीणीची आर्तता व्यक्त करणारे तरल शब्द आधी आपला ताबा घेतात. चित्रफीत पाहताना वहिदाची अदाकारी, अप्रतिम रूप वेड लावते. व्यक्तिशः: मला या गाण्याचा प्रसंग फार भावलेला नाही. वहिदाला असे बाजारात दाखवण्यापेक्षा हिच विरहीणी घरात, एकांतात दाखविली असती तर जास्त वजनदार झाली असती. ( माझे मत ) अर्थात चित्रप्रसंग कसाही असो गाणे जीवलग आहेच.


मूळ कवी: साहिर लुधियानवी, चित्रपट: मुझे जीने दो, १९६३

रात भी है कुछ भीगी भीगी

रात भी है कुछ भीगी भीगी, चांद भी है कछ मद्धम मद्धम।
तुम आओ तो, ऒंखे खोले, सोयी हुई पायल की छमछम॥धृ॥

किस को बताएं, कैसे बताएं, आज अजब हैं दिल का आलम ।
चैन भी हैं कुछ हल्का हल्का, दर्द भी हैं कुछ मद्धम मद्धम ॥।१॥
छमछम छमछम छमछम छमछम

तपते दिल पर यूं गिरती हैं, तेरी नजर से प्यार की शबनम ।
जलते हुएं जंगल पर जैसे, बरखा बरसें रुकरुक, थमथम ॥२॥
छमछम छमछम छमछम छमछम

होश में थोडी बेहोशी हैं, बेहोशी में होश हैं कमकम ।
तुझको पाने की कोशिश में, दोनो जहॊं से खो S गए हम ॥३॥
छमछम छमछम छमछम छमछम

गाणे इथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=6jHCOLUsW6I

2 comments:

  1. साहिरची जुनी गाणि ऐकायला मिळणं म्हणजे पर्वणीच.. खुप आवडलं हे गाणं.मला वहिदाचं ते बात एक रातकी मधलं गाणं खुप आवडतं. ती दिसायची पण खुप छान.. स्क्रिन अपिअरन्स हा नंतरच्या काळात आलेल्या चौकोनी, किंवा खुप लांब चेहेऱ्याच्या( माला सिन्हा, आणि ती राजकपुर बरोबरची बुढ्ढा मिल गया म्हणत नाचणारी.. नांव विसर्लो आता) नट्यांपेक्षा खुपच सुंदर होता.

    ReplyDelete
  2. महेंद्र, अरे वैजयंतीला विसरलास?:(

    ओह... ’ना हम तुम्हे जाने ना तुम हमे जानो ’ हेच म्हणतो आहेस का? सुंदरच आहे ते गाणे. सुमन कल्याणपूरने गायलेले.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !