बरेचदा आयत्यावेळी पार्टीचा बेत ठरतो किंवा अचानक आमंत्रण येते, " अग या गं संध्याकाळी, दंगा करू जरा. " अशावेळी गोडाचा पदार्थ विकत आणण्यापेक्षा थोडासा घरगुती टच देऊन परंतु पटकन करता येईल व सगळ्यांना हमखास आवडेल अशी ही झटपट होणारी रसमलाई.
जिन्नस
- दोन लीटर दूध
- १६ औंसाचा फॅट फ्री स्विटंड कंडेन्स्ड मिल्कचा डबा
- टीनमधील तयार रसगुल्ले: किमान २५ तरी घ्यावेत ( शक्यतो हलदीरामचे )
- केशर, वेलदोडा पूड, बदाम-काजू-पिस्ते
मार्गदर्शन
दोन लीटर दूध मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. दूध गरम झाले की डावाने ढवळत राहावे. ( डाव बाहेर काढून ठेवून नये अन्यथा दूध उतू जाऊ शकते ) साधारण पाव लीटर दूध आटले की कंडेंन्स्ड मिल्कचा डबा त्यात मिसळून एकजीव करावा. दहा मिनिटे उकळू द्यावे. दोन चमचे दुधात थोडे केशर खलून घेऊन मिश्रणात घालावे. काजू-पिस्ता-बदामाचे काप व दोन चिमूट वेलदोडा पूड घालून पुन्हा दहा मिनिटे उकळवून बंद करावे. हे सगळे करत असतानाच एकीकडे डब्यातील रसगुल्ले एका पातेल्यात तीन-चार भांडी साधे पाणी घेऊन त्यात काढून घ्यावेत. त्यातील पाक मात्र घेऊन नये. रसगुल्ले थोडे दाबावेत जेणे करून पाणी त्यात शिरेल. पाच-सात मिनिटांनी प्रत्येक रसगुल्ला तळहातावर घेऊन दाबून त्यातील सगळे पाणी काढून टाकावे. पाकामुळे दडदडीत झालेले रसगुल्ले आता थोडे फोफसे होतील. आटवलेले दूध कोमट झाले की सगळे रसगुल्ले अतिशय हलक्या हाताने त्यात टाकावेत. रूम टेंपरेचरला आले की फ्रीजमध्ये ठेवावे. वाढताना थंडच वाढावेत.
टीपा
या रसमलाईसाठी अगदी २% चे दूधही घेता येते. परंतु जर आपल्याकडचे गोकुळचे ( पूर्ण फॅट असलेले कुठल्याही डेरीचे ) दूध असेल तर स्विटंड कंडेन्स्ड मिल्कचा छोटा डबाच ( ८ औंसाचा ) पुरेसा आहे. यात भरपूर साखर असल्याने वरून फक्त अर्धीवाटी साखर घालावी. कंडेन्स्ड मिल्क अजिबातच घालायचे नसेल तर अडीच लीटर संपूर्ण फॅटचे दूध घेऊन ते बरेच आटवावे व चार चमचे दुधाची पावडर लावावी व दीड ते दोन वाटी साखर घालावी. मात्र या पद्धतीने रसमलाई झटपट होणार नाही. दूध आटवताना चुकूनही खाली लागणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
आताच जेवण झाल आणि मग ही स्वीट डिश..अप्रतिम
ReplyDeleteMastach aahe g!!!1 Rohan aata chapanar aahe mhanaje tyacha nishedh nahi...aani majhihi fav dish tyamule majhahi nahi.. :)
ReplyDeleteaata karun baghate aani phoTu takate..........
सुहास...:).
ReplyDeleteअग रोहनला घाबरून टाकले नव्हते बघ...हाहा... आणि आता वर तिकडे जाऊन एकटा चापेल हे सगळे. मग खरा निषेध कोणाचा.....:)
ReplyDeleteमाझा आहे निषेध...प्लीज तो फ़ोटो काढुन टाक....तोंडातलं पाणी त्या वाडग्यात पडेल असं झालंय...इथे येताना घेऊनच ये म्हणजे एअरपोर्टवरच खाईन आणि मग तुला घरी आणेन...हे हे हे...
ReplyDeleteअपर्णा, आता मायदेशात किंवा इथे भेटायलाच हवे गं.मस्त धमाल करू.:)
ReplyDeleteभानसताई,
ReplyDeleteभारतात कधी येणार आहात? तुमच्या घरी येईन म्हणतो. सगळे पदार्थ खायला. नुसते फोटो बघून भूक वाढते माझी.
आपला,
(खवैय्या)अनिकेत वैद्य
yetya raviwari dish karunch baghto...jamle tar tumhalahi dein mahnto
ReplyDeleteअनिकेत, जरूर या आमच्याघरी.:)
ReplyDeleteप्राजक्त, नक्कीच जमेल. आठवणीने द्या बरं का...:)
ReplyDeletetumhi aamchya jibhelaa khup tras deta rav :-)
ReplyDeleteअरे हे काय चाललंय काय? जो तो आपला खाण्याची पोस्ट टाकतोय. भा, तू सुद्धा! आता मला हे रविवारी करून पहावसं वाटणार ना!
ReplyDeleteअजय...:)
ReplyDeleteकांचन,अग एकदम झटपट होते बघ.नक्की करून पाहा.
ReplyDeleteश्री ताई . . किती दिवस आता भारताबाहेर राहून असा त्रास देणार आहेस. . .आता लवकर या इकडे!!!!
ReplyDeleteरसमलाई ... मलाही.. मलाही ... :D
ReplyDeleteतुम्ही तिघीजणी कित्ती आठवण काढून माझी भूक अजून वाढवणार आहात ??? :D