जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, November 11, 2009

या बैलाला कोणीतरी आवरा रे.......


हा फोटो तर सगळ्यांनीच पाहिला आहे. हा बैल निर्लज्जपणे राष्ट्रगीत सुरू असताना बसू कसा शकतो? अगदी लहान मुलेही राष्ट्रगीत सुरू झाले की ताबडतोब उठून उभे राहतात. कुठेही राष्ट्रगीत वाजले मग ते झेंडावंदन असो वा चित्रपटगृह असो उभे राहून सगळे मानवंदना देतात. तीही अतिशय भारावून व देशाभिमाने. देशप्रेम हे सगळ्यापेक्षा- मुख्य म्हणजे स्वतःपेक्षा वर असते याची जाणीवच नसलेला हा बिहारचा बैल संसदेत तोंड वर करून बोलतो, नेता म्हणून लोक याला निवडून देतात. आज अतिशय मस्तवाल झालेला हा बैल अबू आझमीच्या झालेल्या प्रकाराबद्दल काय बोलतो आहे ते या चित्रफितीत पाहा-ऐका. आज म्हणे महाराष्ट्राच्या विधानसभेत जे पाहायला मिळाले त्याने सगळा देश शरमिंदा झालाय. सर झूक जाता हे. ज्याला राष्ट्रगिताचे आपल्या मातृभुमीचे काडी इतकेही प्रेम नाही. तो राष्ट्रभाषा हिंदी आहे याचे आज गोडवे गातोय. संसदेत चाललेल्या हाणामाऱ्यांत जणू याने कधी सहभाग घेतला नाही. विधानसभेत अशा हाणामाऱ्या होऊ नयेत अशाच मताची मीही आहे. परंतु झालेली घटना ही का घडली आहे व ती प्रतिकात्मक आहे हे लक्षात घ्यायला हवे. आजवर संसदेत-लोकसभेत व राज्यांराज्यांच्या विधानसभेत झालेल्या मारामाऱ्यांच्या चित्रफिती पाहा.( याचा अर्थ अश्या मारामाऱ्या घडू देत असा नाही. विधानसभा-लोकसभा म्हणजे मारामारी करण्याचे आखाडे नाहीत व अशा घटना घडूच नयेत.) त्याही पुढे जाऊन हा म्हणतोय की देश टुटेगा तो महाराष्ट्र के कारण टुटेगा, शिवसेना के कारण टुटेगा. हा तर जाहीर आरोप करतोय. या निंदनीय घटनेवर कार्यवाही नाही केली गेली तर देशाचे नक्कीच तुकडे होतील-देश को टुटने सें कोई नही बचा सकता...... याचा गर्भित अर्थ काय निघतो? का एका भयावह कारस्थानाची सुरवात झालेली आहे? पुन्हा पुन्हा या चित्रफितीत लालू म्हणतो आहे की पना देश खंड खंड होने जा राहा है........... या सगळ्या प्रकरणाचा भारत देशाचे तुकडे होण्याशी काय संबंध आहे? का भारत देशाचे तुकडे व्हावेत असा प्रयत्न सुरू आहे? लालूला या आधी अबूचा इतका पुळका आलेला तर पाहिला नव्हता. उद्या जर लालूने स्वतंत्र बिहारची मागणी केली तर........ तीही महाराष्ट्रामुळे............

24 comments:

 1. अशा निर्लज्ज माणसाला भर रस्त्यावर चाबकाने फोडुन काढले पाहिजे. आता हे असे बैल, चारा खाउन खुप माजलेले आहेत. ह्या बैलाला, स्वतः माकड असल्याचा साक्षात्कार झाला की मग तो अशा माकडचेष्टा करतो. त्यांच्या कडे जास्त लक्ष न दिलं तरीही चालण्यासारखं आहे..

  ReplyDelete
 2. महेंद्र, अरे हे ऐकले आणि इतका संताप आला. आधीच मर्कट तशात मद्य प्याला त्यातच त्यास विंचूदंश झाला असे चाळे चालले आहेत. पण वेळीच हे विंचू ठेचले गेले नाहीत तर अजून पाच वर्षांनी भारताचा नकाशा कसा दिसेल याची भीती वाटते.

  ReplyDelete
 3. याना खेटरानीच मारलं पाहीजे. दुर्लक्ष केलं की आणखी मस्तवाल होतील ही भीती. मी दुर्लक्ष करूनच ब्लॉग लिहीला नव्हता पण आपला लेख वाचला आणि सटकली.

  ReplyDelete
 4. खरच ग श्री..ह्याल हाणायला पाहिजे कुणीतरी..निर्लज्ज माणुस...

  ReplyDelete
 5. लालु हा एक महानिर्ल्लज माणुस आहे, त्याला खरंच महेंद्रकाका म्हणतात तसे रस्त्यावर फोडुन काढला पाहिजे. हे बिहारी साले एकजात सारखे. तो रामविलास, नितीश सारे मस्तवाल आहेत. स्वत: काही करायचं नाही आणि सारे लोक दुसर्या राज्यात पाठवुन द्यायचे. स्वता एकदुसरयाच्या चड्द्या ओढ्ण्यात हे दंग आहेत. यांच्याएवढा भष्ट्राचार कुणी केला नसेन. जाऊदेत मला या माणसाबद्द्ल जास्त बोलायचीही इच्छा नाहीये.

  -अजय

  ReplyDelete
 6. मित्रांनो, तो कोणीतरी आता आला आहे.... यांना राज ठाकरेच वठणीवर आणेल.
  by the way... nice writing bhanas.... keep it up...

  ReplyDelete
 7. माकडाच्या हाती कोलीत आहे!!! लायकी पेक्षा अधिक मिळाल त्यामुळे जास्त उड्या मारतोय!! चारा सुद्धा सोडला नाही त्याने खायचा!! त्याला बैल नका बैलाचा अपमान आहे तो....

  ReplyDelete
 8. ag bailaach lihilas pan shejari basleli mhais? tichya baddal kahich nahi? ;)

  ReplyDelete
 9. नरेन्द्रजी अहो हे बघितल्यावर अक्षरश: सटकलीच हो. प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 10. माऊ अग पाहा ना, काहीही बोलायचे म्हणजे....

  ReplyDelete
 11. अजय अरे यांची जनता दाहीदिशा सोडून दिली आहे. (आपण सगळे एक आहोत-भारताचे नागरिक. मला असे आमचे तुमचे म्हणायची अजिबात इच्छा नाही. पण दुर्दैवाने असे म्हणायची वेळ यांनीच आणून ठेवली आहे.)वर नको ती व्यक्तव्ये करत सतत लाईम लाईट मध्ये राहायचे.
  प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 12. आशुराज स्वागत व अनेक आभार.
  या अशा मस्तवाल लोकांना खरेच कोणीतरी लगाम घालेल का?पाहूया काय काय घडतेय ते.....

  ReplyDelete
 13. मनमौजी मी तुझ्याशी सहमत आहे. माजलेला सांड म्हणायला हवे.याची लायकी तर सर्वश्रुत आहेच.

  ReplyDelete
 14. अग सायो ती भैसीण तर......खरेच किती निर्लज्ज जोडी आहे गं. अरे एखादा निदान सगळे उभे आहेत म्हणून लाजेकाजेस्तव उठेल...पण हे लोक तर नेसूचे कधीचेच वर करून मोकळे झालेत. आता कसली लाज आणि कसला देश.....

  ReplyDelete
 15. भयंकर नालायक माणसं आहेत गं ही!!!चोरांच्या उलट्या बोंबा दुसरे काय!!!अगं ते मुलायम, मायावती पण काही कमी आहेत का???वर तो अमरसिंग आहे....सगळे बेइमान आणि देश महान अशी गत आहे!!!

  ReplyDelete
 16. हा फोटो पाहून मलाही राग अनावर झाला होता पण नंतर मी विचार केला. मी काही ह्या म्हसोबाची नि म्हशीची समर्थक नाही पण मला वाटतं हा फोटो ही फोटोशॉपची करामत असावी अन्यथा चित्रपटातही राष्ट्रगीताचा अवमान सहन न करू शकणा-या भारत देशात हे कुणी सहनच केलं नसतं. जर हा फोटो खरा आहे तर अजून ह्या माजोरड्यांवर कारवाई करून यांना देशातून हाकलून का लावत नाहीत? हा फोटो गेली दोन वर्ष मला ईमेल मधून येतोच आहे. पण कारवाई झाल्याचं कधी ऐकीवात नाही. म्हणूनच या फोटोच्या सत्यासत्येबद्दल मला संभ्रम आहे.

  लालू, मुलायम आणि अमरसिंह यांच्या बोलण्याच्या शैलीतून त्यांची लायकी समजलीय. जोपर्यंत खरं समोर येत नाही तोपर्यंत खोटं पचतं. आता ह्या सगळ्या खोटारड्यांची फाटलीय म्हणून तर दिल्लीवरून दबाव आणून फक्त मनसेवर कारवाई करतात. अबूची चप्पल नाही दिसली या कुत्तरड्यांना.

  ReplyDelete
 17. कांचन अग जर सो कॊल्ड माता म्हणवणा~या त्या निर्मलादेवींच्या पायाखाली असलेला आपला राष्ट्रध्वज आय ए एस अधिका~यांच्या साक्षीने असू शकतो तर हा फोटो खोटा का असेल? आणि कारवाई कोण करणार गं? सगळेच चोर ते कसे एकमेकावर कारवाई करतील? तू व्हिडीओ ऐकलास ना? आता हे जे देशाचे तुकडे होतील...असे बोलतोय....त्यावर कोणी तरी आक्षेप घेतला का?
  हो ना त्या अबूने दाखवलेली चप्पल कशी दिसत नाही नेमकी.....थोडक्यात काय सगळे माजलेले सांड एकत्र येऊन दबाव आणत आहेत.

  ReplyDelete
 18. तन्वी बाबाSSSS...तो अमरसिंग म्हणजे ...मरो..सकाळी सकाळी डोके सटकेल पुन्हा. अग स्वत:च्या लोकांनी यांना दिलेय हाकलून घराबाहेर. आता ही किड आपल्याला पोखरतेय.... :(

  ReplyDelete
 19. kas khajawatoy lalu! mast! bar to hinditach bolat hota ki bihari kinva kay tyacnhya tya bhashe madhe. adhi hya XXX nit hindi bola mhnava. yoga yogane yanchi bhasha hindi sarkhi!
  khrach ya weles he siddh zaly ki pratek ladhai kharach intelllectual waynech ladhvi asa kahi nahi. kadhikadhi danduka hi chngale results deto.

  ReplyDelete
 20. प्रकाश स्वागत व अनेक आभार.अरे तू चित्रफीत पाहिली नाहीस का? नसशील तर जरूर पाहा.

  ReplyDelete
 21. ती निर्मलादेवीची बातमी मला माहीत नाही. काही दुवा बिवा असेल तर दे. ह्या फोटोबद्दल मला अजूनही शंका आहे. पण ह्या साल्यांना चोपून काढायला पाहिजे आता. बस्स झालं.

  ReplyDelete
 22. हो व्हीडीओ बघूनच खाजावाण्यावर टिप्पणी केलीये. माझ्या एका मित्राने याच विषयावर छान लिहिलंय! इथे http://mukhyamantri.blogspot.com/

  ReplyDelete
 23. प्रकाश पाहते हं तुझ्या मित्राची पोस्ट.:)

  ReplyDelete
 24. कांचन अग त्या निर्मलादेवींच्या या बातमीवरून एक दिवस फार गदारोळ माजला होता....आणि गंमत म्हणजे हा गदारोळ त्यांनी झेंडा पायाशी ठेवलाय या मुद्द्यावर नाही बरं का....तर हे सगळे आय ए एस अधिका~यांच्या समोर झाले तर ते काय झोपले होते का? त्यांच्यावर कारवाई करा.....सांग आता यावर काय बोलावे? मी लिंक देते तुला...

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !