जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, November 25, 2009

आवडले मला.........




थबकून मजपाशी दखल, घेणे आवडले मला
धारेच्या विरुद्ध पोहणे, झगडणे आवडले मला

जीवनाचे सत्य दु:खच, लोकांनी ऐकवले सदा
दु:खात सुखाचे क्षण, शोधणे आवडले मला

पानगळती सांगत राहिली, थंडीचे आगमन
तशात भुंग्याचे फुलांवर, झुलणे आवडले मला

केव्हांतरी चांदण्यांत माझ्या, काळरात्र आली
क्षणिक चंद्राचेही असे, रुसणे आवडले मला

बरेचसे थकलेलेच जीव, काही सुगंधित शरीरे
अत्तराहून सुंदर धर्मबिंदू, श्रम आवडले मला

घर जिच्यामुळे उजळलेले, तीच निघे घर बांधाया
उंबरठ्यावर कपाळ तिचे, चुंबणे आवडले मला

नाती जुळतील नाती तुटतील, जीवनाच्या प्रवाहात
माझ्या आपल्यांसवे नीत, फिरणे आवडले मला

14 comments:

  1. तुमची कविता ... तुमचे लिखाण ... आवडले मला ... :)

    ReplyDelete
  2. रोहन तुझे आवर्जून सांगणे, आवडले मला...:)

    ReplyDelete
  3. खरंच खुप सुंदर कविता झाली आहे.

    ReplyDelete
  4. रोहनने माझी प्रतिक्रिया चोरली.....
    आता मला दुसरे काहितरी लिहायला लागेल....
    मस्तच!!!!

    ReplyDelete
  5. आवडले मजलाही तुझे आवडणे,
    वाचुनी मी ही रमले, फिरले तुझिया सवे,
    अंतर्नाद तुझा स्फटिका हूनी नितळ भासे,
    सखे माझेच मला गुंतलेले मन तू दाखीवालेस.
    मस्तच लिहिलेस!!!!

    ReplyDelete
  6. kitik bhavana........
    jagvun sanvedana.......
    je lihilet.....
    te awadale mala.....

    mazahi blog baghu shakata..
    @www.akhiljoshi.wordpress.com

    ReplyDelete
  7. अनुजा मस्त जमलेयं....आभार.:)

    ReplyDelete
  8. Akhil सहीच. स्वागत व अनेक आभार. ब्लॊगवर चक्कर मारतेय.:)

    ReplyDelete
  9. आवडले मला, जे तुला आवडले
    नात्यातील गुंतण्याने मला सांवरले !

    प्रवाहात वहावत ना कधी गेले
    आगमनाच्या चाहूलीने मोहरले !

    सुरेश पेठे

    ReplyDelete
  10. पेठेकाका आपले स्वागत व इतक्या छान ओळींकरीता अनेक आभार.

    ReplyDelete
  11. hi bhagyashree
    khupach chan kavita ahe hi..... Aani ajacha maza mood hi asach kahisa ahe......

    Really nice.

    Shradha

    ReplyDelete
  12. श्रध्दा, काहीशी मागेच पडली होती गं ही कविता.तुला आवडल्याचे ऐकून छान वाटले. आभार्स!:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !