घर अजून शांतच असते. प्रत्येकाच्या संथ, एका लयीत चाललेल्या श्वासोच्छ्वासाचे, चेहऱ्यावरील अर्ध जागृत निद्रेतील भाव - स्वप्नांच्या रेंगाळलेल्या खुणा टिपत, गुणगुणत मी स्वयंपाकघरात शिरते.....
"असाच यावा पहाटवारा जसा वितळतो पावा,
आरसपानी सूर मुलायम असाच निथळत यावा.....
भरून यावा कंठ खगांचा आणि फुटावे गाणे,
व्हावी उन्मन कुणी कोकिळा त्यांच्या मधुर स्वराने,
हुंकारातून असा ओघळत शब्द प्रीतिचा यावा... " मला कशामुळे इतके प्रसन्न वाटतेय हे शोधण्याच्या भानगडीत न पडता भरभरून हा आनंद मी स्वत:त भिनवून घेते. हो नं, न जाणो अचानक संपला तर...... आज तोही माझी साथ सोडायला बिलकुल उत्सुक नसतोच. मोलकरीण वेळेवर येते, लेकाने दप्तर रात्रीच भरून ठेवलेले असते. पहिल्या हाकेला उठून अगदी शहाण्या बाळासारखा आवरून उड्या मारत तो शाळेत जातो. रिक्षावाले काका स्वत: वर येऊन त्याला घेऊन जातात. नवऱ्याच्या शर्टाची बटणे धारातीर्थी पडलेली नसतात. आवर गं पटापट, तुला सोडतो आज स्टेशनवर असे तो मनापासून म्हणतो. एवढेच नाही तर आज डब्यात भाजी कुठली असेही विचारत नाही. मी माझ्याच नादात गुणगुणत राहते......, " गीत होऊन आले, सुख माझे, आले, साजणा, स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले, साजणा........ "
मन प्रसन्न असले की ती प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर, अंगावर बिलगून राहते. समोरून पाहाणाऱ्यालाही ती पोचतेच. माझा आवडता पंजाबी घालून जरा सैलसरच शेपटा, कुंकू लावून मी खाली उतरते. तोवर नवरा स्कूटर काढून गेटवर उभा असतो वाट पाहत.... आणि अचानक समोरून मैत्रीण येते. अगदी नखशिखान्तं मला न्याहाळते. मी कावरीबावरी. अशी काय पाहतेय ही......मला उगाचच वाटून जाते..... संडे इज लॉंगर दॅन मंडे झालेयं की काय..... छे! असे कसे होईल....... नाडी तर नीट बांधली होती मी..... तिचे असे माझ्या आरपार पाहणे संपतच नाही. मी वेंधळ्या हालचाली करत ओढणी सावरत चुळबुळत राहते...... ती निरखतच विचारते, " काय खास? नाही म्हणजे ऑफिसातच जाते आहेस नं? की...... बरीच रंगरंगोटी केली आहेस ती ...... "
आता माझी सटकते...... एक तर सरळ सहजपणे म्हणायचे, " अगं, कसली गोड दिसते आहेस तू आज..... एकदम मूडमें नं...... सहीच रे! माझाही दिवस आज मस्त जाईल बघ....... " पण हे शब्द तोंडातून कसे निघावे.... तोंडावर साधा पावडरचा पफ काय फिरवलाय... तर टवळी म्हणतेय रंगरंगोटी करून कुठे निघालीस........वाटते जीभेची तलवार चालवावी अन तटकन घाव घालावा...... टाकावे बोलून .... " तुझ्या तेलकट, मेणचट, सदाच दुर्मुखलेल्या मुखकमलावर इतकी लिपस्टिक बरबटवली आहेस नं ती जरा पूस गं..... कमीतकमी दहा-बारा जणींचे ओठ रंगतील....... " पण मी तिला असे टोचून मला आनंद मिळेल का? छे! उलट दिवसभर मी स्वत:ला कोसत राहीन....... मग माझा आनंद कशाला संपवा- दिवस फुकट घालवा... ( खरे तर इतके बोचरे बोल बोलायची माझ्यात हिंमतच नाहीये..... भिडस्तपणा जन्मजात मुरलेला आहे अंगात....... म्हणून मग स्वत:चीच समजूत घालून घ्यायची झालं........ ) पण आज मनही बेटे ऐकेना, " अय्या! कशी गं तू मनकवडी..... बरोबर ओळखलेस. आज नं डेट आहे डेट....... " असे म्हणून तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे व वासलेल्या तोंडाकडे पाहत मी डोळे मिचकावत पळते ती थेट नवऱ्याच्या मागे जाऊन बसते. ती अजूनही तशीच भिरभिरलेली. ते पाहून नवरा विचारतो, " काय गं, अशी भूत बघितल्यासारखी का पाहतेय ती........" " काही नाही रे....... मी ' डेटला ' चाललेय असे सांगितल्यामुळे बावचळलीये ती..... आता दिवसभर बसेल अशीच आ वासून..... तिला सोड..... चल तू.... आज मस्त गाडी पळवं...... आज मोगॅंबो खूश हैं...... "

आता काहीतरी गरज होती का तिला हा भोचकपणा करण्याची.... कुचकट कुठली...... जणू काही खास लायसन्स दिलेय असे बोलण्याचे ...... पदोपदी ही अशी माणसे सारखी ढवळाढवळ करतच असतात. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचे आणि दुसऱ्याला लागट बोलत राहायचे....एक से एक नमुने...... " बाहेर निघालीस? इतक्या उन्हाची? कुठे गं? " असेच जरा काम आहे काकू.... म्हणून टाळले की.... " हो का..... अग, काम असणारच गं.... पण इतक्या तातडीने जाते आहेस म्हणून विचारले..... नाही म्हणजे नसेल सांगायचे तर नको सांगूस हो....... मी काळजीपोटी विचारत होते.... तरी पण.... ठाण्यातच जाते आहेस की अजून....... " सोडणार नाही..... छ्ळतच राहणार......
" दुसऱ्याच्या घरात काय चाललेय हे आपल्याला कळलेच पाहिजे..... नव्हे तो आपला हक्कच आहे " असे मत बऱ्याच जणांचे असते. गंमत म्हणजे स्वत:च्या घरात काय काय घडतेय याचा मात्र यांना पत्ता नसतो आणि कळवून घ्यायची गरजही नसते. असेच एकदा एक ओळखीचे काका बिल्डिंगमधल्याच एका लहान पोराला पकडून विचारत होते, " काय रे, काल आई-बाबा भांडत होते नं तुझे? काय झालेले? मग आई रडली नं.... मला ऐकू येत होते....." तो चारपाच वर्षांचा मुलगा बिचारा रडकुंडीला आलेला..... आणि काकांची सरबत्ती चालूच.... मी चटकन पुढे होऊन लेकराला गोंजारले आणि ते बघ तुझे मित्र बोलवताहेत तुला... पळ की.... असे म्हणत काकांच्या हातून त्याचे बखोट सोडवले...... चटदिशी पळाला तो... जणू कुठल्या शिक्षेतूनच सुटला होता. बिचारा......
काकांना म्हटले, " काका, अहो काय हे...... आधीच पोरगं घाबरलेय..... तुम्हाला कशाला हव्यात नको त्या चौकश्या? किती लहान आहे तो...... इतके चैन पडत नसेल आणि धमक असेल तर जा की त्याच्या बाबाला जाऊन विचारा नं...... एवढुसा जीव बिचारा, किती भेदरला होता...... त्याला का छळतायं...... " हे ऐकले मात्र..... ते खवळलेच एकदम, " हेच नं...... आजकालची तुम्ही मुलं, फार आगाऊ झाला आहात........ का? का म्हणून नको विचारू मी त्याला........ एका बिल्डिंगमध्ये राहतो नं आपण. मग...... कळायला नको कोणाच्या घरात काय चालते ते...... काही सामाजिक जबाबदारी आहे का नाही....... विचारीन, त्याच्या बापालाही विचारीन जाऊन..... काय घाबरतो की काय मी..... " असे म्हणत ते तणतणत निघून गेले. हम्म्म..... सामाजिक जबाबदारी....... मी कपाळाला हात लावला......... डोळ्यासमोर सारखा खेटरं खाऊन परत आलेल्या काकांचा चेहरा तरळत राहिला......
काही लोक कहर असतात अगदी. सरदेसाई हे आडनाव सारस्वतांमध्ये आहे, कऱ्हाड्यांमध्ये आहे.... आणिकही कोणात असेल. दोघांचेही कुलदैवत शांतादुर्गाच. सारस्वतांमध्ये हे आडनाव जास्त फ़ेमस. दिलीप सरदेसाई, राजदीप सरदेसाई..... त्यामुळे सरदेसाई म्हणजे सारस्वतच हे समीकरण रूढ झालेयं. तर एकदा अश्याच एका मैत्रिणीशी गप्पा सुरू होत्या...... तुम्ही कुठले आम्ही कुठले....... गाव कुठले - कुलदैवत कोणते....... मी आपले सांगितले, " आम्ही नं, देवरूखजवळ एक छोटेसे गाव आहे वांजोळे म्हणून, तिथले. कुलदैवत शांतादुर्गा. " लगेच मैत्रीण म्हणे, अग ती अमुक तमुक म्हणत होती की तू तर सारस्वतच आहेस पण सगळ्य़ांना चक्क खोटे सांगतेस की मी कऱ्हाडे आहे म्हणून...... म्हणत होती, पक्की मासेखाऊ असेल ती. मी अवाक. मुळात मी चुकूनही कोणालाही जात विचारत नाही. जातपात मी मानत नाही तेव्हां पुढचे प्रश्नच मला पडत नाहीत. संवादाचा - मैत्रीचा आणि जातीचा काही संबंध आहे का? शिवाय हे असे खोटे सांगण्याने माझा कुठला फायदा होणार होता....... मासेखाऊ असेन तर अगदी छाती ठोकून सांगेन नं आहे म्हणून..... मासे खायची काय चोरी आहे का? " अगं काहीतरीच काय, मी कशाला खोटे सांगेन.... जा पाहिजे तर माझ्या सासूबाईंना विचार जाऊन........ आणि तिचे मरू दे गं पण तुलाही खरेच असे वाटते का की मी खोटे सांगतेय..... " हे विचारल्यावर मैत्रीण म्हणे, " अग अगदी तसेच नाही गं...... पण, आजकाल कोणाचा काय भरवसा द्यावा....... " मी नादच सोडला. मला काय फरक पडतो कोणी काही का समजेना ....... पण........ मन दुखलेच.
खूप दिवस मनात होते.... छानशी पैठणी घ्यावी. आता पैठणी काही रोज नेसता येत नाही... कपाटाचीच धन होणार. हे सगळे कळतेय..... पण हौस असतेच नं..... तर मी व आई गेलो पैठणी घ्यायला. गिरगाव पंचे डेपोमधून पैठणी घेतली आणि दुकानाची पायरी उतरलो तोच समोर वरच्या काकू दत्त म्हणून उभ्या....... एक तर गिरगाव पंचे डेपो हेच मुळी एक मोठे प्रकरण आहे. पैसे देऊन साडी घ्यायला गेलोय का घोडचूक करायला......... असा प्रश्न पडावा आणि आपणच आपल्याला दोन चापट्या मारून घ्याव्यात, अशी गत.... त्या दिव्यातून पार पडून घेतलेली पैठणी अजून नीट मनभरून पाहिलीही नाही तोच या काकूंचे दर्शन.......

आम्हां दोघींकडे व हातातल्या पिशवीकडे पाहत, " काय..... मायलेकी अगदी गळ्यात गळा घालून फिरतायं..... खरेदी का? वा.... वा...... काय घेतलेस गं? पाहू तरी मला......" ( खसकन माझ्या हातातली पिशवी ओढून भसकन पैठणीची घडी विस्कट्त बाहेर काढलेली पाहून माझा जीव कळवळल्याने.... न राहवून..... मी एक क्षीण प्रयत्न करत म्हटले..... ) " काकू.... अहो जरा हळू तरी..... चुरगळतेय हो...... " माझ्या बोलण्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत किती गं बावळट तू असा आविर्भाव चेहऱ्यावर व शब्दाशब्दात ठासून भरत, " बाई बाई...... अगं किती हा पैशाचा नास. कुठे मिरवणार आहेस तू ही नेसून..... पाहावं तेव्हा तर जीन्स मध्ये असतेस..... तुमच्या त्या अमेरिकेत का घालणार आहेस ती..... जळ्ळलं मेलं लक्षणं..... आता जाशील इथेच कपाटात ठेवून. त्यापेक्षा सिफॉन- सिल्क काहीतरी हलकेफुलके घ्यायचेस नं..... अहो भाग्यश्रीच्या आई तुम्ही तरी सांगायचेत तिला...... कसली मेली हौस.... एक नाचली की लगेच सगळ्यांची सुरवात..... शोभते का हे वागणे..... " हे बोलून काकू गायब.
किती हा भोचकपणा ........ काहीतरी गरज होती का याची? मी पैठणी नेसेन.... कपाटात ठेवीन... अमेरिकेत आणेन..... नाहीतर कात्रीने कापून त्याचे पडदे बनवेन....... तुम्हाला काय करायचयं? विचारायला आले होते का मी? किती हौसेने गेलेलो आम्ही दोघी.... तासभर पंच्यांचे टिपीकल कुचकट शेरे ऐकून ( जणू गिऱ्हाईकावर मेहेरबानीच केलीये दुकान थाटून ) त्यांना पुरून उरत घेतलेली माझी सुंदरशी पैठणी बिचारी मलूल होऊन गेलेली पाहून भडभडून आले मला. पुन्हा काकुंच्या या तोफखान्याला प्रत्युत्तर देण्याआधीच त्यांनी पलायन केलेले...... पैठणी घेऊन झाली की मस्तपैकी मंजूचा वडा चापू गं असे मनाशी ठरवून निघालेल्या आम्ही दोघी आमचाच वडा झाल्यासारख्या पाय ओढत घरी आलो.
घरातलेच आपले म्हणवणारे लोकही कधी कधी इतका अति भोचकपणा करतात नं ........ माझ्या एका दूरच्या बहिणीने माझ्या आईला फोन केला. नेमकी मीही आईकडे होते. " आज कसा गं हिचा फोन आला..... एरवी तर चुकून कधी साधी चौकशीही करत नाही.... " आईच्या मनात आधीच पाल चुकचुकलेली. दोन मिनिटे उगाच इकडचे तिकडचे काहीतरी बोलून झाल्यावर म्हणे, " मामी, अगं मी नं एका इन्शुरन्स कंपनीचे काम करतेय. उद्याच येते बघ तुझ्याकडे..... तू आणि मामा घेऊन टाका एक एक छोटिशी पॉलिसी, फक्त दहा दहा लाखांची. " मला हे काही ऐकू येत नव्हते.... पण आईच्या कपाळावरची शीर तडतडायला लागलेली पाहिली आणि समजले की काहितरी पेटलेयं........ तरी आई संयम ठेवून म्हणाली, " अगं, आम्हा दोघांची कसली पॉलिसी काढतेस आता या वयात..... ती मॅच्युअर होण्याआधीच आमची रवानगी होणार आहे इथून.... आणि रिटायर्ड माणसांकडे कुठले आले गं इतकाले पैसे....... बरं तुझ्या मामाला पेन्शनही मिळत नाही. "

हे ऐकताच आमची ही भोचकभवानी म्हणते कशी, " अगं मामी, तुम्ही गचकलात तरी मुले आहेत की... त्यांना होईल...... आणि मामाला पेन्शन नसले म्हणून काय झाले.... आत्ताच तर घर विकलेत नं तुम्ही..... मग मिळाले असतील की खोऱ्याने पैसे..... काय कुजवायचेत का आता ते..... द्या की मला त्यातले थोडे. " आमची आई सिंह राशीची........ उगाच सिंहाला डिवचू नये हेच खरे....... एकदा का तो संतापला नं की मग मात्र...... " अगं तुझा मामा दोन वेळा हॉस्पिटलात अगदी मरणाच्या मुखात होता....... इतकाले पैसे लागले ऑपरेशनला...... कसे उभे केले असतील मामीने- तिच्या मुलांनी.... आलीस का विचारायला...... ते सोड गं...... ढांगभर अंतरावर राहत होतीस साधा एक वेळेचा गोळाभर भातही आणला नाहीस शिजवून... जरा तेवढीच मामीला मदत. आणि आता पैसे कुजवायचेत का म्हणून विचारतेस तू......... आमच्या गचकण्याचे तुला काडीचेही दु:ख तर नाहीच वर सल्ले देतेस...... खबरदार पुन्हा फोन करशील तर....... " असे म्हणून आईने फोन आपटला..... आहे की नाही कमाल भोचकपणाची......
हो ना.. काय एकेक नग असतात खरंच. त्या छोट्या मुलाला "सांग काय भांडण झालं घरी" म्हणणारे काका या पोस्टचे भोचक किंग असावेत माझ्या मते.. आणि इन्शुरन्स वाली भोचक क्वीन :)..
ReplyDeleteआणि यांना त्यांच्याच थाटात उलटं सुनावलं की मग आपण बेशिस्त आणि उद्धट ठरतो. अशा अनेक काका/काकू लोकांशी वाजलेलं आहे माझं. आणि काका/काकू कशाला अनेकदा आपले जवळचे मित्र-मैत्रिणीही असाच भोचक/आगाऊपणा करतात तेव्हा तर यांना सगळं माहित असूनही असे का वागतात या प्रश्नाने अजूनच वाईट वाटतं.
हेरंब, अरे काकांनी त्या छोट्या लेकराला अजूनही काही वाह्यात प्रश्न विचारलेन... ते लिहीणे शक्यच नाही. जीवाचा संताप झाला होता रे... असे कसे लोक वागतात?
ReplyDeleteहो नं... आपले जवळचे मित्र-मैत्रिणीही मुद्दामहून भोचकपणा करतात वर हसतात... कसे म्हणायचे त्यांना आपले???
"मी पैठणी नेसेन.... कपाटात ठेवीन... अमेरिकेत आणेन..... नाहीतर कात्रीने कापून त्याचे पडदे बनवेन....... तुम्हाला काय करायचयं?" एकदम मस्त आणि हो ना कुठल्या जन्मीच पाप केलेलं असत आपण कि हि अशी लोक आपली नशीबात येतात. आणि त्या काकाला भांडण चालू असतांना नाही का सुचल सामाजिक जबाबदाररीच... हि लोकं पण काय स्वतः च्या आयुष्यात आनंदी नसतात पण दुसर्यालाही आनंदी बघवत नाही त्यांना..
ReplyDeleteखरंच गं असे किती लोक भेटतात नेहमी...भोचक पणा करणारे. माझी तर एक बहिण नेहमीच काहीतरी पाणउतारा करणारंच बोलते.
ReplyDeleteपण तुझ्या आईने छान सुनावलं! असं वेळेवर आपल्याला बोलायलाही सुचलं पाहीजे!
अश्विनी
काकांची सामाजिक जबाबदारी बाकी मजेशीर होती.. मुलांना तरी सोडायच या लोकांनी!!
ReplyDelete>> उगाच सिंहाला डिवचू नये हेच खरे..
बरोबर आहे..चांगले उत्तर दिले इन्शुरन्स क्वीनला.
पण श्रीताई, तू बाकी कन्या किंवा कर्क वाटतेस हं.. तूही ऎकवायचस, spoilsport woman किंवा पैठणीवाल्या काकूंना!
पोस्ट अगदी मनातली!!
ताई..
ReplyDeleteहा भोचकपणा हा गुण(की दोष) जबराट डोक्यात जातो.
रेल्वेत चढणार्या व्यवस्थित दिसणार्या माणसाला "ए भाई ये फर्स्ट क्लास है" म्हणणं हा भोचकपणा माझ्या सर्वात जास्त डोक्यात जातो.
बाकी सगळे किस्से एकसेएक आहेत. आणि हो हे इन्श्युरन्सचं झेंगाट डेडली वाटलं.
अगदी असे अनेक नग फिरताहेत उजळ माथ्याने जगात... माझ्या लहानपणी आमच्या बाबांच्या मावश्या मला नेहेमी, "का गं मग सकाळचा चहा कोण करतं घरी, आई-बाबा भांडतात का??" टाईप अनेक प्रश्न विचारायच्या, पुढे आई-बाबांना त्यांचे उद्योग कळल्यावर बाबांनीच त्यांना जाम झापले होते...पण ही वृत्ती आहे गं ताई...
ReplyDeleteमागे मला बरे नाही म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो तिथूनच जेवायला हॉटेलमधे गेलो तर माझी एक मैत्रीण तिथे भेटली.... तिला कसला राग आला राम जाणे पण बाईंनी लगेच सुरूवात केली, "जग गोल आहे मस्कत अतिशय लहान आहे!!! :) " म्हणजे काय ते आम्हाला खरचं समजल्ं नाही पण लोकांना सवय असते भोचकपणाची आणि आपल्याला तो सहन करण्याची.... दुर्गूण त्यांचा की सहन करणाऱ्या आपला असा प्रश्न पडतो....
असे सगळीकडेच दिसते.... इंन्श्युर्न्स वाली क्वीन तर काय बोलणे.. हा सर्वात कॉमन अनुभव
ReplyDeleteBhochakpana karanaari maanase kharech jaam dokyaat jatat...tyatoonahi aapalya kharedi war aani aapalya looks war koni ugach comment dili tar doke paar out hote majhe...
ReplyDeleteMajhya eka maitrinine mothi, laamb dandyachi chatri aanali hoti (tichi khoop aawadati hoti ti) aani achanak vargatali ek mulgi yeun mhanali "It looks funny" Aree... tula koni vicharaley ka tujhe mat..?? Ugach matanchi pink takat phirayache....!!! x-(
Ekda mala koni tari mhanale hote, majhya naivn hair cut varun "kaay keleyas he kesanche??? Chimanya rahayala yayachya gharate samjun" are majhe kes, majhi ichaa... Kahihi karen mi, kapen, jalen nahitar undaran kadun kurtadun ghein....
Ne ways...khoop sunder lihilaay lekh...!!! mastach...BTW , tumhala kaay mhanu mi...??? Taai, kaku ki maavashi...??? :)
नेहमीच असतात असे अनुभव. मला तर बरेचदा. माझा स्वभाव पण भांडकुदळ. कुणाला सुखी पाहिलं , आनंदी पाहिलं की काही लोकांचा मुड खराब होतो. मग त्या माणसाला कसे दुःखी करायचे ह्यासाठी असे वागतात लोकं.
ReplyDeleteतर काय, स्वत: कधीही सुखी राहणार नाहीत अन इतर दु:खी कसे होतील हेच शोधत राहतील. सागर, अगदी मलाही हाच प्रश्न पडायचा.... नेमके हे असे लोक मलाच कसे भेटतात...पण मलाच नाही तर सगळ्यांनाच भेटत असतात कारण यांची जमातच फार प्रचंड आहे.
ReplyDeleteआभार.
आश्विनी, तिथेच तर मोठा प्रॉब्लेम आहे नं...सुचलं तरी असे पटकन उलटून बोलायला जीभ रेटतच नाही गं. धन्स गं. :)
ReplyDeleteमीनल, अगं लहान लहान मुलांना काहीही प्रश्न विचारत राहतात गं...श्शीइइइ... मेले जीवाला काहीच कसे वाटत नाही... :( नाही गं, धनू राशीची मी.अगं गंमत ऐक... काकू पैठणीवर इतके माझे बौध्दिक ( का माझ्या बुध्दिची कीव... ) घेऊन गेल्या अन पुढच्याच महिन्यात त्यांच्या चुलतनंणंदेच्या नातवाच्या बारशात त्यांनी पैठणी घेतली.... मी बेशुध्द...आई म्हणे, थांब आता नेसून येऊच दे समोर फक्त माझ्या... :D
ReplyDeleteविद्याधर, ते फर्स्ट क्लास प्रकरण खरेच जबराटच असते. एकेकाचे असे काही तारे तुटत असतात नं... आता स्वत:च्या मामा-मामीला कोणी तरी असे म्हणू शकते का रे? काय बोलायचे खरेच समजतच नाही... :(
ReplyDeleteतन्वे, अगं दुर्गूण आपला गं. समोरून कोणीतरी असे लागट बोलल्यावर तरी आपण उलटून झापडायला हवे नं... पण नको तिथे देशस्थी भिडस्तपणा भिनलायं... तुझ्या प्रकृतीची चौकशी राहिलीच बाजूला... उलट वर हे ऐका... कठीण आहे.आणि नातेवाईकांचे कारनामे तर एकसे एक असतात...असा संताप होतो नं...
ReplyDeleteआनंद,कुठेही जा असे कोणीतरी आपल्या राशीला असतेच बसलेले... :( आईने फटकारल्यावर चिडचिडली असेल अगदी...पण काही पोच तरी हवा की नको बोलताना...
ReplyDeleteमैथिली,खूप छान वाटले तुला पाहून. अगं हे आपल्या दिसण्यावर आणि राहण्यावर कमेंटस पास करणे तर सदाचेच... विचारले नाही तरी जिथे तिथे नाक खूपसून मत देत राहायचे, आसुरी आनंद घेत राहायचा. दरवेळी ती पैठणी हातात घेतली ना गं की मला हटकून या काकू डोळ्यासमोर येतात....:( की मी स्वत:वरच चिडते.
ReplyDeleteअगं श्रीताई म्हण, मावशी म्हण.... जे तुला आवडेल ते म्हण गं.:)
यस्स्स, मूळ हेच आहे... कोणाला आनंदी पाहीले की यांच्या पोटात दुखतेच रे.महेंद्र, आईला मी नेहमी म्हणते की तुझा हा गुण थोडा दे गं मला... :)
ReplyDeleteअगदि चाबुक झाला आहे लेख...
ReplyDeleteहया भोचक लोकांना अश्या चाबकानेच मारले पाहिजे.
मला पण अश्या भोचक लोकांचा खुप राग येतो.बरयाच वेळा चांगल्या मूडची पुर्ण वाट लावुन टाकतात हे लोक...
Maithili : "BTW , tumhala kaay mhanu mi...??? Taai, kaku ki maavashi...??? :) "
ReplyDelete-----
मैथिली : माझ्या मते 'काकू' मस्त शोभेल. पण हे सांगायची माझ्यात हिंमत नाही. कारण काकू लगेच म्हणतील, 'आमच्या दोघींमधे तिसर्याचा सल्ला म्हणजे ... भोचकपणा नुसता... असे कसे लोक वागतात' वगैरे वगैरे.
श्री, अग्ग.. अगदी खरे लिहीले आहेस बघ..भोचकपणाची काही माणसे हद गाठतात..माझ्या लग्नाच्या वेळी रेसेप्शन च्या वेळी माझी एक नणंद जी प्रोफ़ेशन ने वकील, आम्हाला शुभेच्छा देण्या करता आमच्या जवळ आली आणि म्हणाली,हार्दिक शुभेच्छा..पण पुढॆंमागे कधी divorce घ्यायची किंवा घ्यावासा वाटला तर मला नक्की संपर्क करा..मी ना divorce च्याच cases बघते...सोबत स्वता:चे card देवुन मोकळी....आता बोला..मी अगदी रडवेली..
ReplyDeleteमाझे बाबा गेले त्यावेळेस आम्हाला भेटायला येणारे एक एक महारथी असे अजब होते की काय सांगु..इतक औत्सुक्य लोकांना होते..सर्व प्रथम..आता ह्या पुस्तकांचे काय कराल,संगीताच्या records,cassettes आणि घराचे काय..सगळ्या चौकशा...सांत्वना पेक्षा हा भोचक पणा जास्त..कठीण आहे नां......... लवकरच ह्यावर एक छोटसं लिहायची इच्छा आहे..बघु कस जमत ते..
davbindu, अश्या लोकांना नं तिथल्या तिथे वाजवायला हवे रे... म्हणजे निदान पुढच्या वेळी थोडे वचकून राहतील.:D
ReplyDeleteधनंजय, केलास नं भोचकपणा.... पण हा असा भोचकसल्ला आवडला मला.:D
ReplyDeleteमैथिले, नको गं... तू आपले श्रीताईच म्हण गं.
माऊडे, अगं काय सांगतेस... हद्दच झाली म्हणायची की ही... लग्न अजून लागतेयं तोच घटस्फोटाची तयारी....आणि माणसे सांत्वनाला येतात की नको त्या आगाऊ चौकशा करायला... अगदी आमचे आजोबा गेले ना गं तेव्हां हे सगळे अनुभव घेतलेत.... ज्याला त्याला चिंता... अहो, मग आता घराचे काय?विकणार का?... आणि हे सारे आजीच्याच समोर...
ReplyDeleteअरे वा! सहीच आहे की मानस. अनेक शुभेच्छा! :)
अगदी छान लिहिले आहे. काही काही लोक असतातच अशी. बाकी तुमच्या आईने सडेतोड उत्तर दिले ते बरेच झाले. जश्यास तसे.
ReplyDeleteअशा लोकांना हीच भाषा कळते त्यामुळे इलाजच नसतो. रविंद्रजी,आभार.
ReplyDeleteतुमच्या आईच उत्तर आवडलं. पूर्वी मी असाच बोलायचो, पण आता जमत नाही. उगाच कोणाला तोडुन बोलणे आवडत नाही. असो.
ReplyDeleteडेट एकदम बेस्ट... हा हा हा ...
विजय, ब्लॉगवर स्वागत आहे.:)
ReplyDeleteकोणालाही तटकन तुकडा मोड बोलणे जमत नसल्याने सदैव लोकं आपल्याला बकरा बनवून टाकतात.:( पण कधी कधी अतिरेक होतो. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
अश्या भो. भा. काकू आमच्या शेजारी पण खूप आहेत. एक दिवस लवकर office ला जाव तर, आज काय झाडू मारायचा program आहे वाटत असं विचारणार, न एक दिवस late झाला घरी यायला तर लगेच आज कसली party असं म्हणत gate मध्ये उभ्या.....
ReplyDeleteकधी कधी मला प्रश्न पडतो, हे लोक parttime detective का नाही बनत , नाही तरी काम तर full time तेच करतात.............
अगं, या अश्या दुस~यांच्या वेळा व ठिकाणे यांना चोख पाठ असतात बघ. बारीक लक्ष असते सगळ्यांवर. ज्यात त्यात लुडबुडत राहायचे. उच्छाद नुसता.धन्सं गं.
ReplyDeleteबापरे...कसले अनुभव आहेत एक एक...मला अगं कितीही वाटलं तरी अशा लोकांना झापायला जमत नाही गं कितीही भोचकपणा केला तरी...(अगदी ब्लॉगवरसुद्धा....) त्यामुळे उगाच आपला आपल्याला त्रास होतो....
ReplyDeleteअगं तर काय अपर्णा.... काही काही लोक नं अतिच करतात.मेला भिडस्तपणा नडतो गं माझा... पटकन उलट बोलता येत नाही मग जीवाला त्रास होत राहतो. :(
ReplyDeleteएक नम्बर आहे लेख.
ReplyDeleteखर सांगू कधी वाटत कि शांत रहाव का? काय वाटेल ते बडबडू देत काय फरक पडतो.पण आपला मूड खराब होतो त्याच काय ???
आणि त्यांना उत्तर दिल कि म्हणतील मी आहे म्हणून ऐकून घेतलं अजून तुला कस बोलाव समजत नाही...
इकडे आड तिकडे विहीर.उत्तर दिल तरी प्रॉब्लेम नाही दिल तर अजून डोक खात राहतील
ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत व आभार्स!
ReplyDeleteअगदी अगदी! पण आपण कुठल्या कारणासाठी प्रत्युत्तर न करता शांत राहतोय हे त्यांना कळत नसल्याने भलतेच ( गैर )समज करुन अशी लोक त्यांचा आपल्याला झापण्याचा हक्कच असल्यासारखी मिर्या वाटू लागतात कालांतराने. :( आणि बरेचदा एका भोचकपणाचे कडक उत्तर दिले नं की समोरचा वचकून राहतो काही अंशी तरी. अर्थात कशालाही न जुमानणारे महाभोचक, 'आलीया भोगासी असावे सादर...' म्हणत कायमचे झेलावे लागतात. :D