गेल्या महिन्याभरात रोहन, महेंद्र, अपर्णाने त्यांच्या भेटीच्या, गोमांतकी खादाडीच्या मला जळवणाऱ्या सुरस कथा पोस्टताना हटकून सोलकढीचे फोटो टाकले. त्यात भर मनमौजीनेही टाकली. सोलकढीवर माझे खास प्रेम आहे. पुण्याला बेडेकरांची मिसळ खायला गेले की सोलकढीची थंड बाटली पाठोपाठ हवीच. मी मासेखाऊ नसल्याने कुठे जेवायला गेलो असता हातासरशी सोलकढीची वाटी काही समोर येत नाही. तुकडी, चिकन बरोबर कशी सोलकढी आपसूक. मालवण, सिंधुदुर्ग सारख्या खास खास हाटेलात शाकाहारी थाळीतही येते म्हणून मी हटकून तिथे जातेच.
गेल्यावेळी देवरुखात एका एकदम साध्याश्या दिसणाऱ्या खानावळीत जेवायला गेलो असता इतर पदार्थ जरा डामाडौल असल्याने मी खट्टू झालेली. अचानक मालकाने आरोळी दिली, " काय रे दिन्या, पाहुण्यांना सोलकढीची वाटी विसरला काय? " ससा कसा कान टवकारतो तसे सोलकढी हा शब्द कानावर पडताच माझी नजर, कान, जीव सगळे दिन्याकडे धावले. तोही तसा चपळ होता. चटदिशी चार वाट्या घेऊन आला. " ए, अरे त्यांच्या पानाशी नको सगळ्या माझ्याजवळ ठेव आणि त्यांना घेऊन ये आणखी. " असे म्हणत मी हावरटासारख्या चारही वाट्या ओढून घेतल्या व जेवण बाजूला सारून मन लावून घोट घोट ते अमृत प्याले. अगदी ताज्या ताज्या खवलेल्या नारळाच्या दाटसर दुधाची, गडद आमसुलांमुळे आलेला गुलाबी रंग व आंबटाला अचूक तोललेली, अप्रतिम सोलकढी होती ती. नशीब लागते हो, कधी कधी अगदी रद्दड ठिकाणी अवचित असे घबाड लागते हाताला.
इथे येतांना मी चक्क विळीही घेऊन आलेय ती केवळ ताजा फोडलेला नारळ खवून सोलकढी करता यावी म्हणून. पण हाय रे दैवा! नारळ मेले कुजकेच निघतात. फ्रोजन खोबरे मिळते पण त्याची सोलकढी करण्यासाठी बरेच बाळंतपण करावे लागते. शिवाय त्यावर तवंग येणार नाहीच अशी खात्री देताच येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे टिनचे नारळाचे दूध वापरणे. दगडापेक्षा वीट बरी इतपतच असले तरी काहीच नसण्यापेक्षा टिनचे दूध धावते. थोडे तंत्र नीट हाताळले तर प्रिझर्वेटीवचा वास पुढे येत नाही. शिवाय करायला अतिशय सोपी व चटकन होणारी.
इथे येतांना मी चक्क विळीही घेऊन आलेय ती केवळ ताजा फोडलेला नारळ खवून सोलकढी करता यावी म्हणून. पण हाय रे दैवा! नारळ मेले कुजकेच निघतात. फ्रोजन खोबरे मिळते पण त्याची सोलकढी करण्यासाठी बरेच बाळंतपण करावे लागते. शिवाय त्यावर तवंग येणार नाहीच अशी खात्री देताच येत नाही. दुसरा प्रकार म्हणजे टिनचे नारळाचे दूध वापरणे. दगडापेक्षा वीट बरी इतपतच असले तरी काहीच नसण्यापेक्षा टिनचे दूध धावते. थोडे तंत्र नीट हाताळले तर प्रिझर्वेटीवचा वास पुढे येत नाही. शिवाय करायला अतिशय सोपी व चटकन होणारी.
वाढणी: माझ्यासारखी हावरी असेल तर एकालाच पुरेल... नाहितर तिघांना पुरावी.
साहित्य:
आठ-दहा अमसुले ( रंग येत नसेल तर दोन चार अजून घ्यावीत )
एका नारळाचे दूध( एक टिन:
दोन ओल्या मिरच्या चिरून
पाच-सहा लसूण पाकळ्या चिरून ( खूप मोठ्या असतील तर तीन पुरेत )
एक चमचा जिरे पूड/अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
चमचाभर साखर ( साखरेचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी/जास्त करावे. गूळही वापरता येईल )
दोन चमचे कोथिंबीर
कृती:
नारळ फोडून खवून घ्यावा. प्रथम एक भांडेच पाणी घालून खोबरे मिक्सरमधून काढावे व नंतर पिळून दूध काढावे. पुन्हा खोबऱ्यात भांडभर पाणी घालून फिरवावे व पिळून काढावे. एकंदरीत चारदा असे करून दूध काढून एका पातेल्यात घ्यावे. हे करतांनाच अर्ध भांड गरम पाणी घेऊन त्यात अमसुले भिजत घालावीत. दूध काढून झाल्यावर लसूण, मिरच्या व जिरे वाटून घ्यावेत व दुधाला लावावेत. त्याच मिक्सरच्या भांड्यात अमसुलेही भिजवलेल्या पाण्यातच वाटून घेऊन गाळणीने गाळून ते पाणी दुधात घालावे. स्वादानुसार मीठ व साखर घालावी. आता हे सगळे मिश्रण एकजीव करावे, कोथिंबीर भुरभुरावी व शक्यतो थंडच द्यावी. मसालेदार व जड जेवणामुळे हमखास पित्ताचा त्रास होतो त्यावर हमखास उपयोगी.
सोलकढी गरमही छान लागते. वरील सगळी कृती करून झाली की मध्यम आंचेवर ठेवून सारखे ढवळत राहावे. कढ आला की आंचेवरून उतरवावी. फुटू देऊ नये.
त्याचप्रमाणे गरम किंवा गार सोलकढीला फोडणीही देतात व तीही मस्तच लागते. फोडणी देतांना पळीत एक मोठा चमचा तूप घ्यावे, गरम झाले की जिरे टाकावेत. जिरे तडतडले की लगेच दुधात फोडणी घालावी.
टिपा:
साखरेचे प्रमाण किती आंबटपणा हवा आहे यावर ठरवावे. सोलकढी अती आंबटढोक करू नये. टिनच्या दुधाची सोलकढी करताना टिनमधले दूध पातेल्यात ओतून घेऊन आधी चांगले हालवावे. बरेचदा खोबऱ्याचा साका वर घट्ट होऊन बसलेला असतो व खाली पाणचट द्राव दिसतो. हालवून घेतल्यावर तो टिन हेच प्रमाण घेऊन दुप्पट पाणी घालावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच. शक्यतो टिनच्या दुधाची सोलकढी गरम करावी व तिला फोडणीही द्यावी म्हणजे इतर कुठलाही वास येणार नाही.
सोलकढी.....मी पण हावरट आहे....कोणत्याही खादाडीला गेलो की पहिली सोलकढी....बाद मे सब कुछ!!!
ReplyDeleteआमच्या इथे हॉटेल्समध्येही काही खास सोलकढी मिळत नाही...खरतर एवढी फ़ेमस नाहिये इथे ती..पण जानेवारीत रत्नागिरीला गेलो होतो तिथे एका हॉटेलात इतकी लज्जतदार सोलकढी चाखायला मिळाली कि ती दोनदा पिण्यापासुन मी स्वत:ला रोखु शकलो नव्हतो...कृती तर सोपीच दिसते आहे पण मला वाटते सगळ्यांचे प्रमाण मस्त जूळून आल्यावरच ती लज्जतदार होत असावी...
ReplyDeleteनिघायला अवघा १ तास बाकी... आवरा-आवरी सुरू... शेवटच्या क्षणाला ऑनलाइन यावे आणि बघावे तर काय... च्यायला... ;) आता आलात की बनवायच्या पदार्थांमध्ये अजून एकाची मेन्युची भर... :) लिस्टा वाढत चालल्या ताई... :)
ReplyDeleteहाय रे किस्मत !! जलाओ जलाओ...
ReplyDeleteवैसे खुब जमेगा रंग जब मिल सिटॆंगे तीन यार..आप हम और ये "सोलकढी"...हिहिहि हहा....
वाढणी: माझ्यासारखी हावरी असेल तर एकालाच पुरेल... नाहितर तिघांना पुरावी.... हाहाहा...
ReplyDeleteमाझी पण फेवरेट. तळलेल्या माशांबरोबर मात्र एकदम मस्त लागते. फिशकरी राइस संपवल्यावर थोडा सोलकढी भात खाल्ला की कसं तृप्त वाटतं..
ReplyDeleteMast photu bay... :)
ReplyDeleteAata karun pahili phije nhitar mamila order dyayala pahije.... :)
(Bhartat aahe tovar changal aahe hi order dyayachi tyamule no Nishedh :) )
Tumachi post vachun mala suddha iccha zaliye...Solkadhi pyayachi....!!! Aaj sandhyakali karnaar mi.......!!! :)
ReplyDelete>>वाढणी: माझ्यासारखी हावरी असेल तर एकालाच पुरेल... नाहितर तिघांना पुरावी....
ReplyDeleteआनंद + १
हा हा हा .. ज्याम भारी..
मनमौजी, आता मी आले की आपण जाऊ रे तुझ्या तो पोटोबात. :)
ReplyDeleteदेवेंद्र, तशी करायला सोपीच आहे. कोकणात घरगुती खानावळीत एकदम छानच मिळते.
ReplyDeleteरोहन, अरे आपण मस्त अड्डा जमवू. उडालास का?
ReplyDeleteउमा, सिटेंगे नक्की. :) तुझ्या अहमदाबादेतलीही बरीच खादाडी लिस्टवर आहेच.
ReplyDeleteआनंद, अरे काही विचारू नकोस. बनवली नं की पातेले स्वत:पासूनच लपवावे लागतेयं. :D
ReplyDeleteसोलकढी+भात छान लागतो. महेंद्र, मला नं ती फिशकरीची करी असते नं तीचा वासही आवडतो पण त्यात फिश नकोत घातलेले. बटाटा वगैरे घालून करायला हवी... आता सगळे अट्टल फिशकरीवाले काय वाट लावतेयं म्हणून नाके मुरडणार... हीही...
ReplyDeleteतन्वे, हो गं. सध्या तू आयत्या ताटावर ताव मारते आहेस नं. मज्जा. :)
ReplyDeleteमैथिली, जमली ना गं? दे थोडी पाठवून मला पण. :)
ReplyDeleteहेरंब, इतर सारे ठीक आहे पण खरवस आणि सोलकढी नो तडजोड. हावरे म्हणा नाहीतर अजून काही... :D. मांजरासारखे डोळे मिटून घ्यायचे आणि...
ReplyDeleteमस्तच... आपल्यात अजून एक कॉम्मोन गोष्ट... सोलकढी... :)
ReplyDeleteपुण्यात नं एक कार्यालय आहे मित्रमंडळ नावाचं, तिथ हमखास एका वेळच्या जेवणात सोलकढी असते, आणि खूप सुंदर असते. मी तर कित्येक वर्ष आईला म्हणायचे माझ लग्न आपण त्याच कार्यालयात करायचं, म्हणजे मला मनसोक्त सोलकढी पिता येईल... :)
Kharech keli hoti mi solkadhi...rahavalech nai...!!! :)
ReplyDeleteसोलकढी! तोंडाला पाणी सुटलं!
ReplyDeleteउद्याच्या उद्या प्यावी लागेल.. आता सहा महिने लाड पुन्हा बंद!..:(
अमृता, अगं सोलकढीसाठी कार्यालय... हा हा. भारीच. :)
ReplyDeleteविद्याधर, अरे सुट्टी संपलीसुध्दा इतक्यात... :(
ReplyDeleteशेंहगड सर झाला, सगळे भेटले. :) आता आपल्या भेटीचा मुहूर्त कधी लागतोय... हॅपी जर्नी रे.
अशा पोश्टा भरल्या पोटी वाचल्या तरी पुन्हा सोलकढीची भूक (की तहान???) का गं लागते...निदान पुढच्या वेळेस फ़ोटो तरी टाकु नकोस बये....
ReplyDeleteअसो...यावेळच्या दौर्यात जास्तीत जास्त मालवणी ठिकाणी जेवलेय त्याचं मुख्य कारण सोलकढी असावं असं वाटतं...कुणाचीही वाटी उरली तर ती माझ्याच घशात..जास्त लांब कशाला हायवे गोमंतकलाही शेवटची सोलकढीची वाटी पिणारी मीच होते....
BTW ...तुला फ़िशकरीचा वास आवडतो म्हणजेच फ़िशचा वास आवडतो..ये तो फ़िशी है...मग बटाटा घालुन केलीस तर तो वास कसा इल???
अपर्णा, विचारच करत होते की गोमांतक कुठे राहिलं... :)
ReplyDeleteतुला जळीस्थळी सारे फिश करीत डुंबताना दिसतात काय गो? अगं फिश घातलेली करी नाय बा. ते घालण्याआधी जो मस्त वास सुटतो नं तो आणि भात... खयालोमें... भूक लागली. चल गं मी जाते जेवायला. उशीरच झालाय आज.
Namaskar.Mi Potoba baddal lihu ka iethe?Book chaan aahe.Kahi easy recepi suchavu ka?Testy pan.Pl.inform....Suvarna Joshi,Mulund East,Mumbai.
ReplyDeleteसुवर्णाताई, ब्लॉगवर स्वागत व आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण आपला विरोपाचा पत्ता मला दिल्यास मी विरोप लिहीन.
ReplyDeleteश्रीताई .... तु दिलेल्या कृतिप्रमाणे मी सोलकढी करून बघितली .... सर्वांना आवडली ( मला चाखायला शिल्लक राहिली नाही म्हणजे ती चांगली झाली असणार ) .... धन्स ताई .... :)
ReplyDeleteमी कोकणा तील .. पक्की मांसाहारी . त्यामुळे सोलकढी शी भावनिक नाते जरा जास्तच जवळचे . वडे सागुती कितीही हादडली तरीही पोटात सोलकढी ला जागा आवर्जून ने ठेवलेली असते. तिचा पाचक गुणधर्म तर आहेच पण त्या शिवाय वडे सागुती परिपूर्णच वाटत नाही.
ReplyDeleteमी मराठी, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद!
ReplyDelete” सोलकढी ’आहेच तशी. सगळ्यांना आवडणारी.:)
solkadhi...hmmm..tondala pani sutatay...karun pahate udya.kakam bhijaun waparnya peksha aagal mhanje kokamacha ras waparla tar nahi ka chalnar???
ReplyDelete