समुद्रकिनारी गेल्यावर ती चिरपरिचित सेंगचना ची हाक आली नाही असे कधी तरी होईल का? आमच्या चाळीत तर शेंगदाणे-चणे, शेव, कुरमुरे, चिंचोके, डाळं, काबुली चणे, कधीकधी हिरवे उकडलेले चणे, कैरी-कांदा व बरेच काही घेऊन भैय्या येत असे. असेही आपल्याकडे नाक्यानाक्यावर हा सारा माल मसाला शिगोशीग भरलेला असतो. येताजाता पावले थबकतातच. मग कधी गरमागरम खारे शेंगदाणे घे तर कधी सर्दी झालेली असली की चणे. चटणी-चिवड्यासाठी डाळ्या, कुरमुरे, भेळीचा तर साराच सरंजाम असतोच पण घरी करायचा कंटाळा आल्यास ओली व सुकी भेळही चटदिशी हाजिर होते. पापडीचा चमचा करून मस्त हासहुस करत ही आयती भेळ चापण्यातली लज्जत काही औरच. ही अशी दिवास्वप्ने मला भारीच त्रास देतात. इथे तशी पाकिटातली भेळ मिळते पण त्यातल्या चटण्या( दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मस्तच असल्या तरी ) मला खास आवडत नाहीत. बरे एकवेळ तेही चालवून घेऊ... मात्र खारे शेंगदाणे व मसाला शेंगदाणे अगदीच बेकार मिळतात. बरेचदा ते खूप जुनाट व सादळलेले असतात. मसाला शेंगदाण्याला तर एक चमत्कारिक-तेलकट वास ही येत असतो. सुरवातीला चार-पाच वेळा निरनिराळ्या दुकानांमधून आणून पाहिले पण सगळीकडे तिच रडकथा. खाऱ्या शेंगदाण्याची तल्लफ काही चैन पडू देईना तसे एक दिवस घरीच प्रयत्न केला. जमले. आता तर चुटकीसरशी खारे शेंगदाणे - मसाला शेंगदाणे ( हिरवा मसाला, लाल मसाला, किंचितश्या डाळीच्या पिठाचा हात लावलेले- कोटेड, वगैरे प्रकार ) तयार....
खारे व मसाला शेंगदाणे
वाढणी : निदान दोन माणसांना तरी एकावेळी पुरावी.
साहित्य:
दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
तीन चमचे मीठ
तीन वाट्या पाणी
कृती :
शेंगदाणे, मीठ व पाणी एका काचेच्या भांड्यात एकत्र करून तीन मिनिटे मायक्रोव्हेव मध्ये वॉर्मरवर ठेवा. एकदा हालवून पुन्हा मिनिटभर ठेवा. नंतर भांडे बाहेर काढून पाच-सात मिनिटे शेंगदाणे खाऱ्या पाण्यातच ठेवून चाळणीवर टाकून सगळे पाणी काढून टाका. आता शेंगदाणे काचेच्या भांड्यात घाला व भांडे पुन्हा मायक्रोव्हेव मध्ये ठेवा. सुरवातीला तीन वेळा ४५ सेकंद ठेवायचे व प्रत्येक वेळी शेंगदाणे हालवायचे. त्यानंतर प्रत्येकवेळी ३० सेकंद असे चार वेळा व २० सेकंद ३ वेळा. जरा दमट आहेत असे वाटल्यास अजून दोन-तीन वेळा २० सेकंद ठेवावे. हा अंदाज दोनतीनदा केले की बरोबर येतो. मायक्रोव्हेव मधून काढून कोमट होईतो दम धरा. गरम खाल्ले तरी लागतील मस्तच पण थोडेसे ओलसर वाटतील. जसे जसे थंड होत जातील तसतसे अगदी टिपीकल खारे शेंगदाणे लागतील.
वाढणी : निदान दोन माणसांना तरी एकावेळी पुरावी.
साहित्य:
दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
तीन चमचे मीठ
तीन वाट्या पाणी
कृती :
शेंगदाणे, मीठ व पाणी एका काचेच्या भांड्यात एकत्र करून तीन मिनिटे मायक्रोव्हेव मध्ये वॉर्मरवर ठेवा. एकदा हालवून पुन्हा मिनिटभर ठेवा. नंतर भांडे बाहेर काढून पाच-सात मिनिटे शेंगदाणे खाऱ्या पाण्यातच ठेवून चाळणीवर टाकून सगळे पाणी काढून टाका. आता शेंगदाणे काचेच्या भांड्यात घाला व भांडे पुन्हा मायक्रोव्हेव मध्ये ठेवा. सुरवातीला तीन वेळा ४५ सेकंद ठेवायचे व प्रत्येक वेळी शेंगदाणे हालवायचे. त्यानंतर प्रत्येकवेळी ३० सेकंद असे चार वेळा व २० सेकंद ३ वेळा. जरा दमट आहेत असे वाटल्यास अजून दोन-तीन वेळा २० सेकंद ठेवावे. हा अंदाज दोनतीनदा केले की बरोबर येतो. मायक्रोव्हेव मधून काढून कोमट होईतो दम धरा. गरम खाल्ले तरी लागतील मस्तच पण थोडेसे ओलसर वाटतील. जसे जसे थंड होत जातील तसतसे अगदी टिपीकल खारे शेंगदाणे लागतील.
टीपा :
मायक्रोव्हेवची वेळ अजिबात वाढवायची नाही. एकावेळी जास्ती ठेवू म्हणजे पटकन तयार होतील असा मोह झाला तरी तो अमलांत आणायचा नाही. जळून जातात. अगदी थोडा थोडा वेळ ठेवून प्रत्येक वेळी हालवावे. उद्याला हवे असतील तर शक्यतो आजच करावे. चुकून मीठ जास्त झालेय असे वाटल्यास तीन-चारवेळा ठेवून झाले की हातावर चोळावे म्हणजे जादा झालेले मीठ पडून जाईल. मायक्रोव्हेव मध्ये करायचे नसल्यास पातेल्यात जिन्नस घेऊन खळखळवून उकळून घ्यावे. पाणी काढून टाकले की पसरट पॅनमध्ये किंवा तव्यावर टाकून मध्यम मंद आचेवर परतत राहावे. आच अजिबात वाढवू नये. किमान दहा ते बारा मिनिटे लागतील सगळे पाणी आटून कोरडे होण्यासाठी. पंधरा दिवस मस्त राहतात. अजिबात सादळत नाहीत.
मसाला शेंगदाणे करताना......
साहित्य :
दोन वाट्या कचे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )
मार्गदर्शन :
शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून वरीलप्रमाणेच उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.
टीपा :
मसाला शेंगदाणे शक्यतो पॅनमध्ये किंवा तव्यावरच कोरडे करावेत. तव्यावरच लिंबाचा रस टाकल्यामुळे आंबटपणा तर उतरतो मात्र शेंगदाणे ओले होत नाहीत. आठदहा दिवस अगदी मस्त टिकतात. ( केल्याकेल्या फन्ना न झाल्यास.... पण अशी वेळ येतच नाही. घरात कोणीही नसताना करून ठेवले तरच..... ) मसाला शेंगदाण्यात बरीच विविधता आणता येते. कधी लसूण घालून तर कधी जिरे-मिरीचे, किंचित डाळीच्या पिठाचे कोटींग चढेल असे.
Chhan..tar he chalu aahe..amhi tumachi wat baghatoy aani tumhi chane dane khat aahat..........chaalu dya tumache....baki reciepe Ati Uttam !!!!ajjch try karin...
ReplyDeleteअरे व्वा..वाचुन तर वाटतंय जमणार म्हणून....
ReplyDeleteघरात कोणीही नसताना करून ठेवले तरच.....??? तर मग एकटीने फ़न्ना उडेल त्याचं काय???
BTW निषेध......................
चन्ना जोर गरम !!! सहीये..
ReplyDeleteअपर्णा,
>>BTW निषेध....<<
हा हा. विसरणार होतीस वाटतं निषेधायला.
अरे हो.. तुला म्हणता म्हणता मीही विसरणार होतो बघ..
णी शे द !!!!!!
मज्जा करा. मी तर कालच अहमदाबादहून डब्बल डायमंड सिंग ( कुठला सिंग?) खारे दाणे आणलेत. मस्त आहेत.. आणि कसला योगायोग आहे पहा, आता दाणेच खात बसलोय :)
ReplyDeleteउमा, अगं निघालाच ना गं तो आता. म्हणून जरा जास्त दंगा-धमाल.:)
ReplyDeleteहा हा... अपर्णा, हाच तर मोठा खतरा आहे नं.
ReplyDeleteहेरंब, एक दोन दिवसात तुला निषेधायला एक जोरदार कारण देत्येच आता...:P
ReplyDeleteडबल डायमंड सिंग... नावच कसले जबरी आहे रे. यावेळी मुखवास नाही का आणलास?
ReplyDeleteआता इथे हॉटेल मध्ये राहताना काय दाणे करतेय मी, मुलखाची आळशी ना... पण पटकन जाऊन office च्या vending machine मधून rosted peanut with sea salt घेऊन आले......अहाहा, काय मजा येतीये एकेक दाणा खाताना... :)
ReplyDelete"खारे व मसाला शेंगदाणे"च्या ऐवजी "खारे.. मसाला शेंगदाणे" असे हवे होते... मग खाऊन टाकले असते सर्व.. ही ही... :) ह्यावेळी ट्रेकला जाताना बनवून घेउन जातो कसे... :P
ReplyDeleteबापरे.. बनविताना दम नाही धरवणार... बाहेरुन आणुनच मुठभर कोंबलेले बरे तुर्तास....
ReplyDeleteनिषेध...
तोंडाला पाणी सुटले, पण परवाच पोटभर खाल्ले असल्याने आणि आजही ते सहज शक्य असल्याने नो निषेध!
ReplyDelete>>>>ह्यावेळी ट्रेकला जाताना बनवून घेउन जातो कसे... :P
ReplyDeleteरोहना विसरु नकोस......
ताई बरी आठवण दिलीस आता आणून खातेच कशी .... :)
पाउसात अस खाण म्हणजे ..एकदम यम्मी...ते लसुणाची फ़्लेवर असलेले तर खुप आवडतात..
ReplyDeleteअमृता, खारे शेंगदाणे मिळाले नं... :). बाकी ते विमानात आजकाल फुकट...नाही नाही आपल्या तिकिटाच्या किमंतीत मेहेरबानी खातर दिले जाणारे शेंगदाणे इतके दिव्य असतात की ते तरी कशाला देतायं अस म्हणावसं वाटतं.:(
ReplyDeleteरोहन,ट्रेक ठरला नं...सहीच आहे. लेको तुम्ही तिकडे धमाल करा आणि आम्हाला जळवा... :D
ReplyDeleteमाहेरवास जोरात चालू आहे नं विद्याधर. मजा आहे. अजून किती दिवस?
ReplyDeleteतन्वी,काय म्हणतायं? धमाल नं... ट्रेकचे फोटू काढा बर का ढिगाने. :)
ReplyDeleteयस्स... लसणाचे व हिरवा मसाला लावलेले खासच लागतात.:) धन्यवाद देवेंद्र.
ReplyDeleteIts nice with beer !!
ReplyDeleteCheers !!
दीपक.... :)
ReplyDeleteनमस्कार !
ReplyDeleteमी अन्नदेवतेचा भक्त असल्यामुळे, तुमचा ब्लॉग मला प्रचंड आवडला आहे. विशेष करून फोटो इतके जिवंत वाटतात, कि असं वाटतं समोरच जेवायला वाडलंय. पोटच भरलं माझं. मस्तच.
इतका छान ब्लॉग लिहिल्याबद्दल
धन्यवाद !
अभिषेक, ब्लॉगवर स्वागत आहे. तुम्ही मनापासून दाद दिलीत... खूप आनंद वाटला. आभारी आहे. :)
ReplyDelete