भगरीची खिचडी
वाढणी : तीन माणसांना पोटभरीची
साहित्य :
एक वाटी भगर
अडीच वाट्या गरम पाणी
दोन मध्यम बटाटे उकडून
दोन टेबलस्पून तूप
चार हिरव्या मिरच्या
पेरभर आले
मूठभर कोथिंबीर
एक चमचा जिरे
मूठभर भाजलेले शेंगदाणे किंवा दोन टेबलस्पून दाण्याचे कूट
स्वादानुसार मीठ ( आवडत असल्यास एक चमचा साखर )
एक लिंबू ( ऐच्छिक )
कृती :
कढईत मध्यम आचेवर भगर गुलाबी रंगावर कोरडीच भाजून घ्यावी. ( साधारण बारा ते पंधरा मिनिटे ) अडीच वाट्या पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल.
उकडलेल्या बटाट्याची साले काढून हलक्या हाताने कुस्करून घ्यावेत. ( अगदी पीठ करू नये ) हिरव्या मिरच्या खूप तिखट असतील तर फक्त पोट फोडून घ्याव्यात पण अगदीच कमी तिखट असतील तर बारीक चिरून घ्याव्या. आल्याचेही बारीक तुकडे करावे. कोथिंबीर चिरून घ्यावी. मध्यम आचेवर कढई ठेवून तूप घालावे. तापले की त्यात जिरे, आल्याचे व मिरचीचे तुकडे घालून मिनिटभर परतून त्यावर भाजलेले शेंगदाणे व कुस्करलेला बटाटा टाकून परतावे. बटाटा जरासा लालसर दिसू लागला की मोकळी झालेली भगर त्यावर टाकून सगळे मिश्रण नीट परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी. पाच मिनिटाने झाकण काढून स्वादानुसार मीठ घालून परतून पुन्हा एक वाफ आणून आचेवरून उतरवावे. कोथिंबीर व ज्याला हवे त्यास लिंबाचा रस घालून गरम गरम वाढावे.
टीपा :
जितकी भगर घेऊ त्याच्या अडीच पट पाणी घ्यावे. कमी घेतल्यास नीट फुलत नाही व फार घास लागतो. चुकून पाणी कमी घेतले गेले तर कढईत भगर टाकून झाल्यावर पाण्याचा एक हबका मारून एक वाफ आणावी.
साखर आवडत असेल तरच घालावी. शक्यतो घालू नयेच.
शेंगदाणे नसतील तर कूट घालावे.
यात बटाट्याचा कीसही घालता येईल. कीस घालायचा झाल्यास फोडणीत शेंगदाणे घातल्यावर लगेच घालून झाकण ठेवून वाफ आणावी. कीस नीट शिजल्याची खात्री करूनच भगर टाकावी.
ओले खोबरे आवडत असल्यास कोथिंबिरी सोबत घालावे
हे ही ’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच। खाऊगल्लीतही असावे म्हणून....
अहाहा ... झक्कास दिसतोय फोटू... रिवाजाप्रमाणे णी शे ढ घेऊन टाक लगेच :)
ReplyDeleteबाकी 'दिवाळी मिक्स' मध्ये मी कॉपी बरोबर मारलेली.. हो की नाही? ;)
कहर... कहर सुरू झालाय... आता हा ब्लॉग १ महिना ban करावा लागणार... :P
ReplyDeleteहा हा... नक्कीच हेरंब. :) मला आवडले. धन्यू.
ReplyDeleteअर्रर्रर्रर्र... इतका जुलूम नको करूस रोहन. :P
ReplyDelete:D मला एकदम ते बालगीतच आठवलं! 'खादाडखाऊ विहिण म्हणून सारी करती थट्टा..आता उठा! :)
ReplyDeleteआता मी रुसलेय गं अनघे... :D
ReplyDeleteही रेसिपी मी आज घरी नेतोय :D
ReplyDelete>>>कहर... कहर सुरू झालाय...
ReplyDelete+100
अगदी असेच नाही तरी सकाळी नुसत्या चहावर तरी इथे येऊ नयेच....ताई फोटो नाही टाकू गं... नुसती रेशीपी टाकली तरी जमेल आम्हाला :)
निषेध.....
ReplyDeleteमला एक कळत नाही..तु नेहमी वाढणी ३ माणसांची का सांगते ग????:P....मी यु एस ला आलीतरी तु ३ माणसांचेच बनवणार का???????
उत्तम बनलय.............
मला खूप आवडते भगर... Thanks for reciepe...
ReplyDeleteकरून बघायला हवे... :-)
हेहे!!! नको गं राणी रुसू!!
ReplyDelete'कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्हीं, विहिण म्हणून नशिबी आलात हो तुम्हीं!!' :p कित्ती गोड गाणं आहे ना! :D
फ़ोटु मस्त आहे...रिवाजाप्रमाणे नि..षे...ध....पाठवत आहे.. :) :)
ReplyDeleteहा लेख कॉपी करून माझ्या बायकोला पाठवण्यात आला आहे. :)
ReplyDeletebhannat bhagar....yetya guruwari hich bhagar khanarrrrrr...jay khawoo giri
ReplyDeleteश्रीराज, तू करून खाऊ घालणार ना रे? कोणाला ते वेगळे सांगायला नकोच... :D
ReplyDeleteअगं तन्वी फोटू नाही टाकला तर तुम्हांला ’कहर’ कसा वाटेल... आणि त्यातला ’ह’ silent आहे ना... :)
ReplyDeleteउमा, फोटू पाहायचा सोडून नको ते कशाला पाहतेस गं? कसे बाई बरोबर शोधलेस ’३ माणसांचे’ गणित... :D
ReplyDeleteतू ये तर आधी मग हवे तितके बनवू गं. :)
मैथिली तुला नक्की आवडेलच. नक्की करून पाहा. धन्यू गं.
ReplyDeleteखरचं अनघा, सुंदर गाणे आहे. बाहुला-बाहुलीचे लग्न लावतानाच्या आम्हा चिमुरड्यांची लगबग डोळ्यासमोर आली गं.
ReplyDeleteयोमू, धन्यवाद. अजून संधी देतेच आहे तुला निषेधायची... :P
ReplyDeleteधन्यवाद मंदार. कळवा बरं आवडली का ते.
ReplyDeleteजय खाऊगिरी!! :)
ReplyDeleteधन्यवाद प्राजक्त.
nashkat aahat tar dya ki mastpaiki bhagarrrrrr...majja yeel
ReplyDeletemast snap..
ReplyDeletepraajakta, अरे मी आले की परत नोव्हेंमध्येच. असते तर नक्कीच... कोल्हापूरलाही येऊन फार वर्ष झालीत. पुढच्या खेपेस योग साधायला हवा. :)
ReplyDeleteyog, धन्यवाद. :)
ReplyDelete:D भगर!!!??? कधी खाल्ली नाही. घरी गेलो की याची डोळी याची जिव्हा आनंद लुटेन. :)
ReplyDeleteya ho aamhi tumchi wat pahu nakki.
ReplyDeleteसौरभ, अरे महाशिवरात्र/आषाढी एकादशीला हटकून होते भगर आमटी. कदाचित तुला वर्याचे तांदूळ माहीत असतील. :)
ReplyDeleteफोटो मस्त आहेच...फक्त मी पोचेपर्यंत सरली असेल :P
ReplyDeleteविद्याधर, तू येतोस का खायला सांग? मी परत करेन... :)
ReplyDeleteअप्रतिम...भगरीची खिचडी तर अनेकदा खातो पण काही गोष्टी उदा."पाणी चांगले गरम करून घेऊन भाजलेली भगर लगेच त्यात घालावी व झाकून ठेवावे. दोन तासानंतर भगर छान फुलून आलेली व मोकळी झालेली दिसून येईल. " हा सुस (सुगरण सल्ला) आवडला..असे कधी केले नव्हते..मी तर भाजलेल्या भगरीत वरून गरम पाणी घालायचो...
ReplyDeleteछान!!
सिध्दार्थ, ब्लॉगवर स्वागत आहे.:)
ReplyDeleteटिपणी उपयोगी पडल्याचे वाचून आनंद झाला.
अभिप्रायाबद्दल आभार. भेट देत राहा. :)