जाता जाता एक नजर इथेही........

Friday, August 28, 2009

खुसखुस



मित्राकडे गेलो असताना त्याने खुसखुस खिलवले. मला तर ते खाऊन पाहण्याआधीच त्याचे नावच भारी आवडले. खाल्ल्यावर तर अजूनच छान वाटले. तुम्हालाही आवडेल बहुतेक.

जिन्नस
  • एक वाटी खुसखुस
  • एक वाटी गरम पाणी
  • एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून
  • एक मध्यम कांदा बारीक चिरून
  • एक हिरवी मिरची बारीक चिरून, दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून
  • दोन चमचे लिंबाचा रस
  • दोन चमचे फोडणीकरिता तेल
  • मोहरी, हिंग. अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा लाल तिखट
  • दोन चिमूट साखर व चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

एक वाटी गरम पाणी घेऊन ते खुसखुसवर ओतून चमच्याने ढवळून लागलीच झाकण ठेवावे. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. पाळीत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी व हिंगाची फोडणी करावी. हळद मात्र घालू नये. पंधरा मिनिटाने झाकण काढावे. खुसखुसचे दाणे चांगले फुगून आलेले दिसतील. आता त्यात साखर, मीठ व चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरची व लिंबाचा रस घालून सगळे मिश्रण एकत्र करावे. त्यावर तयार केलेली फोडणी घालून पुन्हा सारखे करावे. थोडे तिखट हवे असल्यास वरून लाल मिरचीचे तिखट भुरभुरावे. वाढताना कोथिंबीर घालून वाढावे.

टीपा

खुसखुस ( Couscous ) हे गव्हाचे असल्याने प्रकृतिलाही चांगले व गव्हाची प्रक्रिया केलेली ( प्रोसेस्ड-सेमोलिना ) भरड असल्याने जवळजवळ शिजलेलेच असते. खुसखुस गॅसवर शिजवायचे नाही. कोशिंबीर या सदरात मोडत असले तरी याने पोट भरते. आवडत असल्यास यात अर्धी वाटी गोड मक्याचे दाणे, मटाराचे दाणे वाफवून घालावेत. झटपट होणारे चवदार सॅलड.

5 comments:

  1. फ़ोटो बघुन मला आधि पुलावच वाटला.... :P

    ReplyDelete
  2. Yalaa mexican twist dyayache asalyas Jalapeno Peppers ghalavet. Italian flavor sathee olive oil, olives ani basil parsley ghalavi. Mulaat Moroccan recipe aahe. Yaat kakadihee chirun taaktaat. Kakadimule refreshing flavor yeto.

    ReplyDelete
  3. प्रभावित, आभार गं. अजून निरनिराळ्या प्रकारे बनविता येईलच.
    प्रसन्ना, हेहे.

    ReplyDelete
  4. खुस्खुस? हे मिळतं कुठे? मला आधी खसखस वाटलं. :)

    ReplyDelete
  5. shinu, पास्ता,न्युडल्स असतात ना ठेवलेले त्याच्या आसपास पाहा. सापडेल तुम्हाला.:) प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !