जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, February 16, 2010

अननस - स्ट्रॉबेरी - चॉकलेट सुफले


जिन्नस
  • कूल व्हिप - ८ औंस (फॅट फ्री/लाईट/रेग्युलर जे आवडेल ते)
  • क्रीम चीज- ८ औंस (फॅट फ्री/लाइट/रेग्युलर जे आवडेल ते)
  • जेलो चे एक पाकीट-३ औंसाचे -अननस फ्लेवरचे ( ज्या फळाचे सुफले करणार असू त्याच फ्लेवरचे घ्यावे )
  • एक मोठी वाटी भरून अननसाचे तुकडे ( ज्या फळाचे सुफले करणार असू ते फळ - शक्यतो टीन मधले घ्यावे )
  • अक्रोड-बदामाचे तुकडे / चॉकलेट चिप्स अर्धी वाटी

मार्गदर्शन

काचेच्या भांड्यात क्रीम चीज व कूल व्हिप घेऊन एकजीव करून घ्यावे. टीन मधली फळे वेगळी काढून ठेवावीत. उरलेला रस (सिरप ) साधारण एक कप भरेल. कमी पडल्यास तितके पाणी मिसळून गरम करावे. ( एक कपापेक्षा जास्त भरल्यास दुसऱ्या कपात काढून ठेवावे. व थंड पाणी मिसळताना यातच भर घालून मिसळावे ) किंचित बुडबुडे आले की लागलीच जेलो ( जिलेटीन ) टाकून संपूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे. साधारण दोन मिनिटातच विरघळते. गॅसवरून उतरवून त्यात एक कप थंड पाणी घालून ढवळून कोमट (रूम टेंपरेचर ) आले की क्रीम चीज व कूल व्हिपच्या मिश्रणात मिसळावे. वेगळी काढून ठेवलेली फळे त्यात मिसळून सहा तास फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावे. वाढण्यापूर्वी वरून बदाम-आक्रोडचे तुकडे व ताज्या फळाने सजावट करावी. ताजे फळ नसल्यास टीन मधलेच वापरावे. तसे करावयाचे असल्यास मिश्रणात फळे मिसळण्यापूर्वी थोडी बाजूला काढून ठेवण्यास विसरू नये. वाढताना थंड वाढावे. लहान मुलांची बर्थ डे पार्टी असो की मोठ्यांचे गेट-टू-गेदर असो, सगळ्यांना आवडेल असेच हे सुफले.

टीपा

आपण जे फळ घेणार असू त्याच फ्लेवरचे जेलो घ्यावे. अननस असेल तर अननसाचे, चॉकलेट असेल तर चॉकलेटचे. आपल्याला जर साधे ( प्लेन ) जिलेटीन वापरायचे असेल तरीही चालू शकेल. कृतीत काहीच फरक नाही. ताजी फळेच व साधे जिलेटीन वापरणार असू तर जमल्यास जिलेटीन तयार करताना त्या त्या फळाचा रस घ्यावा. यामुळे चव नक्कीच वाढते. सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये किमान सहा तास ठेवणे गरजेचे आहे. घाई करून काढू नये. संत्री, अननस, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पीच, आंबा, इत्यादींचे जास्त चांगले लागते. सजावट करताना चॉकलेट सुफले केल्यास वरून चॉकलेट किसून भुरभुरावे व छोटे तुकडेही वापरावे. अतिशय आकर्षक दिसते. लहान मुलांना खूप आवडते. यात अक्रोड-बदाम घालू नयेत. पूर्णपणे फॅट फ्री बनवता येत असल्याने मनसोक्त खाता येईल. चवीत अजिबात फरक पडत नाही. हमखास यशस्वी , अजिबात न चुकणारे व वेळखाऊ नसलेले सुफले.

14 comments:

  1. आज पुन्हा एकदा पोटात आगडोंब उसळला.
    भानसताई, पुढची गाडी पकडून मी येतोच आहे. तुम्ही एकडे येऊन हे करेपर्यंत वाट पाहणे आवघड आहे. सगळे पदार्थ तयार ठेवा.

    आपला,
    (खवैय्या)अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  2. घ्या गेला आमचा प्रेम...दीन आणि dessert आता येतंय..:)

    ReplyDelete
  3. अनिकेत, जरूर,... स्वागत आहे.:)

    ReplyDelete
  4. अपर्णा, हाहा.... मला वाटलेच होते तू वैतागणार. सॊरी गं,तुला सांगायची विसरले.

    ReplyDelete
  5. माते अगं काल तुला बरं नाही का, कुठेस वगैरे विचारायला नेट लावले आणि तू दिसलीस हे खाताना....आता निषेध...(सद्ध्या रोहन सुट्टीवर असल्यामुळे निषेधाची वैश्विक जबाबदारी माझ्यावर आहे......रोहणा कुठेस तू!!!)
    बाकि बयो मस्तच दिसतय गं!!! नेमके तुझ्या काळजीने नेटवर नवरोजी पण काल सोबतच होते माझ्या...त्यांनीही पाहिलेत फोटू...आता करायाच हवे!!!!

    ReplyDelete
  6. तन्वी, रोहणाचाच निषेध कर... एकटा एकटा हाणतोय तिकडे तो....:( आणि मी आहे की चंगीभली....:)

    ReplyDelete
  7. याची जरा भारतीय आवृत्ती टाकता येईल का? बर्‍याचशा टर्म्स माहिती नाहीत म्हणून!

    ReplyDelete
  8. आश्विनी, अग आपल्याकडे क्रिम चीज मिळते. आणि समजा ते नसेल तर किमान आठ-दहा दिवसांची चांगली घट्ट साय हाताने फेटून घालावी. ( मिक्सरला घालू नये. ) कूल व्हिप आपल्याकडे मिळते. फूड स्टॉक किंवा मॉल्समधील मोठी दुकाने आहेत तिथे मिळते. डॉलर जनरल सारखे जे दुकान ( मी नाव विसरलेय गं आपल्याकडच्याचे... जिथे रू.९९/- ला गोष्टी मिळतात तिथे ) आहे तिथे मिळू शकेल. जेलो तर आपल्याकडे खूप पूर्वीपासून मिळतेच. बाकी फळे आणि नटस....,:)
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  9. मस्त.. . मस्त. . .Yummmy!!!

    ReplyDelete
  10. आयला.. भारी आहे एकदम. बरं आपल्या गल्लीमध्ये कधी येताय??? जिन्नस आणून ठेवतो मी. हेहे.

    ReplyDelete
  11. Bhagyashri tai,
    jello aivaji fruit pectin vaparta yeil ka? Aslyas kiti va kase vaprave?
    dhanyavaad
    pushpa

    ReplyDelete
  12. पुष्पा, Fruit Pectin नक्कीच वापरता येईल. जॅम वगैरे बनवायचा असल्यास घरी बनवूनच वापरणे जास्त छान. मात्र थोडे वेळखाऊ काम होते.

    इथे जेलो ऐवजी वापरायचा असेल तर ड्राय-नो शुगरवाले वापरून पाहा. त्यावर कसे वापरायचे हे लिहीलेले असते. साखर-स्प्लेंडा-मध वगैरे आवडेल ते आपण वरुन घालावे. जिथे कस्टर्ड, चायनाग्रास वगैरे मिळते तिथेच हेही सापडेल.

    मी स्वत: एकदा करून पाहीन म्हणजे नेमके प्रमाण सांगता येईल.

    धन्यवाद. तू केलेस की कळव गं.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !