जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, August 23, 2009

मंगलमूर्ती मोरया!!!


आले आले वाजत गाजत घरोघरी बाप्पा आले. लहान-मोठे सगळ्यांनीच अतिशय उत्साहाने आपापल्या कल्पनांनी घडवलेल्या मखरात, सजावटीत, रोषणाईत, फुलांच्या सुगंधात व आरतीच्या गजरात मोठ्या दिमाखात विराजमान झाले. सुगृहिणींनि केलेले उकडीचे मोदक व नैवेद्य खाउन तृप्त झाले.
हे गणराया सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी ठेव एवढेच मागणे आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!!

अतिशय मंगलभाव जागवणारी बाप्पांची आरती आपण सतत ऐकतो-म्हणतोच.
पुन्हा एकदा ऐकायचा मोह आवरला नाही.... : येथे ऐका

1 comment:

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !