पुस्तके दिसली आणि पावले रेंगाळली नाहीत असे या जन्मात तरी घडायचे नाही. लहानपणापासूनच अगदी पुडीच्या कागदावरचेही वाचण्याची सवय जडलेली. मिळेल तो कागद आणि कुठेही असलो तरी नजरेखालून गेलाच पाहिजे. रद्दीवाल्याकडे उरापोटावर ( उचलत नाही तरी आईला मदत करायलाच हवी.... हे वाक्य इतरवेळी सोयिस्करपणे विसरले जायचे..... ही ही... ) त्यातल्या त्यात हलकी पिशवी उचलून आईबरोबर जायचेच जायचे. तिथे गेलो की मग काय पर्वणीच...... मिळालेले रद्दीचे पैसे कधीच घरी यायचे नाहीत. अक्षरशः वारा प्यायलेल्या वासरासारखी मी भरभर त्या रद्दीवाल्याच्या दुकानात भिरभिरत ढिगाने पुस्तके उचलत असे. अनेकदा अतिशय दुर्मिळ पुस्तके अक्षरशः कवडीमोल किमतीत हाताशी लागून जात. आई तिथे वैतागे पण दरवेळी मला घेतल्याशिवाय रद्दी द्यायला मात्र जात नसे.
जागोगागी भरणारी पुस्तकांची प्रदर्शने तर सारखीच खुणावत असतात. शिवाय मॅजेस्टिकची मी लाईफ मेंबर असल्याने तिथे चकरा चालूच. पण अजूनही अशी काही ठिकाणे आहेत जिथे अगदी सगळ्या विषयांची, भाषांतली व जगभरातील लेखकांची पुस्तके भरभरून-ओतू जाईतो मांडलेली असतात. अतिशय गाजलेली व नावाजलेल्या खूप मोठ्या साहित्यिकांचा हा अनमोल ठेवा दृष्टीस पडला की वेळ -काळ - स्थळ साऱ्याचा विसर पडे-पडतो. जुन्या बाजारात, भाजी मार्केटच्या दारात, स्टेशनच्या बाहेर, अगदी कुठेही रस्त्यावर हा खजिना सापडू शकतो. ठाण्याला गावदेवी मार्केटमध्ये दोघे जण आहेत. शिवाय स्टेशन रोडला अशोक टॉकीजच्या आसपास अगदी हमखास काही सापडतील. काहींजवळ तर अतिशय जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड्सही सापडतात तर काहींजवळ कॅसेट्सही.
हा पुस्तकांचा मांडलेला बाजार चारी हातांनी मला खुणावतो. अगदी बैठक मारून आरामात एक एक पुस्तक पाहत पाहत कधीनुक दोन तरी पुस्तके घरच्या खजिन्यात येऊन पडतातच. दरवेळी मायदेशातून परत येतांना बारा पंधरा पुस्तके बॅगेत विराजमान होतात व एखादे चांगले जाडजूड हातात. मला वाटते ९१-९२ साल असावे. अशीच मी गावदेवी मार्केटमधल्या पुस्तक पंढरीत रमले होते. ताई, हे स्टूल घ्या नं म्हणजे आरामात पाहता येईल... नेकी और पुछ पुछ...... मस्त बैठक जमवली. त्यादिवशी त्याच्याकडे खरेच काही चांगली पुस्तकेही होती. त्यातल्या एका छोट्याश्याच पुस्तकाने माझे लक्ष वेधून घेतले. जरा चाळले आणि खाली ठेवून इतर काही पाहू लागले..... पण नजर सारखी त्याच्यावरच खिळत होती. तेवढ्यात अजून दोन मुली आल्या. त्यातल्या एकीने नेमके तेच उचलले. माझा जीव खालीवर..... घ्यायचे का नाही ते नंतर ठरवले असते पण निदान हातात तरी ठेवायचे नं...... भर्रर्रकन सगळ्या पुस्तकांवरून नजर फिरवली पण ...... बहुतेक ती एकच कॉपी होती.
एकीकडे इतर पुस्तके पाहत एक डोळा त्या मुलीच्या हाताकडे ठेवून होते. तिने पुन्हा एकदा पुस्तक चाळले आणि खाली ठेवले मात्र.... अक्षरशः झडप घालून मी ते पुस्तक उचलले ..... ती अवाक..... आता माझा चेहरा अलीबाबाचा खजिना मिळाल्यासारखा अन तिचा काहीतरी मोठ्ठे घबाड गमावल्यासारखा....... उगाच तिने मला काही बोलून आमची तू तू मैं मैं होण्याआधीच मी चटदिशी फारशी घासाघीस न करता दुकानदाराला पैसे दिले आणि पुस्तक पर्स मध्ये टाकून रिक्षात बसलेही. न जाणो तिने हिसकावून घेतले तर.......

पुस्तकाचे नांव होते, " नोटस टू मायसेल्फ." लेखकः Hugh Prather. २३ जानेवारी १९३८ साली टेक्सासमध्ये जन्मलेला Prather, लेखक, मिनिस्टर व समुपदेशक होता. या पहिल्याच पुस्तकाने त्याला अतिशय प्रसिद्धी मिळवून दिली. आजवर या पुस्तकाच्या पन्नास लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या असून जवळपास दहा भाषांमध्ये अनुवादही झाला आहे. १९७० सालात प्रकाशित झालेले हे पुस्तक अक्षरशः तोंडतोंडी प्रसिद्धी होऊन हातोहात खपत होते आजही खपते आहेच.
१९६८ व ६९ या दोन वर्षाच्या कालावधीत लेखकाच्या मनात आलेले विचार आहेत हे सारे. लेखक म्हणतो, " मी बायकोला म्हटले की तू आपले घर तुझ्या शिक्षिकेच्या मिळणाऱ्या पगारात चालव व मी लिखाणात स्वतःला पूर्णवेळ झोकून देतो. ती तयार झाली. परंतु दोन वर्षे झाली तरीही केलेल्या लिखाणातील कुठलेच लिखाण स्वीकारले गेले नाही. शेवटी या साऱ्या काळात आपण आपल्यासाठी लिहिलेल्या रोजनिशीतील काही छोटे छोटे उतारेच संकलित करून प्रसिद्ध करावेत का.... असे वाटून कॅलिफोर्नियात राहणाऱ्या व नव्यानेच पुस्तक छपाईच्या व्यवसायात उतरलेल्या एका नवरा-बायकोच्या प्रकाशन संस्थेत पाठविले. त्याआधी त्या दोघांनी फक्त तीन पुस्तके छापली होती, तसेच त्यांच्या संस्थेची कुठेही जाहिरात नव्हती का कोणी प्रतिनिधीही नव्हता. थोडा वेळ लागला खरा परंतु अखेरीस यश आलेच. पुस्तक नुसतेच प्रसिद्ध झाले नाही तर त्यावर्षीचे बेस्ट सेलर पुस्तक ठरले व जबरदस्त रॉयल्टीही मिळाली. " त्यानंतर Hugh Prather ची इतर पुस्तकेही गाजली पण हे सर्वात बेस्ट होते.
या दोन वर्षात त्याच्या मनात आलेल्या भावना, विचार, असहायता , उदासी, डिप्रेशन ..... अनेकविध प्रसंगातून त्याला अभिप्रेत झालेले, आत कुठेतरी खोलवर स्पर्शून गेलेले भाव, विखुरलेले, भरकटलेले विचार मांडले आहेत. लेखक म्हणतो, " की ऐन तारुण्यात असलेल्या मला, अजून जीवन म्हणजे नक्की काय.... आपला स्वतःचा आपल्याप्रती -आपल्या माणसांप्रती, समाजाप्रती व जीवनाप्रती काय दृष्टिकोन आहे? जीवनात येणाऱ्या संकटांशी आपण सामना करू शकतो का? गोंधळलेली मनस्थिती, बालपण हे समर्थ संस्कार - जडणघडण देणारे नसल्याने, जगाशी सामना करण्याचे बळ, शिकवण, उपदेश नीटसे न मिळाल्याने सदैव द्यावा लागणारा लढा, त्यात लग्न टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड..... या साऱ्यांमधून वेळोवेळी मनात आलेल्या या विचारांनीच मला तारून नेलेय.
बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलेलेही असेल, संग्रहीही असेल . हे पुस्तक कधी वाचावे? खरे तर हे पुस्तक कधीही वाचावे. एकदा वाचावे, पुन्हा पुन्हा वाचावे. अतिशय साधे रोजच्या जीवनातलेच व आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलेच विचार आहेत तरीही पुन्हा ते जरूर वाचावे. कुठल्याही वेळी व मनाच्या कुठल्याही अवस्थेत. तुम्ही दमला असाल, अतिशय कंटाळला असाल, चिडचिडला असाल, आनंदात असाल, दुःखात असाल किंवा अगदी निष्क्रिय गोळ्यासारखे बसावे अशा विचारात असाल...... एकदा पुस्तक वाचायला घेतले की तुम्हाला शांत वाटेल, जीवन भरभरून आणि अर्थपूर्ण जगावेसे वाटेल. खाली काही अगदी मोजकेच उतारे नमूद करतेय..... तेही मोह अगदीच आवरला नाहीये म्हणून.... खरे तर पूर्ण पुस्तकही लिहून काढायला आवडले असते मला..... पण तसे करणे योग्य नाही.......
Often my desires are based on images of what
I think I want to be: " I want to work out a
theory of reality based on precognition. " Is
this a desire to do something today? If so, what?
Regardless of the subject of the desire, what
does it push me to do now? To drink? to turn
away from Gayle? To leave work early?This
effect is what the desire is " for ."
Perfectionism is slow death. Idols and ideals are
based on the past. If everything were to turn o
out just as I would want it to, just as I new.
My life would be an endless repetition of
state successes. When I make a mistake I
experience something unexpected.
The key to motivation is to look at how
far I have came rather than how far I have to go.
Guilt is a guide that will lead me whenever I
choose to follow. It will raise its righteous
banner and take me to the wasteland of my
incompetence. Guilt is a voice that will
speak whenever I choose to listen. It will
mournfully address any subject but one:
correcting the mistake.
My trouble is I analyze life instead of live it.
Fear is static that prevents me from hearing
my intuition.
All my life I have made it complicated, but it
is so simple. I love when I love. And when I
love, I am my self.
हे पुस्तक Amazon.com वर येथे उपलब्ध आहे. आपल्याकडे क्रॉसवर्ड/काही ठराविक बुक डेपोज/ रद्दीवाले/ जुनी पुस्तके विकणारे यांच्याकडे मिळू शकेल.
This is very interesting. Thanks to introducing a wonderful book to me. I won't say where it would be availabe. I would certainly search and let you know when I obtain it. Regards.
ReplyDeleteMangesh Nabar
मंगेश ब्लॉगवर आपले स्वागत आहे.अवश्य वाचून पाहा... :) अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
ReplyDeleteनाही वाचल अजुन पण तुम्ही केलेल्या वर्णनामुळे वाचावस वाटते आहे....बाकी तुमचा हे पुस्तक मिळवण्याचा प्रसंग भारीच... :)
ReplyDeleteताई, या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्स.
ReplyDeleteआत्ताच flipkart वरून मागवले आहे.
kharay pustake pahili ki pay thambtat ani apoaap aplya khajinyat bhar padat jate. he mazehi awadte shopping ahe.
ReplyDeletekahi oli kitihi wela wachlya tari tevdhyach chan watat dar weles
MAdhuri
लेख वाचून पुस्तक वाचावंसं वाटू लागलंय.
ReplyDeleteया पुस्तकाची soft copy नेटवर शोधायला हवी. कुणाला मिळाली तर circulate करावी.
विवेक.
ताई, छानच वाटतंय ग हे पुस्तक. त्या कोट्सवरून आणि एकूणच वर्णनावरून वाचावसं वाटतंय. या महिन्याच्या लायब्ररीफेरीत 'Notes to myself' आणि अपर्णाने सांगितलेलं 'my prison my home' उचलतो.
ReplyDeleteमला 'Fear is static that prevents me from hearing my intuition.' हे जाम आवडलं.
आणि पोस्टच्या पहिल्या ओळीशी १०१% सहमत. :-)
davbindu, जरूर वाच. धन्स रे.
ReplyDeletecanvas,कसं वाटलं ते कळवशील? आभार.
ReplyDeleteमाधुरी, यस्स्स्स... काही ओळी मनात घर करून जातात. पुन्हा पुन्हा तितक्याच ताकदीने भिडत राहतात. धन्स गं. :)
ReplyDeleteVivek, आवडेल तुम्हाला. Prather ची अजूनही पुस्तके वाचनीय आहेत. पण हे बेस्ट. मला सॉफ्ट कॉपी मिळाली तर लिंक टाकेनच. अभिप्रायाबद्दल आभार.
ReplyDeleteहेरंब, तू सुचवलेले पुस्तक मिळवते आता. अक्षरे भरभरून खाणारे वेडे आपण... :D
ReplyDeleteछान असेल गं हे पुस्तक असं वाटतंय...आता घाईत आहे पण हे लिस्टवर ठेवेन....मला हे वाक्य फ़ार आवडलं..
ReplyDeleteThe key to motivation
is to look at how far I have came
rather than how far I have to go...
ani post mastach jhaliye...jiyo...
अपर्णा, अगं या पुस्तकात असे अनेक उतारे आहेत जे आपल्याला खरेच खूप उभारी देतात... :) मी वपुंचा एकदम जोरदार पंखा... मला हमखास त्यांची आठवण होते...
ReplyDeleteChan aahe lekh..
ReplyDeleteNakki vachne he pustak...
Marathi madhe pan VAPU che asech eak pustak aahe..VAPURZA...
गणेश,हे पुस्तक आवडेल पाहा तुम्हाला. वपुंची एकजात सारी पुस्तके माझ्या घरच्या संग्रहात व बरेचसे पॅराज तोंडपाठ...:) अभिप्रायाबद्दल आभार.
ReplyDeletereally very interesting..thanx a lot for sharing ..ajjch jaun gheun yete...
ReplyDeleteताई मस्त गं!!! अगं मलाही हीच सवय आहे की अगदी चिटोराही वाचायचा.... आई तर मला कधीच पुस्तकांचा किंवा कपाटातला जुना कप्पा आवरायला/ माळा आवरायला पाठवत नाही... आणि चुकून पाठवलेच तर ’उगा वाचत बसू नकोस’ असे १० वेळा बजावते... :)
ReplyDeleteतू सांगितलेले पुस्तक मस्तच दिसतेय... नक्की वाचले पाहीजे. यावेळेस भारतात गेल्यावर बरीच खरेदी आहे त्यात आता भार... अजुन काही असतील तर पटापट टाक म्हणजे हे राहिले ते राहिले व्हायला नको!!! :)
सोमवारी जातोय धोबीतलावाला, तेंव्हा पहातो सापडलं तर. :)
ReplyDeleteमाऊ, तुला नक्कीच आवडेल.:)
ReplyDeleteतन्वी,मायदेशात गेले की पुस्तकांची खरेदी ही नितांत गरजेच्या विभागात मोडणारी.:)कळवते गं तुला अजून काही.
ReplyDeleteमहेंद्र, मिळाले तर घेच रे. आवडेलच तुला.
ReplyDeleteजबरदस्त वाटतंय. शोधतो यावेळेस जाऊन.
ReplyDeleteफ्लिपकार्टवरुन आलं आहे... वाचुन कळवितो
ReplyDeleteविद्याधर, जरूर वाचून पाहा.... आवडेल आपल्याला. धन्यवाद.
ReplyDeleteअरे... आलंही का... :) नक्की कळवं.
ReplyDeleteअरे हा लेखक तर जाम माझ्यासारखा वेंधळा दिसतोय....
ReplyDeleteअर्थात असलं काही लिहिण्याची आपली काही टाप नाही.
जे काय थोडं इथे आमच्यासाठी आणलंय त्यासाठी धन्यवाद!
It is one of my all time favourit books. Churchgate la pustakanchya dukana madhye phiratana 10 varshanpurvi mala sapadale hote.. It is till close to my heart
ReplyDelete