जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, November 19, 2009

आस....

आताशा मन माझे का असे शांतशांत
न कळे जाणवे का जीवघेणा एकांत
थांबेल कधी शोधणे, मिळेल का जीवा दिलासा
कसे सांगू तुला, किती आहेस तू हवासा

का नयन माझे धुंडती दशदिशां तुज
असता समीप तव स्वर्ग दिसे मज
चहूकडे शोधते मी कुठे लागेल चाहूल तुझी
कसे सांगू जीवलगा, किती आहे आस तुझी

केवळ धडकण्याकरिता का हृदय माझे स्पंदते
तरीही श्वासावर माझ्या का असती तुझेच पहारे
जीव माझा वणवण शोधे का तुझाच सहारा
कसे सांगू प्रिया तुज, तूच एकमात्र आसरा

असे माझे जगणे का माझेच आता नाही उरले
माझ्या आठवात परी का तुझेच श्वास उसासले
आता तरी तुझ्या अंतरात घर माझे वसावे
अन मी स्वतःला तुझ्यावर मुक्त उधळून द्यावे

10 comments:

  1. मस्त.....तुला न भावना शब्दात नेमक्या मांडता येतात!!!!!

    ReplyDelete
  2. विरह खूपच भावला. हे परदेशी निघाले की त्यांचे व माझे असेच व्हायचे.संध्याकाळ तर नकोशी वाटायची.आता एकत्र आहोत तर आई तिकडे एकटी........चालायचेच.

    ReplyDelete
  3. तन्वी प्रयत्न करतेय गं.

    ReplyDelete
  4. अनुक्षरे आजकाल माझी तर त्रिशंकूची अवस्था आहे.:( आभार.

    ReplyDelete
  5. on a lighter note..

    ही कविता सुचण्यामागे इथल्या हिवाळ्याची प्रेरणा असावी...

    ReplyDelete
  6. हा हा...अपर्णा...जावे त्याच्या वंशा तेव्हांच कळे....

    ReplyDelete
  7. दिसे मज चहूकडे शोधते मी कुठे लागेल चाहूल तुझीकसे सांगू जीवलगा, किती आहे आस तुझी

    अप्रतिम!!! खूप विरह आहे या कवितेत. छानच.

    ReplyDelete
  8. रविंद्र प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !