
लेक ताहो









आम्ही दोघे आणि मित्र-मैत्रीण व त्यांची दोन लहान मुले. मोठा आठ वर्षाचा आणि धाकटा अडीचचा. आमचा पोर या वयातून कधीचाच पार झालाय त्यामुळे सवय नाही राहिली राव. पोरांबरोबर पकडापकडी खेळ, कुठे उड्या मार....नुसती धमाल चालली होती. सूर्य अस्तास गेला तसे हॉटेलमधल्या तरण तलावात येऊन डुंबलो. प्रत्येकाला कडकडून भूक लागलेली. काय खायचे यावर चर्चा सुरू झाली. करता करता त्यादिवशी फार उशीर झाल्याने नीटसे काही खाणे मिळाले नाही. जो तो वैतागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रोपवे मधून पार वर जाऊन अख्खा लेक डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला. खूप उनाडलो. रूमवर परत आलो तर काल संध्याकाळपासूनची इंडियन खाण्याची भूक मनात दंगा करू लागली. अरे, गावात शिरताना आपण एक धाबा पाहिला होता ना रे? काय नाव होते बरे..... हां ' निक्की दा ढाबा....' चला जायचे का तिकडे? हो.....सगळ्यांनी एका सुरात होकार भरला. लागलीच निघालो.
' निक्की दा ढाब्यावर ' पोचलो. जेवणाची वेळ झाली होतीच. हॉटेल खूप मोठे नसले तरी अडचण होईल असेही नाहीये. टिपीकल सजावट होती. एकीकडे बुफे लावलेला होता. काही नेहमीची कामाधामाची माणसे त्यांचे ठरावीक जेवण जेवून पटापटा पळत होती. आमच्यासारखी ट्रीपला आलेले दोन-तीन ग्रुप्स आरामात गप्पा-गोष्टी, रमतगमत बसले होते. हॉटेलचा मालक आला. हाय हेल्लो झाले. कहाँ सें हो जी....... मग प्रथम इथे कुठे मायदेशात कुठे सगळी देवाणघेवाण झाली. मालक बोलघेवडा होता. अघळपघळ बोलत होता....मध्येच मुलांशी त्याने थोडी मस्ती केली...... मग थोडे चुटकुले.... हसीं मजाक झाला. यामध्ये ऑर्डरही घेऊन झाली. " आत्ता आणतो सगळे तोवर कुछ पियेंगे? लस्सी ट्राय करो जी....बहोत बढीयाँ...... एकदम पंजाबदी याद ताजा हो जावांदी...... " पण आम्हाला असे पोट भरायचे नव्हते.
मित्राचे धाकटे लेकरू एका जागी बसावे म्हणून त्याच्यासाठी थोडे बर्फाचे खडे एका ग्लासमध्ये मागवले होते. मधूनच एखादा खडा खायचा नाहीतर बशीत घेऊन मीठ टाकायचे.... त्याचा मस्त टाईमपास आहे हा. रमला होता चांगला. आमची मैत्रीण पण जरा हुश्श करून बसली होती. मी बुफे घेतला होता....त्यामुळे डोकावले तिथे. नेहमीचेच पदार्थ होते. पाहता पाहता सगळ्यांचे जेवण आले. काही वेळ सगळे हातातोंडाच्या लढाईत मग्न होते. जरा पोट भरल्यावर पुन्हा गप्पा सुरू झाल्या. तोच ढाब्याची मालकीण आमचे " हाल " विचारायला आली. " कैसा लगा खाना? यहाँ हमारा ढाबा कई सालोंसे हैं.....बहोत बिजी रहते हैं......" वगैरे सुरू झाले.
एकीकडे आम्ही जेवत होतोच. मोठ्याने पास्ता घेतला होता आणि त्याला मीठ हवे होते. पण मिठाचा ताबा धाकट्याकडे होता. त्याच्याकडे मागावे तर तो भोकाड पसरणार म्हणून मित्र म्हणाला की त्या शेजारच्या टेबलावरचे घे रे. पोर उठले तोच निक्कीबाईंनी एकदम ’नो ’ असा जोरदार आवाज दिला. पोरगं एरवी आईबाबाकडे वळूनही पाहणार नाही ते त्या आवाजाने एकदम सहमल....दचकून, घाबरून चुपचाप खुर्चीवर अंग चोरून बसलं. आणि आमच्या सगळ्यांच्या तोंडाकडे पाहू लागलं. तोवर निक्कीबाईंनी धाकट्याचा ताबा घेतला.....एकीकडे तोंड चालूच होते. " पुत्तरजी, ऐसे नमक जाया नही करतें. देखो भैय्याको नमक देदो. अच्छे बच्चे गुड बिहेव करते हैं. चलो भैय्याको नमक देदो....." आता हे एवढे सहज सोपे असते तर आम्ही सगळ्यांनी केले नसते का? पण......काहींना जाम हौसच असते दुसऱ्याच्या पोरांना शिस्त लावायची आणि आईबापाला कानकोंडं करवायची.
तिच्या कडक आवाजाला....म्हणजे तिने प्रयत्न केला होता धाकट्याशी बोलताना तो गोड गोड करायचा....पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ना..... धाकटे पोर घाबरले आणि त्या गडबडीत निक्कीने डाव साधला आणि मोठ्याला मीठ दिले. दुसऱ्याच क्षणाला धाकट्याने गळा काढला आणि निक्कीने धूम ठोकली. मग पुन्हा मीठ-बर्फाची मनासारखी जुळवणी होऊन रडे थांबायला पंधरा मिनिटे बाबापुता करावे लागले. सगळे पुन्हा स्थिरावले. माझ्या मनात निक्कीचा आगाऊपणा खदखदत होता. एकतर आजकाल सगळीकडे लहान मुलांना रमवायला काहीतरी देतात. कलर्स म्हणा, छोटेसे गेम्स म्हणा.....जेणेकरून पोरे आईबाबाला दोन घास जेवू देतील. ते तर दूरच राहिले वर त्याला ही बया रडवून गेली.
बुफे मधले पदार्थ चाखून झाले. मग मोर्चा स्वीट्स कडे वळवला. शोधतेय शोधतेय पण काहीच सापडेना. आयला....म्हटले असे कसे होईल. बहुतेक ठिकाणी दोन तरी गोड पदार्थ असतातच. इथे दोन नाही पण एकतरी असलाच पाहिजे. निक्की तर हॉटेलचे-फूडचे लय गुणगान करत होती. च्यामारी काहीच दिसत नव्हते. नवऱ्याला म्हटले अरे तू शोध बरं....निक्कीच्या रागाने मला गोड सापडतच नाहीये. सगळे हसत होते.....नवरा उठला...शोधून आला. नाही गं....बहुतेक आजच्या बुफेत गोड नाहीच ठेवलेय. आँ......... कमालच झाली. एकही गोड पदार्थ नाही? बुफेचा रेट होता.... $११.९९ आणि गोड नाही. आता बरी तावडीत सापडली निक्की. मी अगदी आसुरी आनंदाने उठले आणि निक्कीला गाठले.
निक्की आमच्या पोराला रडवून जी पळाली ती काउंटरमागे जाऊन दडली होती. मी तिला हाय केले......तशी झाले का जेवण? आवडले का? अगदी गोड बोलू लागली. " हां ठीक होते....पण मी गोड पदार्थ शोधत होते.....कुठे वेगळ्या जागी ठेवले आहेत का? तर दाखव मला..... माझा स्वीट टूथ आज अगदी खवळलाय. " त्यावर निक्कीबाईंनी गाल संपूर्ण ताणून जितके मोठ्ठे हसता येईल तितके हसून मोठ्या गर्वाने मला सांगितले. " अग आज भारीच गंमत झाली. सकाळी ब्रेकफास्टला इतकी प्रचंड गर्दी होती की हे बुफेचे जेवण बनवतानाच नाकात दम आला. आमच्या शेफला गोड बनवायला वेळच नाही मिळाला. मग मीच म्हटले.....कोई गल नहीं जी, इक दिन मिठ्ठा नही होगां तो काम चला लेंगे....... लोगोंको बोल देंगे नही हैं. " मी अवाक. वा! निक्की त्वाडा जवाब नही......
संताप संताप झाला माझा. आमच्या एवढुश्या पोराला शिस्त लावतेय बया. स्वत: धाबा टाकून बसलीये. आणि वर लोगोंको बोल देंगे नही हैं, काम चला लो....... इतनी चंगी-भली तो तुम हो नही जी...... तिला म्हटले, " मग बुफेचा आजचा रेट काय आहे? " " वहीच रोजका...लिखा हैं ना वहाँ. " पुन्हा मीच अडाणी असल्यासारखा चेहरा करून बोर्डाकडे तिने बोट दाखवलेंन. मग मात्र माझा टेंपर गेला ( म्हणजे मनात कधीचाच गेला होताच आता उघडपणे गेला ) " मला वाचता येतोय तो बोर्ड. मी तुला रोजचा भाव विचारत नाहीये. आज तू बुफेत स्वीट्स दिलेले नाहीस. का तर म्हणे तुम्हाला वेळ नाही मिळाला म्हणून......आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची राहिले दूरच तू तर मोठ्या दिमाखात मला सांगते आहेस...... ये ना चालबे. तेव्हां आजचा बुफेचा रेट ९.९९ हा असला पाहिजे ना?" तिने माझ्याकडे मारक्या म्हशीसारखे पाहत हात उडवले ( बहुतेक मनात शिव्या देत होती बया ) आणि म्हणाली, " ऐसे थोडा ना होता हैं? रेट तो वहीं रहेगा. " मी म्हटले मी जे खाल्ले नाही त्याचे पैसे देणार नाही.
तोवर तिच्या नवऱ्याच्या लक्षात आले होते. आपल्या बायकोने धंद्याचे टेक्नीक सोडून भलतीच लाइन पकडली आहे. तो आला पळत. " मॅडमजी कोई गल नही जी. आप चिंता न करो. बिल देख लोजी पहले फिर दे देना.....खाना पसंद आया के नही? नही आया होतो बोलो जी ........ हमें भी इंम्प्रूव्ह करना हैं....... आयीये आप बैठीये..... " असे म्हणत मला आमच्या टेबलपाशी घेऊन गेला. बिलात त्याने बुफेचे दोन डॉलर कमी लावले वर आग्रह करकरून सगळ्यांना मसाला-अद्र्कवाली चाय पाजली. हा हा....भलता गैरसमज करून घेऊ नका .......फुकट नाही काही. म्हणजे खरे तर त्याने गोड गोड बोलून ' चाय ' पाजून आणखी खर्चात पाडले. निक्की सगळा वेळ मला खाऊ का गिळूचा चेहरा करून पाहत होती. हा हा........
जाऊ दे गं.... कुठे दोन डॉलरसाठी हाणामारी..... सगळे म्हणत होते. पण हा प्रश्न दोन डॉलरचा नाहीये. तत्त्वाचा आहे. जिला दोन वर्षाच्या मुलाची मेंटॅलिटी समजत नाही...... त्याला रडवले.... मोठ्याला घाबरवले वर आम्हा सगळ्यांची नजरेने हेटाळणी केली....... साधे पोरांना ताब्यात ठेवता येत नाही...... तिला मी का म्हणून बक्षावे? आणि हे तिने केले नसते तरीही स्वीटस द्यायचेच नाहित वर पैसेही घ्यायचे हा प्रकार तिने करताच नये ना..... नंतर सगळ्या ट्रीपभर निक्की.... असे म्हटले, की......

बरं झालं पोस्टलंस ते...आता आम्ही नाहीतरी लेक ताहोच्या आसपास आहोत म्हणजे पुढच्या समर मध्ये बहुतेक ट्रिप होईल आणि आमचा छोकरा दोन वर्षांचा होईल...आम्हीपण कुठे गेलो की दोनेक इतर जेवणानंतर आपलं भारतीय शोधतो तेव्हा निक्कीला टांग मारावी लागेल असं दिसतंय नाहीतर निक्कीच्या नावाने टाहो फ़ोडेल आमचं लेकरू...
ReplyDeleteकाही काही लोक भेटतात नं असे आणि ते पण व्यावसायिक असून अशी वागणूक मिळाली की खरंच सटकते...मला समजु शकतं तुझं तत्वाचं गणित...प्रश्न दोन डॉलरचा नाहीये..खरंय....
फोटो अप्रतिम.
ReplyDeleteफोटॊ खरंच सुंदर आहेत , पण जवळपास कोणिच दिसत नाही, त्यामुळे एक गुढ् शांतता जाणवते त्या फोटो मधे..
ReplyDeleteआणि भाग्यश्री, त्वाढा तो जवाब नहीं.. धाबा टू गुड>
अपर्णा अग नक्की जा ग ताहोला. अप्रतिम आहे. लेकला लागून हॊटेल्स आहेत तिथेच राहा... म्हणजे अगदी पहाटेपासून संध्येपर्यंतच्या सगळ्या छटा अनुभवता येतील. बाकी निक्की म्हणजे...
ReplyDeleteHarekrishnaji धन्यवाद.
ReplyDeleteमहेंद्र तशी थोडीफार माणसे होती आजूबाजूला. पण शांततेचा अमंल जरा जास्तच.अतिशय सुंदर स्थळ आहे हे. रोपवे मधून वर गेलो की संपूर्ण लेक नजरेच्या आवाक्यात येतो. निळेशार स्वच्छ शांत पाणी चोहोबाजूने हिमाच्छादित शिखरांनी मढलेले डोंगर. अतिशय आल्हाददायक हवा.... कितीही वेळ हे पाहत बसलो तरी मन भरतच नाही. इथेच वर स्किईंगही करता येते. शिवाय नेवाडा बॊर्डरवर असल्याने कसिनोजची रेलचेल आहे.:)
ReplyDelete@भाग्यश्री: हा लेक तिन्ही बाजुने डोगराने वेढलेला आहे का ? फोटो तरी तसच काही दिसत आहे. बाकी फोटो खुपच मस्त आलेत ह...
ReplyDelete-अजय
भाग्यश्रीताई तू सही आहेस.....खरयं तुझं प्रश्न पैश्याचा नसतोच तत्वाचा असतो....आणि येव्हढा निरुपद्रवी तात्विकपणा तरी आपण केलाच पाहिजे ग!!!! नाहीतर नुसतीच आपली चिडचिड आणि ईतर कोणाला काहिच कळतही नाही की आपल्याला नेमका त्रास होतोय तरी काय!!!!
ReplyDeleteसही पण आवडली पोस्ट.....अगं इथे पण एकदा आम्ही कामतमधे गेलो होतो गौरा पळते गं इथे तिथे तर त्या मॅनेजरने असेच रडवले होते तिला......अमित चिडला आणि गर्दी आहे लोक वेटींगला आहेत दिसत होते तरिही निवांत जेवत राहिला.....मी उगाच आपली कानकोंडी होत होते...याचे मत त्याने माझ्या मुलांना न रडवता मला रिक्वेस्ट का नाही केली की आज गर्दी आहे तर जरा को-ऑपरेट करा म्हणून....मी आवरतच होतो ना, गर्दी, लोकांची अडचण मलाही कळतेय पण मुलांना हात लावायचा नाही!!!!!!
अजय तस म्हणता येईल. खूपच सुंदर जागा आहे. प्रत्येक प्रहरी वेगळाच नजारा व निरव शांती.
ReplyDeleteतर काय गं तन्वी, जो तो पाहिजे तसा वागतो आणि आपण नुसतेच चिडचिडत राहतो. मग कधी कधी मराठी बाणा असा डोके वर काढतो. :)
ReplyDeleteअमितचे बरोबरच आहे. जी गोष्ट सरळपणे सांगता येते आणि तेही लहान मुलांशी निगडित ती नीट्च सांगावी ना.
फोटो इतके अप्रतिम आहेत तर जागा किती सुंदर असेल. यावरून एक म्हण आठवली खंडहर दिखाते है कि इमारत कितनी बुलंद थी. हल्ली टेग तेगीचा एक खेळ चालला आहे त्यामुळे माझ्या कालच्या पोस्ट वर तुम्हाला टेग केलाय. भेट द्यावी.
ReplyDeleteहल्ली टेगल, पोस्टल असे शब्द पसरत चालेले दिसत आहेत. चला माझ्या डिक्शनरी साठी शब्द संग्रह वाढत आहे.
मला टॅगलंस, त्याबद्दल धन्यवाद! :-)
ReplyDeleteपण तुझी पोस्ट कुठे आहे?
रविंद्रजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल व मला टॆगलेत अनेक आभार.:) माझी पोस्ट टाकून झाल्याने तुमचे आभार इथेच मानतेय.
ReplyDeleteकांचन हा हा... अग टाकली बघ आत्ताच....:)
ReplyDeleteek number aahet sagale photos!paanyaacha, aakashacha nilaa rang apratim.
ReplyDeleteगौरी फोटोची करामत नवरोबाची.:)
ReplyDeletesahich bolalis ga tyaa nikki la.
ReplyDeleteअग जाम सटकलीच होती माझी. उगाच पोराला रडवले... आपण नेहमीच सोडून देतो ग सायो आणि अशा लोकांचे फावतच राहते.
ReplyDeleteअहं, छान आलेत फोटो.
ReplyDeleteकेवळ फोटोग्राफीच्या संधींसाठी मला परदेशात असावंसं वाटतं. पण खरं सांगु मला अमेरीकेपेक्षा जास्त किंबहुना खुपच आकर्षण आहे ते म्हणजे युरोपचे. प्रत्येक सिन म्हणजे अगदी पिक्चर परफेक्ट