जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, October 24, 2009

मलाच पाहिले मी.......

स्वतःलाच बरबाद होताना पाहिले मी
सभोवताली गुन्हे होताना पाहिले मी

नसा नसांमध्ये रक्त बनून जो वाहत होता
त्यास पाण्यासारखे वाहताना पाहिले मी

मोठेपणाशी माझी करू नका तुलना
स्वतःला वावटळीत भिरभिरताना पाहिले मी

समजत होता जो मला माझ्यापेक्षा जास्त
त्यालाही नाराज होताना पाहिले मी

गैर जे त्यासंबंधी काय तुमच्याशी बोलू
सावलीलाही माझी साथ सोडताना पाहिले मी

10 comments:

 1. धन्यवाद क्रान्ति.

  ReplyDelete
 2. masta mala khup aavadali..majhihi manasthiti ashich kahishi aahe aaj..tu ekdam neat shabdat mandles...

  ReplyDelete
 3. मन:पूर्वक आभार मुग्धा.

  ReplyDelete
 4. नसा नसांमध्ये रक्त बनून जो वाहत होता
  त्यास पाण्यासारखे वाहताना पाहिले मी
  mastach......

  ReplyDelete
 5. सुषमेय स्वागत व आभार.

  ReplyDelete
 6. धन्यवाद रविंद्र.

  ReplyDelete
 7. माऊ....:) कुठे गायब असतेस गं?

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !