या जवानात मला आपण सारे सामावलेले दिसतो
आणि म्हणे ह्यांचे चरण दिसले तर धन्यभाग माझे म्हटले जाते....... वर्षभर उपाशी ठेवा या गोळ्याला
किती उद्दाम असावे माणसाने.......
यावर मी विश्वास ठेवू इच्छित नाही............ हे खोटे असू देत-पण दुर्दैवाने खरे आहे
तुम्ही सुद्धा? का? आमच्याच देशात राहतात, खातात व आमच्याच छाताडावर नाचतात.......
आणि सगळे मतांचे भिकारी यांचेच लांगूलचालन करतात............
आशा आहे असे पुन्हा चुकूनही घडणार नाही
एका स्वतंत्र काश्मीर हवे असे म्हणणाऱ्याने आपल्या माननीय राष्ट्रपतींचे हे चित्र अतिशय अतिरंजित करून मांडले गेलेले पाहिले. लिहिले होते, " हे काश्मिरी माणसा भारताकडून-भारतीयांकडून तुला हेच मिळणार आहे." पद्धतशीर भावना भडकवणे याला म्हणतात. माननीय राष्ट्रपतींना स्वप्नातही वाटले नसेल त्यांच्या या फोटोचा वापर असा होऊ शकेल. ही जी रायफल( AK-47 ) त्यांच्या हातात दिसते आहे ती एका मिलिटंट( Assault Rifle, allegedly recovered from Militants ) कडूनच काढून घेतलेली आहे. हे मात्र लिहिणारा विसरलेला दिसतोय.
हे फोटो मला पण मेल मधे आले होते. माताजी (कसली बोडख्याची माताजी) ती निर्मला आणि तिचे चमचे यांच्यावर काहीच कारवाई केल्या गेली नाही.तिच्या बरोबर त्याच वेळेस जिल्हाधिकारी पण होते म्हणे.. म्हणजे हा अपमान आय ए एस च्या अधिकाऱ्यासमोर झालाय....
ReplyDeleteआपण काय करणार- किंवा करु शकतो? वांझोटा संताप व्यक्त करण्याशिवाय!!
कार्रवाई ?? ती तुमच्या आमच्यावर होवू शकते. ब्लॉग लिहिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया बद्दल.
ReplyDeleteमहेंद्र अरे हे फोटो मला वेगवेगळ्या ठिकाणी सापडले.मी संकलन करून टाकले:). हो ह्या निर्मलादेवी प्रकरणात आय ए एस अधिकारीही होते असे मी ही वाचले. खरेच कमाल झाली. संताप येतोच आणि तो वांझोटा आहे हेही कळते पण चीडचीड होतेच....:(
ReplyDeleteआनंद काय दिवस आलेत हो....:(
ReplyDeleteब्लॊगवर आपले स्वागत व अनेक आभार.
खरंच बोलके फोटो.
ReplyDeleteफक्त तिसरा फोटो खोटा निघू देत अशी माझी प्रार्थना ... काही लोकांबद्दल खूप आदर असतो मनात ... त्यांच्या स्थानाला धक्का लागला तर फार निराश वाटतं.
कालपासून कमेंट टाकायचे राहिले होते....संताप येतो गं या लोकांचा....खर तर ताई आपलाही जास्त राग येतो का नाही आपण सगळे एकत्र येत???आपल्यासारखे विचार असणारे या मुठभर लोकांपेक्षा नक्कीच जास्त असणार गं!!!!
ReplyDeleteगौरी खरच गं, तो फोटो मलाही फार छळतो आहे.
ReplyDeleteतन्वी, अग आपल्यासारखे मूठभर लोक एकत्र आले तर संख्या खूप मोठी असली तरी हे दंडुकेशाहीचा वापर करणार गं. यांच्यासारखे पाळलेले गुंड आपल्याकडे आहेत का? आणि स्वत: गुंड बनायची आपली ताकद नाही....मग?
ReplyDeleteफ़ारच छान पोस्ट आहे ही..काहिकाही गोष्टी मनाला खरच खुप यातना देतात.खुप इछ्चा असते ह्या सगळ्यांच्या विरुद्ध आवाज उठवायची पण ...शेवटी सत्याचा विजय होतो वगैरे हे सगळे सिनेमा आणि नाटकात बरे वाटते बघायला. प्रत्यक्षात सर्वसाधारण माणुसच बळी पडतो.संताप व्यक्त करण्या खेरीज आपण काही करु शकत नाही.
ReplyDeleteमाऊ अग तीच तर खंत आहे ना... नाटक सिनेमातल्यासारखे घडत असते तर हे लोक असे माजले असते का?ह्म्म्म...शोषण करणारे व बळी पडणारे हे चक्र अव्याहत सुरूच आहे.
ReplyDelete@ भाग्यश्रीताई आणि गौरीबाई :
ReplyDeleteअब्दुल कलामांना साईबाबाबरोबर बसलेलं पाहून टीका करण्याचं किंवा वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळे चमत्कारांवर विश्वास किंवा, लहान मुलांशी लैंगिक चाळे केल्याचे साईबाबांवरचे आरोप खरे असल्यास, गुन्हेगारीवर पांघरुण टाकल्या जातं आहे, असं मानायचं काही कारण नाही. (माझा स्वतःचा चमत्कारांवर थोडासा विश्वासही आहे. आणि हा बाबा कदाचित काही चमत्कार करतही असेल, अशी मला प्रामाणिक शंका आहे. मुलांशी अश्लील चाळे केल्याचाही आरोप खरा असावा.) कोणाला आवडो न आवडो, साईबाबांच्या मागे अनेक लोक आहेत. भानू काळे यांनी की अज़ून कोणीतरी साईबाबांच्या नावावर अनेक दवाखान्यांतून गरीबांना फुकट उपचार मिळतात, आणि अनेक मोठे डॉक्टर तिथे विनामूल्य काम करतात, याकडे लक्ष वेधलं आहे. ते डॉक्टर भले बर्याच प्रमाणात मूर्ख असतील; पण त्यांतून उपयोगी गोष्टी घडताहेत.
एखादा कलाकार मेल्यावर तुम्ही-आम्ही 'साला एक नंबरचा बेईमान आणि पैसेखाऊ होता' असं म्हणू शकतो; वाजपेयी किंवा मनमोहन सिंहांना फक्त दुःख व्यक्त करणे हा एकच मार्ग असतो. मग त्यांना स्वतःला कलाकाराचं नाव माहित असो वा नसो.
मोठ्या प्रमाणावर समाजकारण करणार्या व्यक्तींना आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून सतत तडजोड करावी लागते. अगदी तुमच्या देशाशी शत्रुत्व बाळगणार्या परदेशांतल्या पुढार्यांशी चर्चा कराव्या लागतात, मैत्रीचं नाटक करावं लागतं. ज्यांच्यामागे जनशक्ती किंवा इतर पात्रता आहे, ते १००% स्वच्छ नसले तरी त्यांच्या शक्तीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. तसाच प्रकार घडून साईबाबा आणि अब्दुल कलाम एकत्र आले असतील. किंवा ते भेटलेही नसतील आणि हा फोटो साईबाबांच्या 'चमत्कारा'चा भाग असेल.
- डी एन
धनंजय,माजी राष्ट्रपती माननीय अब्दुल कलामांना साईबांबा बरोबर बसलेले पाहून खरेच खूप वाईट वाटले. त्यांच्यावर टिका मी करू शकत नाही.तुम्ही म्हणता तसे...मोठ्या माणसांना बरेचदा अशी नाटके करावी लागतात हे मलाही मान्य आहे.तरिही साईबाबा व त्यांच्यासारख्या लोकांना भेटून नकळत त्यांचे महत्व अजूनच वाढ्वणे होते. फारच गिनेचुने लोक असे आहेत जे आजच्या इतक्या स्वार्थाने बरबटलेल्या जगात स्वत:चे स्वच्छ स्थान टिकवून आहेत. त्यांना असे पाहीले की मन खूप दुखते. असो. बाकी साईबांबा आणि त्यांचे चमत्कार म्हणजे..........
ReplyDeleteआभार.
अब्दुल कलाम यांच्याविषयी माझ्या मनात विशेष आदर आहे, तो त्यांच्या संयत आणि विचारी वागण्यामुळे. सत्यसाईबाबाच्या बाजूला बसणं हा एक शिष्टाचाराचा भाग म्हणून त्यांनी तसं केलं असण्याची शक्यता आहे. निर्मलादेवीचा फोटो म्हणजे अतिच झालं. (अर्थात हा फोटोही ट्रिक नसेल तर) चार क्रमांकाचा फोटो मात्र अस्सल वाटतोय. मला हे फोटो कधी ईमेल मधून आले नव्हते. तुझ्या इथून कॉपी करून घेऊ का? असे फोटो काढून घ्यायला पण लाज नाही वाटत. इथे विक्रोळीजवळ एक मोठं मैदान आहे. तिकडे कुणी राधेगुरू माँ म्हणून येते. गडद मेकप केलेला असतो. भरपूर दागिने घातलेले असतात. डोक्याच्या दोन-तीन केसातून मोती ओवलेले असतात. त्यांचे भक्त म्हणतात, "हमारी गुरू माँ तो गुडीया जैसी दिखती है।" या गुडीयाशी संपर्क साधायचा असेल तर "टल्ली बाबा"चा नंबर फिरवायला लागतो. त्या मैदानात आठ फूटाचं होर्डींग लावंलय त्यावर स्पष्ट अक्षरं वाचता येतात.
ReplyDeleteकांचन खरेच गं, असे करताना जीवाला काहीही वाटत नाही. अग घे की कॊपी करून.:)
ReplyDeleteधन्यवाद, भाग्यश्री.
ReplyDeleteअगं, आत्ता मुद्दाम या बातमीचा शोध घेतला नेटवर तर निर्मलादेवीच्या कृत्याचा राग न येता तिची तरफदारी करणारी लोकं दिसली. तिच्या वयाचा विचार केला पाहिजे, तिने देशासाठी किती योगदान दिलंय वगैरे वगैरे असं म्हणणारीही लोकं दिसली. काय हा आंधळेपणा?
ReplyDeleteआंधळेपणाने भारलेली जनता आहे तोवर हे असेच चालणार गं कांचन. या लोकांनी जनतेची नस बरोबर पकडली आहे.हे असे वाचले की नुसता संताप संताप होतो.
ReplyDelete