जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 3, 2009

विरक्ती.....

विसरून जा प्रेम-अन त्या पाऊलखुणा
स्वप्नांनाही हृदयातून मिटवून टाकणे

डोळ्यांत आसवे देऊन वदला होतास
तुझ्यातल्या मलाच तुझे वजा करणे

लोकांमध्ये कालच तू टाळलेस मला
अन आज तुझे फिरोनी हक्क मागणे

माझ्या शरीराला आता मी त्यागले
तुझ्या प्रेमास मिळो कुठेसे घर नवे

असे किती काळ मी अंतरी झुरावे
देहास या राखेत आता झोकून द्यावे

आताशा ना उरले प्रेम, आशा ना खंत
जीवनाशी फितुरी काळजात विरक्ती

6 comments:

  1. भंगलेल्या त्या स्मृतींना आळविते मी पुन्हा ,हाच का माझा गुन्हा...गाणे आठवले..फ़ारच सुरेख श्री..

    ReplyDelete
  2. "डोळ्यांत आसवे देऊन वदला होतास
    तुझ्यातल्या मलाच तुझे वजा करणे"!!!!

    अप्रतिम!!! मस्त आहे!!!

    ReplyDelete
  3. मनमौजी अनेक आभार.

    ReplyDelete
  4. "विसरून जा प्रेम-अन त्या पाऊलखुणा
    स्वप्नांनाही हृदयातून मिटवून टाक"
    अप्रतिम कविता आहे. :)

    ReplyDelete
  5. रविंद्र अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !