इथे आल्यापासून पाच वेळा नायगारा फॉल्सला गेलो. पण प्रत्येक वेळी समरमध्येच. मे-जून-जुलै-ऑगस्ट, या प्रत्येक महिन्यातील सृष्टीचे बदलते रंग आणि नायगारा फॉल्सचे दृश्य मन-डोळेभरून साठवून घेतले. कितीही वेळा हे पाहिले-अनुभवले तरीही तृप्ती होतच नाही. समाधी लावून तासनतास बसून राहावे. मिशिगन मध्ये आल्यापासून घोकत होतो, एकदातरी जाने-फेब्रुवारी महिन्यातला संपूर्ण हिमाच्छादित नायगारा आणि नायगारा नदी-परिसर पाहायचेच. आमच्यापासून कॅनडा बॉर्डर तासभर अंतरावर. तिथून पुढे साधारण तीन-साडेतीन तासात नायगारा. परंतु २००८ मध्ये एका मागोमाग सात हिमवादळांनी जबरी दणका दिल्याने आम्ही थोडे मागे हटलो. २००९ मध्येही थंडीचा कहर होताच, योग जुळून आलाच नाही.
यावर्षी मात्र अगदी वाटेल ते झाले- अतिरेक स्नो होऊ देत, आपण गोठून गेलो तरी चालेल पण जायचेच असा निश्चय केला होता. पहिला प्रयत्न जानेवारीच्या तिसऱ्या शनीवारी केला पण फसला. साडेचारचा गजर लावला, उठले. जरा पाच मिनिटे पडावे म्हणून... जो डोळा लागला ते डायरेक्ट आठच. काय हे, आजवर तर असे कधीच झाले नव्हते. शी.... अगदी जीवाला चुटपूट लागली. दिवसभर नवऱ्याने चिडवून घेतले. पण त्यादिवशी गेलो नाही हे बरेच झाले. खूप वारा आणि ढगाळ हवा झाली होती दुपारनंतर. मग शेवटचा शनिवार तरी गाठावा पण हवामान खात्याने पुन्हा जाऊ नकाचा इशारा दिला. वाटले आता यावर्षीही होणारच नाही की काय अशाने शेवटी सारा स्नोही जाईल वितळून ही भीती सतावू लागली. आता शेंडी तुटो वा पारंबी, जायचे म्हणजे जायचेच असे म्हणत फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी सकाळी आठ वाजता घर सोडले. बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी लांबून फॉलचे पहिले दर्शन घेतले. गाडी पार्किंग लॉट मध्ये लावण्याइतकाही दम निघेना. काय काय पाहावे आणि किती पाहावे.... हे सारे अवर्णनीय आहे. डोळ्यांचे पारणे फिटले. अविस्मरणीय अनुभव.
निघालो तेव्हा पारा ११ फॅरनाईट दाखवत होता. प्रत्यक्ष फॉलवर २१ तापमान होते. १५ ते २० माईल्स या वेगाने वारे वाहत होते. स्वतःचे वजन जास्ती का अंगावर चढवलेल्या कपड्यांचे असा प्रश्न पडावा इतके- चार चार लेअर्स, दोन दोन सॉक्स- हातमोजे, टोपी-कानाचे आवरण-मफलर आणि खूप जाड कोट घालूनही थंडीचा तडाखा जाणवत होताच. तरीही आम्ही चार तास फॉलवर होतो. पाय निघतच नव्हता तिथून. फोटो -चित्रफिती घेतल्याच आहेत. तुम्ही प्रत्यक्ष पाहाच.
काचेची झाडे
आमच्या समोरच यावरील गोठलेल्या काही तारा कडकड आवाज करत कोसळल्या
तुषारांनी भिजलेली
चकाकणारे लोलक
नायगारा नदी - वरून वाहात येणारी
वरचा किनारा-तुषार-दूरवर दिसणारा रेनबो ब्रिज व नायगारा नदी
(आवेगाने कोसळून काहिशी संयतपणे वाहणारी -सध्या गोठलेली )
कोसळती हिम-जलधारा
सुरेख! काय मस्त फोटो घेतलेस ग!
ReplyDeleteछानच आहेत फोटो. आयुष्यात एकदातरी ह्या धबधब्याला भेट द्यायची माझी इच्छा आहे. तुम्ही तर दर वेळी वेगवेगळ्या ऋतूमध्ये ह्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेतलात. भाग्यवान आहात.
ReplyDeleteAha ha !!!!!! Naigaryache he roop tu camerat mast pakadale ahes, gharbasalya amhala hi pahayala milale.
ReplyDeleteक्रान्ति, अजून टाकतेय गं पाठोपाठ.:)
ReplyDeleteसिध्दार्थ, आयुष्यात एकदातरी इथे जायलाच हवे. नक्कीच भेट द्याल तुम्ही.आभार.
asana, स्वागत व आभार.:)
ReplyDeleteसरदेसाई बाई : फळां-फुलां-झाडां-प्राण्यांच्या फोटोंत मन न रमणार्या माझ्यासारख्या अरसिकालाही फोटो पाहून मजा आली बरं. शिवाय तुमची विंटरमधल्या नायगार्याला भेट देण्याची इच्छा पूर्ण झाली हे वाचून आनन्द झाला.
ReplyDelete- डी एन
धनंजय,यावर्षीही योग नाहीच की काय असे वाटू लागले होते मला.प्रतिक्रियेबद्दल आभार.:)
ReplyDeletewow... kiti amazing g !! malahi ekda winter la yaychay tikde.. god.. kiti to snow !
ReplyDeleteवा.. खरंच गेलं पाहिजे हिवाळ्यात (म्हणजे आता पुढच्याच).. उन्हाळ्यात दोनदा झालाय माझा तसा पण हिवाळ्यात जास्तच भारी दिसतोय..!!
ReplyDeleteहेरंब, अजुनही तुला जमण्यासारखे असेल तर जाऊ शकतोस. फेब्रुवारी संपेतो बहुदा स्नो वितळायला सुरवात होत नाही.
ReplyDeleteभाग्यश्री,नक्कीच आवडेल गं तुला. अर्थात काही दिवसांपुरतेच.लागलीच पळशील LAला.....:)
ReplyDeleteसगळेच फोटो एकदम सहीच. आधीच तुमचा कॅमेरा भारी, त्यात लोकेशन हे असं. मग काय फोटो छान न आले तरच नवल.
ReplyDeleteसुंदर फोटो आहेत. मला इथेच हुडहुडी भरली.. :)
ReplyDeleteछान आहेत फोटो..मी खाली नांव द्यायचं विसरोच.. महेंद्र
ReplyDeleteअत्यंत मनोहारी!
ReplyDeletemast aahe sagale photo aani lucky aahes tu nisarga che etake chan rup jawalun baghay la milale aani thanks for sharing all this -Ashwini
ReplyDeletemegh...:)
ReplyDeleteमहेंद्र, हुडहुडी तर मलाही भरली होतीच. पण डोळे सुखावले. प्रत्येक वेळी नायगाराला जाते, वाटते झोकूनच टाकावे त्या प्रवाहात.....
ReplyDeleteआनंद, धन्यवाद.
ReplyDeleteअश्विनी,उद्याची पोस्टही पाहा गं. आवडतील तुला.:)
कसले मस्त आहेत गं फोटू....पुढच्या ज्यान्येवारीत यावे वाटू लागले बगा तुमच्याकडॆ...तसाही माझा लेक निघालाच आहे तुझ्याकडे आता मेरा पण ऐसाच प्लान हो रहा है....
ReplyDeleteजाणार होतीस माहित होतं..चला झाली एकदाची इच्छा पुर्ण...नायगारा आतापर्यंत फ़क्त उन्हाळ्यातच झालाय...आता फ़क्त गोठलेला पाहायला कुडकुडायची सध्या तरी इच्छा नाहीये...फ़ोटो छान आहेत....
ReplyDeleteस्वच्छ आकाश, ऊन आणि चकाकणारं बर्फ ... मस्तच मेजवानी आहे. आणि खाली ‘क्रमशः’ बघून आणखी खूश झाले मी ... अजून फोटो बघायला मिळणार म्हणून :)
ReplyDeletemastach!!
ReplyDeleteअपर्णा, अग त्यानिमित्ते आली असतीस ना इकडे ...:)
ReplyDeleteगौरी,लख्ख सूर्यप्रकाश होता...अगदी उन्हाचा ताप वाटेल असा पण जीव शून्य त्यात. मात्र फोटोसाठी एकदम पर्फेक्ट गं... होय अजून फोटो टाकतेय.:)
ReplyDeleteमुग्धा...:)
ReplyDeleteनायागाराला भेट हा एक अविस्मरणीय अनुभव आहे आपले फोटो पाहून माझ्या जुन्या आठवणी चाळवल्या मी १९९० साली नायागारयला भीत दिली होती. धन्यावद परत आठवणीच्या सृष्टीत घेऊन गेल्याब्द्धाल .
ReplyDeleteर.ग.जाधव
फोटो जबरी आहेत
ReplyDeleteर.ग.जाधव,स्वागत व आभार.:)
ReplyDeleteप्रसाद, धन्यु.:)
ReplyDelete