जसे कधीकधी टिसी मुद्दामहून सतावतात तसेच टिसींनाही सतावणारे, पळून जाणारे व त्यांना स्वत:मागे पळायला लावणारेही काही कमी नाहीत. मस्त मजेदार किस्से आपल्या अवतीभोवती रोजचे घडत राहतात. आपल्याला प्रत्येकवेळी ती गंमत अनुभवायला वेळ नसतो पण काही मात्र जणू खास आपली व डब्यातल्या सगळ्यांची करमणूक करायलाच घडतात. रोजच्या गाड्या ठरलेल्या त्यामुळे मैत्रिणी-ग्रुप्सही ठरलेलेच. म्हणजे अगदी नेहमीची गाडी चुकली तरीही पुढच्या दोन-तीन गाड्यांचे समीकरण तयार असतेच. त्या मैत्रिणीही अगदी तितक्याच आपुलकीने आपल्याला सामावून घेतात. सकाळ व संध्याकाळचे हे टॉनिक चुकवणे म्हणजे सगळा दिवस खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत राही. सेलफोन्स बोकाळलेले नव्हतेच. फार क्वचितच एखादीकडे दिसत असे. जिच्याकडे तो असे तिला सारखे कोणाचे तरी फोन्स येत, मग कधी मोठ्याने-सगळ्यांना ऐकू जावेच म्हणूनच मुद्दाम, तर कधी इतकी कुजबूज की ज्याच्याशी बोलतेय त्या व्यक्तीला तरी ऐकू येतेय का नाही हाच प्रश्न सगळ्या पाहणाऱ्यांना सतावत राही.

एकदा अशीच माझी रोजची गाडी अगदी चार पायऱ्यांसाठी चुकली. दोन नंबर पासून जीव काढत धावलेली मी वैतागून गेले. पुन्हा जिने चढून पुलावर जाऊन उभे राहावे तोच अनॉन्स्मेंट झाली. आधीची एक लेट झालेली फास्ट तिनावर येते आहे. चला, हे बरे झाले बाई. नाहीतर आज थोडक्यासाठी उशीर होत होता. गाडी आलीही. चढून जरा दम टाकत होते तोच समोर टिसी. मी पर्समध्ये हात घातला तर म्हणाली नको. मी मनोमन खूश. आजूबाजूच्या दोघीतिघींनाही तिने राहू दे म्हणून सांगितले. आम्ही सगळ्या जरा नवलच करत होतो. टिसी एकदम डब्याच्या आत घुसली. आधीच फर्स्टक्लासचा लेडीज डब्बा एवढासा त्यात सकाळी आठ ते अकरा म्हणजे गर्दीचा कहर. आणि त्यावर टिसी आला/आली की ज्याच्या त्याच्या नजरेत चिडचिडेपणा येत असे. जणू ही सारी गैरसोय तिनेच केली आहे या थाटात सगळ्या तो जाहीर उघडही करीत. टिसींची कातडी या साऱ्याला सरावलेली. काय करतील रोजचेच झालेय म्हटल्यावर.
तर ही टिसी खिडकीशी एक जण अगदी हळूहळू सेलवर कुजबुजत होती तिच्याकडे गेली आणि तिकीट म्हणून विचारू लागली. त्या मुलीने अगदी आश्चर्यचकित झाल्याचे भाव डोळ्यात आणत हातानेच तिला आहे ना... असा इशारा केला. सेलवरचे बोलणे सुरूच होते. टिसी म्हणाली, तिकीट दाखव. तसे पलीकडच्या व्यक्तीला एक मिनिट थांब असे सांगत टिसीला म्हणाली, " मी बोलतेय ना, दिसत नाही का? आहे ना पास. रोज रोज काय दाखवायचा? इथे इतक्या जणी आहेत त्यांना विचार ना, मी काय पळून जातेय का? बोलणे संपले की दाखवतेच. " आता हे सगळे बोलण्यापेक्षा पटकन पास दाखवून टाकायचा तर...... टिसी बरं म्हणाली आणि इतरांकडे वळली. इतरजणी त्या सेलवालीवर जाम वैतागल्या. नसता उच्छाद, हिला कोणी सांगितलेय नको ते सल्ले द्यायला, वगैरे बडबडत पर्स मधून पास काढू लागल्या.
टिसीची पाठ वळताच ही खिडकीवाली पटकन उठली. समोरच उभ्या असलेल्या एकीला हाताला धरून आपल्या जागेवर बसवले. आणि हळूहळू सरकत सरकत आतून बाहेर आली. बऱ्याच जणी पाहत होत्या. पण प्रत्येकीला वाटले हिचे स्टेशन येत असेल तेव्हा..... तोच टिसीबाई वळल्या आणि हिच्यामागोमाग बाहेर आल्या. " अहो, झाले का बोलणे? आता पास दाखवताय ना? " टिसीचा आवाज जरा चढलाच होता. हिने एकवार टिसीकडे पाहिले आणि शांतपणे पर्समधून पाकीट काढले. इतका वेळ बघत असलेल्या आम्ही सगळ्या , काय पण ही टिसी... उगाच एखाद्याच्या मागे लागायचे म्हणजे... असे मनात म्हणत होतोच, तोच हिने पर्समधून पासच्या ऐवजी दोनशे रुपये काढले आणि टिसीच्या हातावर ठेवले.
क्षणभर टिसीही चकीतच झाली पण अश्या बायकांची तिला सवय असणारच. विजयी मुद्रेने तिने, " काय... चकटफू प्रवास करायला हवा ना? तोही फर्स्टक्लास मधून? "त्यावर टिसीलाच झापत, " अहो, उगाच फालतू बडबड नकोय. मी कळव्याला चढलेय, आता भांडूप येतेय. तेव्हा जो काय मिनिमम होइल तो दंड घ्या. चला पटापट. जितकी स्टेशन्स पुढे जातील तितक्याला तुम्ही जबाबदार, मी त्याचे पैसे भरणार नाही. " हिचाच आवाज चढलेला. टिसीने पावती फाडली तिला दिली आणि वळली. " उरलेले पैसे काय उद्या देणार का? " टिसीपण... वेंधळेपणा की मुद्दाम... पण उरलेले पैसे दिलेच नव्हते ना.... मग चडफडत दिले, ही उतरली. माझी खात्री आहे, मागून येणारी गाडी तिने पकडली असणार. हा रोजचाच प्रकार असेल. एकतर डब्यात टिसी काही रोज येतच नाहीत. चुकून आलाच तर तो तुमच्यापर्यंत पोचेलच असेही नाही. तीन-चार महिन्यातून एकदा असे पैसे द्यावे लागले तरी किती फायद्याचा सौदा होता की हा. पन्हा ना खेद ना खंत.
एकदा अश्याच एक वयस्कर बाई धावतपळत आल्या. " अगो, परेलला थांबेल ना ही गाडी?" मी हो म्हटले. तश्या चढू लागल्या. त्यांना थांबवत मी हा फर्स्टक्लास असल्याचे सांगितले आणि अगदी दहा पावलांवरच असलेल्या सेकंडच्या डब्याकडे बोट दाखवत तिथे जा असेही सांगितले. तसे, " मला माहीत आहे हा पेशल डब्बा आहे ते. माझ्या लेकीने इथेच चढायचे असे बजावून सांगितलेय. तिकीट आहे ना माझ्याकडे." मी चूप. तिकीट असू शकतेच ना....... त्या चढल्या. मुलुंडाला टिसी आली. आमचे पास पाहून पुढे पुढे सरकत या बाईंकडे पोचली. तिकीट दाखवा मावशी, आहे ना? असे विचारताच यांनी सेकंड्चे तिकीट काढून टिसीला दिले. अहो हा फर्स्टक्लास आहे. तुम्ही इथे कशाला चढलात? अगो बया, मला काय माहीत या डब्यात चढायचे नाही. सगळे चढले मग मीही चढले." " हो का? बरं, आता उतरा भांडुपाला आणि जा सेकंडमध्ये. पुन्हा सापडलात तर दंड वसूल केल्याशिवाय सोडणार नाही मी " असे सांगून ती पुढे गेली. या डामरट बाईला मी एवढे सांगूनही - खरे तर तिलाही ते माहीतच होते, तरीही ही आरामात चढली होती. उभा जन्म लोकलने प्रवास केला असेल तिने वर हा अडाणीपणाचा आव...... धन्य. पुन्हा पुढच्यावेळी ती हमखास फर्स्टक्लासच गाठणार होतीच.
माझी जवळची मैत्रीण, दिवस अगदी भरत आलेले तिचे. वसई ते बॉम्बे सेंट्रल, रोजचाच प्रवास. तिकडून शेअर टॅक्सीने ऑफिस. शेअर टॅक्सी मिळवायची असेल तर तुम्हाला झटकन स्टेशनबाहेर पडायला हवे. एकदा का मेंबर पटापट टॅक्सी पकडून गेले की पंचाईत. एकच टिसी रोजच हिला अडवून पास विचारी. आधीच हिचा जीव मेटाकुटीला आलेला तश्यांत हा उच्छाद. एके दिवशी त्याने पास विचारताच ही थांबलीच नाही. सरळ चालू पडली. "ओ मॅडम, कहाँ जा रही हो? तिकीट किधर है?" तुला रोजच माझे तिकीट पाहायचेय ना? मला थांबायला वेळ नाही आत्ता. तू ये माझ्या मागोमाग. ऑफिसमध्ये पोचले ना की दाखवते हं का तुला माझा पास." असे म्हणत ही पुढे आणि टिसी मागे. शेवटी अगदी गेटपर्यंत पोचल्यावर टिसीने नाद सोडला. ही पठ्ठी काही थांबलीच नाही.
काहीवेळा खरोखरच पास संपत आलाय/संपलाय हे लक्षातच नसते. मग अशावेळी अगदी दयनीय अवस्था होऊन जाते. तर कधी काही लोक अतिशय बेमुर्वत आणि निर्लज्ज असतात. तर काहींचा एकदम कॅलक्युलेटेड हिशोब असतो. जोवर लोकल आहे तोवर किस्से तर घडतच राहणार. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमानुसार त्यांचे रंगही वेगवेगळे असणार... कधी रडवेले, कधी टाईमपास करणारे तर कधी हळहळ वाटावी असे.

आजकाल नाही परवडत असं. दंड वाढलाय. तो ५शे रुपये आहे.
ReplyDeleteपोस्ट नेहेमीप्रमाणेच मस्त झालंय
अरे बापरे! हम्म्म....बराच वाढलाय की.
ReplyDeleteपोस्ट लय भारी झाली आहे..जुन्या आठवणी ताज्या झाल्या...superb....
ReplyDeleteमाऊ....:)
ReplyDeleteट्रेनने प्रवास करणे आणि त्यातून घडणारे किस्से काही औरच ... मी २००४-२००६ अशी २ वर्षेच कामासाठी ट्रेनने नियमित प्रावास केला. त्यातही असे अनेक किस्से घडले... काही खादाडी किस्से सुद्धा होते... हेहेहे... लिहितोच ते आता..
ReplyDeleteगेल्या २ वर्षापासुन मी हे अनुभव घेत आहे...सुदैवाने माझा पास संपण्याच्या दोन दिवसानंतर माझ्या लक्षात आले पण मला टिसीने नाही अडवले :)
ReplyDeleteदंड मात्र आज काल खुप भारी वसुल करतात...
इथे ट्रेन नाही, रिक्षा नाहीतर स्वताची दुचाकी...
ReplyDeleteत्यामुळे फक्त द ट्रेन पिक्चर बघितला आहे..
त्याचा अनुभवच छान नाही आला..
बाकी पोस्ट छान
खरयं ग तुझे....मोठे नमुने भेटतात प्रवासात...आणि तऱ्हेतऱ्हेचे अनुभवही.....
ReplyDeleteबाकि सेकंडचे तिकीट काढून फर्स्ट मधे चढण्यसाठी लागणारे गट्स आपल्यात नाहीत म्हणायचे नी ईतरांची गंमत बघायची......
मी ऐकलेले काही किस्से.
ReplyDeleteमुंबईत लोकलच्या प्रवाश्यांसाठी १ अनोखी योजना एका माणसाने आणली होती.
त्यात ठरावीक रक्कम (१००रु.) भरून सभासद व्ह्यायचे. रोज विनातिकिट प्रवास करायचा.
जर पकडले गेलात तर दंड भरा, पावती दाखवा. तेव्हडे पैसे तो माणूस द्यायचा.
थोडक्यात, no money back insurance सारखा प्रकार आहे तो.
थोड्यावेळासाठी मी लोकलने प्रवास केल्यासारखं झालं...आणि महेन्द्रकाका म्हणतात त्याप्रमाणे दंडही दणदणीत झालाय म्हणजे तरी लोक खोटेपणा करत नसावेत अशी एक (वेडी) आशा..काय??
ReplyDeleteरोहन,लवकर लिही रे.का म्हणतेय कळले ना....:P आता काय नऊच राहीले ना?:)
ReplyDeleteआनंद,लक जोरावर होते तुमचे.:)
ReplyDeleteAkhil, आभार. चित्रपट चांगला नाही वाटला का.... हम्म, आता आली का पंचाईत.पाहावा का नकोच...
ReplyDeleteतन्वी, अग काय कोड्यात बोलते आहेस? हेहे.... बाकी काही लोकं बोलतात एक आणि करतात एक. चालायचेच ग.
ReplyDeleteअनिकेत, खरे की काय? पण त्याचा शेरेकर झाला तर.... त्यापेक्षा मुकाट पास काढलेला काय वाईट. शिवाय उगाच छातीत कायम धडधड.... म्हणजे अजून एक नवीन ताप.:)
ReplyDeleteअपर्णा, दंड इतका दणदणीत असला तरी त्याची भीतीच जर नसेल तर.... काही लोक फारच बिनधास्त असतात ग. आणि मेले टिसीही त्यांना कधीच आडवत नाहीत.
ReplyDeletemi kadhi local ne pravasa nahi kela pan anubhav chan aahet, mage ekda tumhi asach ek anubhav lihilaa hota.
ReplyDeletejunya aathvani tumhala evadhya kasha aathavataat ? :-)
अजय, मलाही काहीवेळा नवल वाटते.माझ्या एका मैत्रिणीला वाचलेली ओळ न ओळ लक्षात राहत असे... अभ्यास एकदा केला की काम झाले. सही ना? :)
ReplyDeleteअजून असाच १ किस्सा
ReplyDeleteमाझा मित्र व्ही. जे. टी. आय. ला होता. तो ठाण्याला राहायचा. कॉलेजमधून लौकर बाहेर पडला तर माटुंग्याहून लोकल न पकडता तो दादर ला जायचा. कारण, डेक्कन क्वीन च्या आधी एक फास्ट लोकल होती कि जी दादर ते ठाणे असा प्रवास फास्ट करून मग स्लो व्हायची. मागे डेक्कन क्वीन असल्यामुळे हि लोकल कायम वेळेत आणि वेगात जायची. त्या लोकलने प्रवास करणे ही त्याची ऐश होती. असो.
अनिकेत,ही अंबरनाथ लोकल(दादर-ठाणे-पुढे स्लो ) सीएसटीहून बरोबर ५ वाजता निघत असे.ठाणा सोडले की लागलीच ट्रॆक बदलून ती एकवर जाई. अगदी खरेय, या लोकलने प्रवास करणे ही चैनच होती. ठाण्याचा माणूस( जवळ राहणारा असेल तर ) पावणेसहाला घरात पोचलेला.:) आभार.
ReplyDeleteलोकलमधील नाना रंजक अनुभव तुम्ही छान वर्णन केले आहेत. इतरही खूप गमतीजमती घडत असतात लोकल मध्ये. माणसांचे स्वभाव, परिस्थिती, वेळ....सर्वांचे एक गमतीशीर कोलाज बनत जाते. अजून लिहा लोकल वरच्या विविध अनुभवांवर !! :-)
ReplyDeleteआ. न.
अरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
mastach lihale aahe
ReplyDeleteaavadale.....
अरूधंती स्वागत व अनेक आभार.:) आधीही काही अनुभव लिहिलेत,सवडीने वाचून प्रतिक्रिया कळवा.
ReplyDeleteराज जैन, आपले स्वागत व आभार.
ReplyDeleteमी कंटाळलो होतो त्या लोकलच्या प्रवासाला. तसे मुंबई मध्ये मला गुदमरायला होतेच. बरे झाले सुटलो. आता पुण्यनगरी नाशिक सध्या तरी अतिशय योग्य ठिकाण आहे. बाकी पोस्ट नेहमीप्रमाणे एकदम छान झालीय.
ReplyDelete