गेली तिनचार वर्षे रंग फारसे आलेच नाहीत. गेल्या वर्षी सुरवात चांगली झाली होती. आता पंधरा दिवसात अप्रतिम नजारा दिसेल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा तापमान उष्ण झाले. चढू लागलेले रंग थबकले. हिरव्या रंगाचा साज पुन्हा पानांवर दिसू लागला अन एक दिवस रात्री अचानक पारा घसरला. एकदम कडाक्याची थंडी पडली. भरीत भर दोन दिवस जोराचा पाऊस मध्येच हलकीशी गारपीट व सोसाट्याचा वारा यांमुळे झाडे अक्षरशः झोडपून निघाली. अर्ध्याहून जास्ती पानांनी धारिणीकडे धाव घेतली. उरली सुरली झाडावरच म्लान झाली, कोळपून गेली. फॉल हा निव्वळ पानगळतीतच संपला. 




बर्निंग बुश
या वर्षी मात्र गेल्या काही वर्षांचे उट्टे काढल्यासारखे भरभरून रंग आले. किती आणि कुठे कुठे पाहावे, नजरेत भरून ठेवावे की कॅमेऱ्यात कैद करावे याची नुसती गर्दी झाली. अक्षरशः रोज सृष्टी मुक्त हस्ताने रंग उधळीत होती. मिशिगन म्हणजे गर्द झाडी व जागोजागी तळी. लांबलचक रस्ते, दोन्ही बाजूने आकाशाचा ठाव घेणारी उंच उंच तरीही भरलेली डेरेदार झाडे. दर दिवशी वेगवेगळे रस्ते धुंडत रंगाचा माग काढत फिरत होतो. धावत्या गाडीतून जितके टिपता येईल तितके नजारे गोळा करत होतो. मेपल, अस्पेन, ओक, बीच, बर्च आणिकही बरीच झाडे आहेत. या सगळ्या झाडांत काही झाडे संपूर्ण लालचुटुक होऊन जातात. तर काही मस्त पिवळा तुकतुकीत रंग लेऊन बसतात. काही शेंड्याला लाल मग केशरी-पिवळी व खाली हट्ट धरून मूळ रंगाला न सोडणारी हिरवीगार राहतात. काही चक्क जांभळी तर काही बिटाच्या रंगाची. बहुतांशी घराच्या बाहेर, बागेत कडेकडेने धड ना छोटी रोपटी धड ना मोठाली झाडे अशी पण डेरेदार झाडे धुमसता अंगार लेऊन लालभडक झालेली दिसतात. ( बर्निंग बुश ) यांच्या शेजारीच पिवळेकंच झालेले झाड म्हणजे पर्वणीच. 




ऑक्टोबरच्या शेवटच्या पंधरवड्यात सगळ्यांचे डोळे सुखावत ही सुंदर पाने पाहता पाहता धरेकडे झेपावतात. रंग तरीही उरतातच मग बरेचदा मुले-मोठे पाने गोळा करून वाळवून कलाकुसर करतात. शिवाय या सगळ्या पानांचा खतासाठी उपयोग होतो. बरेचदा पाने गोळा करून आपल्याच बागेत खड्डा खणून आवश्यक ती द्रव्ये मिसळून येणाऱ्या स्प्रिंगमध्ये पुन्हा एकवार भरभरून फुलण्यासाठीचे खाद्य घरच्याघरी तयार करता येते. एकदा का पाने गळून गेली की उरतात निव्वळ खराटा झालेली झाडे. अगदी बघवत नाही त्यांच्याकडे. खूप वाईट वाटत राहते. सगळ्यात जास्त वैताग वाटतो तो म्हणजे थंडीची जोरदार चाहूल लागलेली असते. प्रत्येक गळणारे पान जणू थंडीच्या दुष्ट आगमनाची दवंडी देत असते. अगदी गाजावाजा करून ही हाडे गोठवणारी मनांना थिजवणारी थंडी येऊ घातलेली दिसत राहते.
सध्या आम्ही फारच उत्तरेला मिशिगनमध्ये म्हणजे निसर्गाच्या कुशीतच. यावेळचा फॉल अतिशय सुंदर होता. त्याची थोडी झलक तुम्हाला दाखवतेय. आहे ना अप्रतिम रंगपंचमी.......













सुंदर...सुंदर...आणि सुंदर.....दुसरा शब्दच नाहीये.....
ReplyDeleteसुरेख! खूपच खास रंगपंचमी आहे ग!
ReplyDeleteवाह!!! क्या बात है!!! निसर्गाने किती मुक्तहस्ताने रंगांची उधळण केली आहे!!! इसका जबाब नही!!Thanks for sharing Pics.
ReplyDeleteमला खास करून तो लालसर रंग खुप आवडतो ... फोटो मस्तच.. :)
ReplyDeleteओ हो, अप्रतीम
ReplyDeleteमी कधी येउ सांग श्री...
ReplyDeleteखुप सुंदर फोटॊ आहेत.. अप्रतिम... शब्दंच नाहित काही कॉमेंट करायला..
ReplyDeleteसर्व निसर्गाची किमया जी पाहायला नशीब लागते. आम्ही तर असे दृश्य विसरलो आहोत. अप्रतिम रंग संगती आहे निसर्गाची. विलोभनीय.
ReplyDeleteमाणसांसारखी झाडंही थंडीने लाललाल झाली आहेत, मस्त, पानगळतीच्या मोसमात बाकी कवितांचे पाऊस पडत असणार, मला मागे एकदा 'गुड आयडिया' म्हणाला होतात लक्षात आहे ना?
ReplyDeleteअगं कसले खतरनाक रंग आहेत ग....एकदम मार डाला..
ReplyDeleteकाय पण सांग या रंगामुळे नंतर येणारी थंडी थोडी सुसह्य होते की नाही?? थंडीत फ़ॉलच्या आठवणी काढायच्या.
आता मी आहे तिथे सगळे पाईन्स. त्यामुळे हिरवाईची मेजॉरिटि आहे. पण कालच माझ्या खिडकीसमोरचं एकमेव केशरी झाड गळलं आणि तुझी आजची पोस्ट योगायोग आहे
kharach sunder rangapanchami.
ReplyDeleteikde hya veli badalatya havemule fall asa jhalach nahi. pan Vermont la sunder colors baghyla milale. tu FB var ahes ka? photo dakhavle aste.
तन्वी, क्रान्ति या वेळी निसर्गाने गेल्या काही वर्षांचे भरभरून उट्टे काढले होते गं.एकापेक्षा एक रंग अन पानांवरची तकाकी अप्रतिम होती. :)
ReplyDeleteमनमौजी :)
ReplyDeleteरोहन लालचुटूक झाड व शेजारी पिवळेकंच म्हणजे तर पर्वणीच.:)यावेळी तुला मिळाले होते का पाहायला रंग?
Harekrishnaji आभार.
ReplyDeleteमाऊ अग तुला विचारायला हवे का..कधी येऊ ते? बॆग भर आणि निघ. हेहे..मात्र रंगांसाठी पुढच्या ऒक्टोबरची वाट पाहायला हवी.:)
महेंद्र आम्ही दहा बारा दिवस रोज वेड्यासारखे बाहेर जात होतो. पारणे फिटले अगदी.
ReplyDeleteरविंद्र आहेत खरी विलोभनीय. आभार.
ReplyDeleteचुरापाव अरे थंडीतल्या कविता म्हणजे ’विरक्ती’ हा...हा... आहे लक्षात आहे.:)
अपर्णा अग यावर्षी रंग आले म्हणून निदान डोळे सुखावले तरी....आता तुला इथल्या वेड्या स्नोचे फोटोही दाखवेनच....एका मागोमाग एक वादळे सुरू झाली की मज्जाच मज्जा...तू थोडीशी सुटलीस आता...:)ओह्ह्ह्ह...अजून तुझ्याकडे पाने आहेत तर...मस्त.
ReplyDeleteसायो अग आहे ना मी FB वर....हा इथे जो आयडी आहे ना तोच....shree_279@yahoo.com .
ReplyDeletetujha nava+aadnav hyane 2 profiles disali FB var. donhich location 'detroit-MI' he ahe. he profiles tujhech ahet?
ReplyDeleteसायो हो गं माझेच आहेत. :)
ReplyDeletephaarach sundar ... visheshatah paanyaatalee pratibimbe tar apratim!!!
ReplyDeleteगौरी हो ग.... अगदी किलर कलर होते यावेळी..:)
ReplyDeleteapratim, dusra shbdach nahi, kahi pics mi wallpaper mhaun set karu pahile pan tyachi size khupach kami ahe, kahi madat kartal ka ? :-)
ReplyDeleteअजय तुझा विरोपाचा पत्ता दे व कुठले फोटो हवेत ते कळव....पाठवते तुला. :)
ReplyDeleteकाय ग मस्त आहे सर्व. अशा फॉल मध्ये गरमागरम वरणफळे, मनात विरक्ती, नजरेसमोर असे भन्नाट रंग. जाऊदे जास्त पुढचे पुढचे लिहित नाही..
ReplyDelete......मी.स्नो पण टाक न पाहायला.
अजयला अनुमोदन!!!
ReplyDeleteवालपेपर म्हणून लावण्याजोगे, आम्ही सध्या तरी प्रत्यक्ष पाहू शकत नाही, डेस्कटोप वर तरी लावता आले तर मिळविली...
anandpatre@gmail.com - remove it from comments if you can :)
anukshare हो ना स्नोचेही टाकेन. जरा ढिगारे साठू तर्र देत...:)
ReplyDeleteआनंद अनेक धन्यवाद.खरे आहे...फारच मनमोहक होता यावर्षीचा फॊल.:)
ReplyDeleteकभी शाख-ओ-सब्ज-ओ-बर्गपर
ReplyDeleteकभी गुंचा-ओ-गुलो खार पर
मै चमन में चाहे जहॉं रहू
मेरा हक है फस्ले बहर पर |
- जिगर मुरादाबादी.
वाह!क्या बात हैं! harekrishnaji या अप्रतिम पंक्ती वाचायला मिळाल्या...मस्त वाटले. आभार.
ReplyDeleteajay.sonawane@gmail.com var pathav pics --- shewtche 4 pics pathav naa
ReplyDeleteवाह, फारच सुंदर. शेवटचा आणि शेवटुन चौथा फोटो माझा सर्वात आवडता
ReplyDeleteआयुष्यात एकदा तरी अश्या रस्त्यावरुन जायचे आहे :-)
अजय फोटो पाठवतेय. :)
ReplyDeleteअनिकेत हो रे...प्रत्येकाने एकदातरी हा रंगाचा उत्सव पाहायला हवाच. आभार.:)
आयला, तुम्ही इथे राहता! छान आहे. तुमच्या ब्लॉगवर ते THANKSचं gadgetही चांगलं आहे. मला ते इथे सापडलं.
ReplyDeleteआहाहा-- काय मस्त छायाचित्रे आहेत! रंगांची उधळण चांगली टिपली आहे. असे रंग,झाडे हिमालयात अपवादाने दिसतात.
ReplyDeleteनुकताच मी अरुणाचल प्रदेशात जाऊन आलो,तेथे अशी तुरळक झाडे दिसली.मनात येणारा प्रश्न असा की ज्यांचे आयुष्यच मिट्ट काळ्या रंगानेच भरलेले आहे,निव्वळ अंधकारानेच उधळले गेले आहे त्यांना ही रंगांची उधळण कशी दिसावी?त्यांनाही असा आनंद कसा मिळावा? अशा सव्वा कोटींपैकी तीस लाखांना साध्या नेत्ररोपणाने हा आनंद मिळू शकतो.त्यासाठी जरूर आहे ती लाख ते दीड लाख नेत्रदानांची, होतात फक्त १५ हजार आणि अत्यंत शरमेची बाब अशी की श्री लंकेसारखा छोटा देश आपल्याला दहा हजार नेत्र पुरवतो. हे लाजिरवाणे परावलंबन नष्ट व्हावे असे सर्व देशाभिमान्यांना नक्कीच वाटेल. सविस्तर माहितीसाठी सर्वांनीच माझा ' www.netradaan.blogspot.com ' हा ब्लॉग जरूर पाहावा ही कळकळीची विनंती.
- श्री.वि.आगाशे,ठाणे.
अवधूत, ब्लॊगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल आभार. :)
ReplyDeleteआगाशेसाहेब, सर्वप्रथम ब्लॊगवर आपले स्वागत आहे. आपल्याला फोटो आवडल्याचे वाचून आन्ंद झाला.
ReplyDeleteआजही नेत्रदान/देहदानाचे महत्व आणि त्याची प्रेरणा मनामध्ये रुजत नाही ही खेदाचीच गोष्ट आहे. आम्ही तिघांनीही कधीचेच हे लिहून दिले आहे. किमान तेवढे तरी प्रत्येकाला करणे शक्य आहेच.
पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या ब्लॊगला भेट दिलीच आहे.