वाटते मला सारखे तू आहेस माझ्यासाठी
आहे अडसर तुझाच उंबरठा माझ्यासाठी
शोधित राहीले मी तुला इथे तिथे
राहिलास तू कोषात तुझ्याचसाठी
नसेल हा दोष सारा तुझ्या स्वभावाचा
मीच नाही जिंकले तुला माझ्यासाठी
शब्द माझे पडलें थिटे जे बोलले तुझ्याशी
आक्रंदन हृदयाचे व्यर्थ ठरले अबोला टाळण्यासाठी
कितीही केलास प्रयास तू मला दुरावण्याचा
देऊनी टाकले मी मज तुला तुझ्यासाठी
आहे मी सर्वदूर पसरणारी अभिन्न आठवण
पाहिन वाट तुझ्या सादेची माझ्यासाठी
रहा तू सदैव मग्न उन्हातल्या वेदनांशी
जाणून घे की आहे मी सावली तुझ्यासाठी
कातरवेळी आठव तुझा रक्ताश्रू झरतो गालांवरी
आण त्या आसवांची, तुला तू देऊन टाक माझ्याचसाठी
भाग्यश्री,
ReplyDeleteअप्रतिम कविता.प्रत्येकाच्याच मनाच्या गाभार्यात अशा नाद विरलेल्या घंटा कधी अचानक किणकिणतात. पण तो नाद शब्दांतून उमटवण्याला एक प्रतिभा असावी लागते. त्या बाबतीत तू भाग्यश्री आहेस.
शुभेच्छा.
अरुणदादा
खूप खूप धन्यवाद अरुणदादा.
ReplyDelete