जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, February 23, 2011

इन्स्पिरेशन... रियली ???

सिनेमांच्या तंतोतंत चोऱ्या इतक्या सातत्याने होत आहेत की आजकाल नवीन सिनेमा आला की नकळत उगमाचा शोध घेतला जातो. ही क्रिया आपसूक व्हावी इतकी अंगवळणी पडलीये. एकदा कशावरून बेतलाय हे सापडले ( फारसे शोधावे लागतच नाही इतकी ही चोरी उघड असते, ) की पूर्ण कंट्रोल सी कंट्रोल वी मारलाय का याची जबर उत्सुकता निर्माण होते. एक बरे आहे की बॉलीवूड डोक्याला फारसा ताप देतच नाही. अगदी शेवटची वीट पडण्यापर्यंत तंतोतंत कॉपी. ( मेट्रिक्स ) काही वेळा चोऱ्या करूनही अपवादात्मक सुंदर सिनेमेही बेतले गेलेत. विकांताला जमलेल्या मैफलीत एकदा का ही चर्चा छेडली गेली की रात्र संपेल पण यादी संपायची नाही... नुसती धमाल.

जे सिनेमांचे तेच संगीताचेही. मोठ्या मोठ्या दिग्गज संगीतकारांनीही जेव्हां सातत्याने या चोऱ्या केल्याचे समोर येते तेव्हां खरेच हळहळ वाटते. मनावर छाप सोडणाऱ्या अनेक गाण्यांमागची डिट्टो मारलेली कॉपी ऐकली की त्या गाण्याची मोहिनीच संपून जाते. अगदी साठच्या दशकापासूनच हा खेळ सर्रास चालू झालेला दिसून येतो. आपल्याकडे ज्या काळाला आजही चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हटले जात , त्यातली काही अजरामर गाणी शब्द वगळता जशीच्यातशी उचललेली आहेत. कुछ तो बदला होता यार! बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते. एकच सुख की या चोरलेल्या चालींवर अतिशय सुंदर व नेमकी शब्दयोजना केली गेली. शिवाय चित्रपटात समयोचित ठिकाणी वापरल्याने ठिगळं वाटत नाहीत. प्रसंग, भावनांच्या गरजेची नस ओळखून चपखल बसलीत. आपल्या प्रेक्षकांची त्या त्या दशकानुसार बदलत जाणारी मानसिकता अचूक हेरत या मारलेल्या कॉप्या पर्फेक्ट पेरल्या गेल्यात. कदाचित म्हणूनच चोरलेली असली तरी इतकी प्रचंड गाजलीत. आजही तितकीच भुरळ घालतात.

बाकी काहींनी संपूर्ण चित्रपट तर कॉपी पेस्ट मारलेत, पण तेवढ्यावरच त्यांचे पोट न भरल्याने त्यातली गाणीही कॉपी पेस्ट मारली. कदाचित त्यावेळी, आडात काहीच नसावे मग पोहऱ्यात येणार कुठून ? मरो, कोण ताप करून घेणार. ऐसेभी आख्खा मूव्ही छाप रहे हैं ना, गाने भी कहींसे उठा लो यार! ऐसा न हो हम वरिजनल के पिछे भागते रह जायेंगे और उधर साला दुसरा कोई, मूव्ही रिलीज भी कर देगा!

अश्या सिना ठोकके केलेल्या काही चोऱ्यांचे मूळ गाणे व बेतलेले गाणे सोबत जोडलेय. गंमत म्हणजे दोन्हीही तितकीच भावतात.




वरून १९५८ साली आलेल्या, " चलती का नाम गाडीतले " दिग्गज : एस डी बर्मन यांचे,



इतके आवडते गाणे पण प्रत्येक वेळी ऐकताना बॅगराउंडला वॉटरमेलन वाजत राहते....



पोलिश फोक


वरून " मधुमती " मधले, दिग्गज : सलिल चौधरी यांचे अजरामर गाणे,



अख्खा मेमरी का वाट लगा दिया ...



एल्विस प्रेस्ली चे



वरून " झुक गया आसमाँ " मधले, शंकर जयकिशनचे ,







कसला आत आत उतरत जाणारा आवाज आहे तिचा... अप्रतिम!
वरून " यादों की बारात " मधले जबर गाजलेले, दिग्गज : आर डी बर्मन चे,



ची मोहिनी आजही तितकीच!




वरून " सी आय डी (१९५६ ) " मधले, दिग्गज : ओ पी नय्यर यांचे,

जॉनी वॉकर, रफी व गीता दत्त के क्या कहनें...






Elvis Presley , " The Yellow Rose of Texas "




वरून " आ गले लग जा " मधले, दिग्गज : आर डी चे,





या गाण्याबद्दल काय बोलावे...



अक्षरशा: तंतोतंत
कॉपी केली आहे आर डी ने, तरीही मेहबुबा मेहबुबा चा जबर पगडा आजही कायम आहेच.



पण खरे मार्क्स
द्यायला हवेत ते Demis Roussos ला




सिनेमा चोरलाच पण त्याने पोट भरले नाही म्हणून गाणेही....




" क्रिमिनल " मधले,





क्लिफ्फ़
रिचर्ड चे,



वरून " लगे रहो मुन्नाभाई " मधील, शंतनु मोइत्रा चे,





भप्पीदांचे , " हरी ओम हरी " , " कोई यहां नाचे नाचे... " आणि अनू मलिकके क्या कहनें! यादी भली मोठी आहे. असाही तो दिग्गजांमध्ये मोडतही नाहीच म्हणा...

50 comments:

  1. विंग्रजी गाण्यांचं ज्ञान तुलनेने कमी असल्याने कुठलं गाणं कशावरून ढापलंय हे चित्रपटांसारखं छातीठोकपणे सांगता येत नाही मला. पण गाण्यांतही ढापाढापी जोरदार असते हे मात्र नक्की. मागे अमित कुमारच्या एका मुलाखतीत 'चलती का नाम गाडी' मधली जवळपास सगळी गाणी कशी कशी आणि कुठून कुठून उचललेली होती ते वाचलं होतं आणि धक्काच बसला होता. मागे तन्वीने कणेकरांचा एक लेख पाठवला होता त्यात तर कणेकरांनी अनेक गाण्यांच्या चोर्‍या त्यांच्या शैलीत दाखवून दिल्या आहेत. तुला पाठवतो तो लेख शोधून.

    >> बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते.

    + अनंतापर्यंत

    ReplyDelete
  2. हेरंब, काही काही गाणी ढापलेली आहे कळले की जोरका झटकाच लागतो. :( किती चोर्‍या करायच्या याला काही सुमार??

    धन्यवाद!

    ReplyDelete
  3. आता जर तू 'बुद्धा बार' ऐकत असशील तर तुला ह्या अशा चोऱ्या भरपूर सापडतील!
    आपण जशी शोधून रेसिपी काढतो..आणि तंतोतंत कॉपी करायचा प्रयत्न करतो तसं आहे नाही का ह्यांचं? :p

    >> बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते...खरं आहे...

    ReplyDelete
  4. आश्चर्य वगैरे वाटले नाही, कारण ह्याची कल्पना होतीच. बप्पी लहरी< आरडी वगैरे नेहेमीच चोऱ्या करतात गाण्यांच्या.
    आपल्याकडे क्षमता नाही असे नाही, हे खरे, पण तिचा वापर करण्याची इच्छा हवी- आणि कॉन्फिडन्स हवा, की आप्ण चांगली चाल लावू शकतो, चांगलं म्युझिक देऊ शकतो म्हणून! नेमका तोच मिसिंग आहे.

    ReplyDelete
  5. Hello
    I am reading this blog forever and I really feel that you have lot of expectations from our stars. You know what? I will blame this on BRITS since they have instigated this thought in our mind. If I know the history well, I feel that we were even better then, than we are today. Think about Indian history prior to Brits. We were always innovative and better than world. But what Brit taught us is, "Keep on copying till you get caught" (since they were and are believing in still even today) and we were fools to accept that. Don't get surprised by seeing names of music directors from 1960s. They were completely aware that none of general listeners (We) will/may have access to those records (let me remind you that there were no MP3 songs available) and hence nobody will even understand that its copied.
    Enjoy guys. MERA BHARAT MAHAN.
    Are we really MAHAN? I think we are, but we need to prove it....

    ReplyDelete
  6. >>>.>> बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते.

    + अनंतापर्यंत
    अगदी अगदी...

    बयो अगं महान चोर आहेत हे.... अगं Bryan Adams चे Summer of 69 ऐकले आणि पुन्हा जोर का झटका....आपल्या अवधुत गुप्तेंचे ’गर्जा महाराष्ट्र’ जसेच्या तसे उचलले आहे त्यावरून...

    मागे गायत्रीने अशीच पोस्ट टाकली होती, खामोशी -द म्युसिकल नावाच्या सिनेमातलीच गाणी चोरलेली होती...
    किती वाईट वाटते ना... कारण ज्या गाण्यांच्या तालावर आपण मोठे होतो तेच अचानक परके वाटतात...

    ReplyDelete
  7. हे ’ बुध्दा बार ’ काय प्रकरण आहे? चेक करते आता. :) धन्यू गं अनघा!

    ReplyDelete
  8. महेंद्र, कष्टावीन फळाची चटक आहे ही. :(

    अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
  9. Dear Anonymous, अभिप्रायाबद्दल आभार! :)

    साठ, सत्तर अगदी ऐशीच्या सुरवातीच्या दशकातही आपल्याकडे जाल तसे फारच तुरळक होते. सामान्य जनतेला कुठल्या या चोर्‍या कळायला. त्याचाच पुरेपूर फायदा उठवत स्वत:ची पोळी भाजली यांनी. पण आजही तेच राजरोस सुरू आहे म्हणजे... खरे निर्लज्ज आहेत.

    Are we really MAHAN? I think we are, but we need to prove it...

    + अनंत

    ReplyDelete
  10. अवधूत कडून इतक्या उघड चोरीची अपेक्षा नव्हती. खरेच हा जोरका झटकाच ... :(

    हो ना गं, असेच होते. गाण्यांशी आपल्याही भावना संलग्न असतात. आणि हे असे पाहिले की त्यांचा चकनाचूर होतो.

    तन्वी, धन्यू गं.

    ReplyDelete
  11. http://en.wikipedia.org/wiki/Buddha_Bar

    :)

    ReplyDelete
  12. Pirates of Silicon Valleyची tagline आहे - "Good artists create... Great artists steal. ;) and its very true :D

    ReplyDelete
  13. मला पण प्रितमची बहुतेक गाणी गुणगुणायला , ऐकायला आवडायची ..
    पण एक दिवस एका इ-मेल मुळे तो मनातूनच उतरून गेला .. korean गाण्यावरून सरळ सरळ कॉपी ..
    RD , बप्पी ह्यांनी पण म्हणजे कहरच की ..
    उद्या रेहमान चे नाव पाहायला लागू नये म्हणजे झाले .

    अजय-अतुल आपले नाही ना करत असले काही , मला ते तरी स्वतःच संगीत देतात असे वाटतंय :(

    ReplyDelete
  14. जीवन की "ढापाढापी" में कब वक़्त मिला
    कुछ देर कहीं पर बैठ कभी यह सोच सकूँ
    जो "चुराया, ढापा, चिपकाया" उसमें क्या बुरा भला।
    (स्व. हरिवंशराय बच्चन ह्यांची माफी मागून..)

    ReplyDelete
  15. Udaloch.. link share kartoy tujhya blog chi, so that other ppl will also know it

    ReplyDelete
  16. अज्ञानात सुख असतं हे खरं :)

    बर फक्त इंग्रजीच ढापलं जातं असं नाही. माझा नवरा अशीच अनेक लाडकी हिंदी - मराठे गाणी कशी कन्नड गाण्यांवरून ढापलेली आहेत ते सांगत असतो.

    ReplyDelete
  17. >> बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते.

    + अनंतापर्यंत

    श्री ताइ...ज्या गाण्यांवर,संगीतकारांवर आपण मनापासुन प्रेम केल त्याविषयी अस वाचायला मिळाल की वाईट वाटत.. :( :(

    ReplyDelete
  18. धन्यवाद अनघा. आज पाहतेच. :D

    ReplyDelete
  19. हा हा... काय पर्फेक्ट टॆगलाईन आहे ही. किती ठिकाणी लागू होईल ना... :D

    धन्यवद सौरभ.

    ReplyDelete
  20. BB, खरेयं. प्रीतम ची उघड लबाडी आहे सगळी. :( खर सांगू, सारखी शंकेची पाल चुकचुकते, रेहमान पण... असेलही. फक्त तो भेसळ करत असेल. सहजासहजी ओळखू येणार नाही इतकी खबरदारी घेत असावा. खणले तर नक्की सापडेल. पण मग इतक्या आवडत्या गाण्यांचा पुरा चकनाचूर होऊन जाईल. :( :(

    अवधूत चे वाचलेस ना तू? अजय-अतुल, अजून तरी झाकली मूठ आहे ( माझ्यासाठी तरी, कोणाला काही माहित असेल तर टाका इथे )

    आभार्स रे!

    ReplyDelete
  21. विद्या, सहीच! आपके इस अंदाज से कुछ पल ये ढापाढापी की चीढ कम हुई!

    बाकी, कुछ कहने के लिये इन्होंने छोडाही नहीं हैं... :(

    धन्यू!

    ReplyDelete
  22. अनिकेत, धन्यवाद! अजून पण खूप आहेत... :D

    ReplyDelete
  23. अज्ञानात सुख असतं हे खरं :)

    अगदी अगदी! गौरी, अगं सगळ्यात गंमत वाटते ती याची की एका हिंदी गाण्यावरूनच दोन तीन अजून गाणी... तीही तंतोतंत! कपाळ बडवावेसे वाटते अगदी.

    नवर्‍याने कन्नड-मराठी ढापूगिरी दाखवली की किती वाईट वाटत असेल ना... :D

    धन्यवाद गं!

    ReplyDelete
  24. तर काय! योमू, आज इतकी वर्षे ज्यांना इतका मान मिळतोयं, त्यांनीही असेच केलेय हे पाहून जास्ती धक्का बसतो.

    आभार्स!

    ReplyDelete
  25. बाबा माझे आभार मान आधि :)

    आधि हरिवंशरायांची ही कविता मी ढापलीये... :)

    विद्याधरच्या कमेंटला +१०० वेळा लाईक :)

    ReplyDelete
  26. http://www.swapnavishwa.com/mazevichar/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-305

    तायडे इथे बघ अजून काही उदाहरणं आहेत या चोऱ्यांची :)

    ReplyDelete
  27. प्रीतम च्या चोऱ्या : http://www.google.com/buzz/113666884130295941126/XKrvnekzwAu/PRITAM-The-Biggest-Thief-of-Bollywood-Music

    ही तन्वीने दिलेली लिंक : http://www.itwofs.com/hindi-others.html

    कणेकरांचा लेख : http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp06.htm

    ReplyDelete
  28. तन्वी, :(. गेली कित्येक गाणी कामातून गेली.

    ReplyDelete
  29. हेरंब, कणेकरांनी कसली भादरलीये ना सगळ्यांची. मस्तच!

    उद्या अन्नू मलिकविरुद्ध चोरीबद्दल संगीत कोर्टात खटला उभा राहिला व अन्नूने मला त्याचं वकीलपत्र दिलं तर मी मांगाची काळी वस्त्रे परिधान करून ललकारून म्हणेन, ‘‘मिलार्ड, अन्नू हा छोटामोठा भुरटा चोर आहे. त्याला शिक्षेची नाही तर अनुकंपेची गरज आहे.

    हा हा....

    ReplyDelete
  30. हा हा हा हा हा.. अनु मलिकला फॉरवर्ड कर ही कमेंट.. तोही वेडा होईल !!!!!!!!

    ReplyDelete
  31. हेहेहे तन्वीताई!! आभार मानायचा विचार क्षणभर आला... मग म्हटलं आपण आपल्या माणसांचे आभार मानीत नाही :)

    ReplyDelete
  32. श्री,

    मी ओपीचा अगदी गरगरणारा पंखा. पण या माझ्या गुरुजींनी ढापाढापी केली होती हे पाहून तीन ताड उडालोच. बाकी ही पोस्ट मात्र लै खास! मजा आला.

    जियो
    अरुणदादा

    ReplyDelete
  33. पुर्वीसुद्धा हे असे प्रकार होत होते हे ऎकणे धक्कादायक वाटते, आपली so called classic! ही चक्क चोरलेली आहेत....

    ReplyDelete
  34. आयला इतक्या लेट आलेय मी वाचयला की आता फकस्त एक मोठा सुस्कारा...........ह्म्मम्म्म्मम्म्म..

    माहित होत मला त्यात जुन्या गाण्याच पूर्वी माझा भाऊ कुठून माहिती काढून द्यायचा त्यामुळे सुस्कारा...

    ReplyDelete
  35. अरुणदादा, हो रे. अज्ञानात सुखी होतो आपण पण आपल्यालाच आपलं सुख पाहवलं नाही ना... मग आता चेहरे पाडून घ्या झालं.

    अनेक धन्यवाद! :)

    ReplyDelete
  36. गौरव, तर काय. वाटायचे की निदान तेव्हां तरी संपूर्ण ओरिजनल, स्वत:चच असेल पण... :(

    अभिप्रायाबद्दल आभार!

    ReplyDelete
  37. अपर्णा, हा सुस्कारा वाढतच जाणारा आहे... :D

    धन्यू गं!

    ReplyDelete
  38. कितीती ढापाढापीं गं...अनु मलिक,प्रितम बद्दल तर ऐकलेच होते...पण हे आणिकच कहर !!!
    >> बरं असे नाही की आपल्यापाशी क्षमता, कुवत व बुद्धिमत्ता नाही. म्हणून अजूनच वाईट वाटते.

    + अनंतापर्यंत

    ReplyDelete
  39. अजिबात आश्चर्य वाटलं नाही.. वाईट वाटणंही बंद झालंय आता...

    ReplyDelete
  40. बाप रे! केवढी ग मोठी ही यादी!!

    ReplyDelete
  41. :-O

    मला हे माहित नव्हतं. म्हणजे ऐकून होते की अशी उचलाउचली चालते; पण एव्हढ्या गाजलेल्या लोकांची नावं वाचायला मिळतील अशी अजिबात अपेक्षा नव्हती.
    इथून पुढे कुठल्याच चांगल्या गाण्यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही हे खरं.

    ReplyDelete
  42. उमा, तर काय. आता कुठलेही छान गाणे ऐकले की वाटते आता हे कुठून चोरलेले असेल... :(

    धन्यू गं!

    ReplyDelete
  43. श्रीराज, अजून बर्‍याच लिंका आहेत.:D

    धन्यवाद!

    ReplyDelete
  44. हो ना मेघना. यापुढे विश्वास ठेवणे खरेच कठिण आहे त्यामुळे काही सच्ची गाणीही उगाच भरडली जातील. :(

    अनेक धन्यवाद!

    ReplyDelete
  45. ह्म्म... आनंदा, तुझ्यासारखेच जमवायला हवे आता. उगाच आपल्याच अपेक्षा अवाजवी आहेत की काय कोण जाणे... :(

    आभार्स रे!

    ReplyDelete
  46. अश्या चोर्‍यां बद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणि वाचलेलं असल्याने धक्का वैगरे बसला नाही. तुझी अनु मलीक बद्दलची कॉमेंट खुप छान आणि समर्पक वाटली. तिने लेखाचा शेवट केला असतास तर......

    ReplyDelete
  47. देवेन, अनु, प्रितम, आणि तो झिपर्‍या ( हम दिल दे चुके वाला... मी मेलं त्याचं नाव विसरलेय. असाही तो रिएलिटी शो मधे ड्रामेबाजी करण्याशिवाय काहीच करत नाही म्हणा... :D )आणि टोपीवाला हे सगळे बदमाशच आणि वर नि्र्लज्जही. मात्र जेव्हां जेव्हां काही थोर लोकांच्या चोरीचे दाखले पुराव्यानिशी आणि तंतोतंत समोर येतात तेव्हां दु:ख होतेच. जाऊ दे. त्यांना अभिमान आणि आपल्याला दु:ख, हे तागडे कसे जुळवायचे??

    आणि ती कमेंट कणेकरांची रे. :)

    आभार!

    ReplyDelete
  48. हिंदीतल्या हिदितली कॉपी : सचिनचा (तेंडुलकरांचा नाही हा, पिळगांवकरांचा)एक पिक्चर आठवतोय का? ऐसी भी क्या जल्दी है! त्यामध्ये एक गाणं होतं- "किन्ना सोणा तुझे रब ने बनाया."
    साल १९९६. त्याच वर्षी आला राजा हिंदुस्तानी. त्यातही हेच गाणं. त्यात फक्त "सोणा" काढून "प्यारा" केलंय. मूळ गाणं आहे नुसरत फतेह आली खान याचं. त्यामुळे किती कॉपी झालीय पहा इथे.

    दुसरं उदाहरण म्हणजे, "दाग द फायर" मधल्या गाण्याचं. "दिल दिवाना ना जाने कब खो गया". अगदी याच चालीचं अजून एक गाणं आहे, "पेहेली पेहेली बार मुहब्बत की है." सिर्फ तुम मधलं. परत दोन्ही पिक्चर्सची वर्षं सेम. इतक्या फटाफट कसं काय बुवा कॉपी करतात. हुशार आहेत म्हणायचे हे लोक.

    ReplyDelete
  49. केतकी, खरेच जाम हुश्शार लोकं आहेत. आता हेच पाहा नं, " अग बाई अरेच्च्या! " छान सिनेमा. गाणी तर अगदी गळ्यातली-मनातलीच. एकंदरीत सगळेच सुंदर जुळवलेय... पण मनात कुठेतरी, " What Women Want " हा २००० साली आलेला Mel Gibson चा सिनेमा रेंगाळत राहतो. :(

    तरीही दाद द्यायला हवीच! :)

    धन्यू गं!

    ReplyDelete
  50. Mast topic aahe. YouTube var sagali evadhi juni gaani milaali hi kamaal aahe. Social space ne gelya mojakyach varshat lokanchya velecha kautukaspad (sad)upayog kela aahe. Kuthalya eka companyla kinva manasala he jamanyasarakhe navhate.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !