जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, August 7, 2010

चित्रदगड - पिक्चर्ड रॉक्स... अंतिम

संध्यासमय

पानी रे पानी तेरा रंग कैसा...

झेपावणारे समुद्रपक्षी

परतीच्या प्रवासात एका विवक्षीत जागी बोट पोहोचताच साठ-सत्तर समुद्रपक्षी अचानक आमच्यावर झेपावू लागले. लांबून गोंडस दिसणारा हा पक्षी प्रसंगी किती रौद्ररूप घेउ शकतो याची झलक मिळाली. कमीतकमी अडीचशे लोक तरी आम्ही होतो तरीही अतिशय वेगाने व उग्र आवेशात हे आमच्यावर झेपावत होते. सावजावर झडप घालताना त्यांच्या डोळ्यात काय भाव असतील त्याचा प्रत्यय आला. जसे अचानक हे आले तसेच वीसएक मिनीटे आमच्यावर घिरट्या घालून ते गायब झाले.


रसरसते सोने

एकांडा शिलेदार

फोटो मोठा करून पाहिल्यावर लक्षात येईल की ज्या दगडावर हे इतके मोठे झाड रुजलेयं त्यावर फारच कमी ( किंबहुना जवळ जवळ नाहीच ) माती आहे. झाडाची मुळे बाजूलाच असलेल्या मोठ्या दगडावर गेलीत आणि झाडाचे पोषण तिथून होते आहे. :) काय जबर तोडगा शोधलाय नं... आणि या दगडाचा आकारही अचंबित करणाराच. खाली हिरवे पाणी, पिवळसर-सोनेरी दगड, सभोवताली हिरगे गर्द सरळसोट वाढणारे वृक्ष अन वर स्वच्छ निळे आकाश. ट्रेल करू तेव्हां या जागेसाठी किमान तासभर तरी हवाच.

सोन्याचा पर्वत

युध्दनौका - मोरपंखी पाणी

कुठल्या सिनेमाची आठवण होतेय... :)

कुठे मोरपंखी, कुठे हिरवे तर कुठे चकाकते सोनेरी जल...

होडके घेऊन गेलो की या स्तंभाशी थांबून पाण्यात पाय सोडून निसर्गाशी एकरूप होता येते

सूर्याचा कटाक्ष

उजळलेले शेंडे

या हिरव्या जलात समर्पित व्हावं...

फोटो सौजन्य : नचिकेत
समाप्त.

30 comments:

 1. एकांडा शिलेदार आणि त्याच्या डोक्यावर मुकुट सुद्धा आहे... :) आणि हे काय.. अजून युद्धनौका.. स्वतःचे आरमार सजवावे म्हणतो... :) ढापला... हेहे..

  ReplyDelete
 2. सजव सजव.... अजून काही आरमारी फोटो तुला मेल करते. :)

  ReplyDelete
 3. me akdhi yeu shri...tuch sang..mag lagech udate ithun....ata jast wat pahaychi ichha nahi ga...sundar ek se badhakar ek ahet photos..

  ReplyDelete
 4. अगं भाग्यश्री, हे तू टाकलेले फोटो खूपच सुंदर आहे गं!!!

  ReplyDelete
 5. Hats off Nachiket
  very nice photos....
  Thanks

  ReplyDelete
 6. अप्रतिम...खुप सुंदर!!

  ReplyDelete
 7. अप्रतिमच ग.. तू तर एकसेएक फोटू टाकायला लागलीस प्रत्येक पोस्टमध्ये.. सही सही.. मला तो सोन्याचा पर्वत जाम आवडला.. दोन-चार दगड उचलून आणायचे ना सोन्याचे ;)

  ReplyDelete
 8. आम्हाला हे बघताना एवढी मजा येतेय, म्हणजे तू प्रत्यक्षात तर धमालच केली असशील! हो ना?

  ReplyDelete
 9. प्रचंड भारी...
  पाण्याचे रंग जबरा आवडले...
  संध्यासमय तर एनीटाईम रॉक्स!

  ReplyDelete
 10. अप्रतीम फोटो.. तू आता प्रोफेशनल फोटोग्राफर्स सारखे फोटो काढणे सुरु केले आहेस. एखाद्या पट्टिच्या फोटोग्राफरला पण कॉम्प्लेक्स येईल. तो सी गल चा फोटो आणि सोन्याचा पहाड खूप सुंदर आलाय. सी गल तर मी डेस्क टॉप वर लावलाय .. :)

  ReplyDelete
 11. उमा, अगं माझ्याकडे तुझे नेहमीच स्वागत आहे. :)

  ReplyDelete
 12. अनेक धन्यवाद अनघा.

  ReplyDelete
 13. शशांक, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद, नचिकेतकडून. ( माझ्यातर्फे आहेतच ):)

  ReplyDelete
 14. धन्यू रे योगेश.

  ReplyDelete
 15. हेरंब, अरे दगड मी आणेन रे उचलून पण सूर्याला कसे पकडावे. ( फॉलच्या कल्पनेनेही मला धस्स होतेय... :( )

  ReplyDelete
 16. होय श्रीराज, खरेच खूपच मजा आली. मात्र ट्रेल करता आला नाही.... थोडी खंत वाटतेयं.... जाऊ लवकरच पुन्हा.
  धन्यवाद.

  ReplyDelete
 17. धन्यवाद विभी. :)

  ReplyDelete
 18. महेंद्र, ऑल क्रेडीट गोज टू नचिकेत. :)

  व्हिडिओत पाहशील त्या सीगल्सनी कसा धुमाकूळ घातला होता ते.

  ReplyDelete
 19. माझी कमेंट कुठेतरी हरवली बहुदा.. :(
  फोटो खूप छान आहेत. सुर्यप्रकाशाच्या छटा तर अप्रतीम..

  ReplyDelete
 20. सर्वच छायाचित्र खुपच सुंदर आहेत.. वॉलपेपर म्ह्णुन ठेवण्यासा्ठी छान वाटत आहेत म्ह्णून सेव केलीत...तिथे प्रत्यक्ष खुपच मजा आली असेल ना......

  ReplyDelete
 21. मीनल, अगं मला फक्त हीच टिपणी मिळाली. कधी कधी ब्लॉगर गंमत करत असतं. तुला फोटो आवडले ऐकून खूपच आनंद झाला. अनेक धन्यवाद.

  ReplyDelete
 22. धन्यवाद हरेक्रिष्णजी.

  ReplyDelete
 23. देवेंद्र, होय. खूपच मजा आली. वर्णनातीतच दृष्ये आहेत सारी. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

  ReplyDelete
 24. अगं गेलीस तरी कुठे?? लिही काहीतरी..

  ReplyDelete
 25. aphlatunch ahet photo !Nisarg ani photographer donhichi kamalach ahe ani tyala sajeshi titles pan !!!

  ReplyDelete
 26. महेंद्र, बरं झालं तू टोकलंस ते. :) आता लिहीते लवकरच.

  ReplyDelete
 27. मधुमती, अगं चुन्या खूश झाला एकदम तुझी टिपणी वाचून. धन्यू गं.

  ReplyDelete
 28. भाग्यश्री, मी तुला दिलाय खो! :

  ReplyDelete
 29. Punha pahile sagale photo... chaan vatale. Rang sundar utaralet.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !