जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 2, 2009

हुशशश........ सुटलो एकदाचे.....

कधी कधी अगदी सहज-सोप्या गोष्टीही कशा त्रास देतात. नाही नाही गोष्टी त्रास देतात म्हणण्यापेक्षा रोजच सहजपणे करणारी एखादी गोष्ट आपण अचानकपणे कशी अवघड करतो. सरळपणे घास तोंडात घालावा ना पण नाही तो उगाचच उलटा-मागून घालायचा प्रयत्न. बरं हे जेव्हां घडायला सुरवात होते तेव्हा दोन मिनिटातच कळत असते की अरे काय मूर्खपणा करतोय आपण. पण मग संचारतो ' हट्टीपणा ' ....... जमत नाही म्हणजे काय. मी करूनच दाखवतो. आणि मग करू पाहणाऱ्याची चाललेली कसरत व पाहणाऱ्याला येणारी गंमत नंतर नंतर अस्वस्थपणा. शेवटी त्या पाहणाऱ्याचा संयम संपतो. " अरे राहू दे, तू थांब. मीच करून टाकतो. हुशशश........ सुटलो एकदाचे, तू - मी- अन आम्हीही. '

( नंबर दोनच्या चित्रफीतीतील घड्याळही काय दाखवते ते पाहा. )

12 comments:

  1. सहीच आहेत ग!!! त्या मागच्या गा्डीतल्या माणसाने किती शिव्या दिल्या असतील ना त्या बाईला!!!!

    ReplyDelete
  2. mast. ekadam patyaa. yaatalyaa donhee bhoomikaammadhye aapan suddhaa asatoch kadhi na kadhi.

    ReplyDelete
  3. महेंद्र...किती कसरत केली रे तिने. पण एक मला आवडले, उगाच तिला काहीतरी बोलण्यापेक्षा याने काम करून टाकले.

    ReplyDelete
  4. तन्वी अग बहुदा त्याला आधी थोडी गंमत वाटली असेल नंतर तोच घाबरला असणार...ही बया येऊन आपल्या गाडीला ठोकेल की काय....त्यापेक्षा उतरा आणि....हाहा...

    ReplyDelete
  5. गौरी हो ना. कधी कधी आपणही असेच अडून बसतो. मग सुरू होतो वेडेपटपणा.....
    आभार.

    ReplyDelete
  6. दोन्ही व्हीडिओ बघून मी खूप हसलो. शेवटी नारायण मदतीला आला व त्यांनी हुशशश.

    ReplyDelete
  7. नारायणाने वाट पाहिली थोडावेळ...शेवटी उतरला...:)
    आभार रविंद्र.

    ReplyDelete
  8. मला जर कुणी parallel park करायला सांगितले तर याहुन मजेशीर विडीओ तयार होतील...

    ReplyDelete
  9. अपर्णा, मलाही फारशी सवय नाहीये पॆरलल पार्किंगची...:( मला डाउनटॊउन मधल्य़ा एकदम टाईट स्पॊट पार्किंगची जरा भीतीच वाटते ग.:D

    ReplyDelete
  10. आज इतक्या दिवसांनी बघतोय मी ही पोस्ट ... दुसरा व्हीडियो सहीच आहे ... मी गाडी घेतली त्या आधी पार्किंगची पूर्ण प्रक्टिस केली होती ... हाहा ...

    ReplyDelete
  11. रोहन आहे ना भन्नाट....:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !