जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 2, 2009

क्षण एक.......

क्षण एक हृदय माझे चकित धडधडले
उरला वेळ संवाद साधण्याचा

क्षण एक तुझे नि माझे नयन गुंतले
उरला वेळ रुसवे काढण्याचा

क्षण एक आठवण तुझी दाटोनी आली
उरला वेळ दाह चांदण्याचा

क्षण एक आकाशाला जखमी केले विजेने
उरला वेळ धरेने झेलण्याचा

क्षण एक जळोनी केले जीवनास पुलकित
उरला वेळ निरूद्देश्य भटकण्याचा

क्षण एक पळविले सीतेला रावणाने
उरला वेळ रामायण सांगण्याचा

क्षण एक द्यूत खेळले धर्मराजाने
उरला वेळ कुरुक्षेत्री लढण्याचा

क्षण एक भारतास स्वातंत्र्य मिळाले
उरला वेळ अंतर्गत कलह सोडवण्याचा

क्षण एक असे त्याची जादू अगाध
उरला वेळ जीवन जगण्याचा

5 comments:

  1. मालतिनन्दनSeptember 3, 2009 at 1:35 AM

    अप्रतिम!!
    श्री, तुझी कविता आता वरची पातळी गाठायला लागली आहे. अशीच लिहित रहा. लवकरात लवकर तुझा कविता संग्रह येऊ दे.
    जियो.

    अरुणदादा

    ReplyDelete
  2. अरुणदादा, माऊ प्रतिसादाबद्दल अनेक आभार.:)

    ReplyDelete
  3. चांगली आहे. परस्पर संबंध बरोबर दाखवला आहे. आकाशाला जखमी केले विजेने उरला वेळ धरेने झेलण्याचा.....फारच छान.
    भारतास स्वातंत्र्य..... किती दूर्देव आहे आपले.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !