आताशा हाती लिहिलेले पत्र दुर्मिळच झालेय म्हणा..... मला वाटते, बहुतेक मी तिसरीत असेन. आमच्या शाळेतून दरवर्षी मुलांना एक बालचित्रपट दाखवायला नेत. आम्हां मुलांमध्ये यावर्षी कुठला सिनेमा पाहायला नेतील यावर बरीच चर्चा सुरू होती. तसे फारसे काही कळतही नव्हते. घरातही कधीही सिनेमांची चर्चाही होत नसे. चुकूनमाकून एखादे बालनाट्य पाहायला मिळे. " जंजीर " जबरी हिट झालेला असल्याने व जागोजागी दिसणारी त्याची पोस्टर्स, तशात जया - अमिताभचे गाजत असलेले लग्न, त्यांचे फोटो- त्यावर चालणारी मोठ्यांच्यातली थोडीफार चर्चा कानावर पडत असल्याने खूपच कुतूहल होते. थोड्याच दिवसात यावर्षीच्या सिनेमाचे नाव कळले. १९६८ साली आलेला, शॉर्ट स्टोरीत मोडणारा, एक तास वीस मिनिटांचा " जवाब आयेगा ". पुढे दोन-तीन वर्षांनी मी जंजीरही पाहिला. अविस्मरणीय खराच. जंजीरबद्दल खरे तर काही बोलायलाच नको. पण माझ्यासाठी तो वेगळ्याच कारणाने अविस्मरणीय झालाय. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन. आत्ता या जंजीरच्या फाट्यावरून मूळ रस्त्यावर...... जवाब आयेगावर येते.
एकमेकांची हात धरून साखळी केलेली आम्ही सारी छोटीछोटी बच्चेकंपनी अती उत्साहात, लकाकणारे डोळे आणि बाईंच्या भाषेत ' कलकलाट ' करत सिनेमागृहात दाखल झालो. अरोरा का ब्रॉडवे मला नीटसे आठवत नाही पण संपूर्ण थिएटर फक्त शाळेच्या मुलांनीच व्यापलेले. आमच्या बरोबरच आणखीही एका शाळेची मुले असावीत. कारण वेगळेच युनिफॉर्मही दिसत होते. " अरे अरे कुठे तिकडे घुसता आहात? हा अर्धा भाग आपला आहे. चला पटापट जागा पकडा आणि घ्या बसून. " प्रभाताई-कमलताई, आम्हा सगळ्या खुशाळलेल्या-आनंदलेल्या पोरांना पकडून पकडून खुर्चीवर बसवत होत्या. आमची गडबड-गलका सुरू असतानाच अचानक दिवे मंद झाले आणि पडद्यावर जाहिराती दिसू लागल्या. एकजात सगळ्या नजरा डोळ्यात जीव एकवटून त्या पड्द्याला चिकटल्या. अन थोड्याच वेळात " जवाब आयेगा " सुरू झाला.
तशी सिनेमाची कथा अतिशय साधीशीच आहे." एक कार्यकारी अभियंता व आपल्या दोन मुलींना घेऊन थोड्या दिवसांची सुट्टी मनवण्यासाठी जरा दूर - फारशा प्रसिद्ध नसलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जातो. तिथे त्यांच्या नोकराचा -केअर टेकरचा मुलगा - बादल व याची लहान मुलगी- मीना दोघे दोस्त बनतात. मीना बादलला लिहावाचायला शिकवते, चित्रकलाही शिकवते. दोन्ही मुले त्यांच्या पाळलेल्या कुत्र्याबरोबर डोंगरात फिरतात-खेळतात. सुट्टी संपताच दोन्ही मुली, वडिलांबरोबर शहरात परततात. इकडे बादल मात्र मीनाशी बोलणे होत नसल्याने खूप उदास होतो. शेवटी स्वत: काढलेल्या चित्रांची वही एका पेटीत घालून त्यावर मीनाचा पत्ता टाकून तो ती पेटी पाण्यात सोडतो. सरतेशेवटी ती पेटी मीनाच्या शाळेत पोचते व तिला मिळते. त्या चित्रांच्या आधारे मीना चित्रकला स्पर्धा जिंकते परंतु बक्षीस घेतांना कबूल करते की ही चित्रे तिची नसून बादलने काढलेली आहेत. हे कळताच बादलला शहरात बोलावले जाते व अशा प्रकारे त्याचे शहराचे स्वप्न खरे होते. "
या कथेचा अर्धा भाग आनंदाचा-मजेचा व नंतरचा अर्धा भाग अतिशय व्याकूळ करणारा. शेवटची वीस मिनिटे तर मी इतकी रडले होते की डोळे भप्प सुजले. खूपच भारले गेलेलो आम्ही. नंतर बऱ्याच वर्षांनी हा लघुचित्रपट दूरदर्शनवरही दाखवला गेला.
त्यावेळी " इस्मत चुगताई व शहीद लतीफ " ही दोन नावे ठळकपणे मनावर छाप टाकून गेली. खरे म्हणजे ही दोन्ही नावे आधीच परिचयाची झालेली होतीच पण.... अरेच्या! जवाब आयेगा ही यांचाच का.... तरीच....., ही दाद आपसूक गेली. ' इस्मत चुगताई ' या अतिशय विख्यात व महान उर्दू लेखिकेने लिहिलेली पटकथा व त्यांचे पती ' शाहीद लतीफ ' यांचे दिग्दर्शन लाभलेला " जवाब आयेगा " सिनेमा. हा सिनेमा पुढे मराठी, गुजराती, बेंगॉली, आसामी, तमील, मल्यालम व कन्नडमध्येही काढला गेला. मीनाच्या भूमिकेत छोटी योगिता बाली अतिशय गोड दिसते. तिने व इर्शादने कामही मस्त केलेय. इस्मत चुगताई यांनी अनेकविध कथा, लघुकथा, कादंबऱ्या व सिनेमांच्या पटकथाही लिहिल्यात. ' गर्म हवा ' या चित्रपटाकरिता त्यांना फिल्मफेअर अवार्डही मिळाले. तसेच श्याम बेनेगल यांच्या ' जुनून 'चे संवादही त्यांनीच लिहिले होते.
जालावर मी बरेच शोधले परंतु कुठेही हा चित्रपट सापडला नाही. कदाचित तो उपलब्ध नसेलच. पाहावयास मिळाल्यास जरूर पाहा. बालचित्रपटात मोडणारा असला तरी मनाला स्पर्शून जाणारा सिनेमा. कोणाला सापडल्यास कृपया दुवा जरूर द्यावा. धन्यवाद.
म्हटलं, किती दिवस हरवणारेयस,
ReplyDelete:)
आपण परत हजर झालात,
छान वाटलं.
तरीच मी म्हटलं, ताई गेली कुठे!
ReplyDeleteआली ती एकदम आठवणीतल्या सिनेमाबरोबर! बेश्ट एकदम!
बघू कुठे सापडतो का हा सिनेमा!
या या.. वेलकम बॅक :)
ReplyDeleteवॉव.. खरंच मस्तच कथा आहे. शोधतोच आता हा चित्रपट..
मला आठवत नाही हा चित्रपट पण आता शो्धतो, आणि सापडला की तूला पण देतो लिंक.
ReplyDeleteअनघा, धन्यू गं.:) बोलूच लवकर.
ReplyDeleteविद्याधर, तू परतलास का?
ReplyDeleteआहे रे मी इथेच. चुकला फकीर मशिदीतच... :)
हेरंब... :) मिळालाच तर मलाही देशील.
ReplyDeleteआता वाचते सगळ्यांच्या पोस्टस.बरीच गॅप झालीये.
महेंद्र, मला वाटले होते की तुला नक्की आठवत असेल हा चित्रपट. या नवरा-बायकोने खूपच आशयपूर्ण चित्रपट दिलेत.
ReplyDeleteश्री ताई...वेल कम बॅक...कशी झाली सुट्टी??? हा सिनेमा शोधला पाहिजे आता...:)
ReplyDeleteहो...परतलो...पुनश्च हरिओम!
ReplyDelete:(
Tayade tu chan mhatalas mhanun aata shodhun pahila pahije ha cinema.... :)
ReplyDeleteBaki parikshan nehemichya shtylit mast jhaley :)
छानच आहे गं "जवाब आएगा"ची कथा आणि दाद द्यायला हवी तुझ्या स्मरणशक्तीला...:) वेलकम बॅक..
ReplyDeleteमला तसंही लहान मुलांचे चित्रपट जास्त आवडतात...असाच एक "हॅलो" म्हणून चित्रपट आला होता केव्हातरी तोही छान आहे...एका मुलीला एक कुत्र्याचं पिलु मिळतं त्याबद्दलची कथा आहे...
अरे सुटी मस्तच गेली. नुसती धमाल. योगेश, सिनेमा खरं तर लहान मुलांचा आहे परंतु त्याचा आशय आणि गुंफण इतकी सुंदर झालीये नं की मनाला स्पर्शून जातो. :)
ReplyDeleteतन्वे, अगो ईशान व गौराला अतिशय आवडेल. परंतु सापडणे खरेच मुश्किल दिसतेय.
ReplyDeleteकाही काही प्रसंग, वाचलेले, पाहिलेले कितीही काळ पुढे गेला तरी पक्के स्मरणात राहून जातात. :)
अपर्णा, " जवाब आयेगा " हा टिपिकल पोस्ट खाते म्हणजे लाईफ लाईन या जमान्यातला नं. कदाचित आज उपलब्ध झालेल्या सगळ्या संदेशवाहक सुविधांपुढे बैलगाडी वाटेल परंतु शेवटी ’भाव” तेच आहेत.
ReplyDeleteमलाही लहान मुलांचे सिनेमे भावतात.:) ’ हॅलो ’ मी पाहिलेला नाही परंतु कथा ऐकलेली आहे. शोधते नेटवर.
अपर्णाशी सहमत! दाद द्यायला हवी तुझ्या स्मरणशक्तीला..
ReplyDeleteवेगळा चित्रपट असावा, पहायला हवा.
http://www.cfsindia.org/online_movies.htm#
ReplyDeleteइथे सध्या २ चित्रपट आहेत. बाकी येतील.. सरकारी गतीने :(
टोरंटवर उपलब्ध नाही, नाहीतर तिथुन काढला असता. मिळाला तर कळवतोच आणि बघतो :)
मीनल, काही काही गोष्टी, घटना, व्यक्ती-स्थळे, इत्यादी मनावर छाप सोडून जातात. कितीही काळ मध्ये गेला तरी त्या धूसर होत नाहीत. :)मला कुठून लिंक मिळाली तर मी टाकीनच.धन्यवाद.
ReplyDeleteविजय, खूप खूप आभार. Harun Arun हा फाळणीपासून अव्याहत सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम व ते ते असण्यामुळे संबंधावर येणारे ताण, उठणारे प्रश्न, आस्तित्वाचा लढा अशा अनेक गोष्टींवर बेतलेला लघूचित्रपट. 'Prince & Crown Stones' पाहते आता.
ReplyDeleteतुम्हाला अजून असेच दुवे मिळाल्यास मला जरूर द्या. धन्यवाद.
"वो जरुर आयेंगे... मेरे करण-अर्जुन आयेंगे..." हे बोलताना राखीच्या (सावंतांची नव्हे) चेहऱ्यावर जो आशावाद आणि विश्वास असतो ना... मी अगदी त्याच अविर्भावात "जवाब आयेगा...." हे वाचलं. आणि जसा त्या चित्रपटात राखीचा विश्वास खरा ठरतो बिलकुल तसेच धडाक्यात पुनरागमन केल्याचा भास मला झाला.
ReplyDeleteव्वाह... भारी!!!
हा हा... बापरे! काय खतरा सिन होता ना. :D
ReplyDeleteFor Marathi Gazal, Kavita etc , visit www.sardesaikavya.com
ReplyDelete