जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, August 27, 2009

मन कशात लागत नाही


आज दिवसभर ऊन दिसलेच नाही आणि पाऊसही फिरकला नाही. सगळ्या दिवसावर रेंगाळत राहिले उदास, साकळलेले मळभ. अन मग अपरिहार्यपणे मनाच्या डोहातली ती गाडलेली टिंबे पृष्ठावर अवतरत राहिली, उरी फुटत राहिली. शेवटी कसाबसा दिवस सरलाय अन करकरीत सांज उतरली. डोळ्यांच्या जाणीवा वारंवार धूसर होताना, आठवून आईचे बोल, " दिवेलागणीला रडू नये गं " पराकाष्ठेने मी कढ जिरवतेय. तशात ग्रेसांची ही कविताच का नेमकी समोर येतेय......


मन कशात लागत नाही,
अदमास कुणाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज् ऐकू येतो पावा ॥

श्वासांचे घेउन बंधन,
जे ह्रुदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥

सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥

मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर् कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥

चल जाऊ दूर् कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधीतरी घात ॥

मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥

कवी: ग्रेस. संग्रह: चंद्रमाधवीचे प्रदेश. अलबम: सांजवेळा

11 comments:

  1. mala pan asa kadhi hota ani mag kashatach laksha lagat nahi...sarkhi jeevachi ghalmel hota rahate...

    ReplyDelete
  2. Kavitaa barichashee

    man manaas umagat naahee
    adhaar kasaa shodhavaa

    chya valanaavar jaate ase vaatale.

    ReplyDelete
  3. इथे 7 महिने हिवाळा असतो. तेव्हा रोजच असे वाटते. अक्षरश: कशातच मन लागत नाहि. आणि उगाचच डोळे भरुन येतात. कविता छान आहे.

    ReplyDelete
  4. प्रभावित,हो गं. ग्रेसांच्या या दोन्ही कविता गेयतेच्या दृष्टीने सारख्याच तालासुरावटीच्या परंतु परस्पर विरोधी.आभार.

    रोहिणी, इथेही तिच परिस्थिती आहे.आत्ताच हिवाळ्याची चाहूल लागलीय.:( बापरे!पुढच्या जूनपर्यंत हा खेळ असाच चालायचा. ह्म्म्म्म...
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. It is true that the winter in Mid-West US can be difficult to face. But it is a state of mind. A few friends of mine used to talk about being depressed all the time from November to January because it gets dark early, and I picked up that attitude from them for 2-3 winters. Then somebody said one should learn to enjoy the early onset of darkness, and bingo! I soon learned to deal with it and then even started looking forward to it.

    But it is easier said than done when it gets really cold. No doubt about it.

    The painting above the post is nice. Who is the artist? If it is you or anybody in your close circle, please accept my compliments.

    By the way, in which region of India is 'Khus-khus' made? Or is it your friend's speciality dish for which he has coined his own name? I had never heard the word before, and it looks like the word was new to you as well.

    ReplyDelete
  6. आम्ही तर मिशिगनमध्ये तेही अजूनच नॊर्थला आहोत. जेव्हा सप्टेंबर संपता संपताच साडेचार-पाचला मिट्ट काळोख होऊ लागतो, डिसेंबर ते मे संपेतो तीन-चार फुटांचे स्नोचे ढिग सतत असतात, थंडीचा तडाखा कमी व्हायचे नावच घेत नाही तेव्हा मनाने कितीही निकराचा लढा दिला तरिही डिप्रेसींग क्षण येतातच. चालायचेच, अशा गोष्टींची सवय करून घेता येत नाही. मात्र पुढे येणाया वसंताची वाट पाहत हे दिवस सुसह्य होऊ शकतात.
    हे सात महिने मनाचा हा खेळ चालणारच.:)

    मुळची मोरोक्कन कृती आहे.
    खुसखुसची माहिती पाककृतीच्या खाली जो दुवा दिला आहे त्यात आपल्याला मिळेलच. मुंबईत मॉल्स मध्ये कदाचित मिळत असेल असे वाटते. असल्यास बहुदा पास्ता, न्युडल्स जिथे ठेवलेले असतात तिथेच ठेवलेले असू शकेल.

    हास्याची खसखस पिकणे असा शब्दप्रयोग सगळ्यांना परिचित आहेच. लहानपणी आम्ही मैत्रिणी जमून अगदी हळू आवाजात काहीतरी बोलून हसत असू तेव्हा आई नेहमी म्हणत असे, काय खुसखुस करून हसताय गं.त्याची मला आठवण आली.
    आभार.

    ReplyDelete
  7. अपर्णा,अनेक आभार.ही अशी जीवाची घालमेल फार त्रास देते. हा हिवाळा नित्याचाच झालेला असला तरिही त्रास देतोच अन डोळे भरून येतच राहतात. अशा वेळा कमीतकमी याव्यात हा प्रयत्न करत राहावे बाकी मन हे ऐकत नाहीच.:D

    ReplyDelete
  8. मिशिगनमधे फार उशीरा उजाडतं हे मान्य. पण सप्टेंबरमधे पाचला मिट्ट काळोख? खालच्या लिंकनुसार ऑक्टोबर १५ ला पण डेट्रॉइट्ला ६:५० ला सूर्यास्त, म्हणजे ७:१० कडे काळोख. ज़रा उत्तरेला ७ वाजता काळोख होत असेल.

    http://www.timeanddate.com/worldclock/astronomy.html?n=77&month=10&year=2009&obj=sun&afl=-11&day=1

    पुढे डिसेंबरच्या पानावर दिसेल की घड्याळ एक तास मागे आल्यावरही डिट्रॉइटला पाचच्या आधी सूर्य मावळत नाही; तुमच्या गावी ४:४५ ला मावळत असेल.

    मात्र त्या सूर्याचा थंडीविरुद्‌ध फायदा नसतोच. माझा एक मित्र म्हणतो की हिवाळ्यात सूर्यापासून फक्त प्रकाश मिळतो, उर्जा अजिबात मिळत नाही. अगदी बरोबर आहे.

    ReplyDelete
  9. सूर्याचा लख्ख प्रकाश दिसणे हीही पर्वणीच वाटण्यासारख्या दिवसात ऒफिशियली सूर्य कधी उगवतो व कधी मावळतो यावरून उजेड आहे असे म्हणता येत नाही. शिवाय आम्ही गर्द वूड्स मध्ये राहतो. तुमचा मित्र म्हणतो ते पर्फेक्ट.असो. या शब्दच्छलाने तात्पुरती उर्जा मात्र मिळाली.:D

    ReplyDelete
  10. chitra aani kavita donhi aprtim.......sangryhya....bhannat

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !