चक्क ब्लॉग सुरू होऊन एक वर्ष झालं. खरंच वाटत नाही. नेमकी मी दोन दिवस प्रवासात आहे. नशीब हॉटेलचे नेट सुरू आहे. फारसे काहीच माहीत नसताना - म्हणजे अगदी ब्लॉग कसा बनवायचा पासून..... अनेक तांत्रिक गोष्टी नव्यानेच पाहत होते, अडखळत-शिकत ब्लॉग सुरू केला. नियमित लिखाण करायचे असे मनात असले तरी, मुळात लिहायला जमेल का? हा प्रश्न होताच. विचार केला निदान सुरवात तर करू, नाहीच जमले तर...... पण मी विक्रमदित्याची बहीण आहे. वेताळ कितीही वेळा निसटून गेला तरी हट्ट सोडायचा नाही. प्रयत्न करीत राहायचे. कासवाच्या गतीने का होईना चार शब्द लिहीत राहीन निदान ते समाधान तरी नक्कीच मिळेल.
हळूहळू इतरांचे ब्लॉग्ज, त्यावरचे लिखाण, त्यांनी जोडलेली गॅझेट्स..... अशा बऱ्याच गोष्टींचे अवलोकन करत सुधारणा करत होते. मग ब्लॉग मराठीब्लॉगविश्व ला जोडला. माझ्या ब्लॉगवर त्यामुळे वाचक येऊ लागले. त्यासाठी म. ब्लॉ. वि. चे खूप खूप आभार. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतेय, एखाद-दुसरी टिपणीही येतेय हे पाहून उत्साह वाढला. रोज दहा वेळा ब्लॉगवर जाऊन नवीन टिपणी आली का ते पाहण्याचा एक नवीनच चाळा सुरू झाला. मग कॉउंटर मीटर लावले. जगाच्या प्रचंड पसाऱ्यात व इतक्या धावपळीच्या जीवनातही लोक पाच मिनिटे मी खरडलेले वाचतात याचा मला अतिशय आनंद होत असे आणि आजही होतो.
वर्षभरात सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न होता. किमान ३०० पोस्ट तरी लिहाव्यात. शेवटी काही विशिष्ट उद्दिष्ट असायला हवेच अन्यथा आळस नावाचा शत्रू अंगात शिरायला कधीही तयार असतोच. पण दोन पोस्ट कमी पडल्या. ही पोस्ट २९८ वी. मनात अनेक घटना- वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांना कागदावर उतरवणे हे सोपे नाही याची पदोपदी जाणीव होऊ लागली. स्मरणशक्तीवरच सारी मदार ठेवून लिहीत राहिले. आणि लक्षात आले की नकळत किती गोष्टी आपण टिपत असतो, विचार करत असतो. रोजच्या हाणामारीतही मनाच्या तळाशी या संवेदना-शोषलेल्या अनेकविध घटना जिवंत असतात आणि आपल्या मनावर त्याचा झालेला परिणामही.
लहानपणापासूनच, " माणूस - त्याचे अंतरंग, वागणे, भावजीवन-स्वार्थ, प्रेम, स्वभावाच्या निरनिराळ्या छटा " हे सारे मला मोहवत आले आहे. त्यामुळे आपसूकच त्यावरच जास्त लिहीत गेले. प्रवासाचेही मला जबरदस्त वेड, साहजिकच ती वर्णने-फोटोही आलेच. अनेकदा वाटे हे काय लिहिलेय, अगदीच सुमार-टाकाऊ वाटतेय..... डिलटून टाकावे. एकदा सासूबाईंना हे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की , "अग अशीच सुधारणा होत जाते. उत्साह कमी करू नकोस. लिहीत राहा. " आजवर दोन पोस्ट डिलीट केल्या व एक टिपणी. अरे! म्हणजे त्या डिलीट केल्या नसत्या तर ३०० वी असती की ही.
गेल्या वर्षभरात अगणित मित्र-मैत्रिणी जोडले, जिव्हाळ्याचे झाले. आताशा रोज बोलल्याशिवाय चैन पडत नाही इतके घरातले-आपलेसे झाले. लवकरच प्रत्यक्ष भेटीगाठीचा योगही येईलच. वाचकांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी लिहीत राहिले. मुलगा दूरच्या राज्यात त्याच्या कॉलेजच्या व्यापात आणि नवरा त्याच्या उद्योगात व सध्या मी नोकरी करत नसल्याने तशी निवांत काहीशी एकटीच झालेय. ब्लॉगमुळे या एकटेपणाची झळ खूपच कमी झाली ही मोठी जमेची बाजू. १५३५ हून अधिक वाचकांनी भूंगाने काढलेल्या माझ्या पाककृतींचे पुस्तक " पोटोबा " डाउनलोड केलेय हे पाहून खूप आनंद झाला. वाचकांचे व भूंगाचे मनःपूर्वक आभार. एकेकाळी आईला सारखे काय गं स्वयंपाकघरात गुंतून पडतेस असे नेहमी म्हणणारी आणि केवळ सांगकाम्यासारखे काम करणारी मी, कधी इतका रस घेऊन पदार्थ बनवू लागले याचे मलाच नवल वाटते. नेटभेटच्या मासिकामध्ये काही लेख छापून आले. नेटभेट टिमचे खूप खूप आभार.
कौतुक हे सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान बाळापासून ते आजोबांपर्यंत, ते वयातीत आहे. असे हे कौतुकाचे चार शब्द वाचक आवर्जून लिहितात कधी टिकाही करतात, सूचना-सुधारणा सांगतात. त्याचा खूप फायदा झाला. वाचकांनी- घरच्यांनी - मित्र-मैत्रिणींनी आवर्जून वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे- प्रोत्साहनामुळे- प्रेमामुळेच मी इतपत लिहू शकले त्याबद्दल सगळ्यांचे मनः पूर्वक आभार. यापुढेही असेच प्रेम-प्रोत्साहन-प्रतिसाद मिळत राहतील. खास बेसन-बर्फी केली आहे ती घ्यायला विसरू नका बर का. आता हॉटेलचे नेट बंड करायच्या आत पोस्टून टाकते नाहीतर वाढदिवस एकटीनेच साजरा करावा लागेल.
गेल्या वर्षभरात अगणित मित्र-मैत्रिणी जोडले, जिव्हाळ्याचे झाले. आताशा रोज बोलल्याशिवाय चैन पडत नाही इतके घरातले-आपलेसे झाले. लवकरच प्रत्यक्ष भेटीगाठीचा योगही येईलच. वाचकांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी लिहीत राहिले. मुलगा दूरच्या राज्यात त्याच्या कॉलेजच्या व्यापात आणि नवरा त्याच्या उद्योगात व सध्या मी नोकरी करत नसल्याने तशी निवांत काहीशी एकटीच झालेय. ब्लॉगमुळे या एकटेपणाची झळ खूपच कमी झाली ही मोठी जमेची बाजू. १५३५ हून अधिक वाचकांनी भूंगाने काढलेल्या माझ्या पाककृतींचे पुस्तक " पोटोबा " डाउनलोड केलेय हे पाहून खूप आनंद झाला. वाचकांचे व भूंगाचे मनःपूर्वक आभार. एकेकाळी आईला सारखे काय गं स्वयंपाकघरात गुंतून पडतेस असे नेहमी म्हणणारी आणि केवळ सांगकाम्यासारखे काम करणारी मी, कधी इतका रस घेऊन पदार्थ बनवू लागले याचे मलाच नवल वाटते. नेटभेटच्या मासिकामध्ये काही लेख छापून आले. नेटभेट टिमचे खूप खूप आभार.
कौतुक हे सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान बाळापासून ते आजोबांपर्यंत, ते वयातीत आहे. असे हे कौतुकाचे चार शब्द वाचक आवर्जून लिहितात कधी टिकाही करतात, सूचना-सुधारणा सांगतात. त्याचा खूप फायदा झाला. वाचकांनी- घरच्यांनी - मित्र-मैत्रिणींनी आवर्जून वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे- प्रोत्साहनामुळे- प्रेमामुळेच मी इतपत लिहू शकले त्याबद्दल सगळ्यांचे मनः पूर्वक आभार. यापुढेही असेच प्रेम-प्रोत्साहन-प्रतिसाद मिळत राहतील. खास बेसन-बर्फी केली आहे ती घ्यायला विसरू नका बर का. आता हॉटेलचे नेट बंड करायच्या आत पोस्टून टाकते नाहीतर वाढदिवस एकटीनेच साजरा करावा लागेल.
अभिनंदन!!!!अभिनंदन!!!!! अभिनंदन!!!!!
ReplyDeleteब्लॉगच्या प्रथम वर्षपुर्तीच्या अनेक शुभेच्छा!
ReplyDeleteयापुढेही आम्हाला असेच चांगले चांगले वाचावयास मिळो.....
abhinandan....tumcha aadarsh samor thewnysarkha aahe.ladu chan zalet jara..sakhar kami hoti pan tumchya shabdane godwa aala.
ReplyDelete.....khup khup subecha. khup chan chan liha. aamhi wachu....
baki ..three chiyars for..u r success.
अभिनंदन!!! आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! या वर्षीही अश्याच २९८ तरी पोस्ट्स आम्हाला वाचायला मिळू दे :)
ReplyDeleteabhinandan, ek varsh satatyane vegavegaLyaa vishayavar lihiNe mhanje ganmat nahee!
ReplyDelete( maza ek praytn eka mahinyat sampalaa anee dusaraa 25 post madhe ase disate aahe:)
sonali
मस्तच.. मन:पूर्वक अभिनंदन, भाग्यश्री ताई आणि असं अभिनंदन करण्याची संधी आम्हाला वारंवार मिळो. पुढील लिखाणास शुभेच्छा. अशाच लिहीत रहा.. !!
ReplyDeleteवाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा...अगं आता इतके मित्र-मैत्रीणी मिळाले तरी काहीशी एकटी काय म्हणतेस??? ही पोस्ट खूप छान झालीय...
ReplyDeleteआणि खास तुझ्या ब्लॉग वाढदिवसासाठी माझ्या ब्लॉगवर केक आणि बिस्कॉटी ठेवलीय बघ...इथं आलीस तर शिकता येईल...(माझ्याकडून नाही घाबरु नकोस...हे हे....)
अभिनंदन. तुमचा ब्लॉग पहिल्यापासून पाहतोय. मध्ये मध्ये एवढ्या पोस्ट वाढल्या होत्या की सर्व काही वाचणे कठीण झाले होते. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे शक्य नव्हते पण भानस म्हटलं की निरर्थक नक्कीच नसणार एवढा विश्वास तयार झाला आणि तो कायम आहे. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा !
ReplyDeleteअभिनंदन भाग्यश्री. तुझं मन असंच कायम संवेदनाक्षम राहू देत जेणेकरून आम्हांला असं छान वाचायची मेजवानी मिळेल.
ReplyDeleteवर्षपूर्तीबद्दल अभिनंदन !
ReplyDeleteहा ब्लॉग असाच लिहित रहा.
सद्ध्या काही दिवस तुम्ही रोज नवीन पाकक्रुती लिहून व त्याचे फोटॊ टाकून आम्हाला छाळताय म्हणून तुमचा ब्लॉग वाचायचा नाही असे ठरवले होते पण आज वर्षपूर्ती म्हणून वाचायला घेतले.
तुम्ही भारतात आल्यावर नक्की भेटूच.
आपला,
(वाचक) अनिकेत वैद्य.
Congrats!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete-Ashwini
एक वर्ष !! मोठा कालावधी, आणि तिनशे पोस्ट्स !! मला पुर्ण कल्पना आहे , नविन पोस्ट टाकायला किती विचार करावा लागतो तो.
ReplyDeleteवर्षभर निरनिराळ्या विषयांवर अभ्यासपुर्ण लेख वाचायला मिळालेत. बहुतेक सगळे लेख वाचले आहेतच या ब्लॉग वरचे.एक वर्षात जवळपास ४६ हजाराच्या वर वाचक, निश्चितच क्रेडिटेबल आहे. असंच लिहित रहा.. नविन वर्षासाठी शुभेच्छा..
खरच शाब्बास तुमची!
ReplyDeleteमहेन्द्रकाकांकडुन स्फुर्ति घेवुन मी आर्यनचा ब्लॉग तयार केला आहे. पण आता लक्षात येतेय सुरुवात करणे सोपे असते पण सातत्याने लिहीणे महा कठिण काम :)
सोनाली
anukshre,धन्यवाद.
ReplyDeleteआनंद, मन:पूर्वक आभारी आहे.:)
ReplyDeleteprajkta,खूप खूप आभार.
ReplyDeleteगौरी, धन्यवाद.:)
ReplyDeleteसोनाली, यावर्षी हे सातत्य कठीण दिसतेय. अग, तू पुन्हा सुरवात करशीलच.:)आभार.
ReplyDeleteहेरंब, शुभेच्छाबद्दल धन्यवाद.:)
ReplyDeleteअपर्णा, अग नुकतीच घरी पोचलेय आणि तू खास मेजवानी ठेवली आहेस म्हटल्यावर आता खायलाच हवे... मस्तच गं.:)
ReplyDeleteसाधक, तुम्ही वेळोवेळी दिलेल्या टिपण्यांनी नेहमीच प्रोत्साहन मिळत असे. खूप खूप धन्यवाद.असाच लोभ असू दे.:)
ReplyDeleteअनिकेत, तरीच मी म्हणतेय की अनिकेत कुठे गायब आहे... ह्म्म्म्म.... इतका मोठा निषेध...:((. भारतात आल्यावर भेटूच. तोवर जालावर भेटत राहूच. आभार.:)
ReplyDeleteAshwini.....:)
ReplyDeleteमहेंद्र,या सा~या प्रवासात वेळोवेळी तुझी खूप मदत झाली, मार्गदर्शन मिळाले, प्रसंगी धीर दिलास. औपचारिकपणे आभार मानत नाही.तुझ्यासारखा मित्र मिळाला यातच सारे आले.:)
ReplyDeleteसोनाली, तू नेहमीच माझा उत्साह वाढवलास. खूप आभार. आता मी मायदेशी आले की आपण भेटूच. तुलाही अनेक शुभेच्छा!:)
ReplyDeleteMegh,अग यामुळेच तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली ना...:) धन्स गं.
ReplyDeleteवर्षपूर्तीबद्दल अभिनंदन !!!!
ReplyDeleteपुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा. अशाच लिहीत रहा.. !!
Cheers!!!
अभिनंदन आणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
ReplyDeleteयापुढेही असच छान छान लिहत रहा...
ताई मनापासुन अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा!!!! अगं खरय खुप मित्र मैत्रिणी दिल्यात या ब्लॉगांनी...... आणि तुझ्याशी बोलल्याशिवाय आम्हालाही चैन नाहीच ना पडत...
ReplyDeleteअशीच लिहीत रहा!!!!
मनमौजी, शुभेच्छाबद्दल आभार.:)
ReplyDeleteदवबिंदू,अनेक धन्यवाद.:)
ReplyDeleteवाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
ReplyDeleteManali
भाग्यश्री ..तुझे मनापासून अभिनंदन.
ReplyDeleteतन्वी,हो ना...:) प्रातिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteमनाली....:)
ReplyDeleteमधुमती, घरच्यांच्याही शुभेच्छा मिळाल्या. हॅपी हॅपी...:)
ReplyDeleteहेय..श्री...माझ्या कमेंट शिवाय तु एकटी कशी साजरी करशील गं??? ....त्रिवार अभिनंदन !!!!!..अशीच लिहित रहा..तुझ्या लिखाणाची मी एक मोठी पंखा आहे...सो ..तुझ्या लिखाणात नेहमी प्रगती होवु दे....पुन्हा एकदा अभिनंदन !!आणि हो मिठाई मस्तच....एक अजुन घेउ का???[:फ]
ReplyDeleteमाऊ, किती उशिर केलास...कधीपासून वाट पाहत होते. थांकू थांकू.:)
ReplyDeleteमन:पूर्वक अभिनंदन भाग्यश्री !!!!!! असच छान चांगले लिहत रहा, तुझ्या ब्लॉग मुळेच तुझ्यासारखी मैत्रीण
ReplyDeleteमिळाली.अनेक अनेक शुभेच्छा :)
asana, मलाही तुझ्यासारखी सखी मिळाली.:)मन:पूर्वक आभार.
ReplyDeletekharach ek varsha aani itaka sundar blog.... abhinandan.....ashi 50 varshe purna hovot aani tyaveli aapan sagale mhatare jamu....datanchya kavalya sambhalat manmurad hasu....
ReplyDeleteसुषमेय, अनेक आभार. अगदी अगदी, मस्त धमाल येईल.
ReplyDeleteअभिनंदन ... आपल्या दोघांच्या ब्लॉगचा वाढदिवस १८ फेब... एकाच दिवशी... मला सुद्धा तेंव्हा कामात aslyane काही सेलेब्रेशन करता आले नाही... म्हणुन आता महिनाभर धमाल पोस्ट्स...:)
ReplyDeleteSorry for my bad english. Thank you so much for your good post. Your post helped me in my college assignment, If you can provide me more details please email me.
ReplyDelete