जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, December 6, 2009

जो वादा किया वो निभाना पडेगा.....

ज्येष्ठ अभिनेत्री बीना राय यांचे निधन झाल्याचे वाचले आणि काळ खूप मागे गेला. मी सातवी-आठवीत असताना ' ताजमहाल , अनारकली ’ पाहिला होता. तेव्हा आमच्या घरी टीवी नव्हता. त्यामुळे चाळीत कोणाकडे तरी जाऊन पाहत असू. रविवारी हिंदी चित्रपट दाखवला जाई. कधी कधी बाबा खूप रागे भरत. बिलकुल लोकांकडे जायचे नाही टीवी पाहायला. आम्ही एवढुसे तोंड करून चुळबुळत बसायचो. पण हे दोन सिनेमे लागले की मात्र बाबाही किंचित दुर्लक्ष करायचे आणि आम्ही धूम ठोकायचो. ' जो वादा किया वो निभाना पडेगा.... व ये जिंदगी उसी की हैं.......' ही गाणी काळजात घर करून गेली आहेत. ' काली घटा ', ' घुंघट ', ' हिल स्टेशन ', ' बंदी ', ' दुर्गेश नंदिनी ',’ चंगेज खान ’, ' फागुन ', ’ दादी मॊं ’ हे बीना राय यांचे चित्रपटही त्या काळात तीनचार वेळा पाहिले. या ज्येष्ठ अभिनेत्रीला त्यांच्याच गाण्याने श्रद्धांजली वाहत आहे.


10 comments:

 1. मला पण बीना राय खूप आवडते. खूपच सुंदर दिसायची. अजूनही तिचे चित्रपट लागले की फक्त तिच्यासाठी ते पहाते.

  ReplyDelete
 2. मला स्वत:ला तिची गाणी आवडतात....कारण त्यांची ओळख माझ्या बाबांनी करून दिली आहे....त्यांच्या गुणगूणण्यातून समजलीत ही गाणी....

  ReplyDelete
 3. 'ye jindagi usi ki hai ...' maajhe all time favourite gane aahe

  ReplyDelete
 4. अगदी खरे..मला ही खुप आवडायची हिची गाणी..एकसे बढकर एक होती गाणी..

  ReplyDelete
 5. क्रान्ति, तन्वी, गौरी,माऊ मला वाटते ही दोन्ही गाणी ऒल टाईम फ़ेवरेटच आहेत. अगदी माझ्या बाबांपासून हल्ली हल्लीच्या मुलांमध्येही फेमस.

  ReplyDelete
 6. एक आणखी तारा निखळला.


  (शंकर महाराजांवरच्या पुस्तकात श्री. आशरंचा उल्लेख आहे. माझ्या एका मित्राची मुलगी त्यांची सुन आहे)

  ReplyDelete
 7. Harekrishnaji...खरे आहे. हे सगळे चित्रपट व कलाकार माझ्यासाठी खूपच जुने तरिही मनात घर करून गेलेत.


  ( श्री.आशरांचा उल्लेख...हो बरोबर.ओह्ह्ह्ह..... मायदेशात आलो की भेटायला आवडेल.)

  ReplyDelete
 8. सचमुच जो वाद किया वो निभाना चाहिये लेकीन ऐसा होता नाही है. माझी आवडती हिरोईन बिना रॉय, मधुबाला व मीनाकुमारी ई. काय अदाकारी होती त्यांची. हल्ली असे चित्रपट, असे गाणे आहेत कि बघावे व ऐकावेसे ही वाटत नाही.

  ReplyDelete
 9. रविंद्रजी खरे आहे तुमचे म्हणणे. वादा निभवणे शक्य नसते. बाकी आजचे काही सिनेमे व गाणीही चांगली आहेत. दोन-तीन वेळा ऐकली की हळूहळू मनात उतरत जातात. मात्र तोवर त्यांच्यापाशी रेंगाळायला हवे.:)

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !