छे! फारच खराब झालीये रे आपली गाडी, नुसती धुळीची पुटे चढलीत. धुवायला हवी लवकर. लांबच्या प्रवासाहून आलो की, किंवा गाडी नुसतीच महिनाभर एकाजागीच उभी असेल तर धुळीने माखते. सहजच आपण उगाच काहीतरी रेघोट्या, अक्षरेही काढतो त्यावर परंतु या धुळीने भरलेल्या मागच्या वा खिडक्यांच्या काचांवर असा आगळा प्रयोग करावा असे आले स्कॉटच्या मनात.
थोडीशी कल्पकता, अंगभूत कला व काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी असेल तर मार्ग आपोआप समोर येतो. माझ्या मनात फार आहे अमुक करावे परंतु कसे करावे..... साधन सामुग्रीच नाही. अशा प्रकारच्या नकारघंटा काहींच्या मनात कधीच वाजत नाहीत. जे जसे असेल तसे वापरून त्याचा नेमका उपयोग करून घेतात. त्यातलाच हा ' स्कॉट वेड - Scott Wade '.
चित्र काढायला हात शिवशिवत होते, समोरच धुळीने माखलेली गाडीची काच होती. बस, अजून काय हवे. काचेलाच बनवला कॅनवास व बोटे, पेस्पीकोला खाऊन फेकलेल्या काड्या, रंगाचा ब्रश यांच्या साहाय्याने भरभर कल्पनाशक्ती काचेवर चितारली जाऊ लागली. धुळीचा असाही उपयोग होऊ शकेल असे कोणाला सांगून खरे वाटले नसते. नुसताच उपयोग नाही तर खरेच किती सुंदर दिसत आहेत पाहा ही चित्रे. स्कॊट ने ह्या त्याच्या आर्टवर्कमध्ये जीवनमान, काळ-समय, प्रसिद्ध व्यक्ती, समाज-वर्तमान-घडामोडी व्यक्त केल्यात. या अशा सुंदर चितारलेल्या गाड्या कोणाला धुवाव्याश्या वाटतील का?. lol . इतक्या धुळीने भरलेल्या गाड्या सारख्या कश्या बरे मिळणार म्हणून स्कॊट आता स्वत:च अशा काचा तयार करतो- तेलाच्या लेपावर माती-वाळू, वगैरे ओतून ड्रायरने वाळवतो. या अश्या चितारलेल्या गाड्या सिग्नलला थांबल्या किंवा रस्त्याने जात असल्या की अनेकजण थांबून पाहतात.
अप्रतिम.














भाग्यश्री,
ReplyDeleteध मा ल पोस्ट!
एवढेच शब्द पुरे आहेत.
अरुणदादा
अरुणदादा,:)
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete