जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 23, 2009

मनःपूर्वक आभार....

दोन वर्षांपूर्वी मायदेशात श्री.अरुण वडुलेकर मला भेटले. गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी मला त्यांच्या ' मालतीनंदन ' ब्लॉगबद्दल सांगितले. मायदेशात आल्यावर एकंदरीतच कॉंप्यूशी भेट रोज होत असली तरी फार वेळ मिळत नाही. मेल्स क्वचित कधीतरी मैत्रिणींशी गप्पा एवढेच. त्यामुळे इथे परत आल्यावर मी त्यांच्या ब्लॉगला निवांत भेट दिली. मला अतिशय कौतुक वाटले. नंतर मनोगतवर मी काही वर्षे असल्याने झालेल्या ओळखीतून सौ. रोहिणीशी ओळख झाली, वाढली... गट्टी जमली..

गप्पांच्या ओघात एक दिवस तिने मला तिच्या ब्लॉग्ज बद्दल सांगितले व तू का नाही ब्लॉग ओपन करत .... असे विचारले. तोवर मला अमिताभ, अमिरखान वगैरेंच्या ब्लॉग्ज बद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले होते. पुन्हा आठ दिवसांनी रोहिणीने परत विचारले, " केलास का गं? " तेव्हा मात्र मनात आले की खरेच काय हरकत आहे प्रयत्न करायला. मग थोडी शोधाशोध, चाचपडत १८ फेब्रुवारी,२००९ ला मी ' सरदेसाईज ' ब्लॉग ओपन केला. मनोगतवर थोडे लिखाण केलेले असल्याने व मुळातच लिहायची ओढ असल्याने मनाने मागे ओढले नाही. विचार केला फार तर काय होईल..... बंद पडेल. सुरवातीलाच नकारात्मक विचार नको असे ठरवून, पाहू... जमेल तोवर करूच
.

ब्लॉगचा पहिला वाचक.. सौ. सासूबाई. त्यांना खूपच आनंद वाटला. पहिली टिपणीही त्यांचीच व पहिला फॉलोवरही त्याच. वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिले... देत आहेतच. माझे सौ. आई व बाबांनीही आत्मविश्वास वाढवला. नंतरकाही दिवसांनी मी ब्लॉग ' मराठीविश्वला ' जोडला. अनोळखी ( आता ओळखीचे ) वाचकात श्री. महेंद्र व यशोधरा हे माझे पहिले वाचक असावेत. त्यांच्याच पहिल्या टिपण्याही आहेत. महेंद्रने मार्गदर्शनही केले. ( आभारी आहे
) हळूहळू वाचक ब्लॉगवर येऊ लागले. त्यांच्या चाहुलीने माझा हुरूप वाढला.

जवळजवळ महिनाभराने इतरांच्या ब्लॉगवरचे निरनिराळे कॉउंटर्स पाहून मार्चच्या शेवटास मॅप, ट्रॅफिक वगैरे गॅझेट्स जोडली . एखादी गोष्ट करायला घेतल्यावर मन लावून करायची ह्या स्वभावाने मी कासवाच्या गतीने परंतु नियमीतपणे लिहीण्याचा प्रयत्न करीत आहे. आज चार महिने होऊन गेलेत.... सगळ्या वाचकांचे, वेळोवेळी आवर्जून लेख कसा वाटला हे सांगणारे वाचक, प्रत्यक्ष ब्लॉगवर टिपणी न टाकता मेलमध्ये कळवणाऱ्या वाचकांची संख्या मोठी आहे ..... अनेक मूक वाचक, जे नियमीतपणे ब्लॉगला भेट देतातच. लिहिलेले आवडले नाही तर जरूर सांगणारे वाचक. माझ्या असंख्य मैत्रिणी-मित्र...... सरतेशेवटी माझा नवरा व मुलगा..... या सगळ्यांनी मला दिलेल्या प्रोत्साहनाने माझे प्रयत्न चालू आहेत. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. लोभ असू द्यात.........

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

11 comments:

 1. ही तर फक्त सुरुवात आहे..प्रत्यक्ष भेटत नसले तरी या नव्या युगाच्या 'कट्ट्या'वर बरीच माणसे मनानी जोडली जात आहेतच :-)

  लीहीत रहा.. :-)

  ReplyDelete
 2. अगदी बरोबर.... :) आभार प्रसाद.

  ReplyDelete
 3. wah sahi.. keep writing..!
  chhan astat tujhya posts!

  ReplyDelete
 4. Bhanas,
  Mi suddha niyamit vachak ahe tumachi. Office madhye alyavar sakali tumachya blog varchi post vachali ki bare vatate. SAT/SUN ghari athavan yete tumachi.
  Keep writing...

  ReplyDelete
 5. Blogchya chauthya masik vadhdivasachya blogla ani lekhikela shubhechaa. Asech bharpoor vachayala miloo de.

  ReplyDelete
 6. माझ्या ब्लॉगवरून प्रेरणा घेतलीस,माझे आभारही मानलेस. भरून आलं.तू कासवाच्या गतीने चालली असशील तरी शर्यत जिंकली आहेस. कारण ब्लॉग कसा सजवायचा हे मला तुझ्याकडून शिकावं लागणार आहे. नव्हे, तसा पहिला धडा तू दिलासही.तू छान लिहितेस. लिहिती रहा.

  ReplyDelete
 7. khupach chan lihita tumhi
  asech dar divashi liha

  ReplyDelete
 8. भाग्यश्री,
  माझ्या ब्लॉगवरून प्रेरणा घेतलीस,माझे आभारही मानलेस. भरून आलं......वगैरे वगैरे ही माझी टिप्पणी अन्वधानाने Anonymous टाकली गेली. अजून माझा असा घोळ होतोच आहे. रागऊ नकोस.
  अरुण दादा

  ReplyDelete
 9. मंदार, स्वागत व आभार.

  अरुणदादा, अरे मी रागवेन का?:)

  ReplyDelete
 10. faar chhan lehile ahes shree....... ...tujhe sagle post chan astat....keep writing

  ReplyDelete
 11. पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा.. तुम्ही तसंही सुंदर लिहिताच, तरी पण ... पुन्हा एकदा शुभेच्छा.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !