जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, November 4, 2009

वडील व मुलगा.....

एके दिवशी, मुलाने वडलांना विचारले, " बाबा, तुम्ही माझ्याबरोबर मॅरॉथॉन मध्ये धावाल का? "
वडील म्हणाले, " हो ". आणि ते दोघेही पहिली मॅरॉथॉन बरोबर धावले.....

पुन्हां एकदा, मुलाने वडिलांना विचारले, " बाबा, तुम्हाला माझ्याबरोबर मॅरॉथॉनमध्ये धावायला आवडेल? "
वडील म्हणाले, " हो बेटा ".
आणि ते दोघेही पुन्हा एकदा मॅरॉथॉन बरोबर धावले....

एके दिवशी, मुलाने वडिलांना विचारले, " बाबा, तुम्ही माझ्याबरोबर Ironman धावाल का? "

' Ironman ' ही अतिशय कठीण ट्रॅथलॉन-Triathlon आहे.

४ किमी पोहणे
१८० किमी सायकल चालवणे
४२ किमी धावणे..... हे सगळे म्हणजे ट्रॅथलॉन.

वडील म्हणाले, " हो बेटा ". आणि ते दोघेही ' ट्रॅथलॉन ' धावले....

सोबत जोडलेल्या दोन्ही चित्रफी्ती जरूर पाहा म्हणजे या वरवर साध्या भासणाऱ्या गोष्टीमागचे भाव दिसतील... हृदयाला भिडतील.... डोळ्यांवाटे झरतील.... आपल्या मुलाच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील कुठवर जाऊ शकतात. वडिलांच्या या तळमळीला जगासमोर मांडताना अतिशय आर्ततेने गा्यलेल्या या दोन्ही गाण्यांचे बोल, स्वर व संगीत तितकेच भिडणारे आहे.

Rick and Dick Hoyt - The Father and Son





7 comments:

  1. खूपच हृदयस्पर्शी आहेत ग!!!! मन हेलावले पहाताना...आपल्या मुलांशी लहानसहान बाबांवर अबोला धरणाऱ्या वडीलांना दाखवावे हे जरा....
    अश्या वेळी जाणवतं आपण आपल्या मुलांसाठी अजूनही कमी पडतोय की काय!!!!

    ReplyDelete
  2. तन्वी खरेयं गं.क्षुल्लक गोष्टींसाठी मुलांवर प्रचंड रागावणारे पालक... आपले मूल धडधाकट आहे हीच किती मोठी देणगी देवाने दिली आपल्याला हे त्यांच्या खिजगणतीतच नसते.

    ReplyDelete
  3. सहजच बरोबर सहमत आहे.भाग्यश्री.तुला सांगावेसे वाटते की हि फ़िती बघुन मला माझ्या मैत्रिणीची आणि तिच्या नव~याची आठवण झाली.त्यांना पण असेच एक लेकरु पदरी आहे.सहजा आई मुलाला सं भाळण्याचे काम चोख करते.पण इथे माझ्या मैत्रिणीचा नवरा पण इतका छान लक्ष देतो कि काय सांगु..मीच त्याला ५ वर्षापासुन बघतेय.बघता बघता इतका बदल ह्या मुलामध्ये..वडिलांना sports ची आवड असल्या मुळे प्रत्येक गोष्ट ते स्वता जातीने त्याला शिकवतात. ह्या मे महिन्याच्या सुट्टीत स्वता त्यांन्नी मुलाला स्विमींग शिकवले..कारण अशा मुलांकरता कोणी रिस्क घ्यायला तयार नाहित.मग हे काम स्वतावर घेउन रोज नियमाने ते घेउन जायचे..त्याच्यात झालेला बदल मला नेहमी जाणिव करुन देतो कि माणुस स्वताच्या मुलांकरता खरच किती करतो नाहि का??आणि मग मी माझ्या धडधाकट मुलाला बघते आणि कुठे कमी न पडो ह्याची खबरदारी घेते.

    खुप छान आहे ग...मला माझ्या मैत्रिणीला नक्की दाखवायला आवडेल..

    ReplyDelete
  4. माऊ हो गं असे नाउमेद न होता, नुसतेच नशिबाला दोष देत परिस्थितिचा-मुलाचा राग राग न करता प्रेमाने जेव्हां आई-बाबा मुलांसाठी इतके झोकून देतात ते पाहून खरेच आपण कुठे कमी तर पडत नसू ना हे मनात आल्याशिवाय राहत नाही. तुझ्या मैत्रिणीचे व नव~याचे कौतुक व अनेक शुभेच्छा!

    क्रान्तिशी सहमत. Salute!!

    ReplyDelete
  5. no words to express !!!!!!!!!!!!!!! gr8!!!!

    -Ashwini

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !