होळी संपल्यावर हळूहळू आंबे, फणस, काजूची बोंडे-ओले काजूगर, रातांबे, जांभळे, करवंद यांची चाहूल लागू लागते. आंबे तरी एकवेळ सगळीकडे मिळतील. मग भले ते मेक्सिकन असू देत नाहीतर अजून कुठल्या काशीतले. आता हापूसच्या मधुर चवीची, राजस रूपाची, तुकतुकीत सोनेरी अंगावर चढलेल्या केशरलालीची, नुसत्या गंधाने नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेचे पारणे फेडणार्या वासाची आठवणही मनात येऊ न देता, मिळतोय ना आंबा इथे, मग कुठला का असेना घ्या खाऊन, असे म्हणत दुधाची तहान पाण्यावर भागवता येण्याचा प्रयत्न तरी करता येतो. पण या राजसासोबत येणार्या अष्टमंडळाचा आस्वाद मात्र मिळत नाही. त्यातल्यात्यात फणसाचे तर नामोनिशाण नसते. हा आता टीन मधला फणस मिळतो म्हणा. पण त्याला कुठली असायला आपल्या दारच्या खासंखास फणसाची चव. चहुबाजूने फुटून लेकुरवाळ्या झालेल्या फणसाच्या झाडांभोवती घुटमळत, कुठे इटुकलेपिटुकले तर कुठे मोठे होऊ घातलेले आणि चांगले फोफावलेले फणस हेरत, त्यांच्या वरून खडबडीत भासणार्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत फिरवत अंदाज घ्यायचा. कुठला भाजीचा, कुठला जरासा जून असला तरी अजूनही भाजीसाठी धावेल. फणस पिकू लागला की भाजीसाठी घेऊच नये. एकतर त्याचा वासही गोडसर होऊ लागलेला असतो आणि निबरही.
'कापा आणि बरका ' हे फणसाचे प्रकार. दोन्हीही मस्तच लागतात. दोघांची स्वत:ची खासियत आहे.' कापा ' कसा अगदी सुटसुटीत-खुटखुटीत-करकरीत. पाण्यात राहूनही कोरडा असल्यागत अचळ काढता येतो. अगदी न धुता तोंडात सोडला तरी फारसा चीक लागत नाही. ' बरका ' मात्र धमाल बुळबुळीत अन सुळसुळीत. जिकडून तिकडून तारा येत असतात, हातातून गरे सटकत राहतात, पाण्यात लगोलग टाकला तरीही चीक चिवटपणा सोडत नाही. पण चवीला काय लागतो महाराजा! काप्यालाही मागे टाकेल. दोघांचेही गरे पिवळसर सोनेरी. त्यावरील तकाकी पाहत राहावी. नुसता एकच एक फणस खाण्यात मजा नाही. या जोडगोळीचा आस्वाद जोडीनेच घ्यायला हवा. अगं, याचा गरा अजूनही तितकाच मधुर व करकरीत असतो बरं. आणि हा बरका असला ना तरी इतकी गोडी आहे ना त्याला. की कापतानाचा त्रास पुरेपूर भरून निघतो बघ. सासूबाई सांगत होत्या.
आमच्या शेतात प्रचंड आंबा, काजू, नारळ, फणस, रातांबे, बांधावर जिकडे तिकडे लावलेली करवंदाची जाळी, चिकू, पेरू... हळद, सूर्यफुले, केळी... नुसती धमाल आहे. यंदा मार्च-एप्रिल मध्ये येणे झाल्याने खूपच चंगळ झाली. वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले. चार दिवस कानात हवा भरलेल्या वासरासारखे नुसते हुंदडलो. शेतातूनच बावनदी जात असल्याने आंबा, काजू, नारळीच्या बागेतून, शेवरीखालून हुंदडून नदीच्या थंडगार पाण्यात झोकून दिले. स्वत:ला तिच्या स्वाधीन करून टाकल्यावर, " किती दिवसांनी आलात गं " असे म्हणत बाहु पसरून तिने आम्हाला अलगद मिठीत घेतले. पाहता पाहता तिच्या मायेच्या उबदार स्पर्शाने आम्ही अंर्तबाह्य पुलकित झालो. किती वेळ डुंबलो तरीही निघावेसेच वाटेना. शेवटी हाकारे आले, " बाजरीची भाकरी, झुणका, ओल्या खोबर्याची खास पाट्यावर वाटलेली लसणीची चटणी तयार आहे. चला पटापट. " डोंगर चढून, नदीच्या मायेत आकंठ डुंबून मन भरले असले तरी पोटात होमकुंड पेटले होते. त्यात हा खासा मेन्यू ऐकून क्षणात सगळे घराकडे पळत सुटलो. चुलीवरून पानात पडणार्या भाकरीचा खरपूस वास, लसणाची लुसलुशीत आणि झणझणीत चटणी... अहाहा... तडस लागेस्तोवर जेवलो. हातावर पाणी पडताच ज्याने त्याने सोयीस्कर जागा पकडून दिली ताणून.
आमचे घर
यावर्षी दोनदा मोहोर आला पण दोन्ही वेळा गळून गेला
थोड्याश्या कैर्या लागलेल्या...
संध्याकाळी सूर्य अस्ताला जाऊ लागला तशी विलक्षण शांतता पसरली. दूरवर घरी परतणाऱ्या गायींच्या गळ्यातील घंटांचा किणकीण नाद या निरवतेला भेदत होता. नारळीच्या झाडांवर उतरत गेलेले निवलेल्या सूर्याचे किरण, चहूकडे पसरलेला संधिप्रकाश, रातकिड्यांची किरकिर, मधूनच येणारा बेडकांचा डरावं डरावं, अचानक टिवटिवत गेलेली एखादी चुकार टिटवी. अंगणात घराच्या पायऱ्यांवर बसून मूकपणे त्या वातावरणात विरून गेले.
किर्र अंधार पडला आणि भानावर आले. अंगण दुधाने उजळून निघालेले. नजर आसमंतावर गेली आणि तिथेच खिळली. काळ्याभोर आभाळात लाखो करोडो चांदण्यांचा अक्षरशः खच पडला होता. कित्येक वर्षात इतके विलोभनीय दृश्य पाहिले नव्हते. डोळ्यांचे पारणे फिटले. पळत गच्चीवर जाऊन त्या अथांग पसरलेल्या दूरस्थ विश्वाच्या भव्यतेत मनातल्या सगळ्या भावांना डोहाच्या तळाशी ढकलून स्वतःला संपूर्णपणे विलीन करून टाकले. तादात्म्य पावणे म्हणतात ते बहुदा हेच असावे.
दुसर्या दिवशी अगदी निवडून निवडून कच्चे फणस उतरवले, निगुतीने मन लावून त्याची भाजी केली. पंचेंद्रिये एकवटून अगदी टल्ली होऊन ती अग्रास खाल्ली. तरीही मनाची तृप्ती होईना म्हणून चार फणस घेऊन मुंबई गाठली. त्यांचीही भाजी करून पुढल्या दोन तीन वर्षांच्या समाधानाची बेगमी करून घेतली. निघता निघता १०० रुपयाला एक या भावाने का होईना चक्क हापुसाचीही चव चाखता आली. चला पावसाची मनोहरी रुपे नाही पण कोकणचा मेवा तर पदरी पडला.
यावेळची मायदेशवारी काही अंशी सार्थकी लागल्याचे समाधान घेऊन भरारी घेतली. इथे आले, येऊन जुनी झाले पण फणसाच्या भाजीची जिभेवर रेंगाळणारी चव काही कमी होईना. तशी अगदी येताजाता होणारी भाजी नसली तरी बहुतेकांच्या घरी निदान एकदातरी होतेच. केळफुलासारखेच फणसाचेही बाळंतपण बरेच करावे लागते खरे पण श्रमाचा पुरेपूर मोबदला मिळतोच मिळतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारा भाजीचा फणस काहीसा गरे होऊ लागलेलाच असतो. परंतु निरनिराळ्या रूपातल्या फणसाची भाजी करता येते व त्याची चवही त्यानुसार बदलते. बरीच वर्षे शेतावर जाऊन जाऊन, सासूबाईंकडून फणस व त्याची भाजी याविषयी बरीच माहिती गोळा केली. तुम्हालाही कदाचित माहीत असेल....
फणसाची भाजी
फणसाची भाजी करण्यासाठी सगळे ' कच्चे फणस ' उपयोगी पडतात. पण वेगवेगळ्या अवस्थेतील फणसाची भाजी वेगवेगळी होते आणि सर्व प्रकारच्या भाज्या चांगल्याच लागतात. अगदी कोवळा, मध्यम कोवळा आणि गरे झालेला. सर्वसाधारणपणे अशी विभागणी होऊ शकते. या तिन्ही भाज्यांची चव, स्वाद वेगवेगळा येतो पण प्रत्येक प्रकारची भाजी उत्तमच होते.
१. साकटा फणस म्हणजे अगदी कोवळा फणस. त्याच्यात अजिबात गरे झालेले नसतात. अशा फणसाची भाजी उत्कृष्ट होते. बाहेरून साकटा कसा ओळखायचा? ज्या फणसाचे काटे बारीक आणि अगदी जवळजवळ असतात तो बहुतेक साकटा निघतो. फणस विकणारेच फणसाचे काटे काढून त्याचे मोठेमोठे तुकडे करून देतात. त्याची पावही (म्हणजे मधला दांडा) कोवळी असते. तीही काढून टाकावी लागत नाही. जरासे काटे रुंदावले तरीही तो कोवळाच असतो. पण त्याची पाव जर जून झाली असेल तर ती काढावी लागते कारण ती शिजत नाही. भाजीवाल्याला ते समजते. तो पाव काढून टाकतो. ह्या फणसालाही साकटाच म्हणतात. फणस कापण्याचे प्राथमिक काम भाजीवाल्याने करून नाही दिले तर आपल्याला करावे लागते.
फणसाची भाजी करण्यासाठी सगळे ' कच्चे फणस ' उपयोगी पडतात. पण वेगवेगळ्या अवस्थेतील फणसाची भाजी वेगवेगळी होते आणि सर्व प्रकारच्या भाज्या चांगल्याच लागतात. अगदी कोवळा, मध्यम कोवळा आणि गरे झालेला. सर्वसाधारणपणे अशी विभागणी होऊ शकते. या तिन्ही भाज्यांची चव, स्वाद वेगवेगळा येतो पण प्रत्येक प्रकारची भाजी उत्तमच होते.
१. साकटा फणस म्हणजे अगदी कोवळा फणस. त्याच्यात अजिबात गरे झालेले नसतात. अशा फणसाची भाजी उत्कृष्ट होते. बाहेरून साकटा कसा ओळखायचा? ज्या फणसाचे काटे बारीक आणि अगदी जवळजवळ असतात तो बहुतेक साकटा निघतो. फणस विकणारेच फणसाचे काटे काढून त्याचे मोठेमोठे तुकडे करून देतात. त्याची पावही (म्हणजे मधला दांडा) कोवळी असते. तीही काढून टाकावी लागत नाही. जरासे काटे रुंदावले तरीही तो कोवळाच असतो. पण त्याची पाव जर जून झाली असेल तर ती काढावी लागते कारण ती शिजत नाही. भाजीवाल्याला ते समजते. तो पाव काढून टाकतो. ह्या फणसालाही साकटाच म्हणतात. फणस कापण्याचे प्राथमिक काम भाजीवाल्याने करून नाही दिले तर आपल्याला करावे लागते.
वर्तमानपत्राचा मोठा कागद पसरावा. त्याच्यावर विळी ठेवावी. सुरीने कापायचा असेल तर लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा घ्यावा. एका रुंद भांड्यात पाणी घ्यावे. विळीच्या किंवा सुरीच्या पात्याला तेल (गोडे) लावावे. पाण्यात २/३ चमचे तेल घालावे. आपल्या हातांनाही तेल लावावे. प्रथम काटे काढून नंतर जरूर असल्यास पाव काढावी. १/२ इंच लांबीरूंदीचे तुकडे चिरून घ्यावे. ते पाण्यात टाकले की पाण्यात तेल असल्यामुळे फणसाचा चीक निघून जातो.
२. फणसात गरे व्हायला सुरुवात झाली तरीही तो सुरुवातीला कोवळा फणसच असतो. गऱ्यांच्या बाजूला बारीकबारीक पात्यांचे आवरण असते. ह्या पात्यांना सांगूळ म्हणतात. सांगळं कोवळी असेपर्यंत ह्या फणसाचीही साकट्यासारखीच भाजी करता येते. अर्थात त्याची पाव काढावी लागते. अगदी कोवळ्या साकट्यापेक्षा ही भाजी थोडी वेगळी लागते पण छानच लागते. आपण चिरायची असल्यास वर सांगितल्या प्रमाणेच चिरावी.
३. गरे झालेल्या फणसाची भाजी म्हणजे खरे तर ती गऱ्यांचीच भाजी असते. प्रथम फणसाचे गरे काढावे लागतात. भाजीवाल्याने काढून दिले तर उत्तमच. नाहीतर फणसाचे मोठे तुकडे करून त्यातील सांगळं बाजूला करण्यासाठी बोटांना तेल लावून मधला गरा काढायचा असतो. गरे काढल्यावर त्यांतील बिया म्हणजेच आठळा काढायच्या. त्यावर एक पापुद्र्यासारखे आवरण असते तेही काढून टाकावे लागते. थोडेसे किचकट काम आहे पण भाजीची चव आठवावी म्हणजे किचकट वाटणार नाही. गऱ्यांचे लहानलहान १ इंच लांबीरुंदीचे तुकडे करायचे. आठळाही ठेचून बारीक तुकडे करून घ्यायचे.
ह्या ३ प्रकारच्या फणसांच्या भाज्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यांची कृती टाकतेच लगोलग.
२. फणसात गरे व्हायला सुरुवात झाली तरीही तो सुरुवातीला कोवळा फणसच असतो. गऱ्यांच्या बाजूला बारीकबारीक पात्यांचे आवरण असते. ह्या पात्यांना सांगूळ म्हणतात. सांगळं कोवळी असेपर्यंत ह्या फणसाचीही साकट्यासारखीच भाजी करता येते. अर्थात त्याची पाव काढावी लागते. अगदी कोवळ्या साकट्यापेक्षा ही भाजी थोडी वेगळी लागते पण छानच लागते. आपण चिरायची असल्यास वर सांगितल्या प्रमाणेच चिरावी.
३. गरे झालेल्या फणसाची भाजी म्हणजे खरे तर ती गऱ्यांचीच भाजी असते. प्रथम फणसाचे गरे काढावे लागतात. भाजीवाल्याने काढून दिले तर उत्तमच. नाहीतर फणसाचे मोठे तुकडे करून त्यातील सांगळं बाजूला करण्यासाठी बोटांना तेल लावून मधला गरा काढायचा असतो. गरे काढल्यावर त्यांतील बिया म्हणजेच आठळा काढायच्या. त्यावर एक पापुद्र्यासारखे आवरण असते तेही काढून टाकावे लागते. थोडेसे किचकट काम आहे पण भाजीची चव आठवावी म्हणजे किचकट वाटणार नाही. गऱ्यांचे लहानलहान १ इंच लांबीरुंदीचे तुकडे करायचे. आठळाही ठेचून बारीक तुकडे करून घ्यायचे.
ह्या ३ प्रकारच्या फणसांच्या भाज्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यांची कृती टाकतेच लगोलग.
bharich lihile aahe. gharacha photo mast...aani tumhi jey anubhwle te wachtana drushya dolyasamor oobhe rahile. akch shanka...hey thikan nemke kothe aahe? (aani punha yal tenva aamhalapn phanas ghewoon ya ho, pan kapa) aani tey chuliwar kelele padarthhiiii
ReplyDeleteमला फणसाची भाजी आवडत नाही पण फोटो आणि पोस्ट आवडले :) 'काजू' चा सगळ्यात बेस्ट आलाय.
ReplyDelete>> वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले.
हाहाहाहा.. हे एकदम जबरीच. सचिन/धोनीने लिहिल्यासारखं वाटतंय ;)
हेरंब ++++++ :D
ReplyDeleteफणसाची भाजी आवडते. कधी स्वत: केली नाही पण आई करत असे. :)
आणि बरं झालं तुझ्या गावच्या घरावर छानसा लेख लिहिलास ते ! त्यामुळे आता पुढल्या वेळी मला घेऊन जाशील त्यावेळी कसं मला आधीच माहित असेल की मला तिथे कायकाय मिळणार आहे ! ;)
>>ज्याला सहजी व पुन्हा पुन्हा जाणे शक्य आहे त्यांची बातच निराळी.
ReplyDeleteयावर काय लिहू (की लोळालोळी करू ते सांग..)
फणसाची भाजी मी खाल्ली नाहीये त्यामुळे ती खिलवायची जबाबदारी मी तुझ्यावर देऊ का?? :) इथे एका एशियन मार्केट मध्ये फणस पहिला आहे...फक्त भाव बघून डोळे फिरले माझे...:) फोटो मस्त आहे फक्त शेवटचा फोटो मला इथे दिसत नाही...
धन्यवाद प्रसाद.
ReplyDeleteदेवरुख साखरपा रस्त्यावर वांजोळे गाव लागते तिथे आहे आमचे शेत. :) नक्की नक्की.
हेरंब, अरे एकदा आमच्याकडची खाऊन पाहा... एकदम गुड बुक्स मधे जाऊन बसेल ती. :)
ReplyDeleteम्हणजे काय... जितका सचिन-धोनीने जिंकला तितकाच आपणही जिकलाय. :D:D हक बनता है रे!
आभार्स!
अनघा, आपण एक यादीच करुयात गं कुठे कुठे जायचेय त्याची. :) आणि सगळे बेत अमलातही आणूयात.
ReplyDeleteयावेळची रुखरुख अजूनही गेलेली नाही माझी. आणि बयो तू चक्क डेट्रॉईटला अवतरलीस पण मी तिथून निघाल्यावर... काय म्हणू तरी काय आता या योगाला... निषेध!!:(
अपर्णा, अगं ते लिहीले तेव्हांच मला माहीत होते तू काय कमेंटणार आहेस ते... :D:D
ReplyDeleteअगं, खरेच. आम्हीही एकदा बघितला म्हणून लगेच उचलायला गेले तर चायनीज ललना तोंड वाकडे करून अर्धा कापलेला फणस परत घेऊन आली. मला म्हणे इतकुश्या फणसाचे $9.87. नकोच मला असे म्हणत आपटून निघून गेली. अतिरेकच किंमत आहे ही. :(
तू दिलेली जबाबदारी मी स्विकारलेली आहे. :) आता योग कधी येतो पाहू... तेरी काली जबान बता तो जरा... :)
आभार्स!
फोटो मस्त!!! आणि ते फणसाचे तर अप्रतीम. फणसाचं लोणचं करते आई- कैरी सोबत मिक्स करून. अगदी मटनाच्या लोणच्यासारखं लागतं ते.( तू खात नाहीस, पण मस्त लागतं )
ReplyDeleteभाजी पण मला आवडते- मटनाच्या रश्शात करतात ती विदर्भात.
पोस्ट मस्त..
माझं माहेर म्हणजे आजोळ कोकणातलं. तू लिहिलेले मी सर्व लहानपणी अनुभवलेले आहे.
ReplyDeleteतेव्हा ते आवडायचं. पण आता फारसे आकर्षण उरले नाही. अर्थात काजू, फणस, आंबा? ते तर इथे ही आणून खाते. पण तिथली चव इथे कसली? खरी तर ती भरतातल्या भरतात मुंबईमधे ही येत नाही.
मी एकदाही फणसाची भाजी खाल्ली नाहीये :(
ReplyDeleteपण पोस्ट जबरी... कोकणाचा मेवा नेहमी मिसणारा :(
मी नुकतीच आगरताळयात होते. तिथेही इकडेतिकडे भरपूर फणस होते .. त्याची भाजी खाण्याबाबत चर्चाही झाली आमची .. पण कृती मात्र राहिलीच :-(
ReplyDeleteमस्तच लिहलंय ..
ReplyDeleteफणसाची भाजी असले काही असते हे आम्हा घाटावरच्या लोकांना माहितच नसते :(
हसू आवरत नाहीये... आंबा, फणस, काजू आणि कोकणातून दिसणारे क्षीतज पाहून आणखी काय प्रतिक्रिया उमटणार!?
ReplyDeleteमहेंद्र, मटनासारखी फणसाची भाजी करतात हे ऐकलेय मी. ’ बावर्ची ’ मधे राजेशखन्ना सुरणाचे वडे बनवतो आणि ते मटण समजून आवडून सगळे ताव मारून खातात... :)
ReplyDeleteफणसाचे लोणचे मी खाल्लेले नाही मात्र केल्याचे पाहिले आहे.
मीनल, तर काय... अगं, परसातली चवळीची पालेभाजी आम्ही खुडली. धुतली आणि चमचाभर तेलात चार हिरव्या टाकून फोडणी घातली. वरून घरचाच नारळ घातला. बास. गरम गरम भाकरीबरोबर काय लागली म्हणून सांगू. आठवणीने तोंपासु. तिथल्या मातीची, पाण्याची एक आगळीच चव आहे गं.
ReplyDeleteधन्यवाद गं. :)
आनंद, कधीतरी येवा कोकणात. खरे तर मी माहेरून पक्की देशावरची. आणि अजूनही मला देशावरचे पदार्थच जास्ती आवडतात. अपवाद ओल्या काजूंची उसळ आणि फणसाची भाजी.
ReplyDeleteधन्यू रे!
सविता, आता पुढच्या वेळेस जाशील तेव्हां आठवणीने खा आणि माझी आठवण काढ. :)
ReplyDeleteआभार्स!
BB, अरे मलाही लग्न होईतो नव्हतेच माहीत. एकदा खाल्ली आणि जी प्रेमात पडले नं. ए आपल्या घाटावरचे पदार्थ खासंखासच असतात. :)
ReplyDeleteधन्यवाद!
श्रीराज, अरे तू अगदीच उंबराच फूल झाला आहेस की रे. :)
ReplyDeleteTumchya post chi kharech vaat pahat hote,aaj eka baithakit charahi naveen post vachun kaadhale.khup chhaan lihile aahe.Maaydeshahun 2-3 mahinyapurvich paratle pan punha jaaychi ichha jhaali.
ReplyDeletepushpa
पुष्पा, अभिप्रायाबद्दल आभार. माझी आठवण काढलीत खूप आनंद झाला.
ReplyDeleteअगदी खरे आहे, नुकतेच परतलो असलो तरी पुन्हा लगेच मन धावते मायदेशी. एकाच बोटीतले बरेचसे प्रवासी आपण. :)
अगं हल्ली मी ऑफिसमध्ये कमी असतो, शिवाय घरी संगणक नाही... त्यामुळे ब्लॉगिंग थोडे कमी झालेय.
ReplyDeleteहे फार्म कुठे आहे ते तरी सांग, म्हणजे तुझ्या अनुपस्थितीत आमचे हाती काही भाजीपाला लागतोय का बघतो , कारण सगळे पाहून वाचून जाम पाणी सुटलेय तोंडाला !!
ReplyDeleteराजीव, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल आभार. :)
ReplyDeleteआमचे हे छोटेसे फार्म देवरुख साखरपा रस्त्यावर आहे. गावाचे नाव ’ वांझोळे ’.
मी पण फणसाची भाजी खालेली नाहीये अजून....
ReplyDeleteपण पोस्ट आणि फोटो आवडले ... मस्तच...
आभारी आहे देवेन. :)छान वाटले तुझा अभिप्राय पाहून.
ReplyDeletePhansachya bhajichi athavan ali tari jibhevar chav rengalat rahate. Mala tar khup awadte. Varshatun ekada tari amhi fansachi bhaji kartoch. Lekh khup chan vatala. Ani fansachi bhaji apratim. Kharokhar nisargashivay manus sukhi rahuch shakat nahi.
ReplyDelete>>सरदेसाई फार्म
ReplyDeleteआवडलं :)))
>>>> वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले.
हाहाहाहा.. हे एकदम जबरीच. सचिन/धोनीने लिहिल्यासारखं वाटतंय ;)
+++
कापा आणि बरका मधला फरक गूगल करता करता इथे पोचलो. पण भारीये हे फणस प्रकरण.
ReplyDeleteआता घरात आलेला फणस कापा की बरका ते शोधून तो कापावा लागणार आहे.
माहिती फारच छान परंतु एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला आहे. तो म्हणजे कापा व बरका फणस बाबाहेरून कसा ओळखावा हे जरा विस्ताराने सांगितले तर फारच उत्तम.
ReplyDelete