जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 6, 2009

कुळथाचे पिठले


जिन्नस

चार टेस्पून कुळथाचे पीठ
तीन चमचे तेल
एक मध्यम कांदा चिरून
दोन टेस्पून सुके खोबरे
दोन मध्यम लसूण पाकळ्या, दोन सुक्या लाल मिरच्या
सहा-सात आमसुले, एक चमचा जिरे
थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

सुके खोबरे, जिरे व सुक्या लाल मिरच्या भाजून घ्याव्यात. लसूण पाकळ्या व ह्या भाजलेल्या मिश्रणाची पूड करून घ्यावी. कढईत तेल घालून नीट तापले की नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर कांदा घालून पाच मिनिटे परतावे. नंतर त्यात चार कप पाणी, केलेली पूड, आमसुले व मीठ घालून एकजीव करून मध्यम आचेवर उकळी फुटेपर्यंत ठेवावे. चांगले उकळले की गॅस लहान करावा. आता त्यात कुळथाचे पीठ घालून विरघळवावे. प्रथम गोळे गोळे होतील. मिश्रण एकजीव करत राहावे. बऱ्यापैकी गुठळ्या मोडल्या की पाच मिनिटे झाकण ठेवून एक वाफ आणावी. झाकण काढून हालवून पाहावे गुठळ्या मोडल्या जाऊन मिश्रण छान एकत्र झाले आहे असे वाटले की गॅस बंद करावा. नसेल तर पाण्याचा एक हबका मारून पुन्हा दोन-तीन मिनिटे ठेवावे. वाढताना कोथिंबीर घालून गरम तांदळाची भाकरी व भाजलेल्या पोह्याच्या पापडाबरोबर खायला द्यावे.

टीपा

हे मध्यम तिखट असते परंतु आवडीनुसार तिखटाचे प्रमाण वाढवता येईल. कुळथाचे पिठले अतिशय चविष्ट लागते. ज्यांना आवडते त्यांना अतिशय आवडते अन नाही त्यांना अजिबात आवडत नाही. चव डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला तर न आवडणाऱ्यांनाही आवडू शकते. ( स्वानुभव, )

4 comments:

  1. Wah aaj kulathache pithle ani dandalachee bhakari vatate... Yummmmyyy as Ved would say... :) Amachyakade ragada pattis.

    ReplyDelete
  2. प्रभावित, हाहाहा....बरोबर ओळखलेस. अरे वा! रगडा पॆटीस का, ह्म्म्म...आम्हाला सोडून काय....:(
    आभार.

    ReplyDelete
  3. मी परत मुंबईमध्ये आलो आहे. आता खातो सगळे मस्तपैकी. आणि मी जातोय लडाखला .. तेंव्हा भेटू २३ ऑगस्ट नंतर. टाटा.

    ReplyDelete
  4. रोहन, लडाख ट्रीपसाठी तुला व संपूर्ण ग्रूपला अनेक शुभेच्छा!!!
    धमाल येईलच पण सांभाळून. आलास की कळव.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !