जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, May 6, 2010

राहिले ओठांतल्या ओठांत.....

काही गाणी अगदी मनात रुतून बसतात. आपलीच होऊन जातात. कधीही आणि कितीही वेळा ऐकली तरी तितकीच भावतात. त्यातले शब्द, संगीत, स्वर सारेच वेड लावणारे. हे गाणेही असेच..... बोल आहेत श्री. वा. रा. कांत यांचे तर संगीत दिलेय श्री. श्रीनिवास खळे यांनी आणि गायलेय माझ्या आवडत्या डॉ. वसंतराव देशपांडे यांनी.

राहिले ओठांतल्या ओठांत वेडे शब्द माझे
भेट होती आपली का ती खरी, कीं स्वप्न माझें ॥धृ॥

कापरे हे हात हातीं बावरे डोळ्यांत आसूं
आग पाण्यांतून पेटे जाळणारें गोड हांसूं
दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतिचें तकदीर माझें ॥१॥

गर्द हिरवे पाचपाणी रक्तकमळें कुंकुमाची
खेळतांना बिंबलेली शुभ्र जोडी सारसांची
आठवे, म्हटलेंस ना तूं, हें हवेंसें विश्व माझें ॥२॥

मी म्हणूं कैसें, फुला रे, आज तूं नाहींस येथें
वेल दारीं साईलीची रोज अजुनी बार देते
लाख पुष्पें तोडिल्याविण, ये भरोनी पात्र माझें ॥३॥

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे
भेट होती आपली का ती खरी, कीं स्वप्न माझें ॥धृ॥

गाणे इथेच देण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जोडले जातच नाहीये. येथे ऐकता येईल. कोणाकडे हे गाणे सहजी जोडता येईल अश्या स्वरूपात असल्यास द्याल का? धन्यवाद.

14 comments:

 1. वा...! मलासुद्धा हे गाणं खुपच आवडतं.

  ReplyDelete
 2. http://www.esnips.com/doc/8cd1b6a8-3ef1-49d5-90cd-b7cc0b576438/Rahile-Othatalya-Othat

  तुम्ही दिलेल्या लिंकवरुन गाणे डाउनलोड करता येईल पण ऐकता येत नाहीए
  म्हणून दुसरी लिंक देत आहे, जिथून online ऐकता येईल.

  ReplyDelete
 3. गाण्याचे बोल अप्रतिमच आहेत. गाणं ऐकावं लागेल.माहितीबद्दल ऍज युज्युअल धन्यवाद!

  ReplyDelete
 4. आजकाल आमच्याकडे या गाण्याची प्रॅक्टीस एकजण करत आहे. पुढच्या आठवड्यात प्रोग्रॅम आहे त्यामुळे खूप वेळा ऎकले जाते. छान गाणे आहे.
  माधुरी

  ReplyDelete
 5. नरेंद्र, याची चित्रफित शोधतेयं कधीपासून... पण नसावी बहुदा. डॉ.वसंतरावांच्या तोंडून हे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य नाही लाभले.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 6. सागर, लिंकबद्दल आभार. मी दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड होतेयं ऐकताही येतेय पण इथे पोस्ट मध्ये जोडता येत नाहीये. :( आता तुम्ही दिलेल्या लिंकमधून जोडता आले तर पाहते.

  ReplyDelete
 7. विद्याधर,नक्की ऐक. इतक्या अप्रतिम बोलांना खळेकाकांच्या संगीताने व वसंतरावांच्या आवाजाने पुरेपूर न्याय दिलाय. :)

  ReplyDelete
 8. अरे वा!सहीच. माधुरी, अगं आत्ता कुठला कार्यक्रम गं? आज तुला कॉलतेच. :)

  ReplyDelete
 9. वा. सुंदर.. किती उत्कट शब्द आहेत !!! घरी जाऊन डाउनलोड करून नीट ऐकतो. आत्ता हापिसात आहे.

  ReplyDelete
 10. हेरंब, ऐक रे नक्की, आवडेल तुला.

  ReplyDelete
 11. मस्त गाणे सांगितलेस ग बयो!!! नक्की ऐकते आता.....सुंदर शब्द आहेत...

  ReplyDelete
 12. तन्वे, तुला आवडेलच गो.

  ReplyDelete
 13. किशोर, ब्लॉगवर आपले स्वागत व अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !