जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, July 21, 2010

मंडळी, या ताव मारायला.....

दिवसभराच्या उपासाने आता थोडेसे दमला असाल, काहींना उपास लागलाही असेल. फळे, दूध, ज्यूस इत्यादींनी पोटाला आधार मिळतो पण जिभेचे चोचले पुरवले जातच नाहीत. उपासाच्या दिवशी अगदी पहाटेपासून अर्धवट झोप व जागेपणाच्या सीमारेषेवर घुटमळणारे माझे मन इतकी अनाप शनाप स्वप्ने पाहते..... .. कसली ते कळले ना....... . एरवी ज्या पदार्थांकडे मी आवडीने सोडाच पण नाईलाजाने तरी खावा असेही पाहणार नाही तेही पदार्थ अचानक मला भलतेच चविष्ट भासू लागतात आणि ते मात्र मोठ्या ताठ्याने मला वाकुल्या दाखवतात. एकदा तर हा खेळ इतका वाईट्ट झाला की मी त्यांचा ताठा क्षणार्धात मोडून त्यांना गट्टमच करून टाकले. वर खातांना लबाड मांजरीसारखे डोळे मिटून घेतले व खाल्ल्यानंतर विठ्ठलाला नमस्कार करून पुन्हा उपास सुरू केला. इतर कोणाच्या लक्षात आले नाही पण ही लबाडी आईने लगेच पकडली. ती मला ओरडण्याआधीच मी हळूच पुटपुटले, " उपासाच्या दिवशी, स्वभावाचा तामसीपणाही निषिद्ध असतो. कोणाला रागे भरल्यास उपास मुळी फुकट जातोच वर पापही लागते. आजी बरेचदा असं काहीतरी म्हणत असे, हो ना गं आई? " असे वर आईलाच ऐकवून पसार झाले.

पण मी काय म्हणते, हे असे उगाच पोटाला-जिभेला छळणारे उपास नकोतच. त्यापेक्षा मस्त खाऊन पिऊन तब्येतीत उपास करावा. किंबहुना त्यासाठीच उपास करावा. आता आमची सकाळ - फराळाची वेळ झालीये व तुमची रात्रीच्या फराळाची. तेव्हां मंडळी, या ताव मारायला. गरम गरम भगर - दाण्याची आमटी , खिचडी, भेंडीचे भरीत, बटाट्याचा तळलेला कीसही सोबत आणतेच आहे..... दाण्याची आमटी मुद्दामहून किंचित तिखट केलीये. थोडे हासहुस झाले तर भरली केळी आहेतच. हात राखून पातेल्याकडे पाहून अनमान करत, नको बरं का..... बेत तसा साधाच आहे, बहुतेक आवडेल तुम्हाला. विठूमाऊलीचा जयघोष करत होऊन जाऊदे मनसोक्त.



23 comments:

  1. का गं बाई, छळायला दुसरं काहीच नाही का?? पचणार नाही हे माहित असून फ़ोटो टाकायचं धाडसं म्हंजे टू..टू...म..........च..(हे लिहिताना पण "मचमच" असा आवाज येतोय मिशिगनमधून...) असो..
    मला एक सांग तो ब.चा कीस पोश्टाने येतो का?? असल्यास मी पत्ता पाठवते कारण मला राहावत नाहीये अक्षरशः....

    ReplyDelete
  2. अपर्णा, अगं इतके आग्रहाचे आमंत्रण दिलेयं ना... ये चटकन, दाण्याची आमटी गरम केलीये.... अस्सा मस्त वास सुटलाय नं.... आता बहुतेक तू लॅपीतून घुसून मारणार मला... :P

    बाकी, मुद्याचे फोनवर बोलतेच. :)

    ReplyDelete
  3. श्री ताई,आमच्या कडेपण आज साबुदाण्याची खिचडी,बटाट्याचे वेफ़र्स (घरीच केलेले) होते,माझा उपवास नसतानाही ’एकादशी अन दुप्पट खाशी’ ही म्हण चुकीची ठरु नये म्हणुन नाइलाजास्तव त्यावर मला ताव मारावा लागला... :)
    तरीही तुझा फ़राळ पाहुन आमचे श्री.भुकोबा पोटे नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या ’मिलेंगे मिलेंगे ’ सिनेमातील ’कुछ तो बाकी है’ हे गाण गुणगुणायला लागले, त्यामुळे भरल्या पोटाने एक छोटासा निषेध...

    ReplyDelete
  4. >>स्वभावाचा तामसीपणाही निषिद्ध असतो. कोणाला रागे भरल्यास उपास मुळी फुकट जातोच वर पापही लागते. आजी बरेचदा असं काहीतरी म्हणत असे, हो ना गं आई? " असे वर आईलाच ऐकवून पसार झाले.

    हा हा हा.. सहीये... आवडल्या चोच्याउबों :))))

    मला तर हे उपास तापास अजिबात झेपत नसूनही मी रोज उपास करतो. रात्री १२ ते पहाटे ७.. ;)
    दुपारचा उपास आत्ता काही वेळापूर्वीच सोडला आणि बघतो तर हे भरलेलं ताट आलं समोर.. त्यामुळे नि नि नि नि नि षेध !!!

    एक शंका : भेंडी चालते उपासाला? (खर्‍याखुर्‍या.. माझ्यावाल्या नाही)

    ReplyDelete
  5. देवेंद्र,अगदी अगदी. एकादशी आणि दुप्पट खाशीच. :)तुझा ”नाईलाज’भारीच आहे.:D आणि ते घरी केलेले वेफर्स जरासे तेलकट होतात खरे पण मलाही खूउउउउप आवडतात.

    ReplyDelete
  6. रात्री १२ ते सकाळी ७ उपास.... हा हा. कॉलेजात असताना तर मी अनेकदा रात्रीची उठून डबे-फ्रीज हुडकत असे.:D

    चोच्याउबों... नाही केल्या तर लबाडीने केलेली खादाडी आईने फटका देऊन पचू दिली नसती नं...हीही...

    अरे, भेंडी चालते उपासाला. ती थोडीशी वाफवून त्यावर तूप-जिरे-हिरवी मिरचीची फोडणी व दही घालून रायते/कोशिंबीरीसारखी करतात. मस्तच लागते. बाकी काही जण मुगाची उसळ उपासाला खातात तर काही कोथिंबीरही खात नाहीत. मत-मतांतरे आहेत यात. माझा एक मित्र उपासाला सॅंडविच खात असे. तो म्हणे उपासाला खिचडीच का म्हणून.... मी सॅंडविच खाणार. इतर काही खात नाही नं... मग झाले तर.:D

    आमचे बाबा म्हणतात," सूर्य अस्ताला गेला की उपास संपला. कसली चंद्राची वाट पाहत बसता... " बहुतेक त्यामुळे त्यांना पण ताटकळावे लागते नं म्हणून येता जाता आम्हाला हे त्यांचे पेटंट वाक्य ऐकवत असतात...

    ReplyDelete
  7. हे सगळं खाल्लंस तू??? मज्जा आहे.. हे इतकं सगळं जर मिळणार असेल तर उपास नेहेमी आलेला काय वाईट?महिन्याभरात चार तरी नक्कीच यावेत.

    मी सध्या रायपूरला आहे, त्यामूळे मिस केलं :(

    ReplyDelete
  8. माझी कॉमेंट बिनानावानेच गेली की वर..

    ReplyDelete
  9. वाव् भानस! तुझा ब्लॉग तर एकदम चविष्टच आहे!

    ReplyDelete
  10. महेंद्न,बिननावाने आली तरी मला कळाले की तूच आहेस. रायपूरला आहेस का? तरीच...

    उपासाचे नुसते निमित्त रे.:)

    ReplyDelete
  11. श्रीराज, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद. :)

    ReplyDelete
  12. Tayade ag kal aaine asech bhargachch padarth kele hote tyamule no NISHEDH!!!!!

    pan bhannnat distey tat tevha jara baraka nishedh nondavalach pahije nahi ka!!!! :)

    ReplyDelete
  13. श्री....क्यों दिल को जला रही हो..पता है हमारा डाएट चल रहा है....फ़िर भी..फ़िर भी..फ़िर भी..नमस्ते लंडन मधे असाच एक डायलोग आहे मान उडवुन..मी पण तसेच केले अत्ता..काय लिहु जास्त..भुकेलेल्याला छळावे कुणी..????श्री ने..हो नं..श्री तुझा निSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS.........

    ReplyDelete
  14. मी स्वतः एकही उपास करत नाही, पण उपासाचे पदार्थ मात्र आवर्जुन खातो...
    यावेळी न खाल्ल्यामुळे आणि अतिशय सुंदर फोटो पोस्टल्याबद्दल णिशेध ताई!!!!!!!!!!

    ReplyDelete
  15. तन्वे, मज्जा सुरू आहे ना तुझी... :) चांगला ताव मारून घे बयो. आठादिसात पुन्हा चुलीशी लागायचेयं. :(

    ReplyDelete
  16. माऊ, अगं अर्धा तास ट्रेडमीलवर जरा धाव गं... :D

    और,क्यौं री ऐसे मेरे मथ्थे पाप चढाती हो। ना रे ना, मैं कभी किसी का दिल जलाने का काम नही करती । ये तो बस यूं ही, खाते समय आपकी याद जो हमे सता रही थी... :P

    ReplyDelete
  17. आनंद, धन्यू रे. यावेळी न खाल्ल्यामुळे.... का बरं? तिथे बाहेर काही मिळत नाही का?( आपले हे असे टिपिकल पदार्थ )

    ReplyDelete
  18. इथे आत्ता रात्रीचे अडीच वाजलेत आणि मी अजून ऑफिस मध्येच आहे. उपाशी. :(
    हे तुझं लिखाण वाचून माझे अधिकच हाल झालेत!
    :( :)

    ReplyDelete
  19. ओह्ह्ह... अगं, आज इतका उशीर?? ह्म्म... निदान मस्त कडक कॉफी तरी घ्यायचीस... :)

    ReplyDelete
  20. बुधवारी नाशिकला होतो... चक्क नाशिकला ताज मध्ये लंचला गेलो होतो... उपवास वगैरे कटाप... :D हेहे...

    ReplyDelete
  21. अशक्य आहे...नशीब मी भरल्यापोटीच पाहतोय पोस्ट!
    मी काल खीर करून ठेवलीय खूप सारी..पण भरली केळी हा अत्याचारच आहे!

    ReplyDelete
  22. कसे वाटले नाशिकच्या ताजचे जेवण? रोहन, सध्या तुझी जोरदार भटकंती चाललीये रे. :)

    ReplyDelete
  23. विभी, खीर संपली की भरली केळी कर. खाउगल्लीत आहे बघ पोस्ट. एकदम सोप्पी आहे करायला. :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !